जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 288/2008. प्रकरण दाखल तारीख - 21/08/2008 प्रकरण निकाल तारीख - 11/12/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य जयंवतराव पि. गोविंदराव जुन्ने वय, सज्ञान धंदा, शेती अर्जदार रा.बेरळी (बू) ता. मुखेड जि. नांदेड. विरुध्द. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. उप वीभाग, मुखेड ता.मूखेड जि.नांदेड गैरअर्जदार तर्फे अधिकृत अधिकारी. अर्जदारा तर्फे वकील - अड.मो.मूकरम खान गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदाराने खालील प्रमाणे आपली तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांचे शेत मौजे बेरळी (बु) ता. मुखेड जि. नांदेड जमीन शेत गट नंबर 443 आहे. अर्जदाराच्या शेतात पाण्याचे बोअर असून त्यावरील मोटारीसाठी गैरअर्जदार यांचेकडून विज पूरवठा घेतलेला आहे. त्यासाठी खांब लाऊन तार ओढलेली आहे. अर्जदाराने वर्ष 2006-07 या वर्षामध्ये 0.60 आर जमिनीत ऊसाचे पिक घेतले होते. फेब्रूवारी,2007 पर्यत ऊस परिपक्व होत असताना दि.24 व 25 फेब्रूवारी 2007 च्या मध्यराञी अचानक विज पूरवठा तारेस तार लागून एकदम जाळ (स्पार्कीग) होऊन अर्जदाराच्या उभ्या ऊसाच्या पिकास आग लागली व त्या आगीमध्ये अर्जदाराचा 0.60 आर जमिनीच्या क्षेञफळावरील ऊसाचे पिक पूर्णतः जळून गेले. त्याभोवती असणारे मोसंबीचे आठ झाडे व आंब्याचे 10 झाडे पूर्णतः जळून गेली. गैरअर्जदार यांचेकडे अनेक वेळा तक्रार केल्याचेनंतर देखील त्यांनी वेळोवेळी देखभाल केलेली नाही व तारा व्यवस्थित ठेवण्यास हलगर्जीपणा केला. तारा खाली झूकल्यामूळे त्या एकमेकास लागून झालेल्या जाळामूळे (स्पार्कीग) अर्जदाराचे पिकाचे व फळ झाडांचे नूकसान झाले आहे.या हलगर्जीपणाबददल विज कंपनी जबाबदार आहे. झालेल्या घटनेची पोलिस स्टेशन मूखेड येथे नोंद करण्यात आलेली असून दि.27.2.2007 रोजी पोलिस अधिका-यांनी घटनास्थळाचा पंचनामा केलो आहे. महसूल कार्यालय यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे मंडळ निरिक्षक मूखेड यांनी पण दि.26.2.2008 रोजी पंचनामा केला.त्यावरुन ऊसाचे पिक व आब्यांचे व मोसंबीचे झाडाचे नूकसान झाल्याचे दिसून येते. 0.60 आर क्षेञफळातील ऊसाबददल रु.51,000/-,आठ मोंसबीचे झाडे याबददल रु.24,000/- व दहा आंब्याचे झाडे याबददल रु.25,000/- असे एकूण रु.1,00,000/- नूकसान भरपाई मिळावी अशी अर्जदाराने मागणी केली आहे. सन 2007 मध्ये ऊसाचा भाव रु.850/- होता, अर्जदारास 90 टन ऊस झाला असता त्याप्रमाणे रु.76,500/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- गैरअर्जदार यांचेकडून होतात. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले म्हणणे दाखल केले आहे. कार्यकारी अभिंयता हा त्या विभागाचा प्रमूख आहे त्यामूळे सर्व कारवाई त्यांचेमार्फतच होते. अर्जदार हे मौजे बेरळी येथील शेत जमिन गट नंबर 443 चे मालक आहेत त्याबददल त्यांना माहीती नाही. गैरअर्जदार यांनी अज्रदारास विज पूरवठा करण्यासाठी जमिनीवरुन खांब लाउुन तार ओढले आहेत हे म्हणणे खोटे आहे. कारण गैरअर्जदार विज कंपनीच्या विज वाहिन्या विवधि शेतामधून जात असतात. अर्जदार यांनी सन 2006-07 या वर्षामध्ये 0.60 आर ऊस लावला याबददल त्यांना माहीती नाही. दि.24 व 25 फेब्रूवारी 2007 च्या राञी स्पार्कीग होऊन आग लागली व पूर्ण पिक जळून गेले हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. ऊसाभोवती मोसंबी फळ देणारी आठ झाडे व आंब्याचे फळ देणारी दहा झाडे पूर्णतः जळून गेली हे म्हणणे सूध्दा गैरअर्जदार यांना मान्य नाही. जमिनीवरुन ओढलेल्या तारेची देखभाल केली नाही हे अर्जदाराचे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे घटना घडण्यापूर्वी विद्यूत तार दूरुस्त करण्या बाबतची तक्रार दिली हे म्हणणे खोटे आहे. पोलिस अधिका-यांनी घटनास्थळ म्हणजे दि.27.2.2007 रोजी पंचनामा केला हे म्हणणे त्यांना अमान्य आहे असे म्हटले आहे. मंडळ निरिक्षक मूखेड व संबंधीत तलाठी यांनी अर्जदाराच्या ऊसाची पंचा समक्ष पाहणी करुन पंचनामा केला हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. दि.5.12.2007 रोजी कायदेशीर नोटीस दिली हे अर्जदाराचे म्हणणे चूकीचे आहे. नूकसान भरपाई बददल रु.1,00,000/-, मानसिक ञासाबददल रु.25,000/- ही अर्जदाराची मागणी अवास्तव व अवाजवी आहे. अर्जदाराच्या जागेत प्रतिवादी कंपनीच्या अधिका-यांनी पंचनामा केलेला आहे त्यात असे आढळून आले की, दोन फेज मधील अंतर 10 इंच होते व सदरील लाईन ही आठ मिटर पोलवर उभी होती इतकेच नव्हे तर याठिकाणी कोणताही विद्यूत अपघात प्रतिवादी कंपनीच्या अभिलेखानुसार झालेला नाही. कोठेही कोणत्याही प्रकारचे स्पार्किग झालेले नाही त्यामूळे कोणताही ऊस जळण्याचा प्रश्न उदभवत नाही. प्रतिवादी यांचे अधिका-यानी पंचासमक्ष जायमोक्यावर जाऊन पाहणी केली त्यामध्ये विज वाहीनीच्या स्पार्कीगमूळे पिक जळाले नसल्याचे सिध्द झाले आहे. यात गैरअर्जदार यांचे सेवेत कोणतीही ञूटी नाही त्यामूळे अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय होय. 2. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी ग्राहक असल्याबददल विज बिले, ग्राहक क्रंमाक 568040052948 चे बिल दाखल केलेले आहे. दि.1.7.2006 रोजी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना एक अर्ज दिला होता व विद्यूत लाईन त्यांचे शेतातून गेलेली असून तारा लूज असल्यामूळे ऊसाला लागत आहेत. त्यामूळै त्या दूरुस्त कराव्यात म्हणून अर्ज दिला होता. तो अर्ज दाखल केलेला आहे. अर्जदार हे मौजे बेरळी ता. मूखेड येथील शेत जमिन गट नंबर 443 चे मालक असल्याबददल तलाठी सज्जा यांचे प्रमाणपञ दाखल केले आहे. याप्रमाणे 0.60 आर जमिनीमध्ये सन 2006-07 या वर्षात ऊसाचे पिक लिहीलेले आहे ते प्रमाणपञ दाखल केलेले आहे.दि.26.2.2007 रोजी ऊसाला तार लागून स्पार्कीग मूळे आग लागली व आगीच्या ठीणग्या हया ऊसाच्या वाळलेल्या पाचोळयावर पडल्या त्यामूळे आग भडकली. या बाबत पोलिसांना सूचना देण्यात आली व त्यानुसार त्यांनी दि.27.2.2007 रोजी पंचनामा केलेला आहे. स्पार्कीग मूळे 0.60 आर क्षेञातील ऊस जळाला असे म्हटले आहे. पोलिस पंचनामा अर्जदाराने दाखल केलेला आहे. त्यानंतर मंडळ अधिकारी, मूखेड यांनी पाच पंचासमोर अर्जदाराचे शेताची पाहणी करुन 0.60 आर क्षेञातील ऊस, 10 आंब्याचे झाडे व आठ मोंसबीचे झाडे आग लागून जळालेली आहेत. म्हणून पंचनामा केलेला आहे तो पंचनामा अर्जदाराने दाखल केलेला आहे. अर्जदारानी गैरअर्जदार यांचेकडे दि.28.2.2007 रोजी अर्ज देऊन जळालेल्या ऊसाची नूकसान भरपाई मागितली आहे व पाहणी करण्याची विनंती केलेली आहे. तो अर्ज तसेच गैरअर्जदार यांचे अधिका-यांनी प्रत्यक्ष जायमोक्यावर जाऊन स्थळाची पाहणी दि.26.2.2007 रोजी केलेली आहे. त्या दोन तारातील अंतर 10 इंच होते व आठ मिटर पोलवर उभी होती. प्रत्यक्ष लाईनची बारकाईने पाहणी केली असता कोणतीही स्पार्कीग झालेली नाही असा पंचनामा दाखल केलेला आहे तो पंचनामा ही या प्रकरणात दाखल आहे. या सर्व कागदपञावरुन असे दिसून येते की, अर्जदार यांचा 0.60 आर ऊस नक्की जळालेला आहे यावीषयी संशय नाही. पोलिस पंचनामा व मंडळ निरीक्षक यांचे पंचनामा यावरुन हे सिध्द होते. परंतु गैरअर्जदार यांचे अधिका-यांनी केलेला पंचनाम्यात स्पार्कीग झालीच नाही असे म्हटलेले आहे. गैरअर्जदारांनी असे म्हटले जरी असले तरी केलेला पंचनामा हा त्यांचाच आहे त्यामूळे गैरअर्जदार हे त्यांचीच बाजू मांडणार,सत्य स्थिती समोर येणार नाही.पंचनामा केलेल्या अधिका-याचे किंवा त्यांवर सहया घेतलेल्या दोन साक्षीदाराचे या बाबत शपथपञही नाही. त्यामूळे तो मान्य करता येणार नाही. त्यासोबत पोलिस पंचनामा व मंडळ निरिक्षक पंचनामा यात स्पार्कीगने ठीणगी पडून ऊस व झाडे जळालेली आहेत हे अर्जदार यांचे म्हणण्यास पूष्ठी मिळते. नक्की आगीचे कारण अर्जदाराने त्या विभागाचे आमदार यांचेकडे अर्ज लिहून नूकसान भरपाईची मागणी करण्याची शिफारस केली होती त्यानुसार आ.सूभाष साबने यांनी अधिक्षक अभिंयता, विद्यूत मंडळ यांना पञ लिहून नूकसान भरपाई देण्यावीषयी शिफारस केली आहे. हया अर्जावर वीधान सभेत प्रश्न नंबर 95307 हा तारांकीत प्रश्न करण्यात आला व यांची पूर्ण माहीती मागविण्यात आली. याप्रमाणे मंडळ अधिकारी तहसील कार्यालय मूखेड यांनी ऊस जळाल्याचा उल्लेख केलेला आहे. तसेच ताराचे स्पार्कीगमूळे ऊस जळाल्याचे म्हटले आहे. गैरअर्जदार यांचे पंचनाम्याप्रमाणे स्पार्कीग झाले नाही असे म्हटले आहे व पोलिस पंचनाम्यात शॉर्टसर्किटमूळे ऊस जळाल्याचे म्हटले आहे. म्हणून यातील पान नंबर 2 वर विद्यूत निरिक्षक यांचे अहवालानुसार फेज आणि न्यूट्रलच्या तारा एकमेकास घासून स्पार्कीग झालेले आहे असे नमूद करण्यात आलेले आहे. या अहवालानुसार तारा एकमेकास घासून स्पार्कीग झाले व ऊसाचा वाळलेल्या पाचोळयावर ठीणग्या पडल्यामूळे ऊस जळाला हे सिध्द होते. गैरअर्जदार यांच्या हलगर्जीपणामूळे ऊस व त्यासोबत आंब्याचे व मोंसबीची झाडे जळाली यांस गैरअर्जदार जबाबदार आहेत. त्यांनी केलेला हलगर्जीपणाबददल व गैरअर्जदार यांनी नूकसान भरपाई दिलेली नाही. म्हणजे सेवेत ञूटी केलेली आहे हे अर्जदाराने सिध्द केलेले आहे. अर्जदार यांचा ऊस हा 0.60 आर मध्ये आहे.त्यांनी 90 टन ऊसाचे उत्पन्न दाखवलेले आहे व ऊसाचा भाव रु.850/- दाखवलेला आहे. एकंदर त्या भागात एवढे ऊसाचे उत्पन्न शक्य नाही. ऊसाचे उत्पन्न हे 35 टन एकरी गृहीत धरल्यास ते 52 टन होते व यांचा भाव रु.800/- प्रमाणे धरल्यास त्याची एकूण किंमत रु.41,600/- होते. ऊस जर झाला असता तर एवढी रक्कम अर्जदारास मिळाली असती. जळालेला ऊस हा कारखाना घेतो त्याबददल साधारण 20 टक्के रक्कम अर्जदारास मिळते हाऊस साखर कारखान्यात घातल्याबददल गैरअर्जदार यांनी कोणताही पूरावा समोर आणलेला नाही.अर्जदारांनी झाडाचे वय किती आहे व ते किती मोठे आहे व त्यांला किती फळे येऊ शकतात याबददल कोणताही पूरावा समोर आणला नाही परंतु हे झाडाच्या रोपाची किंमत व ते झाड जळतानसाठी उपयोग आणला असता तरी कमीत कमी आम्ही म्हणतो तेवढी किंमत झाली असती म्हणून अर्जदारास झाडाच्या नूकसानी बददल खालील प्रमाणे हीशोबाने नूकसान भरपाईची रक्कम देण्यात येते. त्यामूळे ही पूर्ण रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. एका मोंसबीचे झाडा याबददल रु.200/- गृहीत धरल्यास आठ झाडाचे रु.1600/- व आंब्याच्या दहा झाडाबददल रु.500/- गृहीत धरल्यास एकूण रु.5,000/- असे एकूण रु.48,200/- एवढी रक्कम मिळण्यास अर्जदार पाञ आहेत. म्हणून वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत रु.48,200/- व त्यावर दि.25.8.2008 पासून 9 टक्के व्याज पूर्ण रक्कम मिळेपर्यत व्याजासह अर्जदारास दयावेत. 3. मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मंजूर करण्यात येतात. 4. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |