निकालपत्र :-(दि.01.10.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.2 यांना नोंद पोच डाकेने नोटीस पोहचूनही ते हजर झालेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचे वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रार हे शेतकरी आहेत. दि.27.12.2006 रोजी ऊस तोडणीचे काम करीत असताना ऊसाचे धांड अचानकपणे तक्रारदारांच्या उजव्या डोळयास लागून जबर जखम झाली. त्यावेळेस निपाणी येथील भालचंद्र आय अॅन्ड जनरल हॉस्पिटल या ठिकाणी तक्रारदारांना उपचारासाठी दाखल केला. तक्रारदारांच्यावर औषधोपचार केला. परंतु, तक्रारदारांचा उजवा डोळ पूर्णपणे निकामी झाला. याबाबत डॉ. अरविंद तिळवे यांनी दाखला दिलेला आहे. तक्रारदारांच्या उजव्या डोळयास अपघाती दुखापत झाली. याबाबत गांवकामगार पोलीस पाटील यांनी दि.02.01.2007 रोजी दोन पंचासमक्ष घटनास्थळाचा पंचनामा केला. सामनेवाला विमा कंपनीकडे शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत दि.03.04.2007 रोजी सर्व कागदपत्रांसह क्लेम मागणी केली. असे असूनही सामनेवाला यांनी तक्रारदारांना क्लेमबाबत काहीही कळविलेले नाही. याबाबत वकिलांबाबत नोटीसही पाठविली. परंतु, त्यासही उत्तर दिलेले नाही. सबब, शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजनेअंतर्गत क्लेम रक्कम रुपये 50,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजास देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, 8-अ उतारा, पंचनामा, पोलीस पाटील यांचा दाखला, गांवकामगार पोलीस पाटील-खामकरवाडी यांचा दाखला, डॉ.तिळवे यांचा दाखला, तक्रारदारांचे ओळखपत्र, सामनेवाला कंपनीचे दि.06.05.07 व दि.16.06.07 चे पत्र, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस, अपंगत्वाचा दाखला, पोचपावत्या इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तकारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सदर सामनवाला हे ब्रोकर्स/कन्स्ल्टंटस् म्हणून त्यांची नेमणुक केलेली आहे. क्लेम देणेचे जबाबदारी शासन व विमा कंपनीची आहे. सबब तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलाकन केले आहे. प्रस्तुत प्रकरणी 7/12 चा उतारा पाहिला असता तक्रारदार हे शेतकरी असल्याचे दिसून येते. दि.27.12.2006 रोजी तक्रारदार हे ऊस शेतीमध्ये काम करीत असताना त्यांच्या उजव्या डोळयास जखम झालेली आहे. त्या अनुषंगाने गांवकांमवार पोलीस पाटील यांनी दोन पंचासमक्ष स्पॉट पंनामा केले आहे व डोळयास उसाचे धांड लागलेले आहे व त्याबाबत डॉ.अरविंद तिळवे या डॉक्रांकडे उपचार घेतला असा दाखला घेतला. तसेच, भालचंद्र आय अण्ड जनरल हॉस्पिटल यांचेकडील डॉ.अरविंद तिळवे यांनी उपचार केलेसंबंधीचे कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल केले आहे. तसेच, सिव्ही सर्जन, कोल्हापूर यांनी तक्रारदारांच्या उजव्या डोळयास 75 टक्के अंपगत्व आलेचा दाखला दिलेला आहे. उपरोक्त संपूर्ण वस्तुस्थिती विचारात घेता तक्रारदारांच्या डोळयास ऊसाचे धांड लागून त्यांचे उजव्या डोळयास कायमस्वरुपी अपंगत्व आलेची वस्तुस्थिती दिसून येते. (6) तक्रारदारांच्या वकिलांनी सामनेवाला विमा कंपनीकडे क्लेम रक्कमेची मागणी करीत असताना 7/12 उतारा, निवडणुक आयोगाकडील ओळखपत्र, गांवकामगार पोलीस पाटील यांनी केलेला पंचनामा व दाखला तसेच सिव्हील सर्जन यांचे अपंगत्वाबाबतचे सर्टिफिकेट इत्यादी कागदपत्रे सामनेवाला विमा कंपनीकडे पाठवून दिलेली आहेत व सदर कागदपत्रांच्या प्रती प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. सामनेवालाविमा कंपनीला तक्रारदारांनी वकिलामार्फत नोटीसही पाठविली आहे. त्याचीही दखल घेतली नसल्याचे दिसून येते. सामनेवाला विमा कंपनीने क्लेमबाबत तक्रारदारांना कोणत्याही प्रकारे कळविलेचे दिसून येत नाही. इत्यादीचा विचार करता सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने क्लेम रक्कम रुपये 50,000/- व्याजासह तक्रारदारांना द्यावी या निष्कर्षाप्रत येत आहे. सामनेवालाक्र. 1 हे ब्रोकर/कन्स्लटंट असल्याने त्यांची क्लेम रक्कम देणेबाबतची जबाबदारी येत नाही. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारांना क्लेम रक्कम रुपये 50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) द्यावेत. सदर रक्कमेवर दि.27.12.2006 रोजीपासून द.सा.द.शे.9 टक्के व्याज द्यावे. 3. सामनेवाला क्र.2 विमा कंपनीने तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |