Maharashtra

Nagpur

CC/252/2021

SULOCHANA CHOKHOBA NIMGADE - Complainant(s)

Versus

JUNIOR ENGINEER, MAHAVITRAN (MSEDCL) - Opp.Party(s)

ADV VILAS RAUT

15 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/252/2021
( Date of Filing : 02 Jun 2021 )
 
1. SULOCHANA CHOKHOBA NIMGADE
HOUSE NO 1559/09 YADAV NAGAR HOUSING BOARD NAGPUR 440026
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. JUNIOR ENGINEER, MAHAVITRAN (MSEDCL)
BRANCH AUTOMOTIVE SQUARE KAMPTEE ROAD NAGPUR 440026
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. ATUL D. ALSI PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV VILAS RAUT , Advocate for the Complainant 1
 
Dated : 15 Feb 2023
Final Order / Judgement

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये –

  1. तक्रारकर्तीचे नावे असलेल्या भुखंड क्रं.10 वर मागील बरेच वर्षापासून विदयुत पूरवठा दिलेला आहे. सदर विद्युत पूरवठयापोटी येणारे विद्युत देयक न भरल्यामूळे वि.प.ने भुखंड क्रं.10 वर स्थापीत विद्युत पूरवठा बंद करुन मिटर काढुन नेले. विदयुत पूरवठा खंडीत केल्यामूळे तक्रारकर्ती व तिचे अपंग असलेले  वयोवृध्‍द पती यांना मानसिक त्रास होत असल्याने त्यांचे प्रकृतीला धोका होण्‍याची शक्यता नाकारता येत नाही.
  2. तक्रारकर्तीच्या तिन मुलांनी विदयुत देयक अदा न केल्यामूळे विज मिटर काढुन नेले व विदयुत पूरवठा खंडीत केला.  त्याकरिता तक्रारकर्ती जबाबदार नाही. त्यामूळे तक्रारकर्तीला नवीन विद्युत मिटरची गरज आहे. तक्रारकर्तीचा तिसरा मूलगा प्रशांत चोखोबाजी निमगडे यांनी वि.प.कडे नवीन विज जोडणी मिळण्‍याकरिता दिनांक 13.4.2021 ला अर्ज केला. परंतु सदरचा अर्ज तक्रारकर्तीचे पतीचे नावाने भरपूर विद्युत देयक असल्याकारणास्तव रद्द केला. परंतु त्याकरिता तक्रारकर्ती व तिचा पती जबाबदार नाही कारण विद्युत पूरवठयाचा वापर तक्रारकर्तीचे तिन्ही मुलांनी केला व ते विद्युत मिटर भुखंड क्रं.10 वर स्थापीत आहे. तक्रारकर्तीही भुखंड क्रं. 9 ची मालक असुन तो तिचे ताब्यात आहे म्हणुन तक्रारकर्ती नवीन विद्युत जोडणी तिच्या खाजगी उपयोगाकरिता मिळवू पाहात आहे व तक्रारकर्ती नवीन विद्युत पूरवठा मिळण्‍यास पात्र आहे.
  3. तक्रारकर्तीचे पतीने वि.प.चे विद्युत देयक अदा  न केल्याने ते प्रलंबित आहे. परंतु तक्रारकर्तीचा त्या विद्युत देयकाशी काहीही संबंध नाही कारण तक्रारकर्तीने नवीन विज पूरवठयाची मागणी तिच्या ताब्यात असलेल्या भुखंडावर केलेली आहे. भुखंड क्रं.2 वर दोन सिमेंटच्या खोल्या आहेत आणि भविष्‍यात जास्तीचे बांधकाम केल्यास वि.प. कोणत्याही प्रकारचा दंड आकारण्‍याकरिता हकदार राहील व तक्रारकर्ती ते भरण्‍यास जबाबदार राहील. भुखंड क्रं. 9 वर नवीन वीज पूरवठा देण्‍यास कोणतीही अडचण नाही.  भविष्‍यात ताब्याबाबत काही वाद निर्माण झाल्यास वि.प. ला विज मिटर काढून नेण्‍याचा अधिकार राहील आणि तकारकर्तीवर सर्वस्वी जबाबदारी राहील. तक्रारकर्तीने नवीन वीज पूरवठा मिळण्‍याकरिता सर्व आवश्‍यक दस्तऐवज उदा. कर पावती, आधार कार्ड विक्रीचा करारनामा सादर करेल. वि.प.ने तक्रारकर्तीला नवीन विद्युत जोडणी देण्‍यात यावी व विज पूरवठा करावा. तसेच वि.प.ने  मानसिक व शारिरिक त्रासापोटी व नुकसानीपोटी खर्च मिळावा अशी मागणी केली आहे.
  4. तकारदाराने सदर तक्रार दाखल करुन वि.प. यांना मंचामार्फत नोटीस पाठविण्‍यात आली. नोटीस मिळुन वि.प. मंचासमक्ष हजर झाले व लेखी उत्तर दाखल केले.
  5. वि.प. आपल्या लेखी उत्तरात वि.प.नमुद करतात की, भुखंडावर विज मिटर होते व त्याचा ग्राहक क्रं.410013316311 असा आहे. सदरचे वीज मिटर चोखोबोजी निमगडे यांचे नावे आहे व ते तक्रारकर्तीचे पती आहे. वीज देयकावरील पत्ता यादव नगर बिनाकी रोड नागपूर असा आहे. तक्रारकर्तीचे विज देयक यावर विशिष्‍ट भुखंड क्रं. नमुद नाही. तक्रारकर्तीने नमुद केले की, तिच्या तिन्ही मुलांनी विज देयकाची रक्कम भरणा न केल्यामूळे विज पूरवठा खंडीत करुन मिटर काढुन नेण्‍यात आले. तक्रारकर्तीने दिनांक 4.3.2022 ला शेवटचे विज देयक रुपये 20,000/- अदा केले.  त्यानंतर अदा केले नाही.

 

  1. तक्रारकर्तीचे पतीचे नावे भरपूर विज देयक प्रलंबित असल्याबाबत वाद नाही. विज देयकावरील पत्ता हा माधव नगर नागपूर असुन श्री चोखाबाई निमगडे या तक्रारकर्तीचा पती आहे व त्याचा ग्राहक क्रं. 410013316311 असा आहे व ते तक्रारकर्तीचे पतीचे नावे आहे. परंतु त्यावर भुखंड क्रं. नमुद नाही.   तक्रारकर्ती तिच्या तीन मुलांच्या कुटुंबासह राहते त्यामूळे वीज वापर जास्त आहे. तक्रारकर्ती वीज देयका भरण्‍याचे नाकारत आहे आणि प्रलंबित वीज देयकाची जबाबदारी मुलांच्या प्रेमापोटी भरणा करण्‍याचे टाळत आहे. तक्रारकर्तीचा प्रलंबित विदयुत देयकाशी काहीही संबंध नाही हे म्हणणे चुकीचे आहे. तक्रारकर्ती त्यांचेकडे प्रलंबित असलेले विद्युत देयक आजपर्यत व्याजासह भरण्‍यास तयार असल्यास वि.प.तक्रारकर्तीला विद्युत जोडणी देण्‍यास केव्हाही तयार आहे. तक्रारकर्तीने भुखंड क्रं.9 श्री किसन गतफाने यांचेकडुन विकत घेतला आहे परंतु तक्रारकर्तीचे नावे विक्रीपत्र करुन देण्‍यात आलेले नाही. त्यामूळे या आयोगाला सदर तक्रार चालविण्‍याचा अधिकार नाही. तक्रारकर्ती भुखंड क्रं. 9 ची मालक आहे किंवा नाही हा प्रश्नच आहे कारण तक्रारकर्तीने भुखंड क्रं.9 चे विक्रीपत्र अभिलेखावर दाखल केले नाही. तक्रारकर्तीने घर क्रं. 1559/09 ची कर पावती व पत्ता असलेले आधार कार्ड सादर केले आहे व दोन्ही दस्तऐवजांमध्‍ये फरक आहे. विदयुत कायदा कलम 43 अन्वये विद्युत जोडणी ही कायदेशीर मालकी असणा-यांना देण्‍यात येते परंतु सदर प्रकरणात तक्रारकर्तीने भुखंड क्रं.9 चे विक्रीपत्र सादर केले नाही. कायम विद्युत पुरवठयाकरिता तक्रारकर्तीने योग्य त्या न्यायालयात दाद मागावी अशी मागणी केली आहे.
  2. तक्रारदाराने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्तवेजांचे अवलोकन केले असता व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे विचारार्थ घेण्यात आले.

मुद्दे                                 उत्तरे

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                  होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय ?       होय
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारदाराचे प्रती अनुचित व्यापारी

पध्‍दतीचा  अवलंब केला आहे काय ?                            होय

  1. काय आदेश                                     अंतीम आदेशानुसार

 

    का र ण मि मां सा

  1. तक्रारकर्तीने नि.कं.2(5) वर दाखल केलेल्या करारनाम्याचे अवलोकन केल्यावर स्पष्‍ट होते की, तक्रारकर्ती ने मौजा-बिनाकी, सव्हे क्रं. 88/2, येथील नागपूर गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ योजना 32, भुंखड –वाजंरी (बिनाकी), भुखंडक क्रं.9 श्री क्रिष्‍णा नारायणराव गतफणे यांचेकडुन दिनांक 30.11.2007 ला विकत घेतल्याचे व तो त्यांचे ताब्यात असल्याचे स्पष्‍ट होते व नि.क्र.2(2) वर दाखल नागपूर महानगरपालीकेचे घर क्रं. 1559/09 ची कर पावती तक्रारकर्तीचे नावे असुन त्या नियमितपणे कर भरीत असल्याचे व त्यांचे ताब्यात असल्याचे स्पष्‍ट होते. विद्युत कायदा 2003 चे कलम 43 अन्वये विदयत जोडणी ही कायदेशीर मालकी असलेल्या ग्राहकांना देत असल्याचे वि.प.चे लेखी युक्तीवादात नमुद आहे. परंतु वि.प. तक्रारकर्ती ही मौजा-बिनाकी,सव्हे क्रं. 88/2, भुखंड क्रं.9 ची कायदेशीर मालक नसल्याचे सिध्‍द करण्‍यात अपयशी ठरले आहे त्यामुळे तक्रारकर्ती वि.प.कडुन तिच्या मालकीच्या भुखंड क्रं.9 वर विज जोडणी मिळण्‍यास पात्र आहे असे आयोगाचे स्पष्‍ट मत आहे.  सबब खालीलप्रमाणे आदेश पारित करण्‍यात येतो.

     अंतीम आदेश

  1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. वि.प.ने तक्रारकर्तीला तिचे वापरात असलेल्या भुखंडावर कायमचास्वरुपी विज पूरवठा देण्‍यात यावा.
  3. वि.प. ने तक्रारकर्तीस झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी, नुकसान भरपाई म्हणुन रुपये 1,000/- व तक्रारीचे खर्चापोटी रुपये 500/-अदा करावे.
  4. वि.प.यांनी वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून ४५  दिवसाचे आत वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या करावी
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. ATUL D. ALSI]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.