जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 157/2008. प्रकरण दाखल तारीख - 23/04/2008 प्रकरण निकाल तारीख - 22/08/2008 समक्ष - मा.श्री.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती.सुजाता पाटणकर - सदस्या. श्रीमती सुशिला भ्र. भिमराव सोनटक्के अर्जदार. वय 40 वर्षे, धंदा घरकाम रा. द्वारा लक्ष्मण दशरथ सोनटक्के शिवाजी नगर, मूदखेड ता. मूदखेड (सी. रेल्वे) जि. नांदेड विरुध्द. 1. कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. द्वारा वीभाग प्रमूख दीशा अलंकार शॉप नंबर 1 कॉनाट गार्डन, टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद. 2. तहसीलदार, तहसील कार्यालय मूदखेड (सी.रेल्वे) गैरअर्जदार जि. नांदेड 3. नॅशनल इन्शूरन्स कंपनी लि. नगीनाघट रोड नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. एस.जी.कोलते गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - स्वतः. गैरअर्जदार क्र. 2 तर्फे वकील - कोणीही हजर नाही. गैरअर्जदार क्र. 3 तर्फे वकील - अड. रियाजूल्लाखॉन निकालपञ (द्वारा - मा.श्री. सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार क्र.1 व 3 नॅशनल इन्शूरन्स कंपनीच्या सेवेच्या ञूटीबददल अर्जदार यांची तक्रार आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे, अर्जदार ही मौजे इजळी येथील रहीवाशी आहे. तिचे पती कै.भिमराव सोनटक्के हे शेती करुन उदरनिर्वाह करीत होते. दि.7.8.2006 रोजी त्यांचे गांवातून वाहणा-या सिता नदीला पूर आल्यामूळे काही माणसे पूरात अडकली, त्यांना व स्वतःला वाचविण्याच्या प्रयत्नात मृत भिमराव सोनटक्के यांचा अपघाताने बूडून मृत्यू झाला. नैसर्गीक आपत्ती मृताच्या कूटूंबियाना मदत देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने शेती अपघात विमा ही कल्याणकारी योजना सूरु केली होती आणि शासनाने गैरअर्जदार क्र.3 बरोबर करार करुन प्रत्यक्षात शेतक-यासाठी रु.1,00,000/- चा विमा उतरविला होता. या बददल विम्याचा हप्ता शासनाने भरला. सदरील योजना ही तालूकापातळीवरुन राबवायची असल्यामूळे अर्जदाराने तीचे पती वारल्यानंतर विम्याची रक्कम मिळण्यासाठी दि.11.10.2006 रोजी विहीत नमून्यात गैरअर्जदार क्र.2 यांच्याकडे अर्ज दाखल केला. परंतु गैरअर्जदाराकडून अर्जदारांना कोणतीही सूचना मिळाली नाही. दि.27.2.2007 रोजी गैरअर्जदार क्र.2 ला स्मरण पञ लिहीले तेव्हा पून्हा सर्व कागदपञ सादर करण्यास सांगितले ते ही दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने त्यांचे पञ नंबर 2006/अ/जमा/दिनांक 5.3.2007 रोजी गैरअर्जदार क्र.1 कडे मंजूरीसाठी पाठविले. सदरील अर्जा सोबत मूळ अर्ज, तलाठयाचे 7/12 चा उतारा, नमूना नंबर 8, तहसीलदाराचे प्रमाणपञ, तलाठयाचे प्रमाणपञ, पोलिस रिपोर्ट, पोस्ट मार्टम रिपोर्ट, इत्यादी गैरअर्जदार क्र.1 कडे मा. तहसिलदार यांनी पाठविले. आता गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे सर्व कागदपञ पाठविली होती परंतु त्यांनी ती विमा कंपनीकडे पाठविली नाहीत व कागदपञ मिळाली नाहीत म्हणून गैरअर्जदार क्र.3 यांना क्लेम दिला नाही. यानंतर गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना अनेक स्मरणपञे