गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
तक्रारकर्ता तर्फे : स्वतः
विरुध्दपक्षा तर्फे : अॅड. अळसपुरकर
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 02/06/2015)
मा. रा.कि. पाटील, सदस्यः
1. तक्रारदार याने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
ग्राहक तक्रार क्रमांकः 82/2015
..2..
2. तक्रारदाराचे थोडक्यात म्हणणे आहे की, ते विरुध्दपक्ष यांचे ग्राहक असून ग्राहक क्र. ३६७०८४१०९९३३ आहे. तक्रारदाराच्या घरी असलेले मिटर चालु असतांना वापर केलेल्या युनिट प्रमाणे बिलाचा भरणा वेळेवर करीत होते. अशा परिस्थितीत विरुध्दपक्ष यांनी 2 वर्षापासुन 100 युनिट वापर समजुन अंदाजे बिल प्रतिमाह पाठवित आहे. त्यामुळे एवढा वापर नसतांना 100 युनिटचे बिल मला कठीण जाऊ लागले. तक्रारदाराने दि. १.८.२०१४ रोजी विरुध्दपक्षाकडे अर्ज करुन, सदर बंद असलेले दोषयुक्त मिटर बदलवुन देण्यात यावे. यावर विरुध्दपक्षाकडून सांगण्यात आले की, त्यांना येणारे विज बिल भरुन टाका, त्यानंतर विज मिटर बदलवुन देण्यात येईल.
3. त्यानंतर पुढे पण 100 युनिटचे बिल येणे सुरुच राहिले व विरुध्दपक्षाने मिटर बदलण्याची काहीही कार्यवाही केली नाही. उलट तक्रारदाराच्या मिटर मध्ये एकही आकडा स्पष्ट दिसत नसतांना दि. १९.३.२०१५ रोजी तक्रारदाराचे मिटर त्याचे गैरहजेरीत काढुन नेण्यात आले. तक्रारदाराकडे त्यांची म्हातारी आई एकटीच राहत असुन फक्त 2 सीएफएल 8 वॅटचे बल्ब आहेत. त्या व्यतिरिक्त कोणतेही विजेचे उपकरण नाही. तरी पण 100 युनिट प्रतिमाह विज बिल आकारुन रु. २,६००/- चे विज बिल पाठविले.
ग्राहक तक्रार क्रमांकः 82/2015
..3..
सदर चुकीचे विज बिल न भरल्यामुळे त्यांचे विज मिटर विरुध्दपक्षाने काढून नेले. म्हणून तक्रारदाराने सदर अर्ज वि.मंचात दाखल करुन विनंती केली की, तक्रारदाराला प्राप्त झालेले रु. २,६००/- चे विज देयक रद्द करुन त्याऐवजी वास्तविक वापरलेल्या युनिट प्रमाणे विज बिल देण्यात येऊन, विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्यात यावा. विरुध्दपक्षाच्या सेवेतील त्रुटीमुळे शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. १०,०००/- व तक्रार खर्च रु. ५,०००/- विरुध्दपक्षाकडून देण्यात यावे. तक्रारदाराने निशाणी 2 प्रमाणे दस्त 1 ते 5 दाखल केले आहेत.
5. तक्रारकर्ताने निशाणी 3 प्रमाणे अर्ज सादर करुन इलेक्ट्रीक मिटर बसवुन, विद्युत पुरवठा पुर्ववत सुरु करण्याबाबत अंतरीम आदेश पारीत करण्याची विनंती केली.
6. दि. २४.४.२०१५ रोजी वि. मंचाने निशाणी 4 प्रमाणे आदेश पारीत करुन तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे रु. १,३००/- जमा करुन विरुध्दपक्षाने विद्युत मिटर बसविण्याचे सुचविले.
7. विरुध्दपक्षातर्फे तक्रारदाराच्या मुळ तक्रार अर्जावर वारंवार तारीख देऊन सुध्दा लेखी जबाब सादर करण्यात आला नाही म्हणून विरुध्दपक्षाच्या लेखी जबाबा शिवाय प्रकरण पुढे चालविण्यात आले.
ग्राहक तक्रार क्रमांकः 82/2015
..4..
8. निशाणी 9 प्रमाणे तक्रारदाराने लेखी युक्तीवाद पुरसीस सादर करुन तक्रारदाराने विरुध्दपक्षाकडे रु. १,३००/- जमा करुन दि. २८.४.२०१५ रोजी विरुध्दपक्षाने दुसरे नविन मिटर बसवुन दिल्याचे म्हटले.
9. वरील प्रमाणे तक्रारदाराचा अर्ज व सादर केलेले दस्त तक्रारदाराचा लेखी व तोंडी युक्तीवाद, यावरुन वि. मंचाने खालील मुद्दे विचारात घेतली.
मुद्दे उत्तर
- तक्रारदाराला प्राप्त झालेले दि. २४.२.२०१५
चे वादग्रस्त देयक रु. २,६४०/- चे योग्य
आहे का ? ... नाही
- विरुध्दपक्षाकडून सेवेत त्रृटी होऊन
तक्रारदाराला मानसिक व शारिरीक त्रासाबाबत
विरुध्दपक्ष जबाबदार आहे का ? ... होय
- आदेश .. अंतीम आदेशा प्रमाणे
कारणे व निष्कर्ष ः-
10. तक्रारदार श्री. सतीश मात्रे यांनी त्यांच्या लेखी व तोंडी युक्तीवादात कथन केले की, मंचाच्या अंतरीम आदेशा
ग्राहक तक्रार क्रमांकः 82/2015
..5..
प्रमाणे त्यांनी रु. १,३००/- जमा करुन विरुध्दपक्ष यांनी दि. २८.४.२०१५ रोजी नविन मिटर बसवुन दिले. त्या नविन मिटरचे प्राथमिक रिडींग ०००१ असे होते व त्यानंतर दि. २.६.२०१५ चे मिटर रिडींग ०००२८ असे आहे. तक्रारदाराने दाखल केलेले दस्त 2/5 म्हणजे वादग्रस्त विज देयकाचे अवलोकन केले असता, सदर देयक हे 100 युनिटचे असुन त्यात एकूण थकबाकी रु. २,०७६.९२ व चालु बिल रु. ५६२.३१ असे एकूण रु. २,६४०/- देयक असल्याचे दिसुन येते. सदर देयकावरुन जुन २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंत सरासरी १०० युनिटचे देयकाची आकारणी झाली असून थकबाकी पोटी जमा झालेल्या रकमेमुळे वादग्रस्त देयकामध्ये वाढ झाल्याचे दिसून येते.
11. तक्रारदाराने निशाणी 2/3 प्रमाणे विरुध्दपक्षा कडे दि.१.८.२०१४ रोजी अर्ज दाखल करुन, त्यांचे घरगुती मिटर बंद व दोषयुक्त असल्यामुळे बदलवुन देण्याची विनंती केली. वास्तविक पाहता सदर अर्ज प्राप्त होताच विरुध्दपक्षाने तक्रारदाराच्या घराचे व मिटरचे स्थळ निरीक्षण करणे जरुरीचे होते. परंतु तसे न करता तक्रारदाराला अंदाजे प्रतिमाह १०० युनिट प्रमाणे विज बिल देऊन, तक्रारदाराच्या अर्जाची काहीही दखल न घेता, तक्रारदाराची बोळवण केल्याचे दिसुन येते. तक्रारदाराच्या सदर वादग्रस्त बिलामध्ये चालु
ग्राहक तक्रार क्रमांकः 82/2015
..6..
