जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/294 प्रकरण दाखल तारीख - 07/12/2010 प्रकरण निकाल तारीख – 21/02/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या मारोती समृत इंगोले वय वर्षे 35, धंदा शेती रा.हासनाळ (प.मु.) ता.मुखेड जि.नांदेड. अर्जदार. विरुध् 1. विभागीय प्रमुख, कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. शॉप नं.2, दीशा अलंकार कॉम्पलेक्स, टाऊन सेंटर, कॅनॉट प्लेस, औरंगाबाद 2. व्यवस्थापक/मॅनेजर रिलायस जनरल इन्शुरन्स कपंनी लि. 19,रिलायंस सेंटर वॉलचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई -400 038 गैरअर्जदार 3. व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि. शाखा उज्वल इंटरप्रायजेसच्या वर हिंगोली नाका,नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.एन.कूलकर्णी गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 2 व 3 तर्फे वकील - अड. ए.जी.कदम निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) फिर्यादी हा स्वतः त्यांचे सन्माननीय विधीज्ञ श्री. कूलकर्णी यांचे सोबत हजर आहेत. गैरअर्जदार नं. 2 व 3 चे सन्माननीय अड.श्री.अविनाश कदम हजर आहेत. त्यांना गैरअर्जदार नं. 2 व 3 तर्फे तडजोड करण्याचे अधिकारपञ दिले आहे. फिर्यादी व गैरअर्जदार नं.2 व 3 हे तडजोड पञातील मजकूर कबूल करत आहेत म्हणून तडजोड पञातील अटीप्रमाणे ही केस गैरअर्जदार नं. 2 व 3 विरुध्द मंजूर करण्यात येते. तडजोड पञ नि.नं.9 आहे. गैरअर्जदार नं. 1 विरुध्द कांहीही आदेश नाही. खर्च ज्यांचा त्यांनी सोसावा. (बी.टी.नरवाडे,पाटील) अध्यक्ष
| [HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |