Maharashtra

Nagpur

CC/10/237

Manjusha Prashant Mandavgade - Complainant(s)

Versus

JRC Securities Ltd. - Opp.Party(s)

Adv. Joharapurkar

17 Feb 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Complaint Case No. CC/10/237
1. Manjusha Prashant MandavgadeChandrapurChandrapurMAHARASHTRA ...........Appellant(s)

Versus.
1. JRC Securities Ltd.NagpurNagpurMAHARASHTRA ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv. Joharapurkar, Advocate for Complainant

Dated : 17 Feb 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्‍य यांचे आदेशांन्‍वये)
                        -// आ दे श //-
                 (पारित दिनांक : 17/02/2011)
 
1.           प्रस्‍तुत तक्रार ही तक्रारकर्तीनी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्‍द मंचात दिनांक 21.04.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्‍तुत तक्रारीचे थोडक्‍यात स्‍वरुप खालिल प्रमाणे :-
 
2.         तक्रारकर्ती ही घरगुती काम करणारी महिला असुन कुटूंबाचे पालन पोषण करण्‍याकरता कंपनींचे शेअर्स विकत घेत असते व आपला उदरनिर्वाह करते, असे तिने तक्रारीत नमुद केले आहे. गैरअर्जदार ही Non Banking Financial Company असुन ते Stock Broking Depositary Participant, Mutual Fund, Insurance, Commodity Broking अशा अनेक कार्यात गुंतलेली आहे.
 
3.          तक्रारकर्ती ही शेअर्स सिक्‍युरिटीज कंपनीचे भागधारक व सिक्‍युरिटीजचे काम आपल्‍या उपजिवीकेकरता करते व त्‍या करता D-MAT A/c असणे आवश्‍यक असल्‍यामुळे तिने गैरअर्जदारांकडे NSDL-D-MAT A/c उघडण्‍यासाठी अर्ज केला. तिचा A/c DP-Beneficiary ID-10639920 DP  व नंबर DP-ID IN 301895 NSDL असा देण्‍यांत आला.
4.          तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, तिचे पती गैरअर्जदारांच्‍या नागपूर स्थित शाखेत कार्यरत असल्‍यामुळे त्‍यांचे HDFC LTD  यांचेसोबत सं‍बंध होते, आणि त्‍यांचे आग्रहास्‍तव तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडे खाते उघडण्‍या संबंधाने विनंती केली. तिने पुढे असेही नमुद केले आहे की, एचडीएफसी बँकेतून तिच्‍या पतीचे नावावर असलेल्‍या D-MAT खात्‍यामधील काही कंपन्‍यांचे लाईव्‍ह शेअर्स तक्रारकर्तीच्‍या गैरअर्जदारांकडे असलेल्‍या खात्‍यात ट्रान्‍सफर केले. त्‍याबद्दल एचडीएफसी बँकेने दि.01.12.2007 ते 21.12.2007 चे खाते विवरणा (Statement of A/c) मध्‍ये दखल घेतली. त्‍यामधील माहीती प्रमाणे अंदाजीत शेअर्सची किमत व एकूण शेअर्स खालिल प्रमाणे …

अ.क्र.
कंपनीचे नाव
शेअर्सची संख्‍या
त्‍यावेळी अंदाजे किंमत
1.
I.F.C.I.
1400
Rs. 1,41,050/-
 
2.
Lloyd Steel
1000
Rs.   35,325/-
3.
I.D.F.C.
140
Rs.   29,876/-
4.
R.P.L.
200
Rs.   42,120/-
5.
Powergird
100
Rs.   13,645/-
6.
Ispat Industries
150
Rs.   12,210/-
 
