तक्रारदार : तक्रारदार स्वतः हजर
सामनेवाले : सा.वाले सुरेशबाबु या वकीलामार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांचे नॅचरल अॅन्ड होलीस्टीक हेल्थ केअर सेंन्टर या नावाने व्यवसाय असून या व्यवसायाच्या प्रसिध्दीसाठी त्याचप्रमाणे या व्यवसायाचा अधिक अधिक लाभ लोकांना व्हावा या उद्देशाने भाडे घेऊन जाहीरात देणारे तसेच व्यवसायाची माहिती देणा-या सा.वाले “JUST DIAL” या कंपनीशी दि.01.04.2009 ते दि.31.03.2010 या कालावधीसाठी करार झाला. सामनेवाले कंपनीने करारापोटी एकुण रू. 6,623/-,एवढी रक्कम ठरविली. त्यापैकी तीन महिण्याचे रू.1,655/-,एवढी रक्कम आगाऊ देण्याचे ठरले तर रू.552/-,याप्रमाणे पुढील नऊ महिण्याची रक्कम ईसीएस द्वारे देण्याचे ठरले. या करारानूसार सा.वाले यांनी तक्रारदारांना खरे ग्राहक देणे अपेक्षीत होते. लोकांनी तक्रारदारांच्या व्यवसायाबद्दल माहिती विचारल्यानंतर त्यांच्या कंपनीबद्दल माहिती पूरविण्याचा करार सा.वाले यांच्या बरोबर झाला होता.
2. तक्रारदारांची सा.वाले यांचे विरूध्द अशी तक्रार आहे की, करारानूसार सा.वाले यांनी तक्रारदारांना खरे ग्राहक पूरविले नाही. तसेच सा.वाले यांनी त्यांच्याकडे जमविलेल्या कॉनटॅक्समधून एसएमएस(लिड्स) पाठविले. परिणामी त्या एसएमएसच्या आधारावर संपर्क केला असता त्यांनी- 1. आम्ही संपर्क केला नाही 2. आम्हास गरज नाही अशा प्रकारची उत्तरे दिली. तसेच समोरील व्यक्तींशी भांडणे होऊ लागली. त्यामूळे तक्रारदारांनी सा.वाले यांना ईमेल व पत्रे पाठवून सेवा खंडीत करण्याबद्दल कळविले. परंतू सेवा खंडीत करण्याबद्दल कळविल्यानंतरही संपूर्ण वर्षभर सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यातून रक्कम काढून घेतली. व त्यानंतर तेराव्या महिण्याचेही रू.552/-,रक्कम अधिक घेतली.
3. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांसारखेच व्यवसाय करणारे इतर लोकांनाही सा.वाले यांचेकडून तोच अनुभव आला. तक्रारदारांचे असे म्हणणे आहे की, याप्रकारामूळे तक्रारदारांचा रक्तदाब वाढून ब्रेनस्टोक/हॉर्टअॅटयाक/मधूमेह/व लकवा झाला. त्यामूळे त्यांना रूग्णालयात भरती होऊन उपचार घ्यावे लागले.
4. तक्रारदारांनी झालेल्या फसवणुकीबद्दल मुंबई पोलीस यांचेकडे तक्रार केली असता मुंबई पोलीसांच्या कारवाईमूळे सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.6,072/-,परत दिले. परंतू मुंबई पोलीसांनी सा.वाले यांचेविरूध्द गुन्हा नोंदविला नाही. त्यामूळे “JUST DIALE” या कंपनीला कोणतीही शिक्षा झाली नाही. म्हणून तक्रारदार यांनी ग्राहक मंचापूढे प्रस्तुत तक्रार अर्ज दाखल करून तक्रारदारास आलेल्या वैद्यकीय खर्च रू.29734.29/-,व तसेच पुढील आयुष्याच्या तरतूदीसाठी रू.5,00,000/-,सा.वाले यांनी तक्रारदारांना द्यावे अशी मागणी केली आहे.
4. प्रस्तुत तक्रार अर्ज. अनुषंगीक कागदपत्रांसह दाखल केले आहे.
5. मंचाकडुन पाठविलेल्या नोटीशीस अनुसरून सा.वाले हजर झाले व कैफियत कागदपत्रांसह दाखल केले.
6. सा.वाले यांचे म्हणणेनूसार तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2,1(d), प्रमाणे ग्राहक नाहीत. त्यामूळे प्रस्तत तक्रार अर्ज ग्राहक मंचापूढे चालू शकत नाही.
7. तक्रारदारांनी याच कारणाकरीता सा.वाले यांचेविरूध्द पोलीस तक्रार केली होती. सा.वाले यांचे म्हणणेनूसार फैाजदारी कारवाई टाळण्यासाठी सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.6,072/-,रक्कम परत दिली व प्रकरण मिटविले.
8. सा.वाले यांचे म्हणणेनूसार नेसर्स प्रमोदानंद नॅचरल होलीस्टीक हेल्थकेअर सेंन्टर या कंपनीने सा.वाले यांचे बरोबर दि.01.04.2009 रोजी करार केला. तक्रारदारांनी वरील कंपनीस पक्षकार केले नाही तसेच तक्रारदारानी महत्वाच्या बाबी लपविल्या. तक्रारदारांनी कराराचा काही भागच दाखल केलेला आहे व तक्रारीचा उर्वरीत भाग दाखल केलेला नाही. सा.वाले यांचे म्हणणेनूसार प्रस्तुत तक्रार ही केवळ सा.वाले यांचेकडुन पैसे उकळण्याच्या दृष्टीने दाखल केली आहे.
9. सा.वाले यांचे म्हणणेनूसार तक्रारदार व सा.वाले यांच्यात दि.01.04.2009 रोजी एक वर्षाकरीता करार झाला. त्याबद्दल तक्रारदारांनी सा.वाले यांना रू.6,618/-,करारापोटी देण्याचे ठरले होते. त्यापैकी तक्रारदारांनी रू.1,655/-,आगाऊ रक्कम दिली. सा.वाले यांचे म्हणणेनूसार करारानूसार तक्रारदाराना लिड्सची माहिती दिली. तक्रारदार व सा.वाले यांच्यातील करार हा प्रिन्सीपल टू प्रिन्सीपल असल्याने तक्रारदार त्यांचे ग्राहक नाहीत.
10. सा.वाले यांनी तक्रारदारांना व्यवसायाबद्दल ग्यॉरंटी दिलेली नव्हती. तसेच करारानूसार प्रस्तुत करार हा नव्वद दिवसानंतर तीन महिण्याची आगाऊ नोटीस दिल्यानंतर रद्द करता येत होती. तक्रारदारांनी सा.वाले यांना दि.09.07.2009, 09.10.2009, 14.12.2009 आणि दि.09.01.2010 रोजी पत्राद्वारे जाहीरात देण्याचे बंद करावे आणि ईसीएस द्वारे घेतलेले पैसे परत देण्याची मागणी केली परंतू तक्रारदारांनी करार रद्द करण्याबाबतचे अटी व शर्तीचे पालन केलें नाही. म्हणून सा.वाले यांनी तक्रारदारांना वरील पत्रांची उत्तरे पाठविली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी पोलीस तक्रार केल्यानंतर सा.वाले यांनी फौजदार कारवाई टाळण्यासाठी तक्रारदारांचे पैसे परत दिले व प्रकरण मिटविले. त्यामूळे तक्रारदारांनी तक्रार अर्जात मागीतलेल्या मागणीनूसार म्हणजेच रू.29,734.29/-, व नुकसान भरपाई रू. 5,00,000/-, तक्रारदारांना देण्यास जबाबदार नाही.
11. तक्रारदारांनी सा.वाले यांनी दाखल केलेल्या कैफियतीस प्रतिनिवेदन दाखल केले. व त्यास सा.वाले यांनी उत्तर दाखल केले.
12. तक्रार अर्ज, कैफियत व उभयपक्षकारांनी दाखल केलेले कागदपत्रे, प्रतिनिवेदन व त्यास दाखल केलेले उत्तर, पुराव्याचे शपथपत्रे यांची पडताळणी करून पाहिली असता निकालासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदार यांना सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे सिध्द करतात काय? | नाही. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | नाही |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
13. तक्रारदारांचा नॅचरल अॅन्ड होलीस्टीक हेल्थ केअर सेंन्टर असून या व्यवसायाच्या प्रसिध्दीसाठी जाहीरात देण्यासाठी व व्यवसायाची माहिती देण्यासाठी सा.वाले यांचे बरोबर दि. 01.04.2009 रोजी करार झाला होता. या करारापोटी एकुण रू.6,623/-,एवढी रक्कम मोबदला देण्याचे ठरविले होते. व तीन महिण्याचे रू.1,655/-,एवढी रक्कम आगाऊ द्यावयाचे पुढील नऊ महिण्याचे हप्ते रू.552/-,प्रती महिणा याप्रमाणे ईसीएसने भरावयाचे होते त्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांना तीन महिण्याची आगाऊ रक्क्म रू.1,655/-, दिले. व पूढे ईसीएस द्वारे प्रती महिणा रू.552/-,प्रमाणे नऊ महिण्याचे हप्ते भरले. व तेराव्या महिण्याचेही रू.552/-,एवढी रक्क्म सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यातून काढुन घेतले.
14. तक्रारदारांची अशी तक्रार आहे की, तक्रारदारांना सा.वाले यांचेकडुन योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. अपेक्षीत ग्राहक पूरविले नाहीत. कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या कॉनटॅक्समधूनच एसएमएस(लिड्स) पाठविले. त्या एसएमएस च्या आधारावर तक्रारदारांनी संपर्क साधला असता संपर्क केलेल्या व्यक्तीनी आम्ही संपर्क केला नाही किंवा आम्हाला गरज नाही अशाप्रकारे उत्तरे देऊ लागले. त्यामूळे समोरील व्यक्तींशी मोबाईलवर भांडणे होऊ लागली त्यामूळे तक्रारदारांनी सा.वाले यांच्याशी संपर्क साधून करार रद्द करण्यास कळविले. त्यानंतरही सा.वाले यांना तीन/चार वेळा संपर्क साधून करार रद्द करण्याबद्दल आठवण दिली. परंतू सा.वाले यांनी करार रद्द केला नाही. त्यामूळे तक्रारदारांना रक्तदाबाचा त्रास वाढून ब्रेनस्ट्रोक/माईल्ड हार्टअॅटयाक/मधूमेह व लकवा याचा त्रास झाल्याने रूग्णालयात भरती होऊन त्यावर उपचार घ्यावे लागले.
15. यावर सा.वाले यांनी कैफियत दाखल करून तक्रारदारांच्या बरोबर तक्रारदारांनी नमूद केल्याप्रमाणे करार झाला होता ही गोष्ट मान्य करतात व करारानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून रू.1,655/-,आगाऊ रक्कम धनादेशाद्वारे जमा केली व त्यानंतर पुढील हप्ते ईसीएस द्वारे जमा केले.
16. करारानूसार तक्रारदारांना सेवासुविधा पुरविण्यात कोणतीही कसुर केली नाही. असे सा.वाले यांचे म्हणणे आहे. तक्रारदारांच्या बरोबर एक वर्षाचा करार होता. या वर्षाच्या कालावधीत सा.वाले यांनी तक्रारदारांना करारानूसार एसएमएस,(लिड्स) पूरविले. सा.वाले यांना तक्रारदारांचे व संपर्क साधणा-यांशी भांडणे होत होती याबद्दल काही कल्पना नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या व्यवसायाबद्दल ग्यॉरंटी दिलेली नव्हती. सा.वाले यांचे म्हणणेनूसार जर करार रद्द झाला असेल तर कराराच्या दिवसापासून नऊ महिण्यानंतर तीन महिण्याची आगाऊ नोटीस देऊन करार रद्द करता येते. परंतू तक्रारदारांनी करारानूसार करार रद्द केलेला नव्हता.
17. तक्रारदारांनी वरिष्ठ पोलीस इनेस्पेक्टर यांचेकडे तक्रार केली तेव्हा फौजदारी कारवाई टाळण्यासाठी सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.6,072/-,एवढी रक्कम देऊन प्रकरणात तडजोड केली.
18. सा.वाले यांनी कराराची प्रत अभिलेखात दाखल केलेली आहे व तसेच तक्रारदारांना पुरविलेल्या एसएमएस(लिड्स),पुरविल्याबद्दलचा अहवाल अभिलेखात दाखल केला आहे. पृष्ठ क्र 44 वर ADDENDUM TO THE TERMS OF SERVICE दाखल आहे. त्यावर तक्रारदाराची सही आहे. म्हणजेच तक्रारदारांना कराराच्या अटी मान्य आहेत. TERMS OF SERVICE कलम 2 प्रमाणे – If you are Subscriber of the Services in The Mediums of Telephone Internet and SMS – The Contract would be valid in definitely except for termination in accordance with the terms of Service For material breach by Just Dial you shall not have the right to terminate the contract except by prior written notice of three months issued to Just Dial after a minimum period of nine month from the contracts effective date. If you terminate the contract in contravention of this clause you shall be liable to pay Just Dial all amounts that you would have paid had not the contract been terminated. You shall not withdraw the ECS mandate during the validity of your contract
यावरून तक्रारदारांनी कराराच्या अटी/शर्ती नुसार रद्द केलेला आहे. याबद्दल कोणताही पूरावा दाखल केला नाही. तक्रारदारांनी करारानूसार करार रद्द करण्यासाठी कारारच्या दिवसापासून नऊ महिण्यानंतर तीन महिने आधी लेखी नोटीस सामनेवाले यांना पाठवणे आवश्यक होते. परंतू तक्रारदारांनी पाठविलेले लेखी नोटीस कराराच्या दिवसापासून नऊ महिन्याच्या आधी पाठविलेला आहे त्यामूळे कराराच्या अटी शर्तीनूसार करार रद्द झालेला नाही. तसेच तक्रारदारांनी वरिष्ठ पोलीस इनस्पेक्टरकडे तक्रार दाखल केल्यानंतर सा.वाले यांनी प्रकरणात तडजोड केली व तक्रारदारांना रू.6,072/-परत केले. ही रक्कम तक्रारदारांना मिळाली हे तक्रारदार मान्य करतात. म्हणजेच तक्रारदारांनी तडजोडीच्या वेळेस जर तडजोड मान्य नव्हती तर वरील रक्कम सा.वाले यांचेकडुन स्विकारावयाचे नव्हते. एकदा प्रकरणात समेट झाल्यानंतर पुन्हा फक्त मानसिक त्रासाबद्दल तक्रारदारांना अर्ज दाखल करता येणार नाही तक्रारदारानी समेट होण्यापूर्वीच तक्रार अर्ज दाखल करणे आवश्यक होते. परंतू तक्रारदारांनी त्यापूर्वी तक्रार अर्ज दाखल केलेला नाही. तक्रारदारांची सामनेवाले त्यांचेकडुन रू.6,072/-,फौजदार प्रकरणात समेट करणेकामी स्विकारले ही बाब मान्य केली आहे. तक्रारदारांचे हयासंबधात असे कथन नाही की, त्यांनी ती रक्कम आपले हक्क राखुन स्विकारली. हयावरून तक्रारदारांची प्रस्तुत तक्रार अप्रामाणीकपणाची दिसून येते. त्यामूळे तक्रारदार फक्त मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाहीत. म्हणून वरील तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
19. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 553/2010 रद्द करण्यातयेते.
2. खर्चाबद्दल आदेश नाही
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.