Maharashtra

Nanded

CC/10/220

Shankar Nagorao Nageshwar - Complainant(s)

Versus

Jr.Engineer, M.S.E.D.C. Nanded - Opp.Party(s)

A.V.Chaudhari

30 Nov 2010

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/10/220
1. Shankar Nagorao NageshwarMaganpura NandedNandedMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Jr.Engineer, M.S.E.D.C. NandedVidhyut Bhavan Unit NandedNandedMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HON'BLE President B.T.Narwade