ग्राहक तक्रार क्र. 65/2013
अर्ज दाखल तारीख : 06/04/2013
अर्ज निकाल तारीख: 25/11/2014
कालावधी: 01 वर्षे 07 महिने 16 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद
1) महादेव शंकर लोखंडे,
वय-52 वर्षे, धंदा – शेती व नौकरी,
रा.सरमकुंडी ता. वाशी, जि.उस्मानाबाद.
2) शालिनी महादेव लोखंडे,
वय-42, धंदा –शेती व घरकाम, रा.वरीलप्रमाणे. ....तक्रारदार
वि रु ध्द
1) एम.एस.बनसोडे,
कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि. सब स्टेशन पारगांव, ता. वाशी, जि.उस्मानाबाद
2) ललित दत्तात्रय ठाकुर,
कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या,
ता.जि. उस्मानाबाद. ..विरुध्द पक्षकार
कोरम : 1) मा.श्री.एम.व्ही.कुलकर्णी, अध्यक्ष.
2) मा.श्रीमती विदयुलता जे.दलभंजन. सदस्या.
3) मा.श्री.मुकुंद बी.सस्ते, सदस्य.
तक्रारदारातर्फे विधीज्ञ : श्री.के.जी.बावळे.
विरुध्द पक्षकार तर्फे विधीज्ञ : श्री.व्ही.बी.देशमुख.
निकालपत्र
मा.सदस्या श्रीमती विदयुलता जे.दलभंजन यांचे व्दारा :
1) तक्रारदाराच्या तक्रारी अर्जाचे थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे :
तक्रारदाराने विप कडून आपल्या मालकी व वहीवाट असलेली जमीन सर्व्हे क्र.139/अ व सर्व्हे क्र.139/ड जमीनीस पाणी देण्यासाठी विदयूत पुरवठा घेतलेला आहे. त्याचा ग्राहक क्र.600070318137 तक्रारदार क्र.1 व तक्रारदार क्र.2 यांच्या नावे 600070405722 असा असून. तक्रारदार हे आपापसात पती पत्नी असून ते सदर जमीनीचे एकत्रीत वहिवाट करतात व कौटुंबिक व्यवस्थापनासाठी अर्जदार क्र. 1 यांनी अर्जदार क्र. 2 यांचे नावावर सर्व्हे नं.139/ड मधील जमीन केलेली आहे. सर्व्हे क्र.139/अ व सर्व्हे क्र.139/ड मध्ये अनुक्रमे 60 व 40 गुंठे ऊस मेहनत मशागत घेवून गाळपास आला होता. सदर संपुर्ण ऊस दि.24/01/2013 रोजी रात्री. 1.00 वा. सुमारास अर्जदार यांच्या ऊस लागवड केलेल्या शेतातील बांधावरील डी.पी.मध्ये शॉर्ट सर्कीट झाल्याने गाळपास आलेला उस जळाला. अर्जदाराच्या शेतातील ज्वारीच्या कडब्याच्या 2800/- पेंडया, पाईपलाईनच्या 3 इंचाच्या 48 नळया, ऊसातील ठिबक संच पुर्णपणे जळून गेला व त्यामध्ये अर्जदाराचे एकुण संपूर्ण रु.6,00,000/- चे नुकसान झाले सदर घटनेबाबत तक्रारदाराने दि.24/01/2013 रोजी तहसील कार्यालय वाशी यांच्याकडे अर्ज दिला. तसेच पोलीस स्टेशन वाशी, सहय्यक अभियंता, पारगांव सबस्टेशन यांच्याकडे पंचनामा करण्यासाठी अर्ज दिला असता सदर घटनेचा या सर्वानी पंचनामा केला. तक्रारदाराने दि.05/03/2013 रोजी विप क्र.1 यांना नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी विप क्र.2 कडे जाण्याचा सल्ला दिला. म्हणून तक्रारदार दि.06/03/2013 रोजी विप क्र.2 यांच्या कार्यालयात गेले असता त्यांनी नुकसान भरपाई देण्यास पुर्णपणे नकार दिला. म्हणून सदरची तक्रार दाखल केली व तक्रारदाराचे झालेले नुकसान रु.6,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- प्रकरणाचा खर्च रु.5,000/- विप यांच्याकडून देण्यात यावा अशी विनंती केली आहे.
अर्जदार यांनी दिलेला अर्ज, पो.स्टे. वाशी यांनी केलेला पंचनामा, तलाठी कार्यालयाचा पंचनामा, विप क्र.1 यांचा अर्ज, विप यांनी केलेला पंचनामा, अर्जदार क्र.1 व 2 यांचा सातबारा उतारा, अर्जदार क्र.1 व 2 यांचे लाईट बील, इत्यादी कागदपत्रांच्या प्रती मंचाच्या अभिलेखावर दाखल केल्या आहेत.
2) सदर प्रकरणात मंचामार्फत विरुध्द पक्षकार यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी दि.03/05/2014 रोजी आपले म्हणणे दाखल केलेले असून ते पुढीलप्रमाणे....
तक्रारदाराने सन 2011-12 मध्ये सर्व्हे क्र.139/अ मध्ये 0 हे 60 आर व सर्व्हे क्र.139/ड मध्ये 1 हे 40 आर ऊसची लागवड केली हाती व तो गाळपास आला होता तसेच व विप यांच्या डि.पीमुळे सदर ऊस व इतर साहीत्य जळाले हे मान्य नाही. सदर डिपी घटनास्थळापासून ब-याच अंतरावर असल्यामुळे सदरची घटना ही डी.पी. मध्ये शॉर्ट सर्कीट होवून घडली हे मान्य नाही. सदर घटनेचा पंचनामा पोलीस व तलाठी यांनी विदयुत तज्ञ नसतांना व तक्रारदाराच्या सांगण्यावरुन केला असून विपच्या अनुपस्थितीत झाला आहे. सदर घटनेबाबत विप यांना ताबडतोब कळविले नाही. सदरच्या डिपीवरुन ओढलेल्या तारांवरुन तक्रारदार यांना विदयुत पुरवठा दिलेला नसल्याने तक्रारदारास विपकडून ग्राहक या नात्याने नुकसान भरपाई मागण्याचा अधिकार नाही. विदयुत निरीक्षकाचा अहवाल आवश्यक असतांना दाखल नाही. पोलीस पंचनामा पाहीला असता सदर ऊस ट्रान्सफार्मरपासून 10 फुट अंतरावर दिसत असून ट्रान्सफॉर्मरपासुन 350 फुट जळालेला दिसत आहे. त्यानंतर पुढे ट्रान्सफार्मर पासून उत्तर बाजुस असलेला 13 फुट अंतरावरील ऊस जळालला दिसत आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार खारीज होणे योग्य आहे.
3) तक्रारदाराची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, गैरतक्रारदार यांचे म्हणणे, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, उभयतांचा लेखी युक्तीवाद इत्यादींचा विचार करता आम्ही निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित करीत आहोत. त्यांचे निष्कर्ष खाली दिलेल्या कारणांसाठी देतो.
मुद्ये उत्तरे.
1) विरुध्द पक्षकार यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय ? होय.
2) तक्रारदार नुकसान भरपाई रक्कम
मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3) काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे.
निष्कर्ष
4) मुददा क्र.1 व 2 :
अर्जदाराने दि.24/02/2013 रोजी तलाठी सरमकूंडि ता. वाशी, जि. उस्मानाबाद यांचा पंचनामा अभिलेखावर दाखल केलेला आहे त्या पंचनाम्यात एम.एस.इ.बी. च्या डीपीला स्पार्क झाल्याने आग सर्वत्र पसरुन ऊस जळालेला आहे. ग.न.139 अ. मध्ये 60 गुंठे व त्यांची पत्नी सौ. शालीनी महादेव लोखंडे यांच्या नावावर असलेल्या क्षेत्रात स.न.139 ड मध्ये 1 हे 40 गुंठे लागवड केली होती. त्याचबरोबर ज्वारीच्या कडब्याच्या 2800 पेंडयांना आग लागून जळालेल्या आहेत असे एकूण 6 लाखापर्यंत नुकसान झालेले आहे.
5) तसेच पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे वाशी यांच्या घटनास्थळ पंचनाम्यात अर्जदार यांचा ऊस 350 फुट जळालेला दिसत आहे. तसेच बांधावर ठेवलेले पी.व्ही.सी. पाईपच्या तीन इंचाच्या 35 नळया प्रत्येकी 20 फुट लांबीच्या जळून वितळून अर्धवट जळालेल्या दिसत आहे. तसेच कडब्याचा गंजी जळून खाक झालेला दिसत आहे. ट्रान्सफॉर्मर पासून उत्तर बाजूक जळालेला 15 फुट अंतरावरील ऊस साधारण 3 एकर जळालेला दिसत आहे. व आगीमध्ये अंदाजे रु.6,00,000/- चे नुकसान झालेले आहे.
6) तसेच Sub. Engineer, M.S.E.B.D.C. Ltd. Paragoan Unit S/o Washi Div. Osmanabad. यांनी केलेला पंचनामा अभिलेखावर दाखल आहे. सदर पंचनाम्यात D.P.च्या बॉक्समध्ये शॉर्टसर्किट होऊन अंदाजे 4 एकर 20 गुंठे ऊस जळाला, चा-याची गंजी, ठिबक सिंचन व शेतीसाठी लागणारे पाण्याचे PVC. पाईप जळालेला आढळतो व श्री.सुरवसे व्ही.एल.(तंत्रज्ञ) श्री. बन एस.एम. मिटर अॅड आर्ट टेक्नीशिअन यांनी तपासणी केली.
7) अर्जदार यांनी जय भवानी सहकारी साखर कारखान्याचे ऊस खरेदी अडव्हान्स बील 2012 चे रक्कम रु.1,00,103/- चे व रु.1,88252/- चे दाखल केलेले निदर्शनास येते. दोन्ही बीले अडव्हान्स आहेत. म्हणजेच अर्जदार यांनी सदर ऊस कारखान्याकडे पाठवला असता तर त्यांना गेल्यावर्षी एवढे उत्पन्न मिळाले असते असे ग्राहय धरावे लागेल.
8) अर्जदाराचा ऊस वितरण कंपनीच्या शेतात असलेल्या रोहीत्रामध्ये स्पार्किंग होऊन नुकसान झाल्याचे कनिष्ठ अभियंता यांच्या पंचनाम्यात नमूद केलेले आहे. कनिष्ठ अभियंता यांनी तो पंचनामा केलेला आहे व इलेक्ट्रीक इन्सपेक्टर यांच्याकडे पाठविला. इलेक्ट्रीक इन्सपेक्टर यांचा अहवाल विपने दाखल केला नाही, म्हणजे तो अहवाल विप विरुध्द असणार.
9) विजेचे वितरण, विदयूत पुरवठा करण्यासाठी रोहीत्राची मांडणीची वेळोवेळी देखभाल करण्याची व दुरुस्ती करुन सुरक्षित ठेवण्याची कायदेशीर जबाबदारी विदयूत कंपनीची आहे.
10) मंचाचे असे स्पष्ट मत आहे कि ज्यावेळी असे विदयूत अपघात घडतात आणि त्यामुळे ग्राहकाच्या मालमत्तेचे नुकसान होते. त्यावेळी वितरण कंपनीने योग्य ती पावले उचलणे आवश्यक असते.
11) वितरण कंपनीचे कायदेशीर बंधने कसतांना देखिल डि.पी.मध्ये स्पार्कींग का होते. तारांमधील अंतर योग्य आहे का ? ही सर्वस्वी जबाबदारी विदयूत कंपनीची असतांना देखिल कंपनीने उपकरणांची चूक मांडणी व तारांमधील घर्षणामुळे अर्जदाराचा ऊस व शेतीमधील अवजारे यांच्या नुकसानीस जबाबदार आहे हे दोन्ही पंचनाम्यावरुन सिध्द होते. म्हणून विपने सेवेत त्रुटी केली आहे या मतापर्यंत आम्ही आलो आहोत.
12) सदर प्रकरणात पोलिस स्टेशन वाशी, आणि वितरण कंपनीच्या अधिका-यांनी केलेल्या पंचनाम्याचे सुक्ष्म अवलोकन केले असता पोलिस पंचनाम्यात 3 एकर व अभियंता यांच्या पंचनाम्यात 4 एकर ऊस जळालेला आहे असे नमूद केलेले आहे व अर्जदाराचे झाले आहे व त्याला आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले हे नाकारता येत नाही.
13) वितरण कंपनीचे असे म्हणणे आहे की तक्रारदार यांचा ऊस कारखान्यास गेला पंरतु कोणत्या कारखान्यास किती ऊस गेला याबाबत खुलासा दिलेला नाही. परंतू अर्जदाराचा ऊस कारखान्यास गेला असावा ही शक्यता नाकारता येत नाही म्हणून अर्जदाराचा ऊस कारखान्यास गेला असे ग्राहय धरणे योग्य होईल.
14) उर्जदाराचे 3 एकराचे नुकसान झाले आहे असे पंचनाम्यात नमूद आहे. म्हणजेच 100 टन. (एका एकरास सरासरी 33 टन) उत्पादन होते. त्याप्रमाणे 50 टन ऊस न जळाल्याने कारखान्यास गेला असावा व उरलेला 50 टन ऊस रु.2,000/- (दोन हजार प्रमाणे) रु.1,00,000/- ऊसाची नुकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
15) वरील सर्व विवेचनावरुन आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहचलो आहोत कि, अर्जदारांचा ऊस विदयुत वितरण कंपनीच्या निष्काळजीपणामुळे जळाला आहे व त्याच बरोबर शेतीची अवजारे जळालेली आहेत. अर्जदारचा ऊस व शेतीची अवजारे जळाल्यापोटी नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2) विरुध्द पक्षकार विदयूत वितरण कंपनीने अर्जदारास ऊस जळाल्याच्या नुकसान भरपाईपोटी रक्कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख फक्त) तसेच शेतीची अवजारे व ठिबक सिंचन जळाल्यापोटी रक्कम रु.75,000/- (रुपये पंच्यात्तर हजार फक्त), अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.10,000/- (रुपये दहा हजार फक्त) दि.06/04/2013 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याज दराने दयावी.
3) उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी आदेश दिल्या तारखेपासुन तीस
दिवसात करुन, विप यांनी तसा अहवाल 45 दिवसात मा.मंचासमोर सादर करावा,
सदरकामी उभय पक्षकारांनी मंचात हजर रहावे. सदर आदेशाची पुर्तता विप यांनी न
केल्यास तक्रारदाराने तसा अर्ज दयावा
4) उभय पक्षकारांना आदेशाच्या प्रमाणित प्रती निशु:ल्क देण्यात याव्यात.
(श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
अध्यक्ष
(श्री.मुकूंद.बी.सस्ते) (सौ.विदयुलता जे.दलभंजन)
सदस्य सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.