निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 01/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 02/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 20/11/2013
कालावधी 10 महिने. 18 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
मुंजाजी पिता यादवराव कदम. अर्जदार
वय 50 वर्षे. धंदा.शेती. अॅड.ए.डी.खापरे.
रा.धर्मापुरी ता.जि.परभणी.
विरुध्द
1 कनिष्ठ अभियंता. गैरअर्जदार.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण.मर्या. अॅड.एस.एस.देशपांडे.
ग्रामीण उपविभाग,परभणी जिंतूर रोड,परभणी.
2 मुख्य अभियंता.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण.मर्या.
मुख्य कार्यालय,परभणी जिंतूर रोड, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा मौजे धर्मापुरी ता.जि.परभणी येथील रहिवाशी असून त्याने घरगुती वापरासाठी गैरअर्जदाराकडून विद्युत पुरवठा घेतला होता, ज्याचा ग्राहक क्रमांक 534270105291 व मिटर क्रमांक 7612902382 असा आहे. अर्जदाराचे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने बिल देयक क्रमांक 11 हे वादग्रस्त बिल 25/07/2012 ते 25/08/2012 या कालावधीचे बिल अर्जदारास दिनांक 07/09/2012 रोजी दिले. त्यामध्ये चालु रिडींग 4416 असे दाखवुन मागील रिडींग 799 अशी दाखवली व 3617 युनीटचा वापर दाखवुन 39,629/- रु.चे बिल गैरअर्जदाराने अर्जदारास दिले व मागील थकबाकी रु.1208/- दाखवुन 40,840/- रु.चे बिल दिले.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, त्याने 16/03/2012 पर्यंतची सर्व बिले वेळेवर भरलेली आहेत. सदरील वादग्रस्त बिल आल्यानंतर अर्जदाराने दिनांक 19/09/2012 रोजी त्ंयाना सदरचे बिल दुरुस्त करुन द्यावेत असा अर्ज केला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, त्यानंतर अर्जदाराने गैरअर्जदारास परत एकदा दिनाकं 05/11/2012 व 26/12/2012 रोजी दोन अर्ज दिले, तरी सुध्दा गैरअर्जदाराने अर्जाची दखल घेतली नाही, गैरअर्जदाराने सप्टेंबर 2011 ते जुलै 2012 पर्यंत अर्जदाराचा विज वापर अनुक्रमे 45, 36, 184,36,47,22, 50,75,44, 46 व 59 असा दाखवून अर्जदारास बिले दिले आहे, परंतु 25/07/2012 ते 25/08/2012 या महिन्या मध्ये एकुण विज वापर 3617 गैरअर्जदाराने चुकीच्या पध्दतीने दाखवुन चुकीचे बिल दिले, त्यामुळे दुरुस्त होणे गरजेचे आहे.
अर्जदाराचे म्हणणे आहे की, गैरअर्जदाराने सदरचे बील रिडींग न घेताच अत्यंत चुकीच्या पध्दतीने दिले आहे व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, म्हणून अर्जदारास सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली की, सदरचा अर्ज मंजूर करावा. गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले देयक क्रमांक 11 व त्यापूढील बिले दुरुस्त करुन द्यावे व शारिरीक व मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदाराने अर्जदारास 25,000/- व तक्रार अर्जाचा खर्च 5,000/- रु. देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 6 वर 10 कागदपत्रांच्या यादीसह 10 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये अर्जदाराने गैरअर्जदारास दिनांक 26/12/2012,19/09/2012, 05/11/2012 रोजी दिलेला अर्ज, जुलै 2012 चे लाईट बील, ऑगस्ट 2012 चे बील, सप्टेंबर 2012 चे लाईट बील, ऑगस्ट 2012 चे लाईट बील, सप्टेंबर 2012 चे लाईट बील, नोव्हेंबर 2012 चे लाईट बील, ऑक्टोबर 2012 चे लाईट बील, 16/03/2012 ची 1430/- रु. भरलेली पावती, फेब्रुवारी 2012 चे लाईट बील कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदाराना लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर, परंतु त्यांना लेखी जबाब सादर करण्यासाठी अनेक संधी देवुनही मुदतीत लेखी जबाब सादर न केल्यामुळे गैरअर्जदारा विरुध्द विनाजबाबाचा आदेश पारीत करण्यात आला.
अर्जदाराच्या तक्रार अर्जावरुन व दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदारास माहे ऑगस्ट 2012 चे देयक
क्रमांक 11 अन्वये 40,840/- रु.चे चुकीचे बील देवुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 6 वरील 6/4 वरील लाईट बिलावरुन सिध्द होते, गैरअर्जदारानी अर्जदारास बिल क्रमांक 11 अन्वये ऑगस्ट 2012 चे चालू रिडींग 4416 व मागील रिडींग 799 दाखवुन 40,840/- रु.चे बिल दिले होते हे नि.क्रमांक 6/7 वरील लाईट बिलावरुन दिसून येते, सदरचे विवादीत बिल हे अवाजवी आहे, असे मंचास वाटते, कारण सदर बिलाचे अवलोकन केले असता अर्जदाराचा लाईटचा वापर सप्टेंबर 2011 मध्ये 45 युनीट, ऑक्टोबर 2011 मध्ये 36 युनीट, नोव्हेंबर 2011 मध्ये 184 युनीट, डिसेंबर 2011 मध्ये 36 युनीट, जानेवारी 2012 मध्ये 47 युनीट, फेब्रुवारी 2012 मध्ये 22 युनीट, मार्च 2012 मध्ये 50 युनीट, एप्रिल 2012 मध्ये 75 युनीट, मे 2012 मध्ये 44 युनीट, जुन 2012 मध्ये 46 युनीट व जुलै 2012 मध्ये 59 युनीटचा करत होता हे दिसून येते, व तसेच अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 13/8 वरील दाखल केलेल्या सी.पी.एल. वरुन हे दिसून येते की, अर्जदाराचे मीटर नॉर्मल होते, जर मिटर नॉर्मल आहे तर गैरअर्जदाराने एकदम ऑगस्ट 2012 मध्ये बिल क्रमांक 11 अन्वये एकदम 3617 युनीटचा वापर दाखवून 40,840/- रु. चे बिल अर्जदारास देणे एकदम चुकीचे बेकायदेशिर असे मंचास वाटते. सदरचे बिल अर्जदाराने गैरअर्जदारास दुरुस्त करुन द्यावे बद्दल लेखी तक्रार दिली होती हे नि.क्रमांक 6/1, 6/2, 6/3 वरील कागदपत्रा वरुन दिसून येते. मंचाच्या आदेशा प्रमाणे अर्जदाराने गैरअर्जदाराकडे थकीत बिलापोटी 7000/- रु. भरले आहेत, हे नि.क्रमांक 13/1 वरील 21/01/2013 च्या पावती वरुन सिध्द होते. निश्चितच गैरअर्जदाराने अर्जदारास दिलेले ऑगस्ट 2012 चे बिल क्रमांक 11 हे दुरुस्त न करुन देवुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. जे की, दुरुस्त होणे गरजेचे आहे.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदाराने अर्जदारास देयक क्रमांक 11 अन्वये ऑगस्ट 2012 मध्ये दिलेले
40,840/- रु. चे बिल आदेश तारखेनंतर 30 दिवसाच्या आत पुढील दोन
महिन्याचे फोटो रिडींग घेवुन त्याची प्रतिमहा सरासरी काढून त्यानुसार ऑगस्ट
2012 चे थकीत बिल दुरुस्त करुन द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.