जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 202/2008. प्रकरण दाखल तारीख - 05/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 16/10/2008 समक्ष – मा.बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.सतीश सामते - सदस्य गोंविद मूंजाजी बोडके अर्जदार. वय, 51 वर्षे, धंदा सुतारकाम रा. शिवाजी नगर मुदखेड ता. मुदखेड जि. नांदेड. विरुध्द. 1. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित मार्फंत, कनिष्ठ अभिंयता, मुदखेड 2. महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित गैरअर्जदार मार्फत, सहायक अभिंयता, आनंद नगर,नांदेड जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.आर.डी.राठोड गैरअर्जदार तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने शिवाजी नगर मुदखेड येथील आपल्या घरगूती कारणासाठी गैरअर्जदार यांच्याकडून विज पूरवठा घेतलेला आहे. विज पूरवठा घेतला त्यावेळेस त्यांच्याकडे विज मिटर नंबर 55005500/4380 हे मिटर बसविण्यात आले. त्यावेळेस त्यांला सिल बसवले नव्हते. गैरअर्जदार यांना सांगितल्यानंतर त्यांनी पून्हा सिल बसवून देऊन आता सिल उपलब्ध नाही असे सांगितले. यानंतर काही दिवसांनी परत आक्षेप घेतला असता सिल न लावलेले मिटर काढले व तूम्ही रधां मशीनचे काम करता त्यामूळे तूम्हाला हे मिटर ठेवता येणार नाही तूम्हाला दूसरे मिटर लावतो म्हणून दूसरे मिटर लावले. त्यावेळेस जून्या मिटरमध्ये 2400 यूनिट रिंडीग होती परंतु ज्यावेळेस बिल दिले तेव्हा त्यावर 2998 यूनिट म्हणजे 600 यूनिट जास्तीचे दाखवलेले होते. व त्याबददल रु.20,012/- चे बिल दिले जे की चूकीचे आहे. या सोबतच नवीन मिटरची आकारणी रु.10,000/- लिहीलेले ती ही बेकायदेशीर आहे. अर्जदार कोणत्याही विज पूरवठयाद्वारे रधां काम करीत नाहीत. गैरअर्जदारानी आवश्यक नसताना मिटर बदलून त्यांना मानसिक ञास दिला आहे. त्यामूळे अर्जदार यांची मागणी आहे की. जूने मिटर परत बसवावे, 600 यूनिटचे चूकीचे दाखवलेले आहे ते बिल रदद करावे, रु.10,000/- मिटर कनेक्शन चार्जेस रदद करावेत. व विज पूरवठा घरगूतीच ठेवावा, मानसिक ञासाबददल रु.13,000/- व दावा खर्च म्हणून रु.2,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी संयूक्तरित्या आपले म्हणणे वकिलामार्फत दाखल केलेले आहे. तक्रारदाराच्या जागेमध्ये त्यांच्या समक्ष गैरअर्जदाराच्या अधिका-याने भेट दिली असता विजेचा अनाधिकृत वापर केल्याचे व त्यांनी विजेची चोरी केलयाचे आढळले. त्यामूळे त्यांना विज चोरीचे देयक देण्यात आले. अर्जदाराने बिलाची रक्कम व तडजोडीची रक्कम ही पूर्णतः भरली आहे. यांचा अर्थ तक्रारदाराने स्वतःचा गून्हा कबूल केलेला आहे. त्यामूळे आता परत त्यावीषयी तक्रार करता येणार नाही. अर्जदारांनी वैयक्तीक पदनामाने तक्रार केली आहे. वास्तविक अशी तक्रार ही विज कायदा कलम 168 नुसार करता येत नाही. अर्जदाराचा विज पूरवठा हा व्यावसायीक कारणासाठी वापरला होता. त्यामूळे ते कलम 2 (1)(ड) नुसार ग्राहक होऊ शकत नाहीत. अर्जदाराने रहीवाशी विजेची जोडणी घेऊन त्यांचा वापर व्यावसायीक कारणासाठी केलेला आहे. त्यामूळे त्यांचा अर्ज खारीज होण्या योग्यतेचा आहे. सूरुवातीला विजेचे मिटर बसविले त्यांला सिल बसविण्यात आले नव्हते हे अर्जदाराचे म्हणणे सर्वस्वी खोटे व चूकीचे आहे. सन 2006 पासून अशा प्रकारची तक्रार त्यांच्याकडे नाही. म्हणजे अर्जदाराने स्वतः ती सिले तोडलेली आहेत. स्पॉट इन्सपेक्शन केले त्यावेळेस मंजूर भार 0.50 केडब्ल्यू असा असताना प्रत्यक्षात 0.80 केडब्ल्यू इतकी विज आगाऊ खेचत होते. अर्जदाराने केलेल्या गैरकृत्यासाठी त्यांना विज चोरीचे देयक रु.20,012/- व तडजोडीचे देयक रु.10,000/- कलम 135 नुसार देण्यात आले. तक्रारदारावर विज चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली होती परंतु त्यांने तडजोड केल्याचे मान्य केल्यामूळे दि.26.6.2008 रोजी पावती नंबर 500075 नुसार रु.10,000/- तडजोड रक्कम व बिलही भरले आहे. एखादा गून्हा कबूल केल्यानंतर त्यांना तक्रार दाखल करता येणार नाही. म्हणून अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदाराचा विज वापर हा व्यावसायीक आहे काय होय. 2. गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय नाही. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 व 2 ः- अर्जदार यांनी ग्राहक क्र.55005500/4380 या ग्राहक क्रंमाकाद्वारे विज पूरवठा साल 2006 मध्ये घेतलेला आहे व अर्जदार यांच्या म्हणण्याप्रमाणे लगेच गैरअर्जदारानी अर्जदार हे रधां मशिनचे काम करतात त्यामूळे त्यांना नवीन व्यावसायीक मिटर बसवून तेव्हापासून आजपर्यत अर्जदाराने याबददलचा आक्षेप नोंदविला नाही किंवा तक्रार देखील केली नाही. परंतु दि.15.5.2008 रोजी गैरअर्जदार स्पॉट इन्स्पेक्शन करुन अनाधिकृत मंजूर भारा पेक्षा जास्त विज वापरीत होते व विज चोरी हे आरोप लिहून रु.20,012/- चे देयक दिले आहे व हे बिल लवकर न भरल्याकारणाने तक्रारदारावर विज चोरीची फिर्याद दाखल केली आहे परंतु सोबत तडजोडीचे देयक रु.10,000/- दि.13.6.2008 रोजी अर्जदाराने पूर्णतः भरले आहे. एखादया तडजोडीची रक्कम भरल्यानंतर त्यांचा अर्थ असा नीघतो की अर्जदाराने केलेले कृत्य त्यांना कबूल आहे व एखादी तडजोड केलयानंतर परत तक्रार अर्जदाराला करता येणार नाही.शिवाय व्यावसायीक मिटरचे बिल त्यांने पूर्णतः भरुन विजेचा वापर हा व्यावसायीक स्वरुपाचा होता व मंजूर भारापेक्षा जास्त विज वापरली हे त्यांने कबूलच केले आहे. व्यावसायीक वापर नव्हता यासाठी अर्जदाराने कूठलाही ठोस पूरावा दिलेला नाही. म्हणून आम्ही या निर्णयास आलो आहोत की, एकदा तडजोड झाल्यानंतर व ती रक्कम भरल्यानंतर परत तक्रार दाखल करता येणार नाही. म्हणून गैरअर्जदारांनी मूददा क्र.1 प्रमाणे केलेला विजेचा वापर हा व्यावसायीक स्वरुपाचा आहे हे कबूल केल्यामूळे गैरअर्जदार यांनी सेवेत कूठलीही ञूटी केली नाही किंवा अनूचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला नाही हे सिध्द होते. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात येते. 2. पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे. यु. पारवेकर लघूलेखक. |