निकालपत्र
पारीत दिनांक 16/11/2011
इंद्रजीतसिंह कृ. जुनेजा, अध्यक्ष
त.क. यांनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे ही तक्रार दाखल केली त्याचे थोडक्यात म्हणणे आहे की,
1. त.क. हा वरिल पत्यावर राहतो. वि.प. हे आसेगांव ग्रामिण विज वितरण कं.शाखा आसेगांव येथील विज पुरवठा संबंधीत असणारी सर्व सेवा ही वि.प.1 यांच्या मार्फत चालते, वि.प.क्र.2 ग्रामिण विभाग, सब-डिव्हिजन मंगरुळपिर म.रा.वि.वि.कं. मंगरुळपिर जि.वाशिम यांच्या आधिनस्त चालविण्यात येते.
त.क. यांचा ग्राहक क्र. 317263377943 हा आहे. सदर विज वापर हा घरगुती सदरात मोडते. सदर मिटर हे त.क.च्या घराच्या बाहेरीलभिंतीवर लावलेले आहे. वि.प.क्र.1 ने दि.24.02.2011 पर्यंत बिल भरल्यास रु. 1800/- चे बिल दिले व त्या आगोदर ची रक्कम रु.1471/- त.क.ची आर्थिक परिस्थिती अत्यंत खराब असल्यामुळे भरु न शकल्यामुळे त्यांनी दि.24.02.2011 पर्यंत बिलाची रक्कम रु.1800/- दि. 24.02.2011 च्या एक दिवस अगोदर म्हणजे दि.23.02.2011 रोजी मुदतीच्या आत भरली. बिलाची पावती तक्रार अर्जा सोबत दाखल करीत आहे. असे असतांना सुध्दा दि. 26.02.2011 रोजी त.क. हा बाहेर गांवी गेलेला असतांना, कोणतीही पुर्व सुचना किंवा नोटीस न देता त.क. यांचा विघुत पुरवठा खंडीत करुन मिटर काढून नेले. त्या नंतर त.क.लगेचच वि.प.क्र.1 यास जाऊन भरलेले बिलाची पावती दाखवून विचारणा केली असता त्यांनी “ मि पाहतो “असे सांगून उडवाउडविचे उत्तरे दिले. त्या नंतर बरेचदा त.क.प्रत्यक्ष जाऊन वरेच वेळा विज पुरवठा पुर्ववत सुरु करण्या बाबत विनंती केली असता प्रत्येक वेळी त.क.यांचे कोणतेही समाधानकारक उत्तर किंवा पर्याय शोधुन देण्यात आला नाही. तसेच विज पुरवठा दि.26.02.2011 खंडीत केल्या पासून वि.प. यांनी फेब्रुवारी 2011 चे बिल जानेवारी 2011 ते फेब्रुवारी 2011 पर्यंतचे मिटर रिडींग घेई पर्यंत मिटरच्या फोटो प्रमाणे 20 युनिट विजेचा वापर स्पष्टपणे दिसुन येतो व एकूण विज वापर रकान्यामध्ये 39 युनिट दर्शविले आहे. व 00 विज वापराचा 0 बिल देण्यात आले. त्यानंतर मिटर काढून नेलेअसतांना सुध्दा मार्च 2011 चे रक्कम रु. 140/- मागणी बिल व एकुण विज वापर नसतांना सुध्दा व मिटरचा फोटो त्यामध्ये नसतांना देखील 71 युनिट विज वापर दाखविलेला आहे. त्यानंतर एप्रिल 2011 चे दि. 25.05.2011 पर्यंतच्या मुदतीचे एकुण विज वापर 142 युनिट (विज पुरवठा खंडीत असतांना) रु.450/- चे मागणी बिल देण्यात आले. व पुढे मे 2011 चे एकुण विज वापर 71 युनिट चे दाखवुन रु.266/- व मागील थकबाकी रु. 452/- असे एकुण रु.720/- चे मागणी बिल देण्यात आले. त.क.चा मुलगा हा 10 व्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. व फेब्रुवारी महिण्यात त्यांची परिक्षा काळात विजेचा पुरवठा कोणतेही कारण नसतांना बेकायदेशिरपणे खंडीत केला त्यामुळे अभ्यासामध्ये खुप मोठे नुकसान झाले. त्यानुसार त.क. हे शारिरीक, मानसिक, आर्थिक, व शैक्षणिक त्रासापाई रु.1,00,000/- तसेच अतिरिक्त अर्थिक नुकसान रु.15,000/- तसेच विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे रु.5,000/- दररोजचे होणारे नुकसान व ईतर आर्थिक नुकसानापायी रु.30,000/- व तक्रार खर्च रु.5000/- एवढया रक्कमेची मागणी करीत आहे. वि.प. यांनी सेवेमध्ये त्रृटी दर्शविल्यामुळे व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्यामुळे त्यांना सदर रक्कम त.क. यांना देणे आवश्यक आहे. त.क.ची विनंती की, तक्रार मंजुर होउन वि.प. यांनी सेवेमध्ये त्रृटी व जास्तीचे बिल देउन त.क. यांना वारंवार त्रास देउन पुरवठा खंडीत केल्याने व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला असे घोषित करण्यात यावे.तसेच त.क.ने मागीतलेली रक्कम रु. 1,55,000/- वि.प.कडुन देण्यात यावी. तसेच त.क.यांचा विज पुरवठा पुन्हा जोडण्याचे आदेश व्हावे. व ईतर न्याय व ईष्ट दाद त.क. यांना वि.प. कडून मिळावी. त.क.ने यादीसह कागदपत्रे दाखल केली. आहे.
2. त.क. यांनी सदर तक्रार निशानी 5 अंतरीम आदेश करिता अर्जासह दाखल केली आहे. तक्रार दाखल झाल्या नंतर वि.प. यांना निशानी 7 प्रमाणे नोटिस काढण्यात आली. वि.प. यांना तक्रार, निशानी 5 अर्ज व दस्ताऐवजसह नोटिसची बजावनी निशानी 9 व 10 अन्वये झाली आहे. त्या नंतर वि.प. यांनी हजर होवून निशानी 11 प्रमाणे अंतरीम अर्ज निशानी 5 ला लेखी उत्तर/से दाखल केला आहे. वि.प.यांनी त्यांच्या से मध्ये संपूर्ण विरोधी मजकुर नाकबुल केला आहे. परंतू त.क.चा विज पुरवठा खंडीत केला हे कबूल केले आहे. वि.प. म्हणतो की, मे 2011 मध्ये पुनरजोडणी चार्जेस भरल्या नंतर वि.प.चे लाईनमन विज पुरवठा जोडण्यास गेले असता त.क.ने जोडू दिला नाही. व त.क.चे काढलेले मिटर हे त.क. लावुदेण्यास तयार नाही. कारण की, त्याला त्यावेळी नविन मिटर पाहिजे होते. जुने मिटर जेव्हा काढले त्यामध्ये रिडींग 1484 हे होते. मिटर जेव्हा काढून नेले होते त्या वेळी त्या ठिकाणी त.क.चा पुतण्या राहत होता. आणि त्याला काढण्यासाठी बिलाचा भरणा केला नव्हता. आणि त.क.ने बिलाचा भरणा केल्या बद्दलची माहिती त्यावेळेचे संबंधीत खंडीत करणा-या वि.प.कर्मचा-यास माहिती दिली नव्हती. अशा परिस्थितीमध्ये त.क.चा विद्युत पुंरवठा खंडीत झाला. परंतु वि.प. त.क.चा विद्युत पुरवठा पुर्ववत करण्यास तयार आहे. आणि त.क.चे जे मिटर काढले ते मिटर लावून देण्यास तयार आहे. असा लेखी से दिला आणि त्याच रोजी म्हणजेच दि. 30.06.2011 ला उभयपक्षांचा युक्तीवाद निशानी 5 वर ऐकल्याने मंचाने निशानी 5 खाली आदेश पारित केला. अंतरिम आदेशा नंतर वि.प. यांनी त.क.चा खंडीत केलेला विज पुरवठा आदेशाची प्रत मिळाल्या नंतर पुन्हा पुर्ववत करुन दिला आहे. कारण की त.क. यांनी वादग्रस्त देयकाचा भरणा दि. 23.03.2011 रोजीच मुदतीच्या 1 दिवसा पूर्वी निशानी 3 (2) प्रमाणे केला. वि.प. यांनी त.क.चा विज पुरवठा दि.01.07.2011 रोजी पुर्ववत केला आहे. हे त.क.चा अर्ज निशानी 14 वरुन दिसते नंतर वि.प. यांनी निशानी 16 प्रमाणे आपला लेखी जवाब दाखल केला आहे. वि.प. म्हणतो की, त.क.-अब्दुल मुन्नाफ, मोहमद इसाख हे आसेगांव येथे राहतात या बाबत वाद नाही. नंतर इतर विरुध्दी मजकुर ना कबूल आहे. वि.प. म्हणतो की, त.क. यांनी ऑगस्ट 2010 चे रु. 690/- देयक त्यांना दि. 28.09.2010 भरले त्या नुसार त.क. यांनी बिलाचा भरणा केला नव्हता. जानेवारी 2011 पर्यंत रु. 1800/- थकीत झाले होते. ते त.