Maharashtra

Jalna

CC/67/2013

Mohammad moeen mohd.Ibrahim - Complainant(s)

Versus

Jr.Engineer; MSEDCLltd.Tembhurni.Tq.Jafrabad - Opp.Party(s)

mohd.sufyan

05 Dec 2013

ORDER

Dist Consumer Disputes Redressal Forum, Jalna
Survey No.488 Bypass Road, Jalna
 
Complaint Case No. CC/67/2013
 
1. Mohammad moeen mohd.Ibrahim
R/o.Dongaon, Tq.Jafrabad
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jr.Engineer; MSEDCLltd.Tembhurni.Tq.Jafrabad
Tembhurni,Tq.Jafrabad
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
For the Complainant:mohd.sufyan, Advocate
For the Opp. Party:
ORDER

(घोषित दि. 05.12.2013 व्‍दारा श्रीमती रेखा कापडिया, सदस्‍या)

 

अर्जदाराने गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. गैरअर्जदार यांनी दिलेल्‍या चुकीच्‍या व वाढीव वीज बिलाबाबत केलेल्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात न आल्‍यामुळे अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत मंचात तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्‍या तक्रारीनुसार अर्जदार हे डोणगाव ता.जि.जालना येथील रहिवासी असुन त्‍यांनी तेथे गैरअर्जदार यांच्‍याकडून घरगुती वापरासाठी वीज पुरवठा घेतला आहे. मार्च 2010 पासून ते औरंगाबाद शहरात राहत असुन डोणगाव येथील जागेत वीज वापर करीत नाही. गैरअर्जदार यांनी त्‍यांना मीटर रिडींगप्रमाणे वीज बिल आकारणी न करता सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी केली. या वाढीव वीज बिलाबाबत त्‍यांनी गैरअर्जदार यांच्‍याकडे केलेल्‍या तक्रारीची दखल घेण्‍यात न आल्‍यामुळे मंचात तक्रार दाखल केली आहे. गैरअर्जदार यांनी वीज वापराप्रमाणे वीज बिल आकारणी करण्‍याची व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई देण्‍याची मागणी अर्जदाराने केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत वीज बिलाच्‍या प्रती, गैरअर्जदार यांच्‍याकडे केलेली तक्रार इत्‍यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
अर्जदाराने तक्रारी सोबत गैरअर्जदार यांनी वीज पुरवठा पुनर्रजोडणी करुन देण्‍याबाबत आदेश देण्‍याची मागणी वेगळया अर्जाद्वारे केली आहे.
गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या जवाबानुसार अर्जदाराचे मीटर लॉक्‍कड् असल्‍यामुळे त्‍यांना नियमाप्रमाणे सरासरीवर अधारीत वीज बिल देण्‍यात आले. ऑगस्‍ट 2012 मध्‍ये मीटरवर 10379 असे रिडींग आढळून आल्‍यामुळे त्‍यांना मागील 24 महिन्‍याच्‍या कालावधीचे एकुण 7664 युनिट वापराचे बिल देण्‍यात आले. या वीज बिलातून अर्जदाराने भरलेले 3349.59 रुपये वजा करण्‍यात आले. गैरअर्जदार यांच्‍या म्‍हणण्‍यानुसार अर्जदारास ऑगस्‍ट 2012 मध्‍ये देण्‍यात आलेले वीज बिल योग्‍य आहे. अर्जदाराच्‍या मीटरचे रिडींग उपलब्‍ध न झाल्‍यमुळे सप्‍टेंबर 2012 च्‍या पुढील कालावधीचे वीज बिल सरासरीच्‍या आधारे देण्‍यात आले.
गैरअर्जदार यांनी मंचात दाखल केलेल्‍या जवाबासोबत अर्जदाराचे सी.पी.एल व मीटर टेस्‍टींग तपासणी अहवाल दाखल केला आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरुन व मंचा समोर झालेल्‍या सुनावणीवरुन असे आढळून येते की,

1. अर्जदाराने डोणगाव येथील घरासाठी गैरअर्जदार यांच्‍याकडून 1989 मध्‍ये वीज पुरवठा घेतला आहे.
2. अर्जदाराच्‍या मीटरचे रिडींग उपलब्‍ध न झाल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी त्‍यांना जुलै 2012 पर्यंत सरासरीवर आधारीत वीज बिल आकारणी केल्‍याचे दिसून येते. ऑगस्‍ट 2012 मध्‍ये मीटरवरील रिडींग उपलब्‍ध झाल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास मागील रिडींग 2715 व चालू रिडींग 10379 असे दर्शवून 7664 युनिट वीज वापराचे बिल आकारले. या वीज बिलातून आकारलेली रक्‍कम 3349.59 कमी करण्‍यात आलेली दिसून येते.
3. अर्जदाराने तक्रारी सोबत दिनांक 24.12.2012 रोजी गैरअर्जदार यांच्‍याकडे मीटर नादुरुस्‍त झाले असल्‍याबाबत गैरअर्जदार यांच्‍याकडे तक्रार केली असल्‍याचे पत्र दाखल केले आहे. परंतु या पत्रावर कोणतीही पोहच पावती नसल्‍यामुळे त्‍याची दखल घेण्‍यात येत नाही.
4. अर्जदाराने सुनावणी दरम्‍यान मीटर तपासणी करण्‍याची विनंती मंचास केली. गैरअर्जदार यांनी सदरील मीटर तपासणी करुन त्‍याचा अहवाल मंचात दाखल केला आहे. या अहवालाचे निरीक्षण केल्‍यावर सदरील मीटर क्रमांक 10227218 जळाले असुन मीटरवर नोंद असलेले रिडींग 10379 आहे. या अहवालावर अर्जदार व ज्‍युनिअर इंजिनिअरची सही आहे. या चाचणी अहवालावरुन मीटरची चाचणी करताना मीटर वरील रिडींग 10379 असल्‍याचे दिसून येते.
5. अर्जदाराची मुळ तक्रार ही मीटर लॉक्‍कड् व वाढीव वीज बिलाबाबत आहे. मीटर नादुरुस्‍त असल्‍याबाबत अर्जदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेला नाही. यावरुन अर्जदाराने दिनांक 27.11.2013 पर्यंत 10379 युनिट वीज वापर केला असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. यावरुन गैरअर्जदार यांनी ऑगस्‍ट 2012 मध्‍ये 7664 युनिट वीज वापराचे (24 महिन्‍याचे) दिलेले बिल योग्‍य असल्‍याचे दिसून येते.
6. अर्जदाराच्‍या तक्रारीमध्‍ये गैरअर्जदार यांनी बिलापोटी वीज पुरवठा खंडीत केला असल्‍याचे म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांनी याबाबत त्‍यांच्‍या जवाबामध्‍ये कोणताही उल्‍लेख केलेला नाही. यावरुन अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत असल्‍याचे मंच मान्‍य करते. ऑगस्‍ट 2012 मध्‍ये नोंद करण्‍यात आलेली रिडींग (10379) व दिनांक 27.11.2013 रोजी चाचणी करताना मीटर वरील रिडींग (10379) सारखीच असल्‍यामुळे ऑगस्‍ट 2012 नंतर वीज पुरवठा खंडीत झाला असल्‍याचा निष्‍कर्ष काढता येतो. त्‍यामुळे ऑगस्‍ट 2012 ते नोव्‍हेंबर 2013 या काळात स्थिर आकराचे बिल आकरणे योग्‍य ठरेल असे मंचाचे मत आहे.
7. गैरअर्जदार यांनी सातत्‍याने लॉक्‍कड् स्‍टेटस देणे ही त्‍यांची चूक असल्‍यामुळे अर्जदारास व्‍याज व दंड न आकारता 7664 युनिट वीज वापराचे बिल आकारण्‍यात यावे.
वरील सर्व निरीक्षणावरुन मंच खालील आदेश पारित करीत आहे.

आदेश

1. गैरअर्जदार यांनी अर्जदारास ऑगस्‍ट 2012 पर्यंत व्‍याज व दंड न आकारता वीज 7664 युनिटचे बिल द्यावे. सप्‍टेबर 2012 नंतरच्‍या पुढील कालावधीच्‍या बिलामध्‍ये स्थिर आकर लावण्‍यात यावा.
2. गैरअर्जदार यांनी वरील प्रमाणे बिल आकरणी करुन 30 दिवसात सुधारीत बिल अर्जदारास द्यावे.
3. अर्जदाराने मागणी केल्‍यास गैरअर्जदार यांनी अर्जदारास हप्‍ते पाडून द्यावे.
4. खर्चाबद्दल आदेश नाही.
 

 
 
[HON'BLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.