Maharashtra

Jalna

CC/18/2011

Kalpanabai Prakash More - Complainant(s)

Versus

Kabal Ins.Service Ltd. - Opp.Party(s)

S.S.Pradhan

24 Mar 2011

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
CONSUMER CASE NO. 18 of 2011
1. Kalpanabai Prakash MoreR/O Kshirsagar,Po.& Tq.BhokerdanJalnaMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Kabal Ins.Service Ltd.Cidco,AurangabadAurangabadMaharastra ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 24 Mar 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(घोषित दि. 24.03.2011 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
      विमा कंपनीच्‍या सेवेत त्रुटी असल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      तक्रारदाराचे म्‍हणणे असे आहे की, तिचे पती प्रकाश हे शेतकरी होते. त्‍यांचे दिनांक 28.09.2008 रोजी अपघाती निधन झाले. म्‍हणून तिने महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून तहसीलदार भोकरदन यांच्‍या मार्फत गैरअर्जदार रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे विमा दावा दिनांक 10.12.2008 रोजी दाखल केला. परंतू गैरअर्जदारानी अद्याप तिच्‍या विमा दाव्‍याबाबत कोणताही निर्णय न घेता तिचा विमा दावा प्रलंबित ठेऊन त्रुटीची सेवा दिली. म्‍हणून तिने गैरअर्जदारांकडून शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रुपये 1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
      तक्रारदाराने तक्रार दाखल करण्‍यास झालेला 50 दिवसांचा विलंब माफ करावा अशी मागणी स्‍वतंत्र अर्जाद्वारे केली आहे. तक्रारदाराचे म्‍हणणे असे आहे की, तिने दाखल केलेल्‍या विमा दाव्‍याबाबत गैरअर्जदाराने कोणतीही माहिती दिली नाही तसेच तालुका दंडाधिका-याने अंतिम रिपोर्ट दिनांक 20.02.2009 रोजी दिला. त्‍यामुळे वकीलांना भेटून तक्रार दाखल करण्‍यासाठी तिला विलंब झाला.
      तक्रारदाराच्‍या पतीचे निधन दिनांक 28.09.2008 रोजी झाल्‍यामुळे तक्रारदाराने ही तक्रार दिनांक 27.09.2010 पूर्वी दाखल करणे आवश्‍यक होते. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्‍यासाठी 50 दिवसांचा विलंब झाल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू तिला जवळपास सहा महिन्‍यांचा विलंब झालेला आहे. विलंबाबाबत तक्रारदाराने समाधानकारक खुलासा केलेला नाही. तक्रारदाराने विलंबाबाबत दिलेली कारणे योग्‍य नाहीत. गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 10.12.2008 रोजी तहसीलदारमार्फत दाखल केलेल्‍या विमा दाव्‍याबाबत कोणताही निर्णय कळविला नाही. म्‍हणून विमा दावा दाखल करण्‍यासाठी विलंब झाला हे कारण विलंब माफ करण्‍यासाठी कोणत्‍याही परिस्थितीत स्विकारार्य ठरत नाही. तसेच वकीलांना भेटून तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाला हे कारण देखील विलंब माफ करण्‍यासाठी योग्‍य नाही.
म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
 
  1. तक्रारदाराची तक्रार मुदतबाहय असल्‍यामुळे दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.
  2. तक्रारदाराला आदेश कळविण्‍यात यावा.        

HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBERHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENTHONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member