 TOTAL          ….
….
Rs. 2,74,226/-

 
असे एकूण रु.224,226/-चे शेअर्स एचडीएफसी D-MAT खात्‍यामधुन काढून गैरअर्जदारांकडील खात्‍यामध्‍ये वळते करण्‍यांत आले, याबद्दलची पोच सुध्‍दा एचडीएफसी बँकेने दिलेली आहे. तिने पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदारांचे शाखा व्‍यवस्‍थापकांचे मागणी नुसार तक्रारकर्तीने रु.500/- खाते उघडण्‍याकरीता दि.15.11.2007 रोजी भरले, तसेच रु.25,000/- दि.11.12.2007 रोजीचा धनादेश एचडीएफसी बँकेच्‍या जॉंईंट खाते ज्‍याचा क्र.656332 व रु.1,00,000/- चा धनादेश तक्रारकर्तीचे खात्‍यामधुन दि.25.01.2008 रोजी एस.बी.आय.चे धनाकर्षान्‍वये असे एकूण रु.1,25,500/- तक्रारकर्तीचे खात्‍यामध्‍ये जमा केले.
5.          पैसे व शेअर्स ट्रान्‍सफर केल्‍यानंतर तक्रारकर्तीने गैरर्जदारांस कोणतेही शेअर्स विकण्‍यांस किंवा घेण्‍यांस सांगितले नाही. उलटपक्षी पैसे जमा झाले व भागधारकांचे D-MAT खात्‍यामधे गैरअर्जदारांचे शेअर्सची नोंदणी झाली याबद्दलचे रितसर पावतीची वारंवार मागणी गैरअर्जदारांकडे केली. परंतु गैरअर्जदारांनी टाळाटाळीचे उत्‍तर दिले व खात्‍याचे विवरण त्‍वरीत मिळेल असे सांगितले. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी गैरकायदेशिर कृत्‍याचा अवलंब केला, त्‍यामुळे तिला आर्थीक, शारीरिक तसेच मानसिक त्रास झाला. त्‍यामुळे तिने सदर तक्रारीव्‍दारे मागणी केली आहे की, शेअर्सची किंमत रु.2,74,226/- आणि बँकेत जमा केलेले रु.1,25,500/- व त्‍यावर द.सा.द.शे. 18% व्‍याज शेअर्स ट्रान्‍सफर झाल्‍यापासुन ते तक्रार दाखल करेपर्यंत किंवा तेवढे ट्रान्‍सफर केलेले शेअर्स परत द्यावे. तसेच पत्र व्‍यवहार, नोटीस व दळणवळणाचा खर्च रु.25,000/-, मानसिक त्रासाबद्दल रु.75,000/- ची मागणी केलेली आहे.
6.          सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्‍यांत आली असता गैरअर्जदारांनी आपल्‍या लेखी उत्‍तरात नमुद केले आहे की, त्‍यांची नॉन बँकिंग फायनान्‍सीयल कंपनी असुन ती रिझर्व बँकेच्‍या सुचनेप्रमाणे स्‍टॉक ब्रोकींग डिपॉझीटरी फंड, कमोडिटी ब्रोकींग अशी कामे करते व सेवा देते. गैरअर्जदारांनी मान्‍य केले आहे की, तक्रारकर्ती ही त्‍यांचे कंपनीची पक्षकार असुन तिने एनएसई व बीएसई चे सभासदत्‍व घेण्‍याकरीता दि.20.11.2005 ला अर्ज दिला होता व त्‍यानुसार तिची नोंदणी करण्‍यांत आली. त्‍यानुसार तक्रारकर्तीस ग्राहक क्र.I.D. 10639920, D.P.I.D. IN 301895  आणि व्‍यवसाय खाता क्र. MDNT 3020 हा देण्‍यांत आला. तसेच त्‍यांनी पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीचे एच.डी.एफ.सी. बँकेतील  (1) IFCL – 1400, (2) Lyod Steel – 1000,               (3) IDFC – 140,     (4)  RPL – 200,    (5)  Power Grid – 100, (6)  Ispat Indistries – 150.
 
त्‍यांनी पुढे मान्‍य केले आहे की, तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडे खाते उघडले व त्‍याकरीता रु.500/- भरलेले आहे. तसेच धनादेशाव्‍दारे रु.25,000/- व रु.1,00,000/- तिचे खात्‍यात जमा केले आहे. तक्रारकर्तीने पुढे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीची शेअर्स व रक्‍कम ही तिचे D-MAT खात्‍यात जमा झालेली आहे व याची माहिती तक्रारकर्तीस आहे. त्‍यांनी पुढे नमुद केले आहे की, त्‍यांनी सेवेत कोणतीही उणिव ठेवलेली नाही, तसेच तक्रारकर्तीने तिचा व्‍यवसाय तिने दिलेल्‍या ई-मेल आयडी वरुन दररोज व वेळीच पाहणे आवश्‍यक आहे. तक्रारकर्तीने खाते उता-याची प्रत मिळण्‍यासाठी त्‍यांचेकडे कधीही मागणी केलेली नाही, तिने स्‍वतःहून संयुक्‍त जोखीम प्रकटन दस्‍तावेज (Combined Risk Disclosure Document)  भरुन दिलेले होते. गैरअर्जदारांनी पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्तीस सभासद होण्‍यासाठी स्‍वेच्‍छापूर्वक भरुन दिलेल्‍या जोडपत्राव्‍दारे तिच्‍या व्‍यवहाराबाबत (ट्रेडींग) झालेले दस्‍तावेज ई-मेल आयडीव्‍दारे प्राप्‍त करण्‍याबाबत कबुल केलेले होते. त्‍यामुळे त्‍यांनी पोष्‍टाने किंवा प्रत्‍यक्ष देण्‍याचा प्रश्‍नच उपस्थित होत नाही. त्‍यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्तीचा या गैरअर्जदार कंपनीमध्‍ये रक्‍कम तिचे खात्‍यामध्‍ये जमा करणे, शेअर्सची खरेदी विक्री करणे हा व्‍यवसाय दि.22.02.2008 पर्यंत झालेला आहे व सदर तक्रार दि.28.04.2010 ला दाखल केली, त्‍यामुळे ती दोन वर्षांनंतर दाखल केल्‍यामुळे ती कालबाह्य झालेली असुन ती खारिज करण्‍यांची मंचास विनंती केलेली आहे.
 
7.          सदर तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.07.02.2011 रोजी आली असता मंचाने दोन्‍ही पक्षांचा युक्तिवाद त्‍यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्‍तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्‍कर्षांप्रत पोहचले.
                        -// नि ष्‍क र्ष //-
 
8.          तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केले आहे की, ती कुटूंबाचे पालन पोषन करण्‍याकरीता कंपनींचे शेअर्स विकत घेते व त्‍याचे नफ्यातून कुटूंबाचा उदर निर्वाह करीत होती. त्‍याकरीता तिने गैरअर्जदारांकडे डि-मॅट खाते उघडण्‍याकरीता अर्ज केला त्‍यानुसार तिला खाते क्र. DP-Beneficiary ID-10639920 DP  व नंबर DP-ID IN 301895 NSDL असा देण्‍यांत आला. तक्रारकर्तीने आपल्‍या तक्रारीतील परिच्‍छेद क्र.4 मध्‍ये नमुद केले आहे की, तिचे पतीचे नावावरील एचडीएफसी बँकेतील डि-मॅट खात्‍यामधील काही कंपन्‍यांचे लाईव्‍ह शेअर्स तक्रारकर्तीच्‍या गैरअर्जदारांकडे असलेल्‍या खात्‍यात ट्रान्‍सफर केल्‍याचे नमुद केले आहे. याबद्दल गैरअर्जदारांनी आपल्‍या उत्‍तरात सदर बाब मान्‍य केली, यावरुन हा निष्‍कर्ष निघतो की, तक्रारकर्तीचे पती हे शेअर्सचा व्‍यवसाय करीत होते व त्‍या माध्‍यमातून नफा कमवित होते. तसेच सदर शेअर्सच्‍या नफा कमविण्‍याशिवाय दुसरा कोणताही तक्रारकर्तीचा किंवा तिच्‍या पतीचा व्‍यवसाय नव्‍हता. याउलट तक्रारकर्तीचे कथनावरुन असा निष्‍कर्ष निघतो की, तक्रारकर्ती व तिचे पती हे दोघेही शेअर्सचा व्‍यवसाय करीत होते व त्‍यातुन ते नफा कमवित होते. अश्‍या परिस्थितीत सदर व्‍यवहार हा नफा कमविण्‍याकरीता होता व तो व्‍यावसायीक स्‍वरुपाचा असल्‍यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याचे ‘ग्राहक’ या परिभाषेत येत नसल्‍यामुळे तक्रारकर्ती ही गैरअर्जदारांची ग्राहक ठरत नाही, असे मंचाचे मत आहे. मा. राष्‍ट्रीय व मा. राज्‍य आयोगांनी सुध्‍दा शेअर्सच्‍या माध्‍यमातुन नफा कमविणारी किंवा शेअर्सचा व्‍यवसाय करणारी व्‍यक्ति ही ग्राहक संरक्षण कायद्याचे परिभाषेत ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाही व त्‍या संबंधीच्‍या तक्रारीचे निवारण करण्‍याचा अधिकार मंचास येत नाही, असे निर्वाळे दिलेले आहेत. त्‍यामुळे मंचाचे असे मत आहे की, तक्रारकर्तीने आपली तक्रार योग्‍य त्‍या न्‍यायधिकरणाकडे सादर करुन सोडवावी.
 
            प्रस्‍तुत प्रकरणात दाखल दस्‍तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्‍ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
 
      -// अं ति म आ दे श //-
 
1.     तक्रारकर्तीची तक्रार निकाली काढण्‍यांत येते.
2.    उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सोसावा.
 
 

[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT