Maharashtra

Jalna

CC/86/2012

Rambhau Ganpat Khade - Complainant(s)

Versus

Jr.Engineer MSDCL - Opp.Party(s)

Adv.S.A.Javed

19 Dec 2013

ORDER

 
CC NO. 86 Of 2012
 
1. Rambhau Ganpat Khade
At-Antrawala(S),Tq-Ambad
Jalna
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jr.Engineer MSDCL
AT-vadigodri,Tq-AMbad
Jalna
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. NEELIMA SANT PRESIDENT
 HON'ABLE MRS. Rekha Kapdiya MEMBER
 
PRESENT:
 
अड.जी.आर.कड
......for the Opp. Party
ORDER

(घोषित दि. 19.12.2013 व्‍दारा श्रीमती नीलिमा संत,अध्‍यक्ष)
तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 अंतर्गत सेवेतील कमतरतेबद्दल गैरअर्जदार यांचे विरुध्‍द केलेली आहे. तक्रारदारांची तक्रार थोडक्‍यात अशी की, तक्रारदारांनी गैरअर्जदार वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापरसाठी वीज पुरवठा घेतलेला आहे. त्‍याचा ग्राहक क्रमांक 520120003655 असा आहे व जुना मीटर क्रमांक 06365540 असा होता.
तक्रारदारांचे जुने मीटर जळाल्‍याने त्‍यांनी दिनांक 29.06.2010 व 30.12.2011 रोजी गैरअर्जदार यांचेकडे तक्रार अर्ज केले. सप्‍टेंबर 2011 ते जानेवारी 2012 या काळात प्रत्‍येक महिन्‍यात 117 युनिटचे बिल मीटर फॉल्‍टी दाखवून गैरअर्जदारांनी दिले. मार्च 2012 मध्‍ये 3330 युनिट दिले. बराच पाठपुरावा केल्‍यानंतर दिनांक 24.01.2012 रोजी नविन मीटर क्रमांक 1250700 बसवले. दिनांक 19.04.2012 रोजी त्‍याचे रिडींग 250 युनिट इतके होते. दिनांक 19.04.2012 रोजी अर्ज करुन तक्रारदारांनी त्‍यांना वीज बिल न मिळाल्‍याने बिलाची मागणी केली. दिनांक 05.06.2012 रोजी गैरअर्जदारांनी त्‍यांना 585 युनिटचे अवाजवी बिल दिले व दिनांक 03.08.2012 रोजी रुपये 29,750/- रुपयांचे अवाजवी बिल दिले. तक्रारदारांचे नविन बसवलेले मीटरमध्‍ये देखील दोष आहे. तक्रारदारांनी वेळोवेळी बिल दुरुस्‍त करुन पूर्वी प्रमाणेच वीज वापराच्‍या सरासरी बिलाची मागणी केली. परंतु गैरअर्जदारांनी बिल दुरुस्‍त करुन दिले नाही व अशा प्रकारे तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. म्‍हणून तक्रारदारांची तक्रार आहे. त्‍यांनी आपल्‍या तक्रारी सोबत वेळोवेळी गैरअर्जदार यांना दिलेले अर्ज, मीटर बदली अहवाल, मीटर तपासणी अहवाल, गैरअर्जदारांनी त्‍यांना दिलेले दिनांक 03.08.2012 चे विद्युत देयक इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार मंचा समोर हजर झाले. त्‍यांनी लेखी म्‍हणणे दाखल केले. त्‍यांच्‍या कथनानुसार मार्च 2012 ला ग्राहकाला नविन मीटर बसवण्‍यात आले. परंतु अनवधनाने मीटर वाचन घेणा-या एजन्‍सीकडून मागील मिटरचे रिडींग 3368 असे टाकण्‍यात आले. चूक लक्षात आल्‍याबरोबर कनिष्‍ठ अभियंता यांच्‍या अहवालावरुन बी-80 भरुन झालेली चुक दुरुस्‍त करण्‍यात आली आहे व अर्जदाराचे नोव्‍हेंबर 2012 पर्यंतचे एकूण बिल 2311.28 असे क्रेडीटबिल आहे. जेव्‍हा तेव्‍हा सरासरी काढूनच तक्रारदारांना देयक देण्‍यात आले होते व रिडींग उपलब्‍ध झाल्‍यावर ते समायोजित करण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारदारांचे काही नुकसान झालेले नाही व विद्युत पुरवठा खंडित करण्‍यात आलेला नाही. गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यावयाच्‍या सेवेत काही कमतरता केलेली नाही म्‍हणून तक्रार फेटाळण्‍यात यावी. गैरअर्जदार यांनी आपल्‍या जबाबासोबत तक्रारदारांचे सी.पी.एल, बी-80 (कार्यालयीन टीपन) उप कार्यकारी अभियंता, यांनी लिहीलेले पत्र इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.एस.रहेमतअली व गैरअर्जदारांचे विद्वान वकील श्री.जी.आर.कड यांचा युक्‍तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्‍यास केला त्‍यावरुन खालील गोष्‍टी स्‍पष्‍ट होतात.
1. तक्रारदाराचे जुने मीटर क्रमांक 06365540 बंद होते तक्रारदारांनी वारंवार अर्ज दिल्‍यानंतर तक्रारदाराचे जुने दोषास्‍पद मीटर बदलून त्‍या जागी नविन मीटर बसवण्‍यात आले. त्‍याचा मीटर क्रमांक 1250700 असा आहे ही गोष्‍ट देखील तक्रारदारांचे सी.पी.एल व दिनांक 24.11.2012 चा मीटर तपासणी अहवालावरुन स्‍पष्‍ट होते. मीटर बदलल्‍या नंतर देखील जुन्‍याच मीटर वरील रिडींग पुढे टाकले गेले व जुलै 2012 च्‍या मीटर वाचनात 3368 असे वाचन आले ही बाब देखील जुलै 2012 च्‍या सी.पी.एल वरुन स्‍पष्‍ट होते.
2. गैरअर्जदार यांनी लेखी जबाबात म्‍हटल्‍याप्रमाणे दिनांक 21.06.2012 रोजीची बी – 80 ही कार्यालयीन टीपणी दाखल केली आहे. त्‍यात जुन्‍या मीटरच्‍या देयकातून (3368 युनिटचे देयक) नविन मीटर वाचनाच्‍या 258 युनिटचे विद्युत देयक वजा करुन रुपये 29,045.94 इतकी रक्‍कम कमी केलेली दिसते आहे. तक्रारदारांच्‍या ऑक्‍टोबर महिन्‍याच्‍या सी.पी.एल मध्‍ये देखील ही रक्‍कम क्रेडीट म्‍हणून दाखवलेली दिसते.
3. गैरअर्जदारांनी लेखी जबाबात म्‍हटल्‍याप्रमाणे त्‍यांनी तक्रारदारांच्‍या मीटर रिडींग मध्‍ये झालेली चूक दुरुस्‍त केलेली दिसते आहे. परंतु तक्रारदारांचे मीटर जानेवारी 2012 मध्‍ये बदलले गेले. बी-80 चे टीपण जुन 2012 मधील आहे असे असताना प्रत्‍यक्ष सी.पी.एल मध्‍ये दुरुस्‍ती ऑक्‍टोबर 2012 मध्‍ये केले गेली आहे. झालेली चूक लक्षात आल्‍यानंतर देखील 5 ते 6 महिन्‍यांनी गैरअर्जदारांनी प्रत्‍यक्ष सी.पी.एल मध्‍ये दुरुस्‍ती केले ही गैरअर्जदारांनी तक्रारदारांना द्यायच्‍या सेवेत त्रुटी केलेली दिसते.
4. तक्रारदारांनी दिनांक 23.04.2013 रोजी एक शपथपत्र दाखल केले. त्‍यात त्‍यांचा विद्युत पुरवठा दिनांक 22.10.2012 रोजी खंडित केला व रक्‍कम रुपये 5,000/- भरल्‍यानंतर पुन्‍हा दिनांक 28.10.2012 रोजी चालू केला असे कथन केले आहे व रुपये 5,000/- भरल्‍याची पावती दाखल केली आहे. परंतु तक्रारदारांनी शपथपत्रावर प्रस्‍तुतचे कथन केले आहे. त्‍या व्‍यक्तिरिक्‍त वरील बाब सिध्‍द करणारा पुरावा मंचा समोर नाही. खंडित केलेला वीज पुरवठा पुन्‍हा सुरु करण्‍यासाठी भरावी लागणारी रक्‍कम भरल्‍याची पावती मंचा समोर दाखल नाही अथवा सी.पी.एल वर पुरवठा खंडित केल्‍याची तशी नोंद नाही. गैरअर्जदारांच्‍या अधिका-यांनी लेखी जबाबात वीज पुरवठा खंडित केलेला नाही असे लिहीले आहे व त्‍या पृष्‍ठर्थ त्‍यांनी देखील शपथपत्र दिले आहे. अशा परिस्थितीत तक्रारदारांचा वीज पुरवठा उपरोक्‍त काळासाठी खंडित केला होता ही बाब तक्रारदारांनी सिध्‍द केलेली नाही असा निष्‍कर्ष मंच काढत आहे.
5. तक्रारदार वरील शपथपत्रात पुढे म्‍हणतात की त्‍यांनी भरलेली रक्‍कम रुपये 5,000/- पुढे देयकात दाखवलेली नाही. त्‍यासाठी त्‍यांनी डिसेंबर 2012 चे विद्युत देयक दाखल केले आहे. तक्रारदारांच्‍या ऑक्‍टोबर 2012 च्‍याच सी.पी.एल मध्‍ये रुपये 5,000/- ऐवढी रक्‍कम ‘Last receipt Amount’ म्‍हणून दाखवलेली दिसत आहे. परंतु वरील रक्‍कम पुढील बिलात कमी केलेली दिसत नाही ही देखील गैरअर्जदारांनी केलेली सेवेतील त्रुटी आहे.
गैरअर्जदरांनी दिनांक 03.08.2012 च्‍या विद्युत देयकातील थकबाकी अगोदरच ऑक्‍टोबर 2012 च्‍या देयकात समायोजित केलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या प्रार्थनेतील क्रमांक 2 व 3 मधील प्रार्थनेची पूर्तता झालेली आहे.
तक्रारदारांचे दोषास्‍पद मीटर बदलल्‍या नंतरही गैरअर्जदारांनी जुन्‍याच मीटरचे रिडींग नविन मीटर वर टाकले व मीटर बदलल्‍यानंतर सहा ते सात महिन्‍यांनी तक्रार दाखल झाल्‍यानंतर झालेली चुक दुरुस्‍त केली या गैरअर्जदारांनी केलेल्‍या सेवेतील त्रुटीची व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई म्‍हणून तक्रारदारांना रक्‍कम रुपये 2,500/- व प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- देणे न्‍यायोचित ठरेल असे मंचाला वाटते.
सबब मंच खालील आदेश पारित करत आहे.

आदेश

 

1. गैरअर्जदारांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई म्‍हणून रक्‍कम रुपये 2,500/- (अक्षरी दोन हजार पाचशे फक्‍त) आदेश प्राप्‍ती पासून तीस दिवसात द्यावी.
2. गैरअर्जदारांनी तक्रारदारांनी दिनांक 23.10.2012 रोजी भरलेली रुपये 5,000/- (रुपये पाच हजार फक्‍त) एवढी रक्‍कम पुढील बिलात समायोजित करावी.
3. गैरअर्जदार यांनी तक्रारदारांना तक्रारीचा खर्च रुपये 2,500/- (रुपये दोन हजार पाचशे फक्‍त) द्यावा.
 

 
 
[HON'ABLE MRS. NEELIMA SANT]
PRESIDENT
 
[HON'ABLE MRS. Rekha Kapdiya]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.