रिडींगच्या रकान्यामध्ये Faulty असा शेरा मारलेला आहे. याचा अर्थ तक्रारदाराकडील मिटर हे दोषयुक्त आहे हे विरुध्दपक्षाला पण मान्य आहे. तसेच तक्रारदाराला प्रतिमाह १०० युनिटचे विज देयक मागील 8 ते 10 महिन्यापासुन आकारणी कोणत्या आधारे केली याचा काहीही खुलासा विरुध्दपक्षा तर्फे सदर बिलावर किंवा वि. मंचात केला नाही. तसेच तक्रारदाराच्या लेखी कथनाप्रमाणे ते मंगरुळ दस्तगीर हया खेडयात, त्यांची आई एकटीच राहत असुन त्यांचेकडे फक्त 2 सीएफएल बल्ब आहेत, इतर कोणतेही विजेचे उपकरण नाही. तसेच खेडेगावांत विज भारनियम अधिक असल्यामुळे १०० युनिट प्रतिमाह विजेचा वापर होणे अशक्यच आहे.
12. तक्रारदाराचे मिटर बदलवून दिल्यानंतर त्यांचा दि. २८.४.२०१५ ते २.६.२०१५ पर्यंत म्हणजे जवळपास १ महिन्यात २७ युनिट विज वापरल्याचे दिसुन येते. तक्रारदाराच्या युक्तीवादातील कथनाप्रमाणे त्यांना ते मान्य आहे. म्हणुन प्रतिमाह २७ युनिटच्या आकारणी प्रमाणे तक्रारदाराकडून वादग्रस्त कालावधीचे विज बिल वसुल करणे योग्य राहील हया निष्कर्षाप्रत वि. मंच आले असून मुद्दा क्र. 1 ला नकारार्थी उत्तर देण्यात येते.
ग्राहक तक्रार क्रमांकः 82/2015
..7..
13. मुद्दा क्र. 2 चा विचार करता, तक्रारदाराचे मिटर फॉल्टी असतांना, तक्रारदाराने वारंवार विनंती करुन सुध्दा विरुध्दपक्षाकडून मिटर बदलविण्याची कार्यवाही न करणे, तक्रारदाराला भरमसाठ विज बिल आकारुन ते न भरल्यामुळे तक्रारदाराचा विद्युत पुरवठा बंद करणे, त्यांच्या गैरहजेरीत मिटर काढून नेणे, तक्रारदाराच्या घराचे स्थळ निरीक्षण न करणे, इत्यादी अनेक सेवेत त्रुटी निर्माण होऊन तक्रारदाराला शारिरीक व मानसिक त्रास सहन करावा लागला ही बाब नाकारता येणार नाही म्हणून मुद्दा क्र. 2 ला होकारार्थी उत्तर देण्यात येते.
14. वरील सर्व विवेचनावरुन तक्रारदाराचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात येऊन खालील आदेश पारीत करण्यात येते.
अंतीम आदेश
- तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- वादग्रस्त देयक दि. २४.२.२०१५ चे रु. २,६४०/- चे रद्द करण्यात येते. त्याऐवजी प्रतिमाह 25 युनिट प्रमाणे जुन २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंत नविन सुधारीत देयक तक्रारदाराला देण्यात यावे तसेच भविष्यात पण मिटर रिडींग प्रमाणेच देयक देण्यात यावे.
ग्राहक तक्रार क्रमांकः 82/2015
..8..
- तक्रारदाराने वि. मंचाच्या दि. २४.४.२०१५ च्या आदेशा प्रमाणे विरुध्दपक्षाकडे जमा केलेले रु. १,३००/- हे सदर देयकामध्ये समायोजीत करण्यात यावे.
- नवीन सुधारीत विज देयकामध्ये कोणताही दंड किंवा व्याज व विलंब शुल्क आकारणी करु नये.
- मानसिक व शारिरीक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून तक्रारदाराला रु. 2,000/- व तक्रारीचा खर्च रु. 1,500/- असे एकंदर रु. 3,500/- विरुध्दपक्षाने द्यावे. सदर रु. 3,500/- ही रक्कम विरुध्दपक्षाने तक्रारदाराच्या चालु किंवा भविष्यातील विज बिलामध्ये समायोजीत करावी.
- वरील आदेशाचे पालन सदर निकालाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसाचे आत करावे.
- आदेशाच्या प्रती दोन्ही पक्षांना विनामुल्य द्यावीत.
दि. 02/06/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष