Maharashtra

Chandrapur

CC/17/162

Shri Naresh Gangadharrao Bakade At Warora - Complainant(s)

Versus

Kadar Siffudhin Husain At Hinganghat - Opp.Party(s)

Adv. Satpute

30 Nov 2018

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/17/162
( Date of Filing : 26 Sep 2017 )
 
1. Shri Naresh Gangadharrao Bakade At Warora
At Subhash Ward Warora
chandrapur
maharashstra
...........Complainant(s)
Versus
1. Kadar Siffudhin Husain At Hinganghat
At Shivaji Ward Highanghat
wardha
maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 30 Nov 2018
Final Order / Judgement

::: नि का :::

(मंचाचे निर्णयान्‍वये,  मा. श्री.अतुल डी.आळशी, अध्‍यक्ष )

(पारीत दिनांक :- 30/11/2018)

अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक सरक्षंण कायदयाचे कलम १२ अन्‍वये दाखल केली आहे.

अर्जदाराच्‍या तक्रारीचा आशय थोडक्‍यात खालील प्रमाणे.

1.     अर्जदाराने आापल्‍या तक्रारीत असे कथन केले आहे कि, गैरअर्जदार क्र.1 व 2 हे डेव्‍हलपर्स असून त्‍यांनी मौ.वरोरा, हलका क्र.15, भुमापन क्र.298,299 आणि 190 येथील शेतजमीनीवर फकरी बु-हाणी टाऊन या नांवाने लेआऊट टाकला व ग्राहकांकरीता भुखंड उपलब्‍ध करून दिले. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी दिलेल्‍या माहितीपत्रकामुळे आकर्षीत होवून अर्जदाराने सदर अभिन्‍यासातील प्‍लॉट क्र.44, आराजी 179.27 स्‍क्‍वे.मि. हा भुखंड किंमत रू.4,84,344/- मध्‍ये खरेदी करण्‍याबाबत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेशी दिनांक 8/1/2012 रोजी इसारपत्र केले आणि इसारापोटी रक्‍कम रू.96,868/- गैरअर्जदार क्र.1 व 2 हयांना दिली. भुखंडाची उर्वरीत किमतीची रक्‍कम समान चार हप्‍त्‍यांत पहिली किस्‍त रू.96,868/- दि.30/5/2012 चे आंत दुसरी किस्‍त रू.96,868/- दि.30/10/2012 चे आंत तिसरी किस्‍त रू.96,868/- दि.30/5/2013 चे आंत व चौथी किस्‍त रू.96,868/- दि.30/10/2013 चे आंत अशा चार किस्‍तीत देण्‍याचे ठरले. त्‍यानुसार अर्जदाराने दिनांक 8/7/2012 रोजी रू.96,868/- ची किस्‍त गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दिली. याबाबत गैरअर्जदार यांनी अर्जदारांस पावती दिली. करारानुसार लेआऊट दिनांक 30/10/2013 पर्यंत अकृषक करून तसेच त्‍याचे सौंदर्यीकरण करून देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची होती. मात्र त्‍यानंतर बराच कालावधी होवूनदेखील गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून लेआऊट अकृषक करण्‍यांत आला नाही तसेच त्‍याबाबत अर्जदारांनी पाठपूरावा करूनही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु त्‍यानंतर अर्जदार उर्वरीत रक्‍कम अदा करून भुखंडाचे विक्रीपत्र करून घेण्‍यांस तयार असूनही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक कारणास्‍तव भुखंडाची विक्री करून देण्‍यांस असमर्थता व्‍यक्‍त केली व उभय पक्षातील इसारपत्र दिनांक 8/1/2012 रोजी रद्द करून 261 रू.प्रती चौ.फुट या दराने भुखंडाची रक्‍कम रू.2,13,026/-ही प्रत्‍येकी रू.53,256/- प्रमाणे चार किस्‍तीत परत करण्‍याचे कबूल केले. त्‍यापैकी गैरअर्जदारांनी रू.53,256/-ची पहिली किस्‍त अर्जदारास दिली, परंतु त्‍यानंतरची दुसरी, तिसरी व चौथी प्रत्‍येकी रू.53,256/- अशा तीन किस्‍तींची एकूण रक्‍कम रू.1,59,768/-गैरअर्जदारांनी अर्जदारांना दिली नाही. अर्जदारांनी अनेकदा संपर्क साधूनही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी प्रतिसाद न दिल्‍याने अर्जदाराने वकील श्री.धांडे यांच्‍यामार्फत गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस पाठविला, परंतु त्‍यांनी तो नोटीस स्विकारला नाही किंवा त्‍याची दखलही घेतली नाही. सबब तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार मंचात दाखल केली असून तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदारांनी दिलेल्‍या न्‍युनतापूर्ण सेवेबद्दल त्‍यांना दोषी ठरवून गैरअर्जदारांनी दिनांक 8/1/2012 चे इसारपत्रानुसार उर्वरीत रक्‍कम स्विकारून आवंटन केलेला भुखंड क्र.44 चे पंजीकृत विक्रीपत्र अर्जदाराला करून द्यावे व काही कायदेशीर अडचणीमुळे विक्रीपत्र करून देणे शक्‍य नसल्‍यांस त्‍यापोटी भरलेली रक्‍कम रू.1,59,768/- द.सा.द.शे. 18 टक्‍के व्‍याजासह तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रू.1,00,000/- व प्रकरणाचा खर्च रू.5000/- गैरअर्जदाराकडून मिळण्‍याचे आदेश व्‍हावे.

2.     अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 विरुध्‍द मंचातर्फे नोटीस काढण्‍यात आले.  मात्र नोटीसचे लिफाफे ‘’घेण्‍यांस नकार’’ या शे-यासह मंचास परत आले. सबब मंचाने दिनांक 20/8/2018 रोजी गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेविरूध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍यांबाबत आदेश पारीत केला.

3.    अर्जदाराची तक्रार, दस्‍ताऐवज, शपथपञ, लेखी युक्तिवाद तसेच तोंडी युक्‍तीवाद यावरुन खालील मुद्दे मंचाच्‍या विचारार्थ घेण्‍यात आले. त्‍यावरील निष्‍कर्ष आणि त्‍याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.

 

मुद्दे                                                    निष्‍कर्ष

(1)   अर्जदार गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचे ग्राहक आहे काय ?                  होय 

(2)  गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार क्र.1 व 2 यांना न्‍युनतापूर्ण सेवा

     दिली आहे काय ?                                              होय

 

    (3)  अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्‍यास पाञ आहे काय ?             अंतीम आदेशाप्रमाणे

 

कारण मिमांसा

मुद्दा क्रं. 1 बाबत ः- 

4.     गैरअर्जदार क्र.1 व 2 हे डेव्‍हलपर्स असून त्‍यांनी गैरअर्जदार मौ.वरोरा, हलका क्र.15, भुमापन क्र.298,299 आणि 190 येथील शेतजमीनीवर फकरी बु-हाणी टाऊन या नांवाने लेआऊट टाकून अर्जदारास सदर अभिन्‍यासातील प्‍लॉट क्र.44, आराजी 179.27 स्‍क्‍वे.मि. हा भुखंड किंमत रू.4,84,344/- मध्‍ये विकण्‍याबाबत दिनांक 8/1/2012 रोजी इसारपत्र केले आणि इसारापोटी रक्‍कम रू.96,868/- स्विकारली. करारानुसार अर्जदाराने दिनांक 8/7/2012 रोजी रू.96,868/- ची किस्‍त गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दिली. याबाबत गैरअर्जदार यांनी केलेले इसारपत्र व पावती प्रकरणात उपलब्‍ध असून सदर दस्‍तावेजावरून अर्जदार हा गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे असे सिध्‍द होते. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रं. 2 बाबत ः- 

5. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा रिअॅलिटीजचा व्‍यवसाय असून त्‍यांनी मौ.वरोरा, हलका क्र.15, भुमापन क्र.298,299 आणि 190 येथील शेतजमीनीवर फकरी बु-हाणी टाऊन या नांवाने टाकलेल्‍या लेआऊटमधील प्‍लॉट क्र.44, आराजी 179.27 स्‍क्‍वे.मि. हा भुखंड किंमत रू.4,84,344/- मध्‍ये खरेदी करण्‍याबाबत अर्जदाराशी दिनांक 8/1/2012 रोजी इसारपत्र केले आणि इसारापोटी रक्‍कम रू.96,868/- स्विकारली. भुखंडाची उर्वरीत किमतीची रक्‍कम रू.96,868/- च्‍या समान चार हप्‍त्‍यांत देण्‍याचे ठरले, व त्‍यानुसार अर्जदाराने दिनांक 8/7/2012 रोजी रू.96,868/- ची किस्‍त गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दिली. याबाबत गैरअर्जदार यांनी अर्जदारांस पावती दिली. करारानुसार लेआऊट दिनांक 30/10/2013 पर्यंत अकृषक करून तसेच त्‍याचे सौंदर्यीकरण करून देण्‍याची जबाबदारी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांची होती. मात्र त्‍यानंतर बराच कालावधी होवूनदेखील गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून लेआऊट अकृषक करण्‍यांत आला नाही तसेच त्‍याबाबत अर्जदारांनी पाठपूरावा करूनही प्रतिसाद मिळाला नाही. परंतु त्‍यानंतर अर्जदार उर्वरीत रक्‍कम अदा करून भुखंडाचे विक्रीपत्र करून घेण्‍यांस तयार असूनही गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्‍तीक कारणास्‍तव भुखंडाची विक्री करून देण्‍यांस असमर्थता व्‍यक्‍त केली व उभय पक्षातील इसारपत्र दिनांक 8/1/2012 रोजी रद्द करून 261 रू.प्रती चौ.फुट या दराने भुखंडाची रक्‍कम रू.2,13,026/-ही प्रत्‍येकी रू.53,256/-प्रमाणे चार किस्‍तीत परत करण्‍याचे कबूल केले. याबाबतच्‍या करारपत्रावर गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे गैरअर्जदार क्र.1 यांनी स्‍वाक्षरी केलेली आहे, हे दाखल दस्‍तावेजावरून दिसून येते.  एकुण परत करावयाच्‍या रकमेपैकी गैरअर्जदारांनी रू.53,256/-ची पहिली किस्‍त अर्जदारास दिली, परंतु त्‍यानंतरची दुसरी, तिसरी व चौथी प्रत्‍येकी रू.53,256/- अशा तीन किस्‍तींची एकूण रक्‍कम रू.1,59,768/-गैरअर्जदारांनी अर्जदारांना दिली नाही असे अर्जदाराने दाखल केलेल्‍या दस्‍तावेजांवरून दिसून येते. गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्‍यांशी  भुखंड विक्रीचा करार करून भुखंड किमतीपोटी काही रक्‍कम स्विकारलेली असली तरीही सदर शेतजमिनीस अद्याप अकृषक परवानगी मिळालेली नसल्‍याचे तक्रारकर्त्‍याचे कथन आणी दस्‍तावेजांवरून निदर्शनांस येते.  शिवाय अर्जदाराचे याबाबतचे शपथपत्रावरील कथन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी कोणताही बचाव सादर करून खोडून काढलेले नाही. सबब गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी  अर्जदार क्र.1 व 2 यांचेशी  भुखंड विक्रीचा करार करून भुखंड किमतीपोटी काही रक्‍कम स्विकारलेली असली तरीही सदर भुखंडाचे विक्रीपत्र अर्जदार क्र.1 व 2 चे नांवाने करून दिले नाही व अर्जदारांप्रती न्‍युनतापूर्ण सेवा दिलेली आहे असे मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्‍तर हे होकारार्थी नोंदविण्‍यात येत आहे.

मुद्दा क्रं. 3  बाबत ः-

6.    मुद्दा क्रं. 1 व 2 च्‍या विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

अंतीम आदेश

            (1) अर्जदाराची तक्रार क्र.162/2017 अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

            (2) गैरअर्जदार क्र.1 व 2  यांनी वैयक्तिक व संयुक्‍तरीत्‍या अर्जदार क्र.1 व 2 यांचेकडून विवादीत लेआऊटामधील भुखंड क्र. 44 चे किमतीची उर्वरीत रक्‍कम स्विकारून त्‍यांना सदर भुखंडाचे पंजीबद्ध विक्रीपत्र करून द्यावे व प्रत्‍यक्ष ताबा हस्‍तांतरीत करावा. सदर आदेशाची पुर्तता आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत करावी.

             (3) वर नमूद क्र.2 ची पुर्तता करणे शक्य नसल्‍यांस गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तरीत्‍या अर्जदार क्र.1 व 2 कडून भुखंडांचे किमतीपोटी स्विकारलेल्‍या रक्‍कमेपैकी उर्वरीत रक्‍कम रू.1,59,768/-, त्‍यावर कराराच्‍या दिनांकापासून रक्‍कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याजासह परत करावी.  

             (4) गैरअर्जदार क्र.1 व 2  यांनी वैयक्तिक वा संयुक्‍तरीत्‍या अर्जदाराला झालेल्‍या शारीरिक मानसिक ञासापोटी रु.25,000/- व तक्रारीच्‍या खर्चापोटी रू.10,000/-, आदेशाची प्रत मिळाल्‍यापासून 45 दिवसाचे आत अर्जदाराला दयावे.

             (5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्‍य पाठविण्‍यात यावी.

चंद्रपूर

दिनांक – 30/11/2018

 

                              

 

(श्रीमती.कल्‍पना जांगडे(कुटे))     (श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))      (श्री. श्री.अतुल डी. आळशी)          

      सदस्‍या                         सदस्‍या                         अध्‍यक्ष 

                      जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.

 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.