जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 100/2011 तक्रार दाखल तारीख – 13/07/2011
तक्रार निकाल तारीख– 22/03/2013
मधुकर पि. रामभाऊ मोरे
वय 40 वर्षे, धंदा शेती,
रा.भवरवाडी ता.आष्टी जि.बीड . ..अर्जदार
विरुध्द
1. विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं.1, दिशा अंलकार कॉम्प्लेक्स, टाऊन सेंटर
सिडको, औरंगाबाद. ...गैरअर्जदार
2. शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग,
बेलार्ड इस्टेट, मुंबई.
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
तक्रारदारातर्फे - अँड.आर.बी.धांडे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – स्वतः
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - अँड.ए.पी.कुलकर्णी.
------------------------------------------------------------------------------------ निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हा शेतकरी असून तो भवरवाडी ता.आष्टी जि.बीड येथे रहातो. त्यांच्या वडिलांचा नामे रामभाऊ मारोती मोरे यांचा मृत्यू दि.11.07.2009 रोजी बैलगाडीतून पडून झाला आहे.
दि.07.07.2009 रोजी मयत बैलगाडीतून पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला. अर्जदाराने घटनेची माहिती पोलिस पाटील यांना दिली. पोलिसांनी चौकशी करुन पंचनामा केला. नंतर त्यांना पुणे येथे नेले. मयत व्यक्तीच्या पोस्ट मार्टेम ऐवजी ससुन हॉस्पीटल पुणे यांनी मृत्यूच्या कारणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र फॉर्म नं.4 (रुल 7) प्रमाणे दिले आहे. अर्जदाराचे वडील शेतकरी होते हे दर्शविणारी कागदपत्रे अर्जदाराने हजर केली आहेत. याशिवाय क्लेम फॉर्म, पोलिस पाटलांनी केलेला पंचनामा, मयताचा मृत्यू अहवाल, पुणे महानगरपालिकेचे मृत्यूचे कारण सांगणारे प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र इत्यादी गोष्टी दाखल केल्या आहेत व तक्रारदार हा रु.1,00,000/- इतक्या विमा रक्कमेची मागणी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत करत आहे.
गैरअर्जदार क्र.1 व 2 हे मंचासमोर हजर झाले. त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले.
गैरअर्जदार क्र.1 कबाल इन्शुरन्स म्हणतात की, त्यांना प्रस्ताव मुदतीत मिळाला नाही. त्यामुळे 90 दिवसांनंतर प्रस्ताव मिळाला असा शेरा मारुन त्यांनी तो परत पाठवला. गैरअर्जदार क्र.2 रिलायन्स इन्शुरन्स कंपनी यांचे म्हणण्याप्रमाणे देखील प्रस्ताव मुदतीत दाखल झालेला नाही. तक्रारदाराने सर्व कागदपत्रे वेळेत दाखल केली हे दाखवणारा काहीही पुरावा नाही. त्यांचप्रमाणे त्यांचे म्हणण्याप्रमाणे मयताचा मृत्यू त्या घटनेत झाला हे दाखवणारा काहीही पुरावा उपलब्ध नाही. मयताचे एम.एल.सी.नाही तसेच शव विच्छेदन अहवाल पण नाही. त्यावरुन त्यांचा मृत्यू अपघाती नाही असा निष्कर्ष काढावा लागेल.
तक्रारदाराच विद्वान वकील श्री. धांडे व गैरअर्जदार क्र.2 चे विद्वान वकील श्री.ए.पी.कुलकर्ण यांचा युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराच्या वकिलांनी आपल्या युक्तीवादा दरम्यान महाराष्ट्र शासन निर्णयाची प्रत दाखल केली. त्या अंतर्गत त्यांनी विमा कंपन्यांनी विहीत 90 दिवसाच्या कालावधीनंतर देखील प्रस्ताव स्विकारावेत या तरतुदीकडे लक्ष वेधले. त्यांनी मा.राज्य आयोगाच्या आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड लि. सिंधुबाई या निकालाची प्रत दाखल केली. ज्या मध्ये मा. आयोगाने तक्रार उशीरा दाखल झाली या कारणाने केवळ विमा प्रस्ताव नाकारला जाऊ नये त्यांचा दोष अशिक्षीत तक्रारदाराला देऊ नये असे मत मांडले आहे.
गैरअर्जदार क्र.2 चे वकील श्री. कूलकर्णी यांनी पुणे महानगरपालिकेच्या प्रमाणपत्राकडे फॉर्म नं.4(रुल 7) मंचाचे लक्ष वेधले. त्या अंतर्गत Manner of Death या कलमातील नैसर्गिक (Natural) या पर्यायाला खूण केलेली दिसते.
वरील सर्व विवेचनावरुन खालील मुददे मंचाने विचारात घेतले.
मुददा उत्तर
1. तक्रारदाराने तो शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत
विमा रक्कम मिळण्यास पात्र आहे हे सिध्द केले
आहे का ? नाही.
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मूददा क्र.1 व 2 ः-
तक्रारदार विमा रक्कमेस पात्र होण्यासाठी त्यांचा मृत्यू अपघाती असणे आवश्यक आहे. परंतु दाखल कागदपत्रांवरुन हे सिध्द होत नाही. मयताचे मेडिको-लिगल प्रमाणपत्र दाखल नाही. त्यांचे शव-विच्छेदन झालेले नाही. पुणे महानगरपालिकेच्या प्रमाणे मयताचा मृत्यू नैसर्गिकरित्या झालेला आहे हे प्रमाणपत्र स्वतः अर्जदारांनीच दाखल केले आहे. अशा परिस्थितीत मयताचा मृत्यू अपघाती झाला ही गोष्ट तक्रारदाराने सिध्द केली असे म्हणता येणार नाही.
सबब, मंच खालील आदेश पारीत करत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येत आहे.
1.
2. खर्चाबददल आदेश नाही.
2.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड