Maharashtra

Nanded

CC/10/292

Jawaharlal Ganulal Jaiswal - Complainant(s)

Versus

Junior Engineer, Maharashtra State Electiricity Distribution Company Ltd.Mahur - Opp.Party(s)

A.N.Doefode

07 Mar 2011

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/292
1. Jawaharlal Ganulal JaiswalMahur Tq.Mahur NandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Junior Engineer, Maharashtra State Electiricity Distribution Company Ltd.MahurMahur Tq.MahurNandedMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 07 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
 
प्रकरण क्रमांक :- 2010/292
 
                    प्रकरण दाखल तारीख -             06/12/2010     
                    प्रकरण निकाल तारीख              07/03/2011
 
समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील,           - अध्‍यक्ष
         मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख.            -   सदस्‍या 
 
जवाहरलाल गणूलाल जैस्‍वाल,
वय वर्षे 67, धंदा शेती
रा.माहूर ता.माहूर,जि. नांदेड.                                      अर्जदार.
      विरुध्
1.     कनिष्‍ठ अभिंयता
महावितरण उप विभाग,माहूर
ता.माहूर जि. नांदेड                                       गैरअर्जदार
2.    कार्यकारी अभिंयता,
      महावितरण विभागीय कार्यालय,
      भोकर ता.भोकर जि. नांदेड
अर्जदारा तर्फे वकील        -   अड.ए.एन.डोईफोडे
गैरअर्जदारा तर्फे वकील       -   अड.विवेक नांदेडकर
 
                                                                                    निकालपत्र
 (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्‍यक्ष )
 
1.     अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी की,अर्जदार हा मौजे माहूर येथील घर क्र.1137(नवीन) 957 जूना चा मालक आहे. गैरअर्जदाराकडून अर्जदाराने 13 ते 14 वर्षापूर्वी विज जोडणी घेतली आहे त्‍यांचा क्रमांक आर 1038 ग्राहक क्र.565190082960 असा आहे.अर्जदाराच्‍या घराच्‍या मालकी बाबत शोभाबाई तेलेवाड यांचे सोबत वाद चालू असून सदरील दावा क्र.67/98 मध्‍हये तिच्‍या विरुध्‍द मनाई हूकूमाची डिक्री पारीत झाली आहे, सदर प्रकरणी जिल्‍हा न्‍यायालय नांदेड येथे अपील क्र.08/2008 प्रलंबित आहे. गैरअर्जदाराने यापूर्वी देखील सदर शोभाबाई हिच्‍या सांगण्‍यावरुन अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करण्‍याचा प्रयत्‍न केला होता, तिचे पती हे पोलिस अधिकारी आहेत. याबाबत अर्जदाराने ग्राहक तक्रार क्र.06/2008 दाखल केले होते त्‍यात नियमाच्‍या अधिन राहूनच विज पूरवठा खंडीत करता येईल याशिवाय करता येणार नाही असे आदेशीत करण्‍यात आले होते. गैरअर्जदाराने त्‍यानंतर देखील शोभाबाई यांच्‍या संगनमताने अर्जदाराला दि.11.08.2008 रोजी नोटीस दिली व घराबाबत कागदपञ दाखल करण्‍यास सांगितले व विज पूरवठा खंडीत करण्‍याची धमकी दिली. त्‍याबाबत अर्जदाराने तक्रार अर्ज क्र.73/2008 दाखल केला होता त्‍याबाबत मालकी हक्‍काचा वाद स्‍पष्‍ट झाल्‍यानंतरच गैरअर्जदार कंपनीस त्‍याप्रमाणे पूढील कार्यवाही करता येईल असे नमूद केले आहे. सदर
 
 
 
निकालाविरुध्‍द मा. राज्‍य आयोगाने औरंगाबाद यांचेकडे अपील क्र.81/2009 दाखल केले असून ते न्‍यायप्रविष्‍ट आहे. अर्जदाराने ग्राहक मंचात तकार केल्‍यामूळे गैरअर्जदार हे चिडून आहेत व वेळोवेळी चूकीचे बिल जाणीवपूर्वक देऊन अर्जदारास ञास देत आहेत. उदा. दि.13.7.2010 रोजी अर्जदारास रु.4480/- चे देयक दिले, जे की चूकीचे आहे, अर्जदाराने दि.31.7.2010 रोजी रु.2500/- भरले व त्‍याच बिलावर संपूर्ण बिल वसूल झाल्‍याची नोंद करुन सही व शिक्‍का आहे. दि.8.9.2010 रोजी रु.5780/-चे बिल दिले त्‍यात रु.692/- चाजू बिल व रु.5090/- मागील थकबाकी दाखविली आहे. हे बिल चूकीचे आहे. गैरअर्जदारांनी सदरची रक्‍कम बिलावर वजा करुन रु.3280/- अर्जदाराकडून दि.28.09.2010 रोजी वसूल केले. त्‍यामूळे सप्‍टेंबर 2010 पर्यत अर्जदाराकडे कोणतीही थकबाकी शिल्‍लक नाही. परतु पून्‍हा दि.11.10.2010 रोजी रु.3100/- चे बिल दिले व त्‍यात रु.582/- चालू बिल व रु.2515/- मागील बाकी दाखविली. अर्जदाराने गैरअर्जदाराच्‍या लक्षात आणून दिल्‍यावर त्‍यांनी रु.582/- भरण्‍यास सांगितले व तसे बिलावर लिहून दिले. दि.4.11.2010 रोजी अर्जदाराला रु.3020/- चे बिल देण्‍यात आले त्‍यात रु.492/- चालू बिल व रु.2528/- मागील थकबाकी दाखविण्‍यात आली आहे. परत गैरअर्जदाराच्‍या लक्षात आणून दिल्‍यावर त्‍यांनी रु.500/- चे बिल भरावे असे लिहून दिले.त्‍याप्रमाणे दि.27.11.2010 रोजी अर्जदाराने रु.500/- चे बिल भरले. अशाप्रकारे नोव्‍हेबर 2010 पर्यत अर्जदाराकडे कोणतीही थकबाकी शिल्‍लक नाही.गैरअर्जदाराने पून्‍हा शोभा यांच्‍या दि.11.3.2004 च्‍या अर्जाचा हवाला देऊन पून्‍हा मालकी हक्‍काची कागदपञे न दिल्‍यास विज पूरवठा खंडीत करण्‍यात येईल अशी नोटीस दि.04.11.2010 रोजी दिली. सदर नोटीस अवैध व बेकायदेशीर आहे. मनाई हूकूमाची डिक्री असताना देखील गैरअर्जदार यांनी अशा प्रकारची नोटीस देण्‍याचे काही कारण नव्‍हते. तरीही दि.16.11.2010 रोजी गैरअर्जदारातर्फे माहूर व भोकर येथील अधिकारी पोलिस बंदोबस्‍तात येऊन अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत केला. अर्जदाराने विज पूरवठा जोडून दयावा म्‍हणून विनंती केली पण गैरअर्जदारांनी काही लेखी उत्‍तर दिले नाही व तोंडी नकार दिला. वीशेष म्‍हणजे दि.04.11.2010 रोजीच्‍या नोटीसमध्‍ये गैरअर्जदाराने थकीत बिलाबाबत मागणी केलेली नाही. अर्जदार हा 67 वर्षाचा वयोवृध्‍द ज्‍येष्‍ठ नाग्ररिक असून तो ग्रामीण भागातील मागासवर्गीय आहे. अर्जदाराची मागणी आहे की, त्‍यांचा विज पूरवठा पूर्ववत कायम चालू करणेकामी गैरअर्जदारांना आदेश दयावेत, गैरअर्जदारांनी अर्जदाराला दिलेली दि.04.11.2010 रोजीची नोटीस आणि दि.15.11.2010 रोजीची विज पूरवठा खंडीत केल्‍याची कृती बेकायदेशीर असल्‍याचे ठरवीणे कामी आदेश करणे, गैरअर्जदाराच्‍या बेकायदेशीर कृत्‍याबाबत त्‍यांना जास्‍तीत जास्‍त दंड करण्‍याचा यावा.
2.                गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केले आहे.विज कायदा 2003 च्‍या कलम 168 अन्‍वये सदर अधिका-यांना योग्‍य ते संरक्षण दिलेले असल्‍याकारणाने त्‍यांचे विरुध्‍द दाखल केल्‍या जाऊ शकत नाही करिता अर्ज खारीज करावा असे म्‍हटले आहे ? अर्जदाराचा अर्ज हा प्रांग नीर्णय या तत्‍वानुसार बाद होणार आहे. यापूर्वी गैरअर्जदाराविरुध्‍द तक्रार क्र.06/2008 दाखल केला होता त्‍यांचा नीर्णय दि.09.05.2008 रोजी झाला त्‍यानंतर दूसरा अर्ज क्र.273/2008 दाखल करण्‍यात आला ज्‍यांचा नीर्णय दि.12.01.2009 रोजी झालेला आहे. म्‍हणून त्‍यांच मूदयावर तो अर्ज प्रांग नीर्णयाआधारे रदद होण्‍या योग्‍यतेचा आहे. प्रकरण क्र.06/2008 मध्‍ये शोभाबाई यांनी एक अर्ज दिला व त्‍यांना मान्‍यवर ग्राहक मंचाने पार्टी करुन घेतले
 
 
होते कारण सदर शोभाबाई यांनी या घराच्‍या बददल मालकी असल्‍याचे नमूद केले होते. अर्जदाराने दाखल केलेला दावा हा कराराच्‍या पूर्ततेचा दावा होता व ही बाब सर्वमान्‍य आहे, कराराची पूर्तता होऊन विक्री पञ झाल्‍याखेरीज कोणत्‍याही व्‍यक्‍तीला मालकीच्‍या पूर्णत्‍वाचे अधिकार मिळत नाही.  अर्जदाराकडे बिलाची कोणतीही थकबाकी नाही हे म्‍हणणे सर्वस्‍वी खोटे आहे.गैरअर्जदाराने शोभाबाई हिच्‍या म्‍हणण्‍यावरुन अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत केला होता हे म्‍हणणे चूकीचे आहे. गैरअर्जदाराने दि.19.08.2008 रोजी शोभाबाई यांच्‍या संगनमताने नोटीस दिली व कागदपञ सादर करण्‍यास सांगितले हे म्‍हणणे चूकीचे व खोटे आहे. हे म्‍हणणे खोटे आहे कि, अर्जदाराने वेळोवेळी ग्राहक मंचात तक्रार केल्‍यामूळे ते चिडून आहेत व चूकीचे बिल देत आहेत. अर्जदाराला देण्‍यात आलेले बिल हे प्रत्‍यक्ष वापर केलेल्‍या विज वापराचे बिल आहे त्‍यामूळे ते चूक असण्‍याचा प्रश्‍नच उदभवत नाही. संगणीकृत बिले देण्‍याच्‍या पध्‍दतीमध्‍ये अनावधानाने भरलेल्‍या रक्‍कमेची नोंद आलेली नसल्‍याकारणाने ती नोंद करुन भरलेली रक्‍कम वजा करुन उर्वरित रक्‍कम देण्‍यात आली होती ? दि.4.11.2010 रोजी अर्जदारास गैरअर्जदाराने नोटीस दिली हे मान्‍य आहे,  कारण ज्‍या व्‍यक्‍तीला विज पूरवठा देण्‍यात आलेलो आहे त्‍या व्‍यक्‍तीच्‍या मालकीची कागदपञे तपासून पाहण्‍याचा गैरअर्जदाराला पूर्ण अधिकार आहे. नोटीस अवैध व बेकायदेशीर आहे हे म्‍हणणे खोटे व चूकीचे आहे. पोलिस बंदोबस्‍तात दि.16.11.2010 रोजी विज पूरवठा खंडीत केला हे म्‍हणणे खोटे आहे. भारतीय विज कायदा 2003 च्‍या कलम 56 नुसार विजेचे बिल थकीत असलयास गैरअर्जदारांना सदर ग्राहकाची विजेची जोडणी तोडण्‍याचा पूर्ण अधिकार आहे. गैरअर्जदार यांनी कोणतीही सेवेत ञूटी केलेली नसून त्‍यांचे विरुध्‍दची तक्रार ही खर्चासह फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे.
      3.          अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपत्र तपासल्‍यानंतर व दोन्‍ही बाजूचा यूक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर जे मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्‍यावरील सकारण उत्‍तरे खालील प्रमाणे.
मुद्ये.                                                                                          उत्‍तरे.
1.     अर्जदार हे ग्राहक आहे काय ?                                                           होय.
2.    अर्जदार यांने केलेली मागणी पूर्ण करण्‍यास
गैरअर्जदार जबाबदार आहेत काय ?                                      होय,अंशतः          
3.    काय आदेश ?                                                                      अंतीम आदेशाप्रमाणे.
                                    कारणे
मुद्या क्र. 1 व 2 
 
4.                हे दोन्‍ही मूददे परस्‍पराशी पूरक असल्‍यामूळे ते एकञित चर्चिण्‍यात येत आहेत.अर्जदार हा नवीन घर क्रमांक 1837 व जूना घर क्रंमाक 957 माहूर येथे स्थित असलेल्‍या घरात मागील अंदाजे 13 ते 14 वर्षापासून राहतो याबददल दूमत नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराला दि.4.11.2010 रोजी जी नोटीस पाठविली त्‍या नोटीसमध्‍ये सूध्‍दा त्‍यांनी कबूल केले आहे की, त्‍यांनी अर्जदारास विज कनेक्‍शन नंबर 1038 हे दि.25.08.1998 रोजी दिलेले आहे. गैरअर्जदर विज कंपनी ही महाराष्‍ट्रामध्‍ये विज पूरवठा करणारी एकमेव कंपनी आहे. त्‍यांच्‍याच म्‍हणण्‍याप्रमाणे दि.25.08.1998 रोजी अर्जदाराला विज पूरवठा करण्‍यात आला होता. त्‍यामूळे अर्जदार हे गैरअर्जदाराचे ग्राहक आहेत यांत शंका घेण्‍याचे कारण नाही. कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराने वेळोवेळी विज
 
 
बिलापोटी रक्‍कम गैरअर्जदाराकडे भरली आहे. अर्जदारास विज मिळण्‍यासाठी इतर कोणतीही कंपनी नाही व गैरअर्जदाराने अर्जदारास विजेचे कनेक्‍शन दि.25.08.1998 रोजी दिलेले असल्‍यामूळे अर्जदार हे त्‍यांचे ग्राहक आहेत हे सिध्‍दच झालेले आहे.
5.                एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, यापूर्वी अर्जदाराने गैरअर्जदार यांचे विरुध्‍द फिर्याद नंबर 06/2008 ही दाखल केली होती. गैरअर्जदाराच्‍या म्‍हणण्‍याप्रमाणे त्‍या तक्रारीमध्‍ये सदरी शोभाबाई हया स्‍वतःहून शरीक झाल्‍या होत्‍या. सदरील तक्रारीचा निकाल या मंचाने दि.09.05.2008 रोजी दिलेला आहे. त्‍यामध्‍ये असे म्‍हटले आहे की, “ गैरअर्जदार विज वितरण कंपनी ही भारतीय विज कायदा 2003 आणि महाराष्‍ट्र विज नियामक आयोग यांनी त्‍यासोबत केलेले नियम यांचे अधीन राहूनच अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करण्‍याची कारवाई करु शकतील ” अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी सदरील शोभाबाई विरुध्‍द दिवाणी दावा क्र.67/1998 चा दाखल केला होता व त्‍याप्रमाणे दिवाणी न्‍यायालयाने सदरील शोभाबाई  विरुध्‍द मनाईहूकूम पारीत केलेला आहे. सदरील दाव्‍याच्‍या  निकालाची झेरॉक्‍स प्रत अर्जदाराने दाखल केली आहे. त्‍या केसच्‍या निकालावरुन असे दिसते की, विद्यमान दिवाणी न्‍यायाधीश किनवट यांनी तो वादीचा दावा अंशतः डिक्री केला आहे. त्‍याप्रमाणे निकाल पञातल्‍या पॅरा नंबर 2 मध्‍ये असे लिहीण्‍यात आले आहे की, “ The defendants or anybody else on their behalf shall hereby restrained from disturbing the possession of plaintiff over suit house bearing no.957 of Mahur as described in plaint without taking a resort of due process of law.””
 
सदरील गैरअर्जदार शोभाबाई यांनी अपील केल्‍याचे या रेकॉर्डवरुन दिसत नाही. सदरील फिर्याद नंबर 06/2008 मध्‍ये सदरील शोभाबाई स्‍वतःहून हजर झाल्‍या होत्‍या परंतु त्‍या या तक्रारअर्जामध्‍ये स्‍वतःहून का हजर झाल्‍या नाहीत ?  त्‍याबददल काही समजून येत नाही. वरील दिवाणी दाव्‍याच्‍या निकाला बाबत एक गोष्‍ट स्‍पष्‍ट आहे की, सक्षम अशा दिवाणी न्‍यायालयाने सदरील शोभाबाईच्‍या विरुध्‍द अर्जदाराच्‍या ताब्‍यामध्‍ये ढवळाढवळ करु नये अशी ताकीद दिलेली आहे. जरी तो दावा अंशतः डिक्री झाला व वादीची विनंती Specific performance of contract  ची न्‍यायालयाने मंजूर जरी केली नसली तरी अर्जदाराच्‍या कथनावरुन असे दिसते की, त्‍यांनी त्‍या दाव्‍याच्‍या निकालाच्‍या विरुध्‍द मे. जिल्‍हा न्‍यायालय येथे अपील नंबर 08/2008 दाखल केले आहे व ते अपील प्रलंबित आहे. दिवाणी अपील म्‍हणजे Continuation of suit  आहे असे गृहीत धरण्‍यात येते असा कायदा सांगतो. म्‍हणजे सदरील मनाईहूकूम असताना देखील सदरील शोभाबाई यांनी या गैरअर्जदाराकडे परत अर्ज देऊन गैरअर्जदारांना अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत करण्‍यास भाग पाडले आहे असे वाटते. वास्‍तविक पाहता जेव्‍हा अर्जदार हे गैरअर्जदाराचे 12 वर्षापासून जास्‍त काळ पासून ग्राहक आहेत व ते विज बिलाची रक्‍कम गैरअर्जदाराकडे भरत आहेत अशा परिस्थितीमध्‍ये गैरअर्जदाराने त्‍यांचा विज पूरवठा खंडीत करण्‍यास नको होता. अर्जदाराच्‍या मालकी वीषयी चौकशी करण्‍याचे अधिकार गैरअर्जदारांना नाहीत. ते जी वीज पुरवितात त्‍यांचा मोबदला मिळतो किंवा नाही हेच पहाणे त्‍यांचे कर्तव्‍य आहे. जर ग्राहक नियमित देयके भरत असेल तर वीज खंडीत करताच येणार नाही.
 
6.                कागदपञावरुन असेही दिसते की, वरील ग्राहक मंचाच्‍या निकालानंतर सदरील अर्जदारास गैरअर्जदाराने कथीत ञास दिल्‍याबददल दूसरी तक्रार नंबर 273/2008 दाखल करण्‍यास भाग पाडले. सदरील तक्रार नंबर 273/2008 चा निकाल
 
 
या मंचाने दि.12.01.2009 रोजी दिला व त्‍याप्रमाणे अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्‍यात आला होता. त्‍या निकालामध्‍ये मंचाने असे म्‍हटले आहे की, “  दिवाणी न्‍यायालयाचा दावा नंबर आरसीएस नंबर 67/1998 यांचा निकाल अजूनही लागलेला नाही. आता अंतरिम आदेशात अर्जदाराच्‍या ताब्‍यात असलेल्‍या जागेचा अडथळा करु नये असा हूकूम केला आहे व यात अपील नंबर 08/2008 जिल्‍हा न्‍यायालयात अपील ही प्रलंबित आहे. वर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे सदरील दिवाणी दावा नंबर 67/1998 हा मनाईहूकूम करीता का होईना अर्जदाराच्‍या बाजूने न्‍यायालयाने निकाल दिलेला आहे व त्‍याबददल अपील नंबर 08/2008 जिल्‍हा न्‍यायालयात प्रलंबित आहे असे असून देखील गैरअर्जदार यांनी सदरील शोभाबाई यांच्‍या अर्जावरुन विज पूरवठा खंडीत केलचे दिसते.
विज कायद्याच्‍या कलम 56 प्रमाणे पूर्ण 15 दिवसाची नोटीस दिल्‍याशिवाय विज खंडण करताच येत नाही.
 
7.                अर्जदाराने दाखल केलेल्‍या कागदपञावरुन असे दिसते की, गैरअर्जदारांनी अर्जदारास दि.4.11.2010 रोजीची जी नोटीस दिली त्‍यामध्‍ये संदर्भ नंबर 1 मध्‍ये असे लिहीलेले आहे की, सौ. वर्षा तेलेवार रा. माहूर यांचा तक्रार अर्ज दि.11.03.2000, संदर्भ नंबर 2 मध्‍ये    असे लिहीलेले आहे की, विज पूरवठा कायम स्‍वरुपी खंडीत करण्‍याचे पञ दि.12.04.2000 चे, सदरील दावा शोभाबाई यांचे विरुध्‍द आहे व या संदर्भ नंबर 1 मध्‍ये सौ. वर्षा तेलेवार असे लिहीलेले आहे ?  अर्जदाराचे असे म्‍हणणे आहे की, सदरील शोभाबाई यांचे पती पोलिस खात्‍यामध्‍ये कार्यरत असल्‍यामूळेच गैरअर्जदार हे जाणूनबूजून अर्जदार यांना वारंवार ञास देत आहेत ? सदरील नोटीसमध्‍ये सौ. वर्षा तेलेवार रा. माहूर यांच तक्रार अर्जावरुन गैरअर्जदार यांनी सदरील नोटीस कशी दिली हे समजत नाही ? त्‍यामध्‍ये धमकीवजा सूचना देण्‍यात आली होती कि, मालकीहक्‍काचे कागदपञ सात दिवसांचे आंत गैरअर्जदाराच्‍या कार्यालयात हजर करावेत अन्‍यथा विज पूरवठा कायम स्‍वरुपी खंडीत करण्‍यात येईल ?  सदरील नोटीस बरोबर गैरअर्जदारांनी सौ. वर्षा तेलेवार यांचे मालकी हक्‍का बददलची कागदपञ अर्जदाराला पाठविल्‍याचे दिसत
नाही ?
8.                एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, दिवाणी न्‍यायालयात सदरील शोभाबाई यांचे विरुध्‍द मनाईहूकूमाची डिग्री दिलेली असून त्‍यांना ताकीद देण्‍यात आलेली होती कि, त्‍यांनी अर्जदारयांचे ताब्‍यामध्‍ये असलेले घरा बददल ढवळाढवळ करु नये असे असताना देखील जर शोभाबाई अशा प्रकारे अर्ज फाटे करीत असेल तर तशा प्रकारचे अर्ज फाटे हे न्‍यायालयाचा अपमान केल्‍यासारखे होईल ? नोटीसवरुन असे दिसते की, त्‍या कारवाईपासून दूर राहण्‍यासाठी म्‍हणूनच सदरील “ सौ. वर्षा तेलेवार ” यांनी त्‍यांचे या नवीन नांवाने तक्रार अर्ज गैरअर्जदाराकडे दिला असावा ?  अर्जदाराने गैरअर्जदारांना दि.15.11.2010 रोजी पञ देऊन विनंती केली होती की त्‍यांचे घराचे विज कनेक्‍शन हे कायम स्‍वरुपी चालू ठेवावे त्‍या अर्जामध्‍ये त्‍यांनी असा उल्‍लेख केला आहे की, सदरील दिवाणी दावा नंबर 67/1998 मध्‍ये दि.16.04.2007 रोजी झालेल्‍या निकालाप्रमाणे त्‍यांचे घराचे ताब्‍याबाबत गैरअर्जदार सौ.वर्षा ऊर्फ शोभा दत्‍ताञय तेलेवार व इतर यांनी कूठल्‍याही प्रकारचा अडथळा करु नये, असे स्‍पष्‍ट नमूद केलेले आहे. या पञावरुन  असे  दिसतें  की,   सदरील शोभाबाईचे ऊर्फ नांव वर्षा असावे परंतु सदरील
 
 
 
शोभाबाई यांनी त्‍यांचे ऊर्फ नांव वर्षा हे पूर्वीच्‍या तक्रार अर्जामध्‍ये शरीक का केले नाही ?  हे समजून येत नाही. एकंदर प्रकारावरुन असे दिसते की, केवळ सदरील सौ. वर्षा यांचे तक्रारी अर्जावरुन गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा विज पूरवठा खंडीत केलेला आहे, जे कायदयाच्‍या राज्‍यात अभिप्रेत नाही ?
 
9.                गैरअर्जदाराने असा उजर केला आहे की, पूर्वीची तक्रार निकाली नीघाल्‍यामूळे आता अर्जदाराला ही तक्रार दाखल करता येणार नाही. कारण ही तक्रार दाखल करण्‍यासाठी “ रेसज्‍यूडिकेटा ” या तत्‍वाचा बाद येतो ? अर्जदाराच्‍या वकिलाचे असे म्‍हणणे आहे की, सक्षम दिवाणी न्‍यायालयाने अर्जदाराच्‍या हक्‍कामध्‍ये व सदरील शोभाबाईच्‍या विरुध्‍द कायमचा मनाईहूकूम दिला असल्‍यामूळे सदरील शोभाबाई यांनी अशा प्रकारे ताब्‍यात असलेल्‍या घरा बददल ढवळाढवळ करण्‍याचा अधिकार नाही. जर अर्जदार हा कायम सूमारे 13 वर्षापासून त्‍या घरात राहत आहे व ताबा आहे व विजेच्‍या उपभोग घेत आहे, तर तो विज पूरवठा चालू ठेवण्‍यात हक्‍कदार आहे. गैरअर्जदाराने विज पूरवठा खंडीत केल्‍यामूळे अर्जदारास नवीन तक्रार दाखल करण्‍यास कारण घडलेले आहे, त्‍यामुळे या केसमध्‍ये “ रेसज्‍यूडिकेटा ” या तत्‍वाचा बाध येण्‍याचे कारण दिसत नाही.
 
10.               एकंदर कागदपञावरुन असे दिसते की, अर्जदाराने वेळोवेळी विज देयके गैरअर्जदाराकडे जमा केलेली आहेत व त्‍यांनीही वेळोवेळी विज भाराची रक्‍कम कमी करुन ती रक्‍कम घेतलेली आहे ? जर घराचा अर्जदाराकडे काही थकबाकी राहीली असती तर गैरअर्जदाराने अर्जदारास त्‍याबददल लगेच नोटीस पाठविली असती ?  नोटीस शिवाय गैरअर्जदार हे अचानकपणे विज पूरवठा खंडीत करुन अर्जदारास मानसिक ञास देऊ शकत नाहीत. जर अर्जदार थकबाकी मध्‍ये गेले असते तर गैरअर्जदारास त्‍यांचा विज पूरवठा खंडीत करण्‍याचे अधिकार आहेत परंतु त्‍यापूर्वी नियमाप्रमाणे अर्जदाराला कलम 56 प्रमाणे  नोटीस देणे हे त्‍यांचेवर बंधनकारक आहे. तसे न करता विज पूरवठा खंडीत करुन गैरअर्जदारांनी सेवेत ञूटीच केलेली आहे असे या मंचाचे मत झाले आहे.
11.                सदरील नोटीस दि.4.11.2010 मध्‍ये अर्जदाराकडे काही थकबाकी आहे असा एकही शब्‍द त्‍यात लिहीलेला नाही ? यांचा अर्थ दि.04.11.2010 रोजी अर्जदाराकडे कसलीही थकबाकी नव्‍हती, असेच गृहीत धरण्‍यास वाव आहे. त्‍यामूळे एक गोष्‍ट निश्चित वाटते की, तो विज पूरवठा सदरील सौ. वर्षा यांचे तक्रारीमूळेच खंडीत केलेला आहे व त्‍यामूळे गैरअर्जदाराने अर्जदारावर विज पूरवठा खंडीत करुन अन्‍यायच केलेला आहे. अर्जदार हे वयोवृध्‍द, मागासवर्गीय व्‍यक्‍ती आहेत व त्‍यांचे वय वर्ष 67 असे आहे. या वयामध्‍ये त्‍यांना किंवा त्‍यांचे कूटूंबियाना अशा प्रकारे अचानक सबळ कारणाशिवाय विज पूरवठा खंडीत करुन ञास देणे हे गैरअर्जदार या नामाकिंत विज कंपनीला शोभण्‍यासारखे नाही ?  अशा प्रकारे अचानक विज पूरवठा खंडीत केल्‍यामूळे अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये बरेच तथ्‍य आहे कि, हे सदरील शोभाबाई यांचे पती पोलिसमध्‍ये कर्मचारी असल्‍यामूळेच गैरअर्जदारांनी त्‍यांचेकडे सहानूभूतीने पाहून अर्जदाराकडे वक्र कटाक्ष टाकले ? अर्जदाराच्‍या वकिलाच्‍या या यूक्‍तीवादामध्‍ये बरेच तथ्‍य असल्‍याचे वाटते. गैरअर्जदाराने थकबाकी पोटी विज पूरवठा खंडीत करीत आहोत असे कूठेही म्‍हटलेले नाही ?
 
 
 
12.               अधिकचा ऊहापोह न करता एकंदर असे दिसते की, सक्षम दिवाणी न्‍यायालयाचा निकाल असताना व ग्राहक मंचाच्‍या निकालाच्‍या विरुध्‍द अपील प्रलंबित असताना अशा प्रकारे गैरकायदेशीर कृती करणे गैरअर्जदारास शोभण्‍यासारखे नाही. या अर्जदाराच्‍या म्‍हणण्‍यात बरेच तथ्‍य आहे असे वाटते. वरील दोन्‍ही अपीलाचा निकाल लागल्‍यानंतर किंवा अर्जदार जर थकबाकीमध्‍ये गेले असेल तरच गैरअर्जदाराला विज पूरवठा खंडीत करता आले असते, सदरील शोभाबाई किंवा वर्षा यांचे संगणनमतावरुन किंवा कूठल्‍यातरी दबावावरुन अशा प्रकारे विज पूरवठा खंडीत करणे अपेक्षीत नाही. वरील कारणामूळे सदरील मूददा क्र.1 व 2 यांचे उत्‍तर अंशतः सकारार्थी देण्‍यात येत आहे.
मूददा क्र.3 ः-
13.               गैरअर्जदारांनी केवळ सदरील वर्षाबाई किंवा शोभाबाई यांचे तक्रारीमूळेच सदरील विज पूरवठा खंडीत केलेला असल्‍यामूळे गैरअर्जदारांची ती कृती अशोभणीय अशीच आहे व सेवेत ञूटी दर्शवीणारी आहे. म्‍हणून गैरअर्जदाराला ताकीद देणे योग्‍य आहे की, त्‍यांनी ताबडतोब वयोवृध्‍दाच्‍या घराचा विज पूरवठा पूर्ववत जोडून दयावा व ही ञूटी अर्जदाराला अधिकचा ञास न देता लवकरात लवकर भरुन काढावी. अर्जदाराने विज देयके दिलेल्‍या तारखेच्‍या आंत नियमितपणे भरत जावीत. जर अर्जदार थकबाकीमध्‍ये गेला तरच गैरअर्जदाराने तशा प्रकारची नोटीस देऊनच विज पूरवठा खंडीत करण्‍याचा अधिकार राहील. नोटीस न देता अचानकपणे त्‍यांना आवश्‍यक सेवा असणारा विज पूरवठा खंडीत करता येणार नाही. एकंदर कागदपञ पाहता व दोन्‍ही बाजूचा यूक्‍तीवाद ऐकता गैरअर्जदाराला दंड लावणे उचित वाटत नाही. म्‍हणून आम्‍ही खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
                                                                              आदेश
अ)                                       अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्‍यात येतो.
आ)                                     गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना ताकीद देण्‍यात येते की, त्‍यांनी लवकरात लवकर अर्जदाराच्‍या वरील घर क्रमांक 1137 (नवीन) 957 (जूने) मौजे माहूर येथील विज जोडणी नंबर आर-1038 ग्राहक क्र.565190082960 चा विज पूरवठा ताबडतोब पूर्ववत जोडून दयावा., जर निकाल कळाल्‍यापासून 03 दिवसांचे आंत विज पूरवठा पूर्ववत करुन दिला नाही, तर गैरअर्जदार दररोजच्‍या मानसिक ञासाबददल रु.100/- अर्जदारास देण्‍यास बाद्य राहतील.
इ)                                         अर्जदार यांनी विज देयक मूदतीच्‍या आंत गैरअर्जदाराकडे नियमित भरावेत, जर ते थकबाकीदार राहीले तर गैरअर्जदार हे त्‍यांना पूर्व नोटीस देऊनच विज पूरवठा खंडीत करण्‍यास हक्‍कदार राहतील.
ई)                                         पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा.
उ)                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
उ)
 
 
 श्री.बी.टी.नरवाडे पाटील                                   श्रीमती सुवर्णा देशमूख          
                   अध्‍यक्ष                                                           सदस्‍या
 
 
 
जयंत पारवेकर
लघूलेखक                                                           

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT