निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 21/10/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 21/10/2010 तक्रार निकाल दिनांकः- 07/04/2011 कालावधी 05महिने16दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशीB.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. 1 लताबाई भ्र.शिवाजीराव देशमुख अर्जदार वय 35 वर्षे धंदा घरकाम रा.पेडगांव, अड.आर.बी.वांगीकर ता.जि.परभणी. 2 गिता पिता शिवाजीराव देशमुख वय 17 वर्षे अज्ञान पालन पोषणकर्ता, लताबाई भ्र.शिवाजीराव देशमुख 3 अक्षय पिता शिवाजीराव देशमुख वय 15 वर्षे अज्ञान पालन पोषणकर्ता, लताबाई भ्र.शिवाजीराव देशमुख 4 सोनूताई पिता शिवाजीराव देशमुख वय 13 वर्षे अज्ञाना पालन पोषणकर्ता, लताबाई भ्र.शिवाजीराव देशमुख रा.वरीलप्रमाणे. विरुध्द 1 मे.कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. गैरअर्जदार. दिशा अंलकार शॉप क्रमांक 2 कॅनाट गार्डन, टाऊन सेंटर सिडको, औरंगाबाद. 2 रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड अड.जी.एच.दोडीया. धिरुभाई अंबानी गृप 210 साई इन्फोटेक, आर.बी.मेहता मार्ग पटेल चौक, घाटकोपर ( ईस्ट ) मुंबई. 3 स्टेट ऑफ महाराष्ट्र मार्फत कॅलेक्टर, कलेक्टर ऑफीस, परभणी. 4 तहसीलदार तहसील ऑफीस परभणी, जि.परभणी. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. ) शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विम्याची देय नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत विमा कंपनीकडून झालेल्या सेवात्रुटीची दाद मिळणेसाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे पेडगांव ता.जि. परभणी येथील रहिवासी शेतकरी आहे. तारीख 10/06/2008 रोजी अर्जदाराचा पती मयत शिवाजी देशमुख विहीर खोदाईच्या कामावर असताना विहीरीत पडून जबर जख्मी झाला व त्याचे अपघाती निधन झाले. महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-याचा गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता. त्या पॉलीसीचा अर्जदाराचा मयत पती शिवाजी देशमुख लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने त्यानंतर तहशीलदार परभणी यांचेकडे शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह विमा क्लेम दाखल केला. परंतु गैरअर्जदारानी आजतागायत त्यांना नुकसान भरपाई दिली नाही अशा रितीने गैरअर्जदाराने नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीत सेवात्रुटी करुन मानसिकत्रास दिला.म्हणून ग्राहक मंचात त्याची दाद मिळणेसाठी प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल केलेला आहे. आणि गैरअर्जदाराकडून पॉलीसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई रुपये .1,00,000/- व मानसिक त्रासापोटी रुपये 50,000/- द.सा.द.शे. 15 % व्याजासह गैरअर्जदाराकडून मिळावी अशी तक्रार अर्जातून मागणी केलेली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदार हिचे शपथपत्र ( नि.2) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि.5 लगत एकूण 9 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार नं 1 यांनी दिनांक 30.11.2010 रोजी मंचाकडे लेखी जबाब पोष्टाव्दारे पाठविला होता तो प्रकरणात नि. 11 ला समाविष्ठ करुन घेतला. गैरअर्जदार नं 2 यांनी तारीख 24/02/2011 रोजी आपले लेखी म्हणणे सादर केले ते प्रकरणात नि.12 वर आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यानी मंचाची नोटीस स्विकारुनही नेमलेल्या तारखेस हजर झाले नाही किंवा लेखी म्हणणे सादर केले नाही त्यामुळे त्यांचेविरुध्द दिनांक 05.03.2011 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.11) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्यक ती सल्लागार म्हणून नेमलेले आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्याचेकडून विमा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत शिवाजी देशमुख रा. पेडगांव जि.परभणी यांच्या डेथे क्लेम ची कोणतीही कागदपत्रे त्याना आजअखेर मिळालेली नाहीत त्यामुळे त्या क्लेम संबंधी काय झाले त्याच्या खुलासा देता येत नाही सबब गैरअर्जदारास या प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबा सोबत शेतकरी विम्या संबधीचे महाराष्ट्र शासनाने 24 ऑगष्ट 2007 चे परीपत्रक तथा मार्गदर्शक सुचना दाखल केलेले आहे. गैरअर्जदार नं 2 यांनी आपल्या लेखी जबाबात ( नि.14) अर्जदाराची तक्रार कायदेशीर रित्या गैरअर्जदारां विरुध्द चालणेस पात्र नसल्यामुळे ती फेटाळण्यात यावी,कारण कबाल इंन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस यांच्याकडून त्यांना अर्जदाराच्या मयत पतीच्या शेतकरी अपघात विमा क्लेम संबंधीची कसलीही कागदपत्रे त्याना आजतागायत मिळालेली नाहीत त्यामुळे अर्जदारांस विमा क्लेमची नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तक्रार अर्जातील इतर सर्व विधाने त्यांनी साफ नाकारलेली असून गैरअर्जदारां विरुध्द विनाकारण तक्रार दाखल करुन खर्चात पाडलेले आहे.तसेच तक्रार अर्ज कायदेशीर मुदतीत ही नाही. गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई क्लेम संदर्भात कोणत्याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही वरील सर्व बाबी विचारात घेऊन तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केलेली आहे. लेखी निवेदनाच्या पुष्टयर्थ गैरअर्जदार नं 2 चे शपथपत्र ( नि.15) दाखल केलेले आहे. तक्रार अर्जाच्या अंतिम सुनावणीच्या वेळी अर्जदार तर्फे अड वांगिकर आणि गैरअर्जदार नं 2 तर्फे अड दोडिया यांनी युक्तीवाद केला. निर्णयासाठी उपस्थीत होणारे मुद्दे. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार नं. 2 यांचेकडून अर्जदाराचा विमा क्लेम मंजूर करण्याच्या बाबतीत सेवात्रुटी झाली आहे काय ? नाही. 2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- प्रस्तुत प्रकरणातील अर्जदाराचापती मयत शिवाजीराव देशमुख याचा दिनांक 10.06.2008 रोजी विहीरीत पडून अपघाती मृत्यू झाला होता हे पुराव्यात दाखल केलेल्या नि. 5/5 आणि नि. 5/7 वरील कागदपत्रातून आणि नि. 5/9 वरील पोलीसानी केलेला घटनास्थळ पंचनामा या पुराव्यातून शाबीत झाले आहे. मयत शिवाजी देशमुख शेतकरी व्यक्तिगत अपघाती विम्याचा लाभार्थी असल्याने त्याचे अपघाती मृत्यूनंतर मयताची कायदेशीर वारसदार पत्नी ( अर्जदाराने ) नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 4 यांचेकडे क्लेम फॉर्मसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केली होती असे तक्रार अर्जात म्हटलेले आहे परंतू शासनाचे परीपत्रकात नमूद केलेली सर्व कागदपत्रे दिलेली होती हे शाबीत करण्यासाठी प्रस्तूत प्रकरणात 7/12 उता-याखेरीज अन्य कोणतेही महसूल रेकॉर्डची कागदपत्रे पुराव्यात दाखल केलेली नाही. तहसीलदाराकडे सादर केलेली कागदपत्रे पूर्ण होती किंवा नव्हती हे प्रस्तूत प्रकरणी गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 हजर होवून त्यानी आपले म्हणणे सादर न करता गैरहजर राहील्यामुळे आणि त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत झालेला असल्यामुळे दिलेल्या कागदपत्राविषयी नेमकी वस्तूस्थिती मंचासमोर आलेली नाही. याउलट गैरअर्जदार क्रमांक 1 यानी आपल्या लेखी जबाबात ( नि. 11 ) म्हटल्याप्रमाणे तहसीलदाराकडून त्याना मयत शिवाजी देशमुख रा. पेडगांव याच्या डेथक्लेमची कागदपत्रे त्याना मिळालेलीच नाही असे सांगितलेले असल्यामुळे तहशीलदार परभणी यांचेकडे अर्जदाराने कागदपत्रांची अदयापी पूर्तता केलेली नसावी असे अनुमान निघते. मुळातच गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचेकडे क्लेमची कागदपत्रे आलेली नसल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा 2 यांचेकडून क्लेम मंजूर करण्याची बाबतीत सेवा त्रूटी झाली असे मुळीच म्हणता येणार नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडून महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी व कुटूंबातील त्या लाभार्थी शेतक-याला त्याच्या अपघाती मृत्यू पश्चात काही प्रमाणात का होईना आर्थिक मदतीचा लाभ त्याचे कुटूंबाला मिळावा या उदात्त हेतूने शासनाने सर्व शेतक-याची विमा हप्त्याची रक्कम शासनाच्या तिजोरीतून भरुन ही कल्याणकारी विमा पॉलीसी घेतलेली आहे. मयत शिवाजी देशमुख याचा अपघाती मृत्यू पॉलीसी मुदतीत झालेला असल्याने व तो पॉलीसीचा लाभार्थी असल्यामुळे त्याचे पश्चात अर्जदाराला नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळालीच पाहीजे व ती मिळणेस पात्र आहे. क्लेम उशीरा आला या तांत्रीक कारणास्तव विमा कंपनीने क्लेमची कागदपत्रे स्विकारण्याचे नाकारता कामा नये या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगाने रिपोर्टेड केस 2008 (2) All MR ( Journal) page 13 ( महाराष्ट्र ) मध्येही हेच मत व्यक्त केलेले आहे त्याचा आधार घेवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आदेश 1 गैरअर्जदार नं.4 याने अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेमची नुकसान भरपाई रुपये 100000/- मंजूर करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कबाल इन्शुरन्स ब्रोकरेजकडे आदेश तारखेपासून 30 दिवसात शेतकरी अपघात क्लेम प्रस्ताव पाठवल्याचे अर्जदारास कळवावे त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने अर्जदाराचा नुकसान भरपाईचा क्लेम त्यानंतर त्यापूर्वी एक महिन्यात सेटल करावा. 2 पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ.अनिता ओस्तवाल. सौ.सुजाता जोशी. श्री.सी.बी.पांढरपट्टे. सदस्या. सदस्या. अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |