जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 49/2012 तक्रार दाखल तारीख – 03/04/2012
तक्रार निकाल तारीख– 30/04/2013
1) शोभा रामा मूळे,
रा.पाटोदा, ता.पाटोदा जि.बीड.
2) नितीन रामा मूळे
3) स्वाती रामा मूळे,
रा.वरीलप्रमाणे. ... अर्जदार
विरुध्द
1) विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्विस प्रा.लि.,
शॉप नं. राज अपार्टमेंट, सिडको
औरंगाबाद.
2) शाखा व्यवस्थापक,
रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.,
19, रिलायन्स सेंटर, वालचंद हिराचंद
मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई.
3) जिल्हा कृषी अधिकारी,
कृषी अधिकारी कार्यालय, धानोरा रोड, बीड. ... गैरअर्जदार
समक्ष - श्रीमती नीलिमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
अर्जदारातर्फे अड.ए.एस.पावसे,
गैरअर्जदार क्र.1 तर्फे कोणीही हजर नाही,
गैरअर्जदार क्र.2 तर्फे अड.ए.पी कुलकर्णी.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे प्रतिनिधी.
---------------------------------------------------------------------------------------
निकाल
दिनांक- 30.04.2013
(द्वारा- श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य)
(2) त.क्र.49/12
तक्रारदारांचे पती श्री.रामा शंकर मूळे हे शेतकरी असून दि.19.03.2008 रोजी उंचावरुन खाली पडल्यामुळे जखमी होवून मृत्यू पावले. सदर घटनेची माहिती पाटोदा पोलीस स्टेशन यांचेकडे मिळाल्यानंतर पोलीसांनी वरील घटनेची चौकशी व तपास करुन मृत्यूची नोंद केली, मयत व्यक्तीचा पंचनामा केला.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेकडे कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव दाखल केला. परंतू अद्याप पर्यंत गैरअर्जदार यांनी नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार क्र.1 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव दि.28.07.08 रोजी प्राप्त झाला. सदर प्रस्तावामध्ये कागदपत्रांच्या त्रुटीची पुर्तता करुन प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे दि.05.01.09 रोजी पाठविण्यात आला.
गैरअर्जदार क्र.2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे तक्रारदारांना सदर तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही.
गैरअर्जदार क्र.3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी मार्फत विमा कंपनीकडे सादर केला नाही. तहसिलदार पाटोदा यांचे मार्फत पत्र क्र.208 दि.26.06.08 रोजी कबाल इन्शुरन्स कंपनीकडे दाखल करण्यात आला.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्र.1, 2, 3 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले. तसेच तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.पावसे आणि गैरअर्जदार क्र.2 यांचे विद्वान वकील श्री.कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती श्री.रामा शंकर मूळे यांचा उंचावरुन खाली पडल्यामुळे दि.19.03.08 रोजी मृत्यू झाला. तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे तहसिलदार पाटोदा यांचे मार्फत पत्र क्र.208 दि.26.06.08 रोजी पाठविल्याचे गैरअर्जदार क्र.3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार दिसून येते.
(3) त.क्र.49/12
गैरअर्जदार क्र.1 यांच्या लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारांचा प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करुन परिपूर्ण प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीकडे दि.05.01.09 रोजी पाठवला आहे हे दिसून येते.
तक्रारीत दाखल पुराव्यानुसार तक्रारदारांनी विहीत मुदतीत व आवश्यक कागदपत्रासहीत प्रस्ताव दाखल करुनही विमा कंपनीने सदर प्रस्तावावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही.
वरील परिस्थितीनुसार गैरअर्जदार क्र.2 यांनी तक्रारदारांचा प्रस्ताव गुणवत्तेवर निकाली करणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1) गैरअर्जदार क्र.2 विमा कंपनीला आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा
शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा प्रस्ताव आदेश
मिळाल्यापासून 60 दिवसात गुणवत्तेवर निकाली करावा.
2) खर्चाबाबत आदेश नाही.
3) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड