Maharashtra

Beed

CC/10/58

Amo Ramesharao Bhota. - Complainant(s)

Versus

K.G.N. Computer"s & Inverter:s. & Other-01 - Opp.Party(s)

P.S.RAjajpurkar.

09 Mar 2011

ORDER

 
Complaint Case No. CC/10/58
 
1. Amo Ramesharao Bhota.
R/o Ruturaj Gramsevak Colony, C/o U.M.Tandale"s House,Nagar road,Beed
Beed
Maharastra
...........Complainant(s)
Versus
1. K.G.N. Computer"s & Inverter:s. & Other-01
Lodha Chamber's.Opposit of Shahu Bank, Jalna road,Beed,
Beed
Maharastra
2. Okiya Battries,On line power,.
Opposit of Bafana Jaweller's,Jalna road,Aurangabad
Aurangabad
Maharastra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  P. B. Bhat PRESIDENT
  A P Bhosrekar MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

तक्रारदारातर्फे    – वकील – ए.पी.पळसोकर,
                            सामनेवाले 1 तर्फे – वकील – ए.पी.पळसोकर
                            सामनेवाले 2 तर्फे – स्‍वत:, 
                            सामनेवाले 3 तर्फे – एकतर्फा आदेश.
                                                    
                              ।। निकालपत्र ।।
                ( निकाल घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्‍वरुपे – सदस्‍या ) 
 तक्रारदार यांनी प्रस्‍तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्‍द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचे के.जी.एन. कॉम्‍प्‍युटर अँण्‍ड इन्‍व्‍हर्टर येथील दुकानातुन सामनेवाले नं.3 या कंपनीचे मायक्रोटेक यु.पी.एस.बी.850 मॉडेल क्र.6030 सिरीयल क्रं.0685235767 ता.31.8.08 रोजी रोख रक्‍कम रु.12,000/- देवून खरेदी केला. सामनेवाले नं.1 यांनी सदरच्‍या बॅटरीचची वॉरंटी 30 महिन्‍यासाठी दिली. सदर बॅटरीज वॉरंटीच्‍या कालावधीत बॅटरीत बिघाड झाल्‍यास बॅटरी करारान्‍वये विनामोबदला परत बदलून देण्‍याची हमी दिली. सदरची बॅटरी खरेदी केल्‍यानंतर कांही महिने व्‍यवस्थित चालू होती परंतु त्‍यानंतर बॅटरी वेळोवेळी खराब होवून बॅटरीज स्‍पार्किंग होवून बॅटरीतुन चरचर आवाज होणे असे प्रकार चालू झाले. या संदर्भात सामनेवाले नं.1 यांचेकडे कल्‍पना दिली असता विजेच्‍या कमी जास्‍त दाबामुळे बॅटरीत स्‍पार्किंग होत असल्‍याचे सागीतले व बॅटरीतील दोष शोधण्‍याचे टाळले. अखेर ता.22/11/2009 रोजी बॅटरीमध्‍ये स्‍फोट होवून बॅटरीतील अँसिड फरशीवर व घरातील इतर मौल्‍यवान वस्‍तूवर पडून सर्व वस्‍तूंची राखरांगोळी झाली. घराची फरशी पूर्णत: खराब झाली. त्‍यामुळे घरमालकाने फरशीचे दुरुस्‍तीसाठी रक्‍कम रु.25,000/- ची मागणी तक्रारदारांकडे केली आहे. सदर घटनेची माहिती सामनेवाले नं.1 यांना दिली असता त्‍यांनी सामनेवाले नं.2 यांचा अधिकृत मोबाईल नंबर देवून त्‍यांचेशी संपर्क करण्‍या बाबत सांगुन तक्रारदारांना सेवा देण्‍यास इन्‍कार केला.
वरील घटनेची माहिती सामनेवाले नं.2 कंपनीचे अधिकृत इंजिनिअर यांना वारंवार दिल्‍यानंतर विलंबाने सदर जळीत बॅटरी,यूपीएस व इतर साहित्‍याची तपावणी करुन अकोल्‍याच्‍या एका ग्राहकाच्‍या बाबतीत अशीच घटना घडल्‍यानंतर त्‍यांना बॅटरी बदलून दिलेली आहे. सदर घटनेचा रिपोर्ट कंपनीकडे पाठवून देताच कंपनीकडून बॅटरी व झालेल्‍या नुकसानीची रक्‍कम मिळेल असे सांगीतले. सामनेवाले नं.3 ही बॅटरी उत्‍पादीत करणारी कंपनी असुन त्‍यांनी उत्‍पादीत केलेल्‍या वस्‍तु कंपनीने विहित केलेल्‍या मुदतीचे आत खराब झालेली असल्‍यामूळे सदरची बॅटरी बदलून देण्‍याची जाबाबदारी सामनेवाले नं.1 ते 3 यांची आहे. सामनेवाले नं.1 यांना बॅटरीच्‍या दोषा बाबत कल्‍पना देवूनही दोष न तपासून सेवेत कसूरी केली आहे. तसेच सदरची बॅटरीची मुळत: खराब व वापरणेस सुरक्षीत नसल्‍याची माहिती असूनही त्‍याकडे दूर्लक्ष केले. सदर घटनेची सूचना देवूनही नवीन बॅटरी व नुकसानीची रक्‍क्‍म न देवून सामनेवाले यांनी सेवेत कसूर केलेला आहे. तक्रारदारांनी ता.6.2.2010 रोजी वकीला मार्फत नोटीस पाठवून नूकसानी बाबतची रक्‍कम, बॅटरीची किंमत इत्‍यादीची मागणी केली. परंतु सामनेवाले यांनी नोटीसची दखल घेतली नाही अथवा बॅटरीही बदलून दिली नाही. तरी तक्रारदारांची विनंती की, मॉडेल क्रं.6030 सिरीयल क्रं.0685235767 खरेदी केलेली बॅटरी बदलून देण्‍यात यावी अथवा बॅटरीची किंमत रु.12,000/- व आर्थीक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.25,000/- आणि घरातील फरशी व मौल्‍यावान वस्‍तुचे नुकसानीपोटी रु.30,000/- असे एकुण नुकसान भरपाई रक्‍कम रु.55,000/- सामनेवाले नं.1 ते 3 यांचेकडून मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.
      सदर प्रकरणात सामनेवाले नं.1 हजर झाले असुन त्‍यांनी त्‍यांचा खुलासा न्‍यायमंचात ता.11.6.2010 रोजी दाखल केला. त्‍यांचा खुलासा थोडक्‍यात असा की,
      सामनेवाले नं.1 यांनी तक्रारदारांना बॅटरी विकत घेतल्‍याची बाब मान्‍य आहे. तसेच सदर बॅटरीची कंपनीच्‍या नियमानुसार कंपनीतर्फे कांही अटीवर 30 महिन्‍याची वॉरंटी देण्‍यात आली होती. त्‍याबाबत कंपनीचे वॉरंटी कार्ड देण्‍यात आले आहे. तक्रारदारांनी वॉरंटी कार्ड दाखल करत असताना कंडीशन फॉर वॉरंटी कार्ड दाखल केलेले नाही. त्‍यामुळे कंपनीमार्फत पुरविण्‍यात आलेले वॉरंटी कार्ड सामनेवाले मार्फत सदर प्रकरणात दाखल केले आहे. तक्रारदारांनी सदर इन्‍वहटर व बॅटरी पोलीस मुख्‍यालयाचे शेजारी असलेल्‍या संभाजीनगर येथील घरामध्‍ये बसविले होते. परंतु सदरील बॅटरीचे स्‍फोट झालेल्‍या ठिकाणी ग्रामसेवक कॉलनीच्‍या घरामध्‍ये आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे संमतीशिवाय व कंपनीच्‍या अधिकृत व्‍यक्‍तीशिवाय इतर व्‍यक्‍तीमार्फत सदरील बॅटरी व इन्‍व्‍हटर ग्रामसेवक कॉलनीमध्‍ये तक्रारदारामार्फत लाहविण्‍यात आले आहे. अनाधिकृत व्‍यक्‍तीमार्फत सदरील बॅटरी व इन्‍व्‍हटर हलविण्‍यात आलेले असल्‍याने सदरील करारा कंपनीचे नियमाप्रमाणे निरर्थक झाला आहे.
सामनेवाले नं.1 यांनी सदर घटनेनंतर सामनेवाले नं.2 ओकया बॅटरी या कंपनीचे अधिकृत अधिका-यांशी संपर्क करण्‍याबाबत विंनती केली होती. त्‍यानुसार कंपनीचे अधिकृत इंजिनिअरने घटनेची पाहनी केली आहे. परंतु कंपनी तर्फे तक्रारदाराचा दावा नाकारलेला आहे. त्‍यामुळे सामनेवाले नं.1 यांना तक्रारदारांना त्‍यांचे हद्दीपर्यन्‍त सेवा पुरवलेली आहे. तरी तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करण्‍यात यावी.
      सदर प्रकरणात सामनेवाले नं.2 यांनी पोस्‍टाने ता.6.4.2010 रोजी खुलासा न्‍यामंचात दाखल केला आहे. सामनेवाले नं.2 यांचा थोडक्‍यात खुलासा की,
      सामनेवाले नं.2 यांनी सदर घटनेबाबत डिलरने तक्रारदारांनी घटने बाबत कांहीही कळविले नाही. ज्‍या दिवसी घटना झाली त्‍यांवेळी बॅटरीमध्‍ये दोष होता किंवा नाही बॅटरी व इन्‍व्‍हटरला प्रॉब्‍लेम होता काय हे पाहन्‍याचे काम असते. सामनेवाले यांचे काम डिलरला फक्‍त कंपनीच्‍या बॅअरी उपलब्‍ध करुन देण्‍याचे काम करते. सदर प्रकरणाची नोटीस मिळाल्‍यानंतर सामनेवाले नं.2 यांनी कंपनीला ता.21.3.2010 रोजी ई-मेलद्वारे कळविले आहे. तसेच कंपनीचे इंजिनिअरला सुध्‍दा फोनवर कळविले आहे.
      सामनेवाले नं.2 ओकाया कंपनीचे बॅटरीचे डिटिब्‍यूटर आहेत आता तो एरिया कार्यक्षेत्रात नाही. सद्या नविन डिस्‍ट्रीब्‍यूटर कंपनीने दिला आहे. सर्व्हिस व वॉरंटीची जिमेदारी कंपनीची आहे.
      सदर प्रकरणात सामनेवाले नं.3 यांना नोटीस प्राप्‍त होवूनही न्‍यायमंचात हजर नाहीत अथवा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार खुलासा दाखल नाही. ता.8.2.2011 रोजी त्‍यांचे विरुध्‍द प्रकरण एकतर्फा चालविण्‍याचा निर्णय न्‍यायमंचाने घेतला.
      तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, सामनेवाले नं.1 यांचा खुलासा, शपथपत्र, गागदपत्र, सामनेवाले नं.2 यांचा खुलासा यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकिल ए.पी.पळसोकर व सामनेवाले नं.1 यांचे विद्वान वकिल एन.एम.कुलकर्णी यांचा युक्‍तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सामनेवाले नं.1 यांचेकडून ओकाया कंपनीची यु.पी.एस.बी.850 मॉडेल क्र.6030 सिरीयल क्रं.0685235767 ता.31.8.08 रोजी सामनेवाले नं.3 यांनी उत्‍पादीत केलेली रक्‍कम रु.12,000/- देवून खरेदी केल्‍याची बाब सामनेवाले यांना मान्‍य आहे. त्‍याच प्रमाणे सदरची बॅटरीची वॉरंटी 30 महिन्‍याची असल्‍याची बाबही सामनेवाले यांना मान्‍य आहे. फक्‍त सदर बॅटरीकरीता कंपनीची कांही नियम व अटी असल्‍या बाबत त्‍यांनी नमुद केले आहे.
तक्रारीत नमुद केल्‍याप्रमाणे सदरील बॅटरीचा स्‍पोट होवून बॅटरीतील अँसिड घरातील इतर मौल्‍यावान वस्‍तुवर पडले घराची राखरांगोळी झाले असल्‍या बाबत नमुद केले आहे. सदर घटनेची माहिती सामनेवाले नं.1 व 3 यांना मिळल्‍यानंतर सामनेवाले नं.3 कंपनीने त्‍यांचे अधिकृत इंजिनिअर यांना पाठवून बॅटरीची पाहणी केली आहे. परंतु सदरची तपासणी झाल्‍यानंतर कोणताही अहवाल सदर घटनेबाबत पाठविण्‍यात आलेला दिसून येत नाही. सामनेवाले नं.3 उत्‍पादीत कंपनी सदर प्रकरणात हजर नाही अथवा त्‍यांचा खुलासा दाखल नाही. अशा परिस्थितीत सामनेवाले नं.3 यांच्‍या सदर घटनेची तपासणीसाठी आलेले इंजिनिअरने या संदर्भात कोणताही अहवाल दिला अथवा काय याबाबत खुलासा होत नाही.
      तक्रारीतील कागदपत्रे पाहता, सामनेवाले यांनी सदर घटनेच्‍या बॅटरीची वॉरंटी कार्ड दाखल केल्‍याचे दिसून येते. सदरचे वॉरंटी कार्ड हे तक्रारदारांच्‍या बॅटरीचे नसून दुस-या बॅटरीचे मुळे कोरे वॉरंटी कार्ड सदर प्रकरणात दाखल केल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे सदरची वॉरंटी कार्डाबाबत शासंकता निर्माण होते. सदर वॉरंटी कार्डची कंडीशन ऑफ वॉरंटी मध्‍ये कलम 9 व 10 प्रमाणे तक्रारदारांनी केले असल्‍यामुळे तक्रारदारांना सदर बॅटरीची वॉरंटी देता येत नाही असे नमुद केले आहे. तक्रारदारांनी सदर बॅटरीची सर्व्हिस अनाधिकृत मानसांकडून करुन घेतल्‍यानंतर
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
सबब, न्‍यायमंच खालील आदेश देत आहे.
                        ।। आ दे श ।।
1.     तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्‍यात येते.
2.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, तक्रारदारांचे मारुती स्विप्ट जीचा नोंदणी क्रं.एचएच-23 एन-1001 ची विमा लाभ रक्‍कम रोख तत्‍वावर होणारी विमा लाभ रक्‍कम रु.2,54,800/- ( अक्षरी रुपये दोन लाख चौपन्‍न हजार आठशे फक्‍त ) आदेश मिळाल्‍या तारखे पासुन एक महिन्‍याचे आत देण्‍यात यावा.
3.    सामनेवाले यांना आदेश देण्‍यात येतो की, वरील आदेशातील रक्‍कम विहित मुदतीत अदा न केल्‍यास सामनेवाले तक्रार दाखल तारखेपासुन द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज देण्‍यास सामनेवाले जबाबदार राहतील.
4.    सामनेवाले खर्चा बाबत कोणतेही ओदश नाहीत.
5.    ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 कलम 20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्‍यांचे संच तक्रारदारास परत करावेत.
 
 
                            ( सौ.एम.एस.विश्‍वरुपे )     ( पी. बी. भट )
                                   सदस्‍या,               अध्‍यक्ष,
                   जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,बीड जि. बीड           
 
 
[ P. B. Bhat]
PRESIDENT
 
[ A P Bhosrekar]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.