जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/202 प्रकरण दाखल तारीख - 25/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 13/01/2011 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. सयद रफिक पि. सयद अमीर वय 30 वर्षे, धंदा व्यवसाय अर्जदार. रा.इंदिरा नगर, असदुल्लाबाद, नांदेड विरुध्द. 1. कनिष्ठ अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. झोन क्र.5 गैरअर्जदार 2. कार्यकारी अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.एस.व्ही.अर्धापूरकर.. गैरअर्जदारा तर्फे वकील - अड.व्ही.व्ही.नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्या ) गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार हा इंदिरा नगर नांदेड येथील रहीवासी असून त्यांने प्लॉट क्र.122 चा मालक असून सदरील मालमत्ता रऊफ खॉन यांच्या कडून खरेदी खत क्र.1573/09 दि.20.02.2009 रोजी विकत घेतली आहे. अर्जदार यांने ऑगस्ट 2009 मध्ये गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे विज जोडणी साठी अर्ज दिला. त्यासाठी आवश्यक असलेली फिस भरण्यास तयार असल्याचे सांगितले. गैरअर्जदार क्र.1 यांनी दि.3.9.2009 रोजी अर्जदारास एक लेखी पञक दिले व त्या पञकानुसार सौ. गंगाबाई तुकाराम नरवाडे यांनी अर्जदारास विज जोडणी कनेक्शन देण्यात येऊ नये असा लेखी आक्षेप गैरअर्जदार क्र.1 यांच्याकडे नोंदविला आहे म्हणून विज जोडणी देता येत नाही म्हणून सागितले. परंतु गंगाबाई हिचा सदर मालमत्तेशी काही एक संबंध नाही. त्यामूळे त्या बेकायदेशीररित्या हस्तक्षेप करीत आहेत. हस्तक्षेप करु नये म्हणून अर्जदार यांनी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर नांदेड येथे आरसीएस क्र.209/09 द्वारे कायमचा मनाई हूकूम गंगाबाई यांचेविरुध्द मिळविण्यात यावा म्हणून दि.31.3.2009 रोजी दावा दाखल केला असून तो प्रंलबित आहे. अर्जदार यांनी घरकूल योजनेअंतर्गत सर्वे करुन व मालकी व ताबा बाबतचे कागदपञाचे अवलोकन करुन योजनेअंतर्गत घर मंजूर केंल्याचे व नवीन विज जोडणी देण्याचे सांगितले, परंतु गैरअर्जदारक क्र.1 यांनी नवीन जोडणीस परवानगी दिली नाही.तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचे दि.3.9.2009 रोजीचे पञ पाहिले असता त्यांस कोणत्या नियमा अंतर्गत विज पूरवठा नाकारला यांबाबत पञामध्ये काहीही नमूद नाही.गैरअर्जदार यांनी कनेक्शन दिल्यास ते विद्यूत कायदा अंतर्गत असलेल्या अटी व नियमांवर आधारित राहणार असून त्यांचा भंग केल्यास ते कनेक्शन वापस घेण्याचा गैरअर्जदार यांना अधिकार राहील. विज जोडणी नसल्यामूळे अर्जदाराच्या घरी चोरीचे प्रकार घडत आहेत. तसेच कूटूंबातील सर्वाना आपली राञ अंधारात घालवावी लागत असून त्यामूळे मूलाचे शैक्षणीक नूकसान होत आहे. विज जोडणी न देऊन गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली आहे. म्हणून अर्जदाराने सदर तक्रार दाखल करुन अशी मागणी केली आहे की, अर्जदाराचा अर्ज मान्य करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी विज जोडणी साठी योग्य रक्कम घेऊन तात्काळ अर्जदारास वरील मालमत्तेवर विज पूरवठा कनेक्शन देण्याचे आदेश व्हावेत. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. विज कायदा 2003 च्या कलम 168 प्रमाणे अधिका-याविरुध्द वैयक्तीकरित्या तक्रार दाखल करता येत नाही. अर्जदार यांचा गैरअर्जदार यांचेशी ग्राहक म्हणून काहीही संबंध नाही.तसेच गंगूबाई यांना या प्रकरणात मध्ये वादी केलेले नाही. ऑगस्ट 2009 मध्ये कनिष्ठ अभियंता झोन क्र.5 यांना विज जोडणीसाठी अर्ज केलेला तो अर्ज हा कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात केला पाहिजे.गैरअर्जदार ही सार्वजनिक क्षेञामध्ये काम करणारी कंपनी असून त्यांना अर्जदार यांचे ज्या मालमत्तेबाबत वाद आहे त्यामध्ये पडावयाचे नाही. मालमत्तेसंबंधीचा वाद हा त्यांनी स्वतः दूर करावयाचा असतो.गंगूबाई यांनी अर्ज दिल्यामूळे व अर्जासोबत कर आकारणी पावती व कोर्टाची कागदपञे दाखल केल्यामूळे गैरअर्जदार यांनी दि.3.9.2009 रोजी एक पञ देऊन या सर्व बाबीचा त्यामध्ये केला आहे. सदर मालमत्तेबाबत वाद हा दिवाणी न्यायालयात प्रलंबित असल्यामूळे व गंगूबाई यांनी आक्षेप घेतल्यामूळे अर्जदार यांना विज जोडणी दिलेली नाही. तसेच अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक नाही. म्हणून अर्जदाराचा अर्ज हा गैरसमजूतीवर आधारित असल्याकारणाने तो खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले कागदपञाप्रमाणे व दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकूण खालील मूददे उपस्थित होतात ते मूददे व त्यावरील सकारण उत्तरे खालील प्रमाणे, मूददे उत्तर 1. अर्जदार हे ग्राहक आहेत काय 2. अर्जदाराने केलेली मागणी पूर्ण करण्यास - सिध्द करु शकला नाही. गैरअर्जदार बांधील आहेत काय ? 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र.1 व 2 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात असे लिहीले आहे की, ऑगस्ट 2009 मधे त्यांनी कनिष्ठ अभिंयता झोन क्र.5 यांचेकडे विज जोडणी करिता अर्ज केला होता. पण आजपर्यत त्यांना विज जोडणी न देऊन गैरअर्जदार यांनी ञूटीची सेवा दिली. दि.03.09.2009 रोजीचे कनिष्ठ अभिंयता झोन क्र.5 यांचहे पञ हे अर्जदाराने दाखल केले आहे, ज्यामध्ये सौ. गंगाबाई भ्र. तुकाराम नरवाडे यांनी दि.23.7.2009 रोजीला विज वितरण कंपनीला अर्ज दिला व काही कागदपञे दाखल केली. म्हणून अर्जदारास विज जोडणी गैरअर्जदार यांनी दिली नाही अशा आशयाचे एक पञ मंचासमोर आहे. दि.04.01.2010 रोजीचे कार्यकारी अभिंयता (बीएसयूपी) नांदेड यांचे वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड यांचे पञ पाहता त्यांनी अर्जदारास दि.19.01.2010 रोजीचे आंत रु.23500/- मागासवर्गीय असल्यास किंवा रु.28200/- खुल्या प्रवर्गाचे असल्यास भरावेत व घरकुल योजनेचे कागदपञे व बॉन्ड करुन घ्यावेत अन्यथा मुदतीनंतर आपले म्हणणे ऐकून घेतले जाणार नाही व आपल्या नांवाऐवजी दूस-या लाभार्थ्यास घरकूल बांधून देण्याचा नीर्णय घेण्यात येईल. यावरुन असे स्पष्ट होते की, अर्जदाराने घेतलेली जागा ही त्यांचे मालकीची आहे हे अर्जदाराने सिध्द केले नाही. दि.04.01.2010 रोजीच्या पञानुसार जर अर्जदाराने रु.28500/- रक्कम नांदेड महानगरपालिकेकडे भरली असती तर त्यांने ती पावती मंचासमोर दाखल करणे आवश्यक होते. किंवा नांदेड शहर महानगर पालिकेला गैरअर्जदार म्हणून प्रकरणात दाखल करणे आवश्यक होते. कोणत्याही कायदेशीर पुराव्याचा अर्जदाराने अवलंब केलेला नाही. त्यामुळे अर्जदार हा सदर प्लॉटचा मालक आहे हे सिध्द झाले नसल्यामुळे ती जागा त्यांचे मालकीची नाही. त्या जागेवर गैरअर्जदार विज जोडणी कशी देणार ? म्हणून या केसमध्ये गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी मानल्या जात नाही. या निर्णयास्तव हे मंच आलेले आहे. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदराचा अर्ज फेटाळण्यात येतो. 1. 2. खर्च ज्यांचे त्यांने सहन करावा. 2. 3. उभयपक्षांना निर्णय कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख अध्यक्ष सदस्या जयंत पारवेकर लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |