प्रकरण पंजीबध्द करण्यांत आले दि.04/05/2010 विरुध्दपक्षास नोटीस लागून हजर राहण्याची तारीख :- 04/05/2010 मा. अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बुलडाणा यांचे समक्ष प्रकरण क्रमांक :- सी.सी. /98/2010 निकाल तारीख :- 22/11/2010 श्रीमती वंदना पुरुषोत्तम गायगोळ : वय 28 वर्षे, धंदा - शेती : तक्रारकर्ती रा. पिंप्री अडगांव, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा. : --विरुध्द-- 1) कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. : सिंधुदुर्ग अपार्टमेंट, जोगळेकर प्लॉट : रुख्मीनी नगर जवळ, जगताप पेट्रोल पंप मागे, : अमरावती 444 606 : 2) नॅशनल इन्शुअरन्स कंपनी लि. आयएक्स कर्मशियल : युनियम हाऊस, एक्सलसियल सिनेमाच्या मागे, : 9- वॉलेस स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 400 001. : विरुध्दपक्ष जिल्हा मंचाचे पदाधिकारी :- 1) श्री.राजीव त्रिं. पाटील - अध्यक्ष 2) श्रीमती नंदा लारोकर - सदस्या तक्रारकर्त्यातर्फे वकील :- श्री.डि.एस.तायडे विरुध्दपक्ष क्र.1 तर्फे :-प्रतिनिधी श्री.कोल्हे विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे वकील :- श्री.सी.एस.खरात. (मा.अध्यक्ष श्री.राजीव त्रिं. पाटील यांनी निकाल कथन केला) आ दे श प त्र 1.. तक्रारकर्तीनुसार तिचे शेतकरी पती पुरुषोत्तम वामनराव गायगोळ यांचा दि.20/06/2007 रोजी अंगावर विज पडून अपघाती मृत्यू झाला. ज्यानंतर तक्रारकर्तीने त्यांच्या मृत्यूबाबत शेतकरी अपघात वैयक्तीक विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मिळण्याकरीता तहसिलदार संग्रामपूर यांच्यामार्फत विरुध्दपक्ष क्र.1 यांच्याकडे विम्याचा दावा ..2.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /98/2010 ..2.. पाठविला होता. मात्र विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी आजतागायत संबंधीत विमा दावा निकालात काढलेला नाही व म्हणून तक्रारकर्तीने ही तक्रार दाखल करुन तिला संबंधीत विम्याची रक्कम व व्याज इत्यादी मिळावे म्हणून ही तक्रार दाखल केलेली आहे. 2.. विरुध्दपक्ष क्र. 1 यांच्या लेखी जवाबानुसार त्यांना संबंधीत विम्याचा दावा दि.20/6/2007 रोजी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सदरचा दावा दि.21/9/2007 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 कडे पाठविला आहे. मात्र विरुध्दपक्ष क्र.2 ने दि.23/2/2009 रोजी संबंधीत विमा दावा नामंजूर केलेला आहे. म्हणून या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र.1 यांची सेवेतील कोणतीही त्रुट नसल्यामुळे त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यांत यावी. 3.. विरुध्दपक्ष क्र.2 यांच्या लेखी जवाबानुसार संबंधीत प्रकरणामधे मृत शेतकरी पुरुषोत्तम वामनराव गायगोळ यांचे नांव त्यांच्या मृत्यूनंतर 7/12 च्या उता-यामधे दाखल करण्यांत आलेले आहे. अशा प्रकारे अपघाताच्या दिवशी संबंधीत व्यक्तीच्या नावाने कोणतीही शेती नसल्यामुळे विरुध्दपक्षाने संबंधीत व्यक्तीवा विमा दावा योग्य त्या कारणाकरीता खारीज केलेला आहे. तक्रारकर्तीने महसुल अधिका-यामार्फत बेकायदेशीरपणे तिच्या पतीच्या मृत्यूनंतर त्यांचे नांवाची नोंद 7/12 उता-यामधे घेतलेली आहे व म्हणून विरुध्दपक्षाने योग्य त्या कारणाकरीता तिचा विम्याचा दावा नामंजूर केलेला असल्यामुळे ही तक्रार खारीज करण्यांत यावी. 4.. या प्रकरणातील तक्रार अर्ज, विरुध्दपक्षाचा लेखी जवाब व उभय बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेता आमच्या समोर खालील मुद्दे निर्णयासाठी उपस्थित होतात. अ) विरुध्दपक्षाची या प्रकरणातील सेवेतील त्रुटी आहे काय ? -- होय. ब) या तक्रारीचा अंतिम आदेश काय ?-- कारणमिमांसेप्रमाणे.. 5.. उभय पक्षांनी लेखी युक्तीवाद दाखल केला व तोंडी युक्तीवाद केला. या ..3.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /98/2010 ..3.. प्रकरणातील वादाचा एकमेव मुद्दा मृत पुरुषोत्तम गायगोळ हा अपघाताच्या दिवशी शेतकरी होता अथवा नाही इतकाच आहे. या संबंधी तक्रारकर्तीने जी कागदपत्रे या प्रकरणात सादर केलेली आहे त्यावरुन असे दिसून येते की, दि.10/5/2007 रोजी मौजे पिंप्री अडगांव, ता.संग्रामपूर, जि.बुलडाणा येथील फेरफारातील नोंद क्र.1091 नुसार वाटणी पत्रकाची नोंद करण्यांत येऊन त्यामधे पुरुषोत्तम गायगोळ यांना मौजे पिंप्री अडगांव येथील गट क्रमांक 296 मधील 3 हेक्टर 17 आर जमीनी पैकी 1 हेक्टर 42 आर इतकी जमीन देण्यांत आलेली होती. या फेरफाराची प्रत तक्रारकर्तीने या प्रकरणात दाखल केली आहे. 5. विरुध्दपक्ष क्र.2 च्या वकीलांनी त्यांच्या लेखी युक्तीवादात तसेच तोंडी युक्तीवादा दरम्यान संबंधीत फेरफार हा संशयपूर्ण असल्याचे नमूद केले आहे. याकरीता त्यांनी खाजगी इनव्हेस्टीगेटर श्री.डि.डि.शेख यांनी केलेल्या चौकशीमधील काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यानुसार संबंधीत वाटणी पत्राठी दि.9/5/2007 रोजी जे स्टॅम्प पेपर विकत घेण्यांत आले होते त्या अनुक्रमांक 126 व 127 च्या नोंदीमधे मुळ रजिस्टरमधे काही खाडाखोड दिसून येते. त्याचप्रमाणे त्या फेरफाराची नोंद पिंप्री अडगांव येथील फेरफार क्रमांक 1090 नुसार घेण्यांत आली आहे. त्या नोंदीवरुन दि.2/6/2007 रोजीची मंडळ अधिकारी यांची सही देखील संशयास्पद वाटते. मंचानुसार दि.9/5/2007 रोजी विक्री झालेल्या रु.100/-च्या दोन स्टॅम्पमधील नोंदीबाबत कोणतीही खाडाखोड झालेली दिसून येत नाही. तसेच फेरफार क्र.1090 मधे देखील मंडळ अधिकारी यांच्या सहीमधे व त्यांच्या इतर सहयामधे कोणताही फरक दिसून येत नाही. त्यामुळे विरुध्दपक्षाने जरी याबाबत काही चौकशी केली असेल तरीही त्यामधून कोणताही ठाम निष्कर्ष काढता येत नाही. तसेच विरुध्दपक्षाने संबंधीत दावा नाकारल्याबाबत देखील तक्रारकर्तीला कळविलेले दिसून येत नाही. त्यामुळे कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विम्याचा दावा ..4.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /98/2010 ..4.. फेटाळला असल्यामुळे विरुध्दपक्षाने तक्रारक्रर्तीला विम्याची रक्कम व त्यावर योग्य ते व्याज इत्यादी देण्याचा आदेश पारीत करुन ही तक्रार मंजूर करण्यांत येते. 6.. या प्रकरणातील विरुध्दपक्ष क्र.1 यांच्या लेखी जवाबानुसार त्यांनी तक्रारकर्तीचा विम्याचा दावा संपूर्ण पडताळणी करुन दि.21/09/2007 रोजी विरुध्दपक्ष क्र.2 यांच्याकडे पाठविला होता. विरुध्दपक्ष क्र.1 च्या लेखी जवाबानुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन घेतल्यानंतरच ते संबंधीत दावा विमा कंपनीकडे पुढील कार्यवाहीकरीता पाठवित असतात. त्यामुळे या प्रकरणात विरुध्दपक्ष क्र.2 यांना विरुध्दपक्ष क्र.1 यांच्यामार्फत तक्रारकर्तीचा विम्याचा परिपूर्ण प्रस्ताव हा सप्टेंबर 2007 मधेच प्राप्त झाला होता हे स्पष्ट आहे. त्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 यांनी त्या पुढील एक महिन्यात म्हणजेच जास्तीत जास्त 31/10/2007 पर्यत त्यावर उचीत कार्यवाही करणे आवश्यक होते. मात्र विरुध्दपक्ष क्र.2 यांनी दि.23/02/2009 रोजी कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय तक्रारकर्तीचा विम्याचा दावा नाकारल्या असल्यामुळे विरुध्दपक्ष क्र.2 हे तक्रारकर्तीला महाराष्ट्र शासनाच्या खालील निर्णयानुसार योग्य ते व्याज देखील द्यायला बाध्य आहेत असे मंचाचे मत आहे. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या, शासन निर्णय क्रमांक शेअवि 2008/प्र.क्र.187/11 अ, मंत्रालय विस्तार, मुंबई 400 032, दि.6/09/2008 नुसार वरील योजनेची अंमलबजावणी, कार्यपध्दती व नियुक्त यंत्रणाची कर्तव्ये आणि जबाबदारी याबाबत निर्देश देण्यांत आलेले आहेत. यामधील कलम 23 (इ)(1) व (2) हे खालीलप्रमाणे आहे. (1) विमा सल्लागार कंपनीने सादर केलेला विमा प्रस्ताव तपासून परिपूर्ण प्रस्ताव स्विकारुन पोहोच देतील. एक महिन्यात त्यावर निर्णय घेवून नुकसान ..5.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /98/2010 ..5.. भरपाईच्या रकमेचा धनादेश शेतक-यांच्या वारसदारांच्या बचत खात्यात जमा करतील. (2) विमा प्रस्तावात त्रुटी असल्यास त्रुटीबाबतचे पत्र किंवा दावा नामंजूर असल्यास त्याबाबतचे पत्र संबंधीत अर्जदारास पोहोच करतील व त्याची प्रत विमा सल्लागार कंपनी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांना देतील. परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यापासून एक महिन्याच्या आत उचीत कार्यवाही न केल्यास तीन महिन्यापर्यत दावा रकमेवर दरमहा 9 टक्के व त्यानंतर पुढे 15 टक्के व्याज देय राहील. त्यामुळे या प्रकरणात विरुध्दपक्ष तक्रारकर्तीला दि.01/11/2007 ते दि.31/01/2008 या तीन महिन्याच्या कालावधीकरीता द.सा.द.शे. 9% दराने व दि.01/02/2008 पासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यत द.सा.द.शे.15% दराने व्याज द्यायला बाध्य आहे असे मंचाचे मत आहे. सबब खालील अंतीम आदेश पारीत करण्यांत येत आहे. अं ती म आ दे श 1) विरुध्दपक्षाने कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय तक्रारकर्तीचा विम्याचा दावा फेटाळून सेवेतील त्रुटी दर्शविली आहे. सबब विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला तिचे मृत शेतकरी पती पुरुषोत्तम वामनराव गायगोळ यांच्या दि.20/6/2007 रोजी झालेल्या अपघातील मृत्यूबाबत शेतकरी वैयक्तीक अपघाता विमा योजनेअंतर्गत विम्याची रक्कम रु.1,00,000/- (अक्षरी रु.एक लक्ष फक्त) ची रक्कम द्यावी. तसेच या रकमेवर दि.01/11/2007 ते दि.31/01/2008 पर्यत द.सा.द.शे.9% दराने व दि.01/02/2008 पासून प्रत्यक्ष रक्कम देईपर्यत द.सा.द.शे.15% दराने व्याज द्यावे. ..6.. प्रकरण क्रमांक :- सी.सी. /98/2010 ..6.. 2) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीचा विम्याचा दावा कोणत्याही योग्य त्या कारणाशिवाय फेटाळून लावल्यामुळे तक्रारकर्तीला झालेल्या आर्थीक,शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.2000/- (अक्षरी दोन हजार) ची रक्कम द्यावी. 3) विरुध्दपक्षाने तक्रारकर्तीला न्यायीक खर्चाबाबत. रु.1000/- (अक्षरी एक हजार) ची रक्कम द्यावी. 4) वरील आदेशाचे पालन विरुध्दनपक्षाने हा आदेश मिळाल्यापासून 45 दिवसाच्या आत करावे. (श्रीमती नंदा लारोकर) (राजीव त्रिं. पाटील) सदस्या अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, बुलडाणा. स्थळ :- बुलडाणा दिनांक :- 22/11/2010
| [HONORABLE Mrs Nanda Larokar] Member[HONORABLE R T Patil] PRESIDENT | |