Maharashtra

Nanded

CC/10/259

Lata Diliprao Wattamwar - Complainant(s)

Versus

Junior Engineer, Maharashtra State Electricity Dis.Company - Opp.Party(s)

Bhalke L.B.

30 May 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/259
1. Lata Diliprao WattamwarDeshpande Galli Deglur Tq.DeglurNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Junior Engineer, Maharashtra State Electricity Dis.CompanyDeglur Tq.DeglurNandedMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE MR. President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 30 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/259
                          प्रकरण दाखल तारीख - 19/10/2010
                          प्रकरण निकाल तारीख 30/05/2011
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
       मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
    
लता भ्र.दिलीपराव वटटमवार
वय 44 वर्षे, धंदा नौकरी (शिक्षीका)                                    अर्जदार
रा.देंशपांडे गल्‍ली,देगलूर ता.देगलूर जि. नांदेड
     विरुध्‍द.
1.     कनिष्‍ठ अभिंयता
विज वितरण कंपनी मर्यादित
      कार्यालय देगलूर ता.देगलूर जि. नांदेड
2.    कार्यकारी अभिंयता,
विज वितरण कंपनी मर्यादित
देगलूर ता.देगलूर जि.नांदेड                                    गैरअर्जदार
3.    अधिक्षक अभिंयता
विज वितरण कंपनी मर्यादित
नवा मोंढा नांदेड ता.जि.नांदेड
 
अर्जदारा तर्फे वकील             - अड.एल.बी.भालके
गैरअर्जदार क्र.1 ते 3 तर्फे         - अड.विवेक नांदेडकर
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्‍यक्ष  )
 
1.               ? सर्वसाधारणपणे अर्जदाराचे प्रत्‍येक महिन्‍याचे देयक हे रु.200/- असताना इतके देयक पाहून अर्जदार अंच‍बित झाला. गैरअर्जदार क्र.1 यांना बिलाबददल विचारणा केली असता अर्जदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, अर्जदार हा देगलूर येथील रहिवासी असून गैरअर्जदार यांचेकडून मिटर क्र.558010016585 चा वापर करतात. अर्जदार यांनी मूक्‍कावार यांचेकडून घर क्र.1560/1996 चे खरेदी केले. अर्जदार ही सदरील घरातील मिटर वर्ष 1996 पासून वापरत आहे. परंतु विज मिटर हे पूर्वीचे मालक मूक्‍कावार यांचेच नांवावर राहिले. अर्जदार हे त्‍या मिटरचा वापर करीत आहेत व त्‍यांची देयके ते वेळेवर भरत आहेत. अर्जदाराने जून 1996 ते एप्रिल 2009 पर्यत विज देयके विना विलंब भरली आहेत. माहे एप्रिल 2009 मध्‍ये देयकामध्‍ये चालू रिंडीग फॉल्‍टी दिले व माहे जूलै 2010 रोजी पर्यतचे देयक हे चालू रिंडींग फॉल्‍टी म्‍हणून दिले. एकूण यूनिकट 54 असून त्‍यानुसार दिलेले बिल ते भरत आलेले आहेत. त्‍यानुसार माहे जूलै 2010 पर्यत देयकाची रक्‍कम भरली. अर्जदाराच्‍या विनंतीवरुन गैरअर्जदाराने अर्जदारास नविन मिटर बदलून दिले.ऑगस्‍ट 2010 रोजीचे देयकात चालू रिंडीग 5910 मागील रिंडीग 5907 एकूण वापरलले यूनिट 03 असे होते व देयकामध्‍ये अर्जदाराने न वापरलेल्‍या विजेचया देयकाची थकीत रक्‍कम रु.26,637.41 एवढी रक्‍कम भरण्‍यास सांगितले
 
 
त्‍यांनी गैरअर्जदार क्र.2 कडे जाण्‍यास सांगितले. त्‍याचे कडे गेले असता त्‍यांनी गैरअर्जदार क्र.3 कडे जाण्‍यास सांगितले ? गैरअर्जदार क्र.3 यांनी अर्जदारास तोंडी आश्‍वासन देऊन जूने बिल रदद करुन नवीन बिल देण्‍यात येईल असे सांगितले ? म्‍हणून त्‍यांनी ऑगस्‍ट 2010 चे देयक भरले नाही.नंतर गैरअर्जदार यांनी सप्‍टेंबर 2010 चे देयक रु.199/- दिले व त्‍यात मागील देयकाची रक्‍कम रु.27,215.33 व्‍याजासह असे मिळून रु.27,330.00 दिले.देयक न भरल्‍यास दि.27.10.2010 रोजी विज पूरवठा बंद करण्‍यात असे सांगितले. गैरअर्जदार यांनी चूकीचे बिले देऊन अर्जदारास ञूटीची सेवा दिलेली आहे.अर्जदाराचे मिटर घरगूती वापरासाठी आहे.अर्जदाराने गैरअर्जदारास दि.2.9.2010 रोजीचे पञ देऊनही गैरअर्जदाराने त्‍या पञाची दखल न घेता दि.18.9.2010 व दि.16.10.2010 रोजीचे चूकीचे नवीन देयक दिले. अर्जदार यांनी वेळोवेळी तक्रार करुन सूध्‍दा गैरअर्जदार यांनी चूकीचे बिले देणे चालूच ठेवले म्‍हणून अर्जदारास मानसिक ञास झाला आहे त्‍याबददल रु.25,000/- मिळावेत तसेच दावा खर्च म्‍हणून रु.3,000/- मिळावेत, व देयक रु.27,130/- रदद करावे अशी मागणी केली आहे.
2.                गैरअर्जदार क्र.1 ते 3 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. अर्जदारास तक्रार दाखल करण्‍यास कोणतेही कारण घडले नसताना खोटी व चूकीचे तक्रार दाखल केली आहे म्‍हणून ती फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. विज कायदा 2003 च्‍या कलम 168 प्रमाणे   अधिका-याविरुध्‍द वैयक्‍तीकरित्‍या तक्रार दाखल करता येत नाही. अर्जदार यांचा गैरअर्जदार यांचेशी ग्राहक म्‍हणून काहीही संबंध नाही. अर्जदार यांनी 1996 साली घर खरेदी केले पण 2010 पर्यत सदर विज मिटर स्‍वतःचे नांवे करावे म्‍हणून अर्ज दिलेला नाही. सदर मिटर नंबर हे श्रीयुत आर.व्‍ही.मुक्‍कावार यांचे नांवे आहे.म्‍हणून अर्जदार यांना ग्राहक म्‍हणून घेता येणार नाही. अर्जदार यांनी सदर मिटर क्र.558010016585 चा वापर केला व आजही विजेचा वापर करीत आहेत हे म्‍हणणे चूक आहे ? हे म्‍हणणे खोटे आहे की, अर्जदारास देयक रु.26,637.41 दिले.अर्जदार यांनी रु.26,680/- बिल येण्‍या इतपत विजेचा वापर केला नाही हे म्‍हणणे चूकीचे आहे ? दि.27.10.2010 रोजी विज पूरवठा बंद करण्‍यात येईल असे सांगितले हे म्‍हणणे बरोबर नाही.अर्जदाराचे मिटरचे इन्‍स्‍पेक्‍शन दि.18.8.2010 रोजी करण्‍यात आले त्‍यादिवशी विजेचा वापर 5878 इतका होता ? तांञिक कारणामुळे ग्राहकास 54 यूनिटचे सरासरी बिल देण्‍यात येत होते ? मार्च 2009 ते जूलै 2010 या 17 महिन्‍यात 5907 यूनिटचा विजेचा वापर केला होता त्‍यानुसार दर महिना विजेचा वापर 348 युनिट इतका झाला होता ? एकूण विजेचे बिल रु.30,037.30 झाले होते त्‍यापैकी अर्जदाराने रु.3400/- भरले आहेत ते वजा करता रु.26,637/- रक्‍कम बाकी होती. प्रत्‍येक महिन्‍यास अर्जदाराने बिल न भरुन चूक केली आहे म्‍हणून गैरअर्जदाराच्‍या सेवेत कोणतीही ञूटी नसून अर्जदाराची तक्रार रु.10,000/- खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
3.                 अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञ पाहून जे मूददे उपस्थित होतात, ते मुददे व त्‍यावरील सकारण उत्‍तरे खालील प्रमाणे,                        
           मूददे                                                                                            उत्‍तर
1.     अर्जदार ग्राहक आहेत काय ?                                                          होय.
2.    गैरअर्जदार यांनी अर्जदारास ञूटीची सेवा दिली आहे काय ?           होय.
3.    काय आदेश  ?                                                                        अंतिम आदेशाप्रमाणे
 
 
मूददा क्र. 1 ः-
4.                अर्जदार यांनी देगलूर येथील असलेले घर व विज मिटर ज्‍यांचा ग्राहक क्र.558010016585 असलेले त्‍यांचे मूळ मालक मूक्‍कावार यांचेकडून खरेदी खत क्र.1560/1996 दि.27.6.1996 प्रमाणे विकत घेतलेले आहे व तेव्‍हापासून अर्जदार हे त्‍या घराचे व विज मिटरचा उपभोग घेत आहेत. अर्जदाराने सदरी रजिस्‍ट्रर खरेदी खताची नक्‍कल दाखल केली आहे. जरी अर्जदार यांनी दि.27.6.1996 रोजी सदरी मूल्‍यवान वस्‍तू विकत घेतली असली तरी मागील 14 वर्षापासून त्‍यांनी सदरी मिटर त्‍यांचे नांवावर का करु शकले नाही ?  या बददल सबळ कारण काही दिसून येत नाही. तथापि अर्जदार हे मालक म्‍हणून सदरी घराचा व मिटरचा उपयोग करीत आहेत याबददल दूमत नाही. म्‍हणून अर्जदार हे गैरअर्जदाराचे सध्‍या डायरेक्‍ट ग्राहक नसले तरी इनडायरेक्‍ट ग्राहक आहेत. कारण मागील अनेक वर्षापासून ते विज बिलाची रक्‍कम गैरअर्जदाराकडे भरत आहेत वरील विवेचनावरुन मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
मूददा क्र.2 ः-
5.                अर्जदाराने आपल्‍या तक्रार अर्जासोबत कागदपञाची यादी नि.4 वर दाखल केली आहे. त्‍या यादीवरुन असे दिसते की, त्‍यांनी त्‍या यादीसोबत सदरी घराची खरेदी खताची नक्‍कल, विज देयकाच्‍या नक्‍कला दाखल केलेल्‍या आहेत. गैरअर्जदारांनी दिलेल्‍या विज देयकाच्‍या नक्‍कलाचे अवलोकन केले असता असे दिसते येते की, गैरअर्जदार क्र.2 यांनी माहे ऑगस्‍ट 2009 च्‍या विज वापराबददलचे चार्जेस रु.600/- लावलेले आहेत. एकूण यूनिट 80 असल्‍याचा त्‍या बिलामध्‍ये उल्‍लेख केलेला आहे. त्‍याचप्रमाणे गैरअर्जदार यांनी मे,2009चे बिल दिलेले आहे त्‍यावरुन असे दिसते की, त्‍या महिन्‍यामध्‍ये अर्जदाराने एकूण 54 यूनिट विज वापराबददल रु.180/- असे बिल दिलेले आहे. अर्जदाराने वरील दोन्‍ही बिलाची रक्‍कम भरली आहे. त्‍याचप्रमाणे कागदपञावरुन असे दिसते की, मार्च,2010 मध्‍ये गैरअर्जदारानी अर्जदारास 54 यूनिट विज वापराबददल रु.210/-  चे बिल दिलेले आहे. एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराने सदरी विज मिटर द्वारे दरमहा अंदाजे 54 यूनिट विज वापर केला आहे व त्‍याबददल गैरअर्जदार यांनी वेळोवेळी तसे देयके दिलेली आहे व अर्जदाराने ते देयक भरलेली देखील आहेत. गैरअर्जदारांना हे मान्‍य आहे की, सदरी मिटर हे राहत्‍या घराचे आहे म्‍हणून वापरल्‍या जात होते.
6.                कागदपञावरुन असे दिसते की, त्‍यानंतर गैरअर्जदाराने अचानकपणे माहे ऑगस्‍ट 2010 चे बिल दिले आहे. त्‍यामध्‍ये फक्‍त 3 युनिट विज वापरल्‍याचे लिहीले आहे पण मागणी रु.26,680/- ची केली आहे ?  कागदपञावरुन असेही दिसते की, त्‍यानंतर सप्‍टेबर 2010 चे विज देयक गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिले व त्‍यामध्‍ये देखील सप्‍टेंबर 2010 मध्‍ये वापरलेले यूनिट फक्‍त 50 असे दाखवले तरी देखील विज बिल रु.27,327.84 ची मागणी केली आहे ? मागील संपूर्ण वर्षात अर्जदाराने जे यूनिट वापरलेले आहेत ते दरमहा फक्‍त 54 यूनिटचा वापर आहे. सप्‍टेंबर 2010 मध्‍ये फक्‍त 50 यूनिट वापरलेले असताना एवढया रक्‍कमेचे बिल कसे काय दिले ?  या बददल गैरअर्जदार क्र.1 खूलासा करु शकत नाही. कागदपञावरुन असे दिसते की, ऑगस्‍ट 2010 चे बिल
 
 
 
गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले आहे. त्‍या महिन्‍याचा वापर 3 यूनिट दाखवलेला असून एकूण रु.26,680/- दाखवलेले आहेत ?  वरील कागदपञावरुन सकृतदर्शनी असे दिसते की, गैरअर्जदाराने नजरचूकीने  किंवा कर्मचा-याच्‍या निष्‍काळजीपणामूळे विज देयक रु.26,680/-माहे ऑगस्‍ट 2010 चे, रु.27,330/- माहे सप्‍टेंबर 2010 चे चूकीचे दिलेले आहे असे वाटते. म्‍हणून  अर्जदाराचे जे म्‍हणणे आहे की गैरअर्जदार यांनी त्‍यांना ञूटीची सेवा दिली, यामध्‍ये बरेच तथ्‍य आहे. अर्जदाराने सदरी चूकीचे देयक रदद करावेत अशी विनंती केली आहे. एकंदरीत बिल मागणी बाबत सकृतदर्शनी असे वाटते की, ऑगस्‍ट 2010 व सप्‍टेंबर 2010 चे विज आकाराची मागणी गैरअर्जदार यांनी चूकीची केलेली आहे असे वाटते. म्‍हणून मूददा क्र.2 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
 
मूददा क्र.3 ः-
 
7.                वरील चर्चेवरुन असे दिसते की,संपूर्ण वर्षभरात अर्जदारयांनी दरमहा फक्‍त 54 यूनिट च विज वापरलेली आहे. त्‍याबददल पूर्णाक देयक अंदाजे रु.200/- दरमहा त्‍यांना देण्‍यात आले आहे व त्‍यांनी ते नियमितपणे भरलेले आहे. त्‍यानंतर सर्व प्रथम माहे ऑगस्‍ट 2010 मध्‍ये अर्जदारास 3 यूनिट चे बिल देऊन देखील पूर्णाक देयकची मागणी रु.26,680/- बिलाची चूकीची मागणी केली आहे ? त्‍याचप्रमाणे माहे सप्‍टेबर 2010 मध्‍ये 50 यूनिटचीे बिल देऊन मागणी माञ पूर्णाक देयक रु.27,330/- ची केलेली आहे ती सूध्‍दा सकृतदर्शनी चूकीची आहे असे वाटते. माहे ऑगस्‍ट 2010 व सप्‍टेंबर 2010 ची मागणी बिलाची रक्‍कम रदद करण्‍या योग्‍य आहे असे आमचे मत आहे. त्‍यांनी महिन्‍याची सरासरी बिल रु.200/- ची मागणी करावयास पाहिजे होती ती न करता निष्‍काळजीपणे त्‍यांनी ऑगस्‍ट व सप्‍टेंबर 2010 ची मागणी अवास्‍तव व भरमसाठ केली आहे ती रदद होण्‍यास पाञ आहेत असे आमचे मत आहे.
 
8.                अर्जदाराने त्‍यांची मागणीमध्‍ये सेवेच्‍या ञूटी बददल दंड म्‍हणून रु.25,000/- व मानसिक ञासाबददल रु.25,000/- व शारीरिक ञास बददल रु.10,000/- मागणी केलेली आहे ?  सदरील मागणी हे अवास्‍तव आहे असे आम्‍हास वाटते. कोणा तरी कर्मचा-याचे हलगर्जीपणामूळे किंवा निष्‍काळजीपणामूळे ऑगस्‍ट व सप्‍टेंबर 2010 चे बिल चूकीचे देण्‍यात आलेले असावे त्‍याबददल गैरअर्जदारावर भूर्दड लावणे योग्‍य होणार नाही.
 
9.                अर्जदार यांनी मागील चौदा वर्षामध्‍ये गैरअर्जदार यांच्‍याकडे रितसर अर्ज देऊन सदर मिटर त्‍यांचे नांवे का करुन घेतले नाही हे मोठे कोडे आहे ?  त्‍यांनी आता तरी विनाविलंब गैरअर्जदाराकडे रितसर अर्ज देऊन मिटर त्‍यांचे नांवे करुन घ्‍यावे व त्‍यास गैरअर्जदार हे नक्‍कीच सहकार्य करतील याबददल संशय घेण्‍याचे कारण नाही.
 
10.               वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
 
 
 
 
                                                                            आदेश
1.                                          अकर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते आहे.
 
2.                                          हा निकाल लागल्‍यापासून 30 दिवसांचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदारास माहे ऑगस्‍ट व सप्‍टेंबर 2010 च्‍या बिलाची रक्‍कम दरमहा रु.200/- प्रमाणे नवीन बिल दयावे.
 
3.                                          गैरअर्जदाराने माहे ऑगस्‍ट व सप्‍टेंबर 2010 चे दिेयक अनूक्रमे रु.26,680/- व रु.27,330/- दिलेले आहेत ती रददबातल ठ‍रविण्‍यात येत आहेत.
 
4.                                          सदरी चूकीचे बिलाची मागणी करुन अर्जदारास गैरअर्जदार यांनी नक्‍कीच मानसिक ञास दिलेला आहे त्‍याबददल गैरअर्जदाराने अर्जदारास रु.2,000/- व दाव्‍याचा खर्च म्‍हणून रु.1,000/- दयावेत.
 
5.                                          पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
 श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                  श्रीमती सुवर्णा देशमूख      
                अध्‍यक्ष                                                               सदस्‍या
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE MR. President B.T.Narwade] PRESIDENT