- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चंद्रलाल प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 28 ऑगष्ट 2015)
अर्जदार व त्याचे वकील गैरहजर. अर्जदाराने केलेलया तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी आहे की,
अर्जदार व गैरअर्जदार यांचे तांदूळ विक्री संबंधातील व्यवहार मागील 10 वर्षा पासून सुरु होते. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून दि.14.7.2013 ला रुपये 4,46,250/- तांदूळ बिल क्र. 36 नुसार खरेदी केले होते. विरोधी पक्ष यांनी अर्जदाराला 1,50,000/- रुपयाचा धनादेश दिला होता व तो धनादेश वटविण्याकरीता बँकेने जमा केला असता, तो न वटता परत आला. म्हणून अर्जदाराने दि.23.6.2014 रोजी गैरअर्जदारा विरुध्द पोलीस स्टेशन आरमोरी येथे गुन्हा नोंदविला. गैरअर्जदाराने धनादेशाची रक्कम परत न केल्याने आर्थीक नुकसान झाले म्हणून सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करण्यात आली.
कलम 2(1)(ग्राहक संरक्षण कायदा 1986) प्रमाणे अर्जदार हा ग्राहक संज्ञेत मोडत नाही. सबब, खालील आदेश पारीत करण्यात येते.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अस्विकृत करुन खारीज करण्यात येते.
(2) अर्जदाराच्या तक्रारीची मुळ प्रत सोडून उर्वरीत प्रती अर्जदारास परत करावे.
(3) आदेशाची प्रत अर्जदारास विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 28/8/2015