क.ने दि.23.02.2011 ला भरले त्यामुळे त.क. बिलाचा भरणा मुदतीत भरतो हे म्हणने चुकीचे आहे. दि.26.02.2011 रोजी त.क. हे बाहेर गांवी गेले होते त्यांच्या माघारी विद्युत पुरवठा खंडीत केला हे म्हणने चुकीचे आहे. सुरवातिला त.क. वि.प.क्र.1 कडे बिलाची पावती घेवुन आले हे म्हणने चुकीचे आहे. वि.प. क्र.1 हे 14 फेब्रवारी ते 25 मार्च 2011 पर्यंत प्रशिक्षणा करीता अमरावती येथे गेले होते. त्यामुळे त.क.चे कथन कपोल कल्पीत आहे. वि.प. म्हणतो की, विद्युत पुरवठा खंडीत केल्या नंतर पी.डी. रिपोर्ट जोपर्यंत कार्यालयामध्ये पोहचत नाही तोपर्यंत संगणक त्याच्याकडे फिड असलेला प्रोग्राम प्रमाणे पुढील बिल काढीत असते जेव्हा त्याला रिडींग प्राप्त होत नाही तेव्हा तो ऐवरेज बिल काढतो. त.क. यांनी दर्शविलेले प्रमाणपत्र खोटे आहे म्हणुन नाकारलेले आहे. वि.प. पुन्हा त्याचे परिछेद 5 प्रमाणे म्हणतो की, ज्या घरामध्ये हा विवादित विद्युत पुरवठा आहे त्या घरामध्ये त.क. चे पुतणे मोहमंद जाहेद अब्दुल सत्तार व सादिक सत्तार हे राहत असत. त.क. हा त्यांच्या वडिलांच्या नांवाने असलेल्या घरामध्ये राहात असे त्यांच्या वडिलांच्या नांवाने सदर विद्युत पुरवठा आहे. त.क. ला ज्या ठिकाणी वादातील विद्युत पुरवठा दिलेला आहे त्या घरातुन त्यांच्या पुतण्याला काढण्याचे होते आणि त्याचे पुतणे घर रिकामे करुन देत नव्हते आणि म्हणुन त.क. यांनी बिलाचा भरणा केला नाही. ता.26.02.2011 ला जेव्हा वि.प. कंपनीचे लाईन मन श्री.सैफयुद्दिन सरफुद्दिन हे आसेगांव येथे गेले व त.क.ला विद्युत पुरवठयाचे पैसे भरण्या करीता सांगीतले, तेव्हा त.क. ने सांगीतले की मला घर खाली करुन घ्यावयाचे आहे मी पैसे भरत नाही. तुम्ही लाईन कापुन टाका व त्यांनी तारीख 23.02.2011 ला पैसे भरल्या बाबत सांगीतले नाही. म्हणुन वरिल लाईन मन यांनी त.क.चा विद्युत पुरवठा खंडीत केला. विद्युत पुरवठा खंडीत केल्यानंतर वरिल दोन्ही पुतण्यानी घर खाली करुन दिले व त्यानंतर जाणुन-बुजून या गोश्टीचा गैरुायदा करुन घेण्याच्या उद्देशाने त.क. हा मे 2011 पर्यंत चुप राहिला कारण तो त्यांच्या वडिलांच्या घरामध्ये राहिला व त्यानंतर ग्राहक मंचामध्ये पैसे उकळण्याच्या दष्टीने सदरहु प्रकरण दाखल केले आहे. मे 2011 मध्ये वि.प.चे लाईन मन विद्युत पुरवठा जोडण्या करीता गेले असता त.क. ने कापलेले मिटर लावू दिले नाही जुने मिटर काढलेले हे सुस्थिती मध्ये आहे. त्यांनतर कोर्टाच्या आदेशा नंतर ते मिटर त्यांनी लावु दिले. व जाणुन-बुजून जुन 2011 पर्यंत गैरफायदा करुन घेण्याच्या उद्देशाने केस दाखल केली नाही. व विद्युत पुरवठा खंडीत केल्या नंतर पैसे भरल्याची पावती दाखविली नाही. विद्युत पुरवठयाचे पैसे हे पोष्टामध्ये भरल्या जातात. आणि महिणा संपल्यानंतर पोष्ट वाले लिस्ट पाठवितात व त्यांनतर त्यांची नोंद रेकॉर्ड होते. तरी वरिल पारिस्थिती मध्ये त.क. यांची तक्रार ही खर्चासह खारीज करण्यात यावी आशी विनंती केली आहे. वि.प. यांनी आपले म्हणने प्रित्यार्थ महमद जाहेद अब्दुल सत्तार चे शपतपत्र निशानी 18 प्रमाणे व सैफोद्दीन शरफोद्दीनचे शपतपत्र निशानी 19 प्रमाणे तसेच त.क.चा सी.पी.एल. निशानी 20 प्रमाणे दाखल केला आहे.
3. त.क. ची तक्रार वि.प.चा लेखी जवाब तसेच दाखल असलेले सर्व कागदपत्रांचा व उभयपक्षांचा युक्तीवाद ऐकल्या नंतर मंचाने अवलोकन केले असता खालील मुद्वे उपस्थित होतात.
1. त.क. वि.प. चा ग्राहक आहे काय ? - होय
2. वि.प. यांनी सेवेत तृटी व अनुचित - होय
व्यापार प्रथेचा अवलंब केला का ?
3. म्हणुन आदेश काय ? - अंतीम निर्णयाप्रमाणे.
4. मुदा क्र.1 वि.प. यांनी तकला घरगुती वापरा करीता विद्युत कनेक्शन दिले त्यांचा ग्राहक क्र. 317263377943 असा आहे आणि त.क. यांनी वरील ग्राहक कनेक्शन चे देयकाचा भरणा केला आहे म्हणन त.क. वि.प. यांचा ग्राहक आहे.
5. मुदा क्र.2. त.क.यांनी वादग्रस्त देयक निशानी 3 (2) चा भरणा रु.1800/- दि.23.02.2011 रोजी केला त्या देयकाची कालावधी दि.24.02.2011 पर्यंत होती परन्तु वि.प. यांचे कर्मचारी यांनी त.क.चा विद्युत पुरवठा मुद्तीच्या आत केल्यानंतर ही त्याचा विज पुरवठा दि. 26.2.2011 रोजी त.क. हा बाहेरगावी गेलेला असतांना त्याचे माघारी कोणतीही पूर्व सूचना किंवा नोटिस न देता खंडीत करुन विद्युत मिटर काढून नेले आणि त्यानंतर त.क. यांनी लगेचच गैरअ.क्र. 1 यास जाऊन भरलेल्या बिलाची पावती दाखवून विचारणा केली असता त्यांनी “मी पाहतो ” असे सांगुन उडवा उडवीचे उत्तरे दिले त्यानंतर बरेचदा त.क. प्रत्यक्ष जाऊन बरेच वेळा विज पुरवठा सुरु करण्या बाबत वि.प.ला विनंती केली असता प्रत्येक वेळी त.क.चे कोणतेही समाधान कारक उत्तर किंवा पर्याय शोधुन देण्यात आला नाही. नंतर वि.प. त.क.ला विद्युत पुरवठा खंडीत असताना मार्च 2011, एप्रिल 2011 व मार्च 2011 चे देयक सरासरी 71 युनिट दर माह प्रमाणे देत होते. त.क.चा मुलगा 10 व्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता त्याची मार्च 2011 मध्ये परीक्षा संपन्न झाली विज पुरवठा खंडीत झाल्याने त्याच्या अभ्यासामध्ये खुप मोठे नुकसान झाले त.क. यांनी मुलांचे शाळेचे प्रमाणपत्र दाखल केले आहे. अशा प्रकारे विज पुरवठा खंडीत केल्यानंतर लिगल नोटिस वि.प. यांना देऊन सुध्दा विज पुरवठा जोडण्यात आलेला नाही त.क.ला आर्थिक,मानसिक व शारिरीकत्रास झाला नंतर विज पुरवठा पूर्ववत करण्याकरीता त्यांनी तक्रार दि.16.6.2011 रोजी दाखल केली आहे. आणि त.क. नुकसान भरपाई व कोर्ट खर्च मागविण्याचा हक्कदार आहे. तसेच वरील कथनाला उत्तर वि.प. ने दिले की, त.क. ने वादग्रस्त देयक रु.1800/- चा भरणा दि.23.02.2011 रोजी केला हे मान्य आहे परंतु वरील देयक चालू देयक (Current Bill) नसून त्यामध्ये थकित रक्कम रु.1471/- चा ही समावेश आहे चालू देयक रु. 324.49 चे होते. त.क. सप्टेंबर 2010 पासुन थकित होता परंतु त्याचा विज पुरवठा खंडित केला नव्हता म्हणून त.क. देयकाचा नियमित भरणा करीत नव्हता तसेच दि. 23.02.2011 रोजी वरील देयक रु. 1800/- चा भरणा भरल्यानंतर त.क. यांनी वि.प.यांना लेखी कळविले नाही आणि दि.26.02.2011 रोजी त.क.चे माघारी त्याचा विज पुरवठा खंडित केला ही बाब नाकारली व शपतपत्रावर म्हटली आहे. उलट वि.प.चे लाईनमन श्री.सैफयुद्दिन सरुफुद्दीन हे दि. 26.02.2011 रोजी आसेगांव त.क.चे घरी गेले व त.क.ला देयकाचा भरणा केल्या बद्दल विचारले असता त.क यांनी सागितलेकी, त्याला घर खारी करुन घ्यावयाचे आहे म्हणून पैसे भरत नाही. तुम्ही लाईन कापून टाका व त.क. यांनी दि. 23.02.2011 रोजी देयकाचा भरणा केल्याबद्दल सांगितले नाही. म्हणून लाईनमन यांनी त.क.चा विज पुरवठा तातपूर्ती खंडित केला आहे वि.प.चे वरील लाईनमनचे म्हणण्यानुसार त.क.चे वरील घरात त्यांचे पुतणे-महमद जाहेद अब्दुल सत्तार त्यांचे भावा सोबत राहत होतो. वि.पने त्याचे वरील म्हणने चे प्रित्यार्थ लाईनमन सैफयुद्दीन चा पुरावा निशानी 19 प्रमाणे व त.क.चे पुतणे महमद जाहेद अब्दुल सत्तार चा पुरावा निशानी 18 प्रमाणे दाखल केला आहे. वि.प.चे वरील म्हणणेला खोडून टाकण्या करीता त.क. यांनी कोणतेही प्रतिउत्तर व सबळ पुरावा दाखल केला नाही. तसेच त.कच्या मुलाला विद्युत पुरवठा खंडित झाल्याने कोणते विपरीत परीणाम व नुकसान झाले हे सिध्द करणे करीता कोणताही पुरावा दाखल केला नाही. वि.प.चे म्हणणे आहे की, वि.प.क्र.1 हे 14 फेब्रवारी 2011 पासून ते 25 मार्च 2011 पर्यंत प्रशिक्षणाकरीता अमरावती येथे गेलेले होते त्यामुळे त.क.चे कथन कपोल कल्पीत आहे. त.क.ने वादग्रस्त देयकाचा भरणा केल्या नंतर पावती घेऊन त्यांचे जवळ आले नाही हे सिध्द होते. तसेच त.क. यांनी विद्युत पुरवठा खंडीत झाल्यानंतर त्यांनी मे 2011 मध्ये लिगल नोटिस वि.प.ला दिली आहे त्यापूर्वी त.क. यांनी वि.प.ला पुरवठा सुरु करण्याकरीता लेखी पावती सोबत कां कळविले नाही?आणि नोटिस दिल्यानंतर लगेज तक्रार मंचासमोर दाखल केली आहे. यावरुन वि.प.चे म्हणने यांना बाल मिळते व त.क. यांनी वि.प.चे प्रतिज्ञापत्रावर लेखी जवाब व साक्षांचे प्रतिज्ञापत्रात कथन यांना खोडून टाकण्याकरीता प्रतिउत्तर न दिल्याने तसेच कोणतेही सबळ पुरावा त्योचे म्हणनेचे प्रित्यार्थ दाखल न केल्याने त.क. त्यांचे मागणीनुसार नुकसान भरपाई मागविण्यास हक्कदार नाही. परंतु वि.प.चे कथन की, त.क.चे देयक रु.1800/- चा भरणा केल्यानंतर आणि वरील गांव आसेगांव येथे विज देयकाचा भरणा पोष्टा मध्ये होतात व भरलेले देयकाची यादी एक महिण्या नंतर भेटतात म्हणून त्यांना त.क.चे देयक भरल्याबद्दल माहिती त्याना उशीरा मिळाली आहे. तसेच वि.प.चे संगणक यांना मिटर रिडींग प्रत्येक महिन्यात उपलब्ध न झाल्याने तो सरासरी त्याला प्रोग्राम फीड असल्या प्रमाणे पुढील बिल काढून असतो. म्हणून त.क.ला 71 युनिटचे देयक मार्च 2011, एप्रिल 2011, व मे 2011 चे देण्यात आले त्यात वि.प.ची कोणतीही चूक नाही असे म्हटले आहे. परंतु त.क.ने वादग्रसत देयक रु. 1800/- भरणा मुदतीचे आत दि. 23.02.2011 रोजी केला आहे. व त्याचा विज पुरवठा पूर्व सुचना/ नोटिस न देता खंडित केला आहे तसेच वि.प.ला वादग्रस्त देयक रु. 1800/- चा भरल्या बाबत माहिती पोष्टाकडून एक महिण्या नंतर मार्च 2011 पर्यंत मिळालेली असताना ही वि.प. यांनी त.क. चा विज पुरवठा मार्च, एप्रिल, मे 2011 मध्ये केव्हा ही स्वतःहून पूर्ववत करुन देणे जरुरीचे होते परंतु वि.प.ने त.क.चा लिगल नाटिस मे 2011 मध्ये मिळाल्यानंतर ही विजपुरवठा सुरु केला नाही येथे वि.प. यांनी सेवेत त्रृटी, कमतरता व अनुचित व्यापारप्रथेचा अवलंब केला आहे हे सिध्द होते वरील कालावधीत म्हणजे मार्च 2011 ते मे 2011 पर्यंत त.क.चे पुतणे महमद जाहेद महमद सत्तार त.क.चे घरी राहत होते. त्यावेळी वि.प.चे कर्मचारी/लाईनमन त.क.चे घरी येऊन विज पुरवठा सुरु केले असता त्यांना कोणताही अडथळा होत नव्हता म्हणून वि.प. यांनी त्यांचे सेवेत कमतरता व अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याने खालील प्रमाणे नुकसानी भरपाई व तक्रारी खर्च मागण्यास हक्कदार आहे.
6. वरील विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. त.क.ची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे
2. वि.प. यांनी त.क.चा तात्पूर्ती खंडित विज पुरवठा अंतरीम आदेशा प्रमाणे दि. 01.07.2011 रोजी पूर्ववत सुरु केल्याने त्याला या अंतिम आदेशानुसार कायम स्वरुपी करण्यात येते व त.क. यांनी वादग्रस्त देयक रु. 1800/- भरल्या नंतर वि.प.कडे चालू देयक रक्कमेचा भरणा नियमित करावा तसे न केल्यास वि.प. त.क. विरुध्द नियमानुसार कार्यवाही करु शकतात.
3. वि.प. यांनी त.क. यांना मानसिक,शारिरीक व आर्थिक त्रासा बद्दल एकूण रु.10,000/- नुकसान भरपाई दयावी व तसेच तक्रार खर्च रु. 2000/- दयावे.
4. उभयपक्षकारांना आदेश प्रत निशुल्क देण्यात यावी.
5. तक्रारीतील सदस्यांच्या प्रतिचा संच त.क.यांना देण्यात यावा.
वरील आदेशाचे पालन वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळालयापासुन 30
दिवसाचे आत करावे तसे न केल्यास वरील सर्व रक्कमेवर द.सा.द.शे. 12 टक्के व्याजासह प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यत वसूल करण्यास त.क. पात्र राहील.
इन्द्रजितसिह कृ.जुनेजा एस.जी.देशमुख
अध्यक्ष सदस्य
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम
दि. 16.11.2011
स्टेनो/गंगाखेडे