पाठविण्यात आली. यामूळे गैरअर्जदार क्र. 3 ला रक्कम रु.1,00,000/- व त्यावर दि.7.8.2006 पासून 18 टक्के व्याज देण्याचे आदेशीत करावे. अर्जदारास मानसिक ञासापोटी गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी रु.50,000/- दयावेत व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. याप्रमाणे IRDA approved Insurance Advisor company appointed as a consultant by Govt. of Maharashtra, for the above Insurance Scheme. म्हणजे त्यांची नियूक्ती ही फक्त सल्लागार म्हणून आहे यावर ते कोणतीही रक्कम घेत नाहीत. व मृताचा मृत्यू दि. 7.8.2006 रोजी झाला व क्लेम दि.9.3.2007 रोजी त्यांना प्राप्त झाला आणि छाननी पूर्ण केल्याचे नंतर काही कागदपञ आवश्यक होते आणि प्रपोजल अपूर्ण होते म्हणून आणि तहसिलदार कडे पञ पाठविले. केमीकल अनॉलायझरचा रिपोर्ट या कागदपञात नसल्याकारणाने त्यांचा क्लेम सेटंल होऊ शकत नाही असे कळविले. त्यामुळे ते असे म्हणतात की, अर्जदार यांनी यात आवश्यक ती कागदपञ दाखल करण्यास सांगावित म्हणजे त्यांचा पाठपूरावा विमा कंपनीकडे करता येईल. गैरअर्जदार क्र.2 यांना मंचातर्फे नोटीस पाठविण्यात आली, नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही म्हणून त्याचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 यांनी वकिलामार्फत आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. याप्रमाणे विमा संबंधीची कागदपञे अर्जदाराने दाखल केली नाहीत. सदर प्रकरणाशी त्यांचा काहीही संबंधी नाही. महाराष्ट्र शासनाने विमा उतरविला हे नमूद केले आहे. त्यासंबंधी दस्ताऐवज दाखल केलेले नाही. त्यामूळे गैरअर्जदाराना ते माहीती नाही. अर्जदाराने म्हटल्याप्रमाणे गैरअर्जदार क्र.1 कडे प्रस्ताव पाठविला व त्यांची कोणतीही सूचना गैरअर्जदार क्र.3 यांना मिळाली नाही. गैरअर्जदार क्र.2 ने सूध्दा विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविला नाही. त्यामुळे ञूटीची सेवा देण्याचा प्रश्नच येत नाही. त्याकारणाने मानसिक ञासाबददल रक्कम देण्याचा प्रश्न येत नाही. अर्जदाराचा दावा गैरअर्जदाराच्या संदर्भात खारीज करण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे तसेच गैरअर्जदार क्र.3 यांनी आपली साक्ष रामनारायण रामप्रसाद बंग यांच्या शपथपञाद्वारे नोंदविली आहे. सर्व पक्षकारानी दाखल केलेला दस्तऐवज बारकाईने तपासून आणि वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय होय. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी तिचे पतीचे अपघाती निधन झाल्यानंतर जेव्हा त्यांना महाराष्ट्र शासनाची अशी योजना आहे हे कळाल्यानंतर त्यांनी प्रपोजल आवश्यक त्या कागदपञासह गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे दि.11.10.2006 रोजी दाखल केले. व त्यानंतरही गैरअर्जदार क्र.1 च्या म्हणण्याप्रमाणे सर्व कागदपञ दाखल केलेले आहेत. यात प्रस्तूत प्रकरणात दाखल केल्याप्रमाणे क्लेम फॉर्म, एफ.आय. आर., आकस्मात मृत्यू रिपोर्ट, घटनास्थळ पंचनामा, मृत्यू दाखला, देना बँकेचे पासबूक, गांव नमूना नंबर 6 या प्रमाणे वारसा हक्क प्रमाणपञ, तसेच नमूना नंबर 8 इत्यादी सर्व कागदपञ दाखल केलेली आहेत व कागदपञ क्लेम सेंटल करण्यासाठी पूरेशी आहेत. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.5.7.2007 रोजी नमूना नंबर 8-अ, 6-क हे मागितले होते ते अर्जदाराने दिलेले आहेत व इथेही दाखल केले आहेत. यानंतर दि.14.3.2007 रोजी मृत्यू पञ, घटनास्थळ पंचनामा, एफ.आय.आर., इत्यादी कागदपञ मागितली होती ते ही अर्जदाराने त्यांना दिलयाचे दिसते व प्रस्तूत प्रकरणात देखील दाखल केलेले आहेत. पून्हा एक दि.12.1.2005 रोजी गैरअर्जदार क्र.1 ने तहसीलदारांना पञ पाठविले होते. ज्यात बँकेचा तपशील, पोस्ट मार्टेम रिपोर्ट इत्यादी मागितले आहे ते ही अर्जदाराने दिलेले आहेत. म्हणजे ही सर्व कागदपञ गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे प्रपोजल फॉर्मसह उपलब्ध असताना केवळ केमीकल अनॉलायझरचा रिपोर्ट दाखल केला नाही या हया एकच कारणामूळे त्यांनी हे प्रपोजल गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे लवकर पाठविले नाही. ही त्यांची सेवेतील ञूटी स्पष्टपणे दिसून येते. कै.भिमराव यांचा मृत्यू झालेला आहे, पोस्ट मार्टेम रिपोर्टमध्ये बूडून मृत्यू झाला याबददलचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामूळे केमीकल विसेरा रिपोर्ट घेऊन त्यामध्ये नवीन अजून काय सिध्द होणार आहे हे न कळण्यासारखे आहे व हया कारणासाठी प्रपोजल न पाठवणे हे देखील योग्य होणार नाही. गैरअर्जदार क्र.1 ने आम्ही कूठलीही रक्कम शासनाकडून स्विकारली नाही असा आक्षेप घेतला आहे. यांला प्रतिउत्तर देताना अर्जदाराने असे म्हटले आहे की, गैरअर्जदार क्र.1 यांचे नेमणूक ही शासनाचे सल्लागार व नौकर म्हणून झालेली आहे व दर तिन महिन्यानी आढावा घेऊन तिन महिन्याचे कमशिन कंपनीस अदा करण्यात येते व काम चोख करण्यासाठी म्हणून त्यांनी शासनास संपूर्ण बँक गॅरटी दिलेली आहे. शासनाने कृषी पशूसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग नीर्णय क्र.पीएआयएस 1205/प्र.क्र.310/11 ऐ दि.7.7.2006 याप्रमाणे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना अंमलात आणली. गैरअर्जदार क्र.3 यांचे प्रस्ताव स्विकारुन राज्याच्या क्षेञातील शेतक-याचा एक कोटी सहा लाख एवढी रक्कम अदा करुन ही योजना अंमलात आणली व योजनेसाठी गैरअर्जदार क्र.1 यांना सल्लगार व ब्रोकर म्हणून नेमले म्हणून सेवा देणे गैरअर्जदार क्र.1 चे कर्तव्य आहे व यात त्यांनी कसूर केल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्र.1 यांनी दाखल केलेल्या कागदपञामध्ये गैरअर्जदार क्र.3 यांनी सरळ अर्जदार यांच्या नांवे लिहीलेले पञ ज्यावर दिनांक नाही ते दाखल केले आहे. या पञात अर्जदारांना बँकेचा तपशील, 7/12, शीधापञिका, पोस्ट मार्टेम रिपोर्ट , फेर फार इत्यादी कागदपञाची मागणी केलेली दिसून येते. यांचा अर्थ गैरअर्जदार क्र.3 यांनी प्रपोजल मिळाले आहे व या पञाप्रमाणे क्लेम नंबर व मृत व्यक्तीचे नांव यांचाही उल्लेख केलेला आहे. शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना व शासन यांचे दि.6.2.2006 रोजीचे परिपञक या प्रकरणात दाखल केलेले आहे. यानुसार नॅशरल इन्शूरन्स कंपनीचे प्रयोजनास्तव म्हणून नाशीक, औरंगाबाद, पूणे नागपूर हे महसूल वीभाग कार्यक्षेञ राहीतील व या क्षेञातील 68 लाख शेतक-याचा विमा देय