नि. 33 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र.147/2010 नोंदणी तारीख – 3/6/2010 निकाल तारीख – 28/9/2010 निकाल कालावधी – 115 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ 1. श्री मुरलीधर सुंदरदास गुजर, रा. रहिमतपूर, रेल्वे स्टेशनजवळ, रहिमतपूर, ता.कोरेगाव जि.सातारा 2. सौ कल्पना मुरलीधर गुजर रा. रहिमतपूर, रेल्वे स्टेशनजवळ, रहिमतपूर, ता.कोरेगाव जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री. एस.डी.शिंदे) विरुध्द 1. श्रीकांत रामनारायण मर्दा, चेअरमन कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 2. कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा तर्फे व्यवस्थापक राजू शंकरराव सावंत, ----- जाबदार क्र.1 व 2 (अभियोक्ता श्री पी.के.बारसावडे) 3. श्री युवराज बाळकृष्ण केंजळे, व्हाईस चेअरमन कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 4. संजय नंदलाल झवर, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 5. श्री प्रविण छगनलाल ओसवाल, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 6. श्री सुभाष मोतीलाल भंडारी, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 7. श्री सुनिल रणछोडदास गांधी, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 8. श्री प्रभाकर व्यंकट बर्गे, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 9. श्री संभाजी पतंगराव बर्गे, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 10. श्री रविंद्र शंककराव भुजबळ, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 11. श्री दत्तात्रय शिवराम नामदास, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 12. श्री प्रल्हाद माधवराव घोडके, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा 13. सौ मंदाकिनी श्रीकांत सुतार, संचालक कै राजकुमार गांधी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था लि. कोरेगाव, कल्पराज अपार्टमेंट, मेनरोड, साखळी पुलाजवळ, ता.कोरेगाव जि.सातारा ----- जाबदार क्र.3 ते 5 व 7 ते 13 (एकतर्फा ) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी जाबदार संस्थेमध्ये रक्कम रु.50,000/- दामदुप्पट ठेव योजनेअंतर्गत रक्कम ठेव म्हणून ठेवलेली आहे. सदरच्या ठेवीची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी सदरची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तसेच अर्जदार यांचे जाबदार संस्थेमध्ये बचत खाते असून त्यामध्ये काही रक्कम शिल्लक आहे. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना सदरच्या बचत खात्यातील रक्कम देण्यासही टाळाटाळ केली. अर्जदार यांनी जाबदार यांना दि.12/4/2010 रोजी वकीलांचेमार्फत रजिस्टर्ड पोस्टाने नोटीस पाठवून रकमेची मागणी केली. सदरची नोटीस जाबदार यांना मिळाली. तथापि जाबदार यांनी नोटीशीला उत्तर दिले नाही अथवा अर्जदार यांची रक्कमही परत दिलेली नाही. थोडक्यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्यात यावयाची रक्कम न दिल्यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्थेचे ग्राहक आहेत. त्यामुळे जाबदार संस्थेकडून मुदत ठेव पावतीची व बचत खात्यातील एकूण देय रक्कम वसूल होऊन मिळण्यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्ये अर्जदार यांनी ठेवीची व्याजासह होणारी एकूण रक्कम तसेच बचत खात्यातील व्याजासह होणारी एकूण रक्कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. 2. प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.5, 7, 8, 10, 11 व 13 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती नि. 9 ते 14 ला दाखल आहे. जाबदार क्र.3, 4, 9 व 12 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचे पोस्टाचे शेरे असलेले लखोटे प्रस्तुतकामी दाखल आहेत. जाबदार क्र. 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, व 13 हे नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. जाबदार क्र.6 यांना अर्जदार यांचे नि.24 वरील आदेशानुसार प्रस्तुत प्रकरणातून वगळण्यात आले आहे. 4. जाबदार क्र.1 व 2 यांनी नि.28 ला त्यांचे लेखी म्हणणे दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकुर नाकारला आहे. ठेवीची मुदत संपलेनंतर दोन वर्षाचे आत अर्जदार यांनी ठेव रकमेची मागणी केलेली नव्हती. जाबदार यांनी ठेवपावतीवरील देय रकमेपैकी रु.1,50,000/- अर्जदार यांना दिलेले आहेत. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 164 नुसार अर्जदारने जाबदार यांना नोटीस दिलेली नाही. तसेच सहायक निबंधकांची परवानगीही घेतलेली नाही. शासनाचे कर्जमाफी घोषणेमुळे जाबदार संस्थेच्या कर्जदार कर्जफेड करण्यास टाळाटाळ करुन लागले त्यामुळे जाबदार संस्था अडचणीत आली आहे. सध्या पतसंस्थेवर प्रशासकांची नेमणूक केली आहे. कर्जदारांविरुध्द वसुलीची कारवाई चालू आहे. सहकार खात्याचे अध्यादेशानुसार रु.10,000/- पर्यंतची ठेव परत करण्यात जाबदार तयार आहेत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 5. अर्जदार यांनी या अर्जाचे कथनातील सिध्दतेसाठी नि. 2 ला शपथपत्र दिलेले आहे. ते शपथपत्र पाहिले. अर्जदार यांनी नि. 5 सोबत दाखल केलेली मूळ ठेवपावती व बचत खात्याचे पासबुक पाहिले. 6. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार ठेवीदार ग्राहकाने या मे.मंचामध्ये दाद मागणेपूर्वी महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 चे कलम 164 नुसार नोटीस देणे बंधनकारक नाही तसेच सहायक निबंधकांची परवानगी घेणेही बंधनकारक नाही. अर्जदार व जाबदार संस्था यांचेमधील वाद हा ठेवीदार ग्राहक व पतसंस्था यांचेदरम्यानचा वाद असलेने सदरचे तक्रारप्रकरणास महाराष्ट्र सहकारी संस्थां कायदा 1960 मधील तरतुदी लागू होत नाहीत असे या मंचाचे मत आहे. तसेच ठेवीची मुदत संपलेनंतर अगर संपणेपूर्वी ठेव रक्कम परत मिळण्याचा अर्जदार यांचा कायद्यानेच अधिकार आहे. सबब अर्जदार हे ठेवीची मूळ रक्कम व त्यावरील व्याज तसेच बचत खात्यातील रक्कम परत मिळणेस पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 7. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारअर्जदार यांचा अर्ज मुदतीत नाही. परंतु अर्जदार यांनी शपथपत्राद्वारे असे कथन केले आहे की, त्यांनी जाबदार यांचेकडे ठेवीच्या रकमांची मागणी वेळोवेळी केली त्यावेळी जाबदार यांनी संगनमत करुन कॅश उपलब्धतेनुसार ठेवीच्या रकमा दिल्या जातील असे सांगितले. सदरचे कथन पाहता अर्जदार यांनी ठेवीची मुदत संपलेनंतर ठेवरकमेची जाबदार यांचेकडे वेळोवेळी मागणी केल्याचे दिसून येते, सबब प्रस्तुतचा तक्रारअर्ज मुदतीत आहे असे या मंचाचे मत आहे. 8. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की, त्यांनी अर्जदार यांचे ठेवपावतीवरील रु.1,50,000/- हे अर्जदार यांना दिलेले आहेत. परंतु अर्जदार यांनी दाखल केलेल्या प्रत्युत्तरामध्ये त्यांनी जाबदार यांचे सदरचे कथन स्पष्टपणे नाकारलेले आहे. तसेच जाबदार यांनी अर्जदार यांना सदर रक्कम अदा केल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. जर जाबदार यांनी वादातील ठेवपावतीवरील रक्कम अर्जदार यांना अदा केली असती तर सदरची ठेवपावती त्यांची जमा करुन घेतली असती. परंतु सदरची ठेवपावती ती अर्जदार यांचे ताब्यात आहे. या सर्व बाबींचा विचार करता जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवपावती क्र.3534 वरील दामदुप्पट रक्कम अदा केलेली नाही हे दिसून येते. सबब सदरचे ठेव पावतीवरील दामदुप्पट रक्कम तसेच बचत खात्यातील शिल्लक रक्कम व्याजासह जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तरित्या परत मिळणेस अर्जदार पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. 9. या सर्व कारणास्तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्यात येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, व 13 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ. ठेवपावती क्र. 3534 वरील दामदुप्पट रक्कम ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून संपूर्ण रक्कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्केंप्रमाणे व्याजासह द्यावी. ब. बचत खाते क्र.554 वरील शिल्लक रक्कम बचत खात्याचे नियमाप्रमाणे देय होणा-या व्याजासह द्यावी. क. मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 3,000/- द्यावेत. ड. अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु. 2,000/- द्यावेत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 28/9/2010 (सुनिल कापसे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |