मा. नियमीत सदस्यांची पदे रिक्त मंच अपुरा.
तक्रारदार गैरहजर.
सा.वाले क्र 1 तर्फे प्रतिनीधी श्री. आदिल मिया शेख हजर.
प्रकरण आज सा.वाले क्र 2 व 3 यांना पाठविलेल्या नोटीसबाबत पुरावा सादर करणेकामी नेमण्यात आले होते व तक्रारदार यांना अंतिम संधी देण्यात आली होती. तरी सुध्दा ते गैरहजर. वेळ 11.50 मिनीट.
मंचाचा कार्यभार विचारात घेता, प्रकरण त्याच टप्यावर तहकुब करणे योग्य होणार नाही. मंच अपुरा. सबब, योग्य आदेश पारीत करण्याकरीता मागे ठेवण्यात येते.
मंच पूर्ण.
त्यानंतर प्रकरण दुपारी 2.10 मिनीटांनी पुकारण्यात आले.
तक्रारदार गैरहजर
सा.वाले क्र 1 तर्फे प्रतिनीधी श्री. आदिल मिया शेख हजर.
तक्रारदार यांना सामनेवाले क्र 2 व 3 यांना नोटीस पाठविल्याचा पुरावा सादर करणेकामी वारंवार संधी देण्यात आली होती. परंतू ते सतत गैरहजर. त्यामुळे प्रकरणात आवश्यक ती प्रगती होऊ शकली नाही. मंचाचा कार्यभर विचारात घेता, प्रकरण त्याच टप्यावर तहकुब करणे योग्य होणार नाही. सबब, खालील आदेश.
आदेश
तक्रार क्र 131/2016 ग्रा.सं.कायदा कलम 13(2) (सी) प्रमाणे खारीज/Dismissed For Default करण्यात येते.
खर्चा बाबत आदेश नाही.
हाच अंतिम आदेश समजण्यात यावा.
या आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क टपालाने पाठविण्यात याव्यात.
npk/-