राहील असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. नंबर 3 मध्ये कंपनीच्या प्रस्तावानुसार शेतक-याचा मृत्यू झालयास त्यांस रु.1,00,000/- परिपञक नंबर अ नुसार याप्रमाणे नूकसान भरपाई रक्कम प्राप्त होणार आहे. या करिता प्रति शेतकरी रु.6/- विमा हप्ता प्रति वर्षाकरिता भरला आहे. नंबर 5 मधील नियमाप्रमाणे ब्रोकर सल्लागार कंपनीस दयावयाचे कमशिन शासनाच्या संमती शिवाय विमा कंपनीने अदा करु नये व यात कृषी आयूक्त हे तीन महिन्याचा आढावा घेऊन त्यांस मान्यता देतील. म्हणजेच गैरअर्जदार क्र.3 हे गैरअर्जदार क्र.1 यांना मधस्थी सेवा बददल कमीशन देतील. म्हणजे गैरअर्जदार क्र.1 चा आक्षेप या परिपञकाप्रमाणे मान्य करता येणार नाही व त्यांने मिळत असलेल्या कमीशन बददल त्यांने सेवा देणे बंधनकारक आहे. यातील नंबर 7 परिच्छेद नुसार शासन नीर्णया संबंधी विहीत केलेले प्रपञे/कागदपञे वगळता अन्य कोणतेही कागदपञ शेतक-यांना वेगळे सादर करण्याची आवश्यकता नाही. अनावधाने काही कागदपञ देण्याचे राहीले किंवा ती मिळाले नसल्यास पर्यायी कागदपञे व चौकशी आधारे प्रस्तूतचा नीर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे. व गैरअर्जदार क्र.1 हे केवळ केमीकल अनालायझरचा रिपोर्ट नाही या कारणास्तव त्यांनी प्रस्ताव प्रंलबित ठेवला आहे. हे हया नियमाच्या विरोधात आहे. परिपञकातील परिच्छेद नंबर 9 प्रमाणे प्रस्ताव गैरअर्जदार यांच्याकडे आल्यानंतर एक महिन्याचे कालावधीत कंपनीने अदा करणे बंधनकारक राहील. केमीकल अनालेसीसचा रिपोर्ट सोडलयास प्रस्ताव आवश्यक असणारी सर्व कागदपञे या प्रकरणात दाखल आहेत. मृत्यू बूडून झाला हे पोस्ट मार्टेम रिपोर्ट द्वारे स्पष्ट झाले आहे. त्यामूळे आता केमीकल अनालेसीसचा रिपोर्ट मागण्याची गरज नाही हे सर्व प्रकार करुन गैरअर्जदार क्र. 1 व 3 यांनी सेवेत ञूटी केल्याचे सिध्द होते. वरील सर्व बाबी वरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचा मृत भिमराव सोनटक्के विषयी आलेला प्रस्ताव सर्व कागदपञासह गैरअर्जदार क्र.3 यांच्याकडे पाठवावा, काही कागदपञे त्यांच्याकडे कमी असतील तर प्रकरणात दाखल असलेलया कागदपञाच्या सत्यप्रती घेऊन त्या प्रपोजलसह पाठविण्यात याव्यात. 3. गैरअर्जदार क्र.1 यांनी प्रपोजल न पाठवून सेवेत कसूर केल्याबददल त्यांनी दंड व मानसिक ञासाबददल रु.15,000/- अर्जदार यांना दयावेत असे न केल्यास यानंतर त्यावर 9 टक्के व्याजाने पूर्ण रक्कम देईपर्यत व्याजासह अर्जदारास दयावेत. 4. हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे नंतर गैरअर्जदार क्र.3 यांना गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडून अर्जदार यांचा प्रपोजल प्राप्त न झाल्यास त्यांनी मंचामध्ये दाखल असलेले प्रपोजल व सर्व कागदपञाच्या प्रती यांच्या सत्यप्रती घेऊन अर्जदार यांचा क्लेम सेंटल करुन त्यांना विमा रक्कम रु.1,00,000/- दयावेत, असे न केल्यास यानंतर दि.22.9.2008 पासून 9 टक्के व्याजासह पूर्ण रक्कम मिळेपर्यत अर्जदारास दयावेत. 5. दावा खर्च म्हणून गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांना रु.2000/- दयावेत. 6. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे. यु. पारवेकर लघूलेखक. |