Maharashtra

Jalna

CC/25/2011

Shantabai Fakirba Sable - Complainant(s)

Versus

Kabal Ins. Service Ltd. - Opp.Party(s)

R.V.Jadhav

24 Mar 2011

ORDER


REPORTSSurvey No.488 Opp. Krida Bhavan bypass road Jalna
CONSUMER CASE NO. 25 of 2011
1. Shantabai Fakirba SableR/O Mauje Baranjla (Sable),Po. & Tq. BhokerdanJalnaMaharashtra ...........Appellant(s)

Vs.
1. Kabal Ins. Service Ltd.Cidco,AurangabadAurangabadMaharashtra2. 2) Manager, Relience Gen.Ins.Co.Govandi (E),Mumbai-400088MumbaiMaharashtra ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 24 Mar 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(घोषित दि. 24.03.2011 व्‍दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्‍यक्ष)
      विमा कंपनीच्‍या सेवेत त्रुटी असल्‍याच्‍या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे.
      तक्रारदाराचे म्‍हणणे असे आहे की, तिचे पती फकीरबा हे शेतकरी होते. त्‍यांचे दिनांक 25.11.2008 रोजी अपघाती निधन झाले. म्‍हणून तिने महाराष्‍ट्र शासनाच्‍या शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून तहसीलदार भोकरदन यांच्‍यामार्फत गैरअर्जदार रिलायन्‍स जनरल इन्‍शुरन्‍स कंपनीकडे विमा दावा दिनांक 21.12.2008 रोजी दाखल केला. परंतू गैरअर्जदारांनी अद्याप तिच्‍या विमा दाव्‍याबाबत कोणताही निर्णय न घेता तिचा विमा दावा प्रलंबित ठेऊन त्रुटीची सेवा दिली. म्‍हणून तिने गैरअर्जदारांकडून शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रुपये 1,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे.
      तक्रारदाराने तक्रार दाखल करण्‍यास झालेला 55 दिवसांचा विलंब माफ करावा अशी मागणी स्‍वतंत्र अर्जाद्वारे केली आहे. तक्रारदाराचे म्‍हणणे असे आहे की, ती ग्रामीण भागातील अशिक्षीत महिला असुन वकीलांना भेटून तक्रार दाखल करण्‍यासाठी तिला विलंब झाला.
      तक्रारदाराच्‍या पतीचे निधन दिनांक 25.11.2008 रोजी झाल्‍यामुळे तक्रारदाराने ही तक्रार दिनांक 24.11.2010 पुर्वी दाखल करणे आवश्‍यक होते. तक्रारदाराने तक्रार दाखल करण्‍यासाठी 55 दिवसांचा विलंब झाल्‍याचे म्‍हटले आहे. परंतू तिला जवळपास तीन महिन्‍यांचा विलंब झालेला आहे. विलंबाबाबत तक्रारदाराने समाधानकारक खुलासा केलेला नाही. तक्रारदार अशिक्षीत असली तरी तिला पतीच्‍या अपघाती निधनाबद्दल नुकसान भरपाई मिळू शकते या विषयीची माहिती असल्‍याचे तिने तहसीलदारांकडे पतीच्‍या निधनानंतर एकच महिन्‍याच्‍या आत दिनांक 21.12.2008 रोजी दाखल केलेल्‍या विमा दाव्‍यावरुन दिसुन येते. तसेच तक्रारदाराने त्‍याचवेळी मोटार अपघात प्राधिकरणाकडे नुकसान भरपाई मिळावी म्‍हणून बजाज अलायन्‍झ इन्‍शुरन्‍स कंपनीच्‍या विरुध्‍द अपघात दावा दाखल केला होता. ही बाब तक्रारदाराने तक्रारी सोबत दाखल केलेल्‍या कागदपत्रातील पान क्रमांक 22 वर असलेल्‍या मोटार अपघात प्राधिकरणासमोर दाखल केलेल्‍या कागदपत्राच्‍या यादीवरुन दिसुन येते. याचाच अर्थ तक्रारदाराच्‍या पतीच्‍या निधनानंतर तिने त्‍वरीत वकीलांशी संपर्क केलेला होता. त्‍यामुळे वकीलांशी संपर्क करुन तक्रार दाखल करण्‍यास विलंब झाला हे तक्रारदाराचे म्‍हणणे योग्‍य व संयुक्‍तीक वाटत नाही. तक्रारदाराने विलंबाबाबत दिलेली कारणे योग्‍य नाहीत आणि विलंबाचा कालावधी तीन महिन्‍याचाच असला तरी तक्रारदाराला तिच्‍या पतीचे निधन झाल्‍यापासून जवळपास दोन वर्षाचा कालावधी तक्रार दाखल करण्‍यासाठी उपलब्‍ध होता. तसेच ती वर्ष 2008 पासूनच वकीलांच्‍या संपर्कात होती त्‍यामुळे मुदतीच्‍या आत तक्रार दाखल करण्‍यास तिला कोणतीही अडचण नव्‍हती. म्‍हणून तक्रार दाखल करण्‍यासाठी झालेला विलंब माफ करण्‍यास योग्‍य नाही.
      म्‍हणून खालील प्रमाणे आदेश करण्‍यात येतो.
 
आदेश
  1. तक्रारदाराची तक्रार मुदतबाह्रय असल्‍यामुळे दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.
  2. तक्ररदाराला आदेश कळविण्‍यात यावा.

HONABLE MRS. Rekha Kapdiya, MEMBERHONORABLE Mr. D. S. Deshmukh, PRESIDENTHONORABLE Mrs. Jyoti H. Patki, Member