निकालपत्र :- (दि.26/11/2010) (सौ.प्रतिभा जे.करमरकर,सदस्या) (1) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की – यातील तक्रारदार यांचे पती गोपाळराव वामनराव देशपांडे हे मु.पो.दाटे ता.चंदगड जि.कोल्हापूर येथे राहत असून त्यांचे 7/12 उता-यावर नोंद असून त्या नियमाप्रमाणे ते शेतकरी आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या विमा योजनेअंतर्गत शेतकरी अपघात विमा पॉलीसी सामनेवाला क्र.1 यांचेमार्फत सामनेवाला क्र.2 कडे उतरवली आहे. यातील तक्रारदार यांचा मुलगा गजानन गोपाळ देशपांडे हा जनावरे शोधणेसाठी दि.11/02/2007 रोजी शेताकडे गेला असता अंधारात पाय घसरून पडला व त्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर त्याला जखमी अवस्थेत बेळगांव येथील के. एल. ई. रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचार चालू असताना दि.17/02/2007 रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. गजानन हा तक्रारदार यांचा कर्तबगार व शेती उद्योगात मदत करणारा होता. तक्रारदार हे सर्वस्वी त्यांचेवर अवलंबून हेाते. तक्रारदारांनी मुलाचे प्राण वाचवणेसाठी उपचारादाखल बरीच रक्कम खर्च केली आहे.त्यांचा कर्ता सवरता मुलगा गेल्याने त्यांचे अपरिमीत नुकसान झाले आहे. तक्रारदार यांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी त्यांचे मयत मुलावर होती व तक्रारदार हे निव्वळ त्यांचेवर अवलंबून होते. मयत गजानन हा कुटूंबाचाच घटक असलेने गावचे7/12 पत्रकी त्यांचे वडील हयात असलेने नांव नोंद नसलेतरी तो शेतकरी होता. त्याचे वडीलांचे नांवे 7/12 पत्रकी एकत्र कुटूंब पुढारी म्हणून नांव नोंद असलेने हिंदू वारसा कायदयाप्रमाणे त्यालाही मालकी हक्क प्राप्त झालेले होते. तक्रारदार व त्यांचे पती हे दोघेही वयस्कर असल्यामुळे त्यांना शेती कामासाठी मयत गजानन याचाच आधार होता. तक्रारदार यांच्या पतीने दि.15/0/2007 रोजी तहसिलदार चंदगड यांचेमार्फत सामनेवाला क्र. 1 व 2 यांचेकउे सर्व कागदपत्रांसह क्लेम अर्ज पाठवला. प्रस्तुत कलेम सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी दि.26/10/2007 रोजी 7/12 उता-यावर मयत गजानन यांचे नाव नसल्यामुळे नामंजूर केला. यातील तक्रारदार यांच्या पतीने वकीलांमार्फत दि.01/01/008 रोजी सामनेवालांच्या सेवात्रुटीबद्दल दाद मागण्यासाठी तक्रार क्र.14/2008 अन्वये या मंचात तक्रार दाखल केली. त्यावेळी विमा पॉलीसीची प्रत उपलब्ध नसल्याने व याकामी तांत्रिक अडचण राहू नये म्हणून ग्राहक तक्रार क्र.14/2008 चे कामी प्रस्तुत तक्रारदार यांनी दिवाणी व्यवहार संहिता अॅ.1 रुल 5 प्रमाणे थर्ड पार्टी तक्रारदार म्हणून सामील करुन घ्यावे असा अर्ज दिला. सदर अर्ज मा.मंचाने तांत्रिक कारणाने निकाली काढला. त्यांनी त्यावेळी दिलेल्या निर्देशाप्रमाणे यातील तक्रारदार यांनी सदर कामी नुकसानभरपाई मिळण्यासाठी पुन्हा प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. मे. मंचाने ग्राहक तक्रार अर्ज क्र.14/2008 चे कामी व्यतीत झालेला कालावधी हा मुदत माफीसाठी ग्राहय धरणेत यावा असे निकालपत्रात नमुद केले असलेने प्रस्तुतचा तक्रारदार यांचा अर्ज मुदतीत आहे. महाराष्ट्र शासनाने विम्याची हप्ता रक्कम भरुन देखील व नुकसान भरपाई मिळणेसाठी शिफारस करुन देखील सामनेवाला क्र. 1 व 2 यांनी विमा रक्कम देणेचे नाकारलेने सेवा देणेस त्रुटी दाखवली आहे. महाराष्ट्र शासनाने उतरवलेल्या शेतकरी विमा पॉलीसी योजनेनुसार तक्रारदार यांचा मयत मुलगा गजानन व तक्रारदार हे ग्राहक ठरतात तसेच विमा पॉलीसीतील नमुद अटीनुसार तक्रारदार हया नुकसान भरपाई मिळणेस पात्र ठरतात. सबब तक्रारदारास सामनेवालांकडून शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत देय असणारी रक्कम रु.1,00,000/- व्याजासह मिळावी तसेच शारिरीक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.3,000/- सामनेवालांकडून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत ग्राहक तक्रार क्र.14/2008 मध्ये दि.08/01/2010 रोजी दिलेल्या निकालपत्राची सत्यप्रत दाखल केली आहे व शपथपत्र दाखल केले आहे. (04) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदारच्या पतीची विमा पॉलीसी मान्य केली आहे. परंतु तक्रारदाराच्या इतर सर्व कथनाला मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. यातील तक्रारदारचा अर्ज कायदयातील तरतुदी व पॉलिसीतील अटी व वस्तुस्थितीचा विचार करता मे. कोर्टात चालणेस पात्र नाही. तक्रारदारांचा अर्ज दाखल करण्याचा कोणताही हक्क व अधिकार नाही. या कारणास्तव तक्रारदाराचा अर्ज कोर्ट खर्चासह नामंजूर करावा. सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रार अर्जातील कलम 3 मधील बहूतांशी मजकूर चुकीचा,खोटा व दिशाभूल करणारा आहे. तक्रारदाराचा मुलगा हा जनावरे शोधणेसाठी दि.11/02/2007 रोजी शेताकडे गला असता अंधारात पाय घसरुन पडला. त्यास गंभीर दुखापत झाली. त्यानंतर जखमी अवस्थेत त्यास के.एल.ई. हॉस्पिटल,बेळगांव येथे उपचाराकरता दाखल केले असता उपचार चालू असाताना दि.17/02/2007 रोजी त्यांचा मृत्यू झाला इत्यादी मजकूर चुकीचा आहे. तसेच मयत गजानन हा कुटूंबाचा घटक असलेने गावाचे 7/12 पत्रिकेत त्याचे वडील हयात असलेने नांव नसले तरी तो शेतकरी होता. त्याचेवर तक्रारदार अवलंबून होते इत्यादी सर्व कथने खोटी आहेत. मयत गजानन हा केव्हाही शेतकरी नव्हता. तक्रारदाराने आपले म्हणणे शाबीत करणेसाठी कोणताही पुरावा याकामी हजर केलेला नाही. सदर कामी तकारदाराने हजर केलेले पोलीस पेपर्सवरुन व तक्रारदाराने तक्रारीत त्यांचा व्यवसाय व तथाकथित अपघाताबाबत दिलेली माहिती यात तफावत दिसून येत आहे. नमुद पॉलीसी ही व्यक्तीगत पॉलीसी आहे. मयत गजानन यांचे वडीलांचे नांवे 7/12 पत्रकी एकत्र कुटूंब पुढारी म्हणून नोंद असलेने हिंदू वारसा कायदयाप्रमाणे त्यालाही मालकी हक्क प्राप्त झाले होते हे म्हणणे चुकीचे आहे. कुटूंबाकरिता किंवा त्यातील सदस्यांकरिता प्रस्तुत नमुद पॉलीसीन कव्हर/नुकसान भरपाई मिळत नाही. सबब तक्रारदाराने महत्वाची माहिती लपवून ठेवून(सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्ट) खोटया मजकूराचा अर्ज दाखल केला आहे त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज सप्रेशन ऑफ मटेरियल फॅक्टस या कारणाने रद्द होणेस पात्र आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा. (05) सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, या प्रकरणातील तक्रार अर्ज क्र.14/08 हा तांत्रिक कारणाने निकाली काढला हे तक्रारदाराचे म्ळणणे निखलास खोटे आहे. तक्रारदार यांचा मयत मुलगा गजानन हा सामनेवालाचा ग्राहक ठरतो हा तक्रारदाराचे म्हणणे चुकीचे आहे. प्रस्तुत तक्रारीतील तक्रारदार तसेच तिचा मयत मुलगा गजानन हे शेतकरी नसल्यामुळे शेतकरी विमा योजनेअंतर्गत विमा लाभधारक होऊ शकत नाहीत. महाराष्ट्रातील शेतक-यांचा अपघातातील निधनाबाबत व कायमच्या अपंगत्वाबद्दल नुकसानभरपाई मिळावी हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सदर योजनेतील अटी व शर्तींचा (Annexture सह)विचारा करता येत नाही, मयत गजानन अगर त्याचा मृत्यू इत्यादी बाबी पॉलीसीप्रमाणे कव्हर होत नाहीत. मयत गजानन हा सामनेवाला विमा कंपनीचा ग्राहकच होत नसल्यामुळे त्याच्यसा मृत्यूची नुकसानभरपाई मागण्याचा कुठलाही अधिकार प्रस्तुत तक्रारदारास नाही. कारण 7/12 च्या उता-यावर मयत गजानन किंवा त्याची आई यांचे नावच नमुद नाही. मयत गजानन हा शेतकरी होता किंवा शेतात काम करत होता हे सिध्द करणारा कुठलाही पुरावा तक्रारदाराने दाखल केला नाही. मयत गजानन याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा कुठलाही पुरावा तक्रारदाराने मंचासमोर दाखल केला नाही. सबब वरील सर्व मुद्दयांचा विचार करता तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी विंनती सामनेवाला क्र.2 यांनी सदर मंचास केली आहे. (06) सामनेवाला यांनी आपले म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (07) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद ऐकला. तसेच दोन्ही बाजूंनी दाखल केलेली कागदपत्रेही काळजीपूर्वक तपासली. (08) सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा क्लेम नाकारायचे कारण मयत गजानन गोपाळराव देशपांडे यांचे नांव 7/12 च्या उता-यात नाही. सबब शेतकरी अपघात विमा योजनेच्या अटींप्रमाणे तो या योजनेचा लाभार्थी ग्राहक होऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत नुकसानभरपाई मागण्याचा कुठलाही अधिकार त्यांना पोहच नाही असे दिले आहे. (09) शेतकरी अपघात विमा योजनेचे परिपत्रक काळजीपूर्वक अभ्यासले असता असे स्पष्ट होते की, सदर विमा योजना ही प्रामुख्याने महाराष्ट्रातील अल्प व अत्यल्प भूधारक कुटूंबास घरातील कर्त्या व्यक्तीच्या अनैसर्गिक व अपघाती मृत्यूमुळे जी हलाखीची परिस्थिती ओढवते त्यावेळी सदर कुटूंबाला मदतीचा हात दयावा या उदात्त हेतुने महाराष्ट्र शासनाने जानेवारी-2005 रोजी सुरु केली आहे. शेतक-याच्या जमिनीच्या 7/12 च्या उता-यात बहुतेक वेळा केवळ कुटूंबप्रमुखाचेच नांव असते. त्याच्या कुटूंबातील इतर व्यक्ती ज्यासुध्दा सदर शेतीकामात राबतात त्या सर्वांची नांवे 7/12 च्या उता-यात असतातच असे नाही. पण म्हणून त्यांच्या कुटूंबातील सदर व्यक्ती ज्या त्या जमिनीत राबत असतात त्यांना शेतकरी म्हणता येणार नाही किंवा उपरोक्त विमा योजनेच्या संदर्भात तो शेतकरी ग्राहक होणार नाहीत हा सामनेवालाने या संदर्भात काढलेला निष्कर्ष हे मंच ग्राहय धरु शकत नाही. मयत गजानन हा सज्ञान होता. त्यांचे आई-वडील दोघेही वयस्कर असल्यामुळे शेतीकामात त्यांचे महत्वाचे योगदान होते. त्यामुळे या विमा क्लेमचा विचार करताना letter of law पेक्षा spirit of law चा विचार करणे आवश्यक आहे. केवळ विमा योजनेचा मूळ उद्देश लक्षात घेऊन सामनेवाला विमा कंपनी तकारदाराच्या विमा क्लेमचा विचार करणे आवश्यक होते. तसे न करता सामनेवाला विमा कंपनीने तक्रारदाराचा क्लेम केवळ तांत्रिक कारणाने नामंजूर करणे ही सामनेवालांच्या सेवेतील निश्चितच त्रुटी आहे अशा स्पष्ट निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास विमा क्लेमप्रमाणे रक्कम रु.1,00,000/-(रु.एक लाख फक्त) दि.15/05/2007 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह दयावी. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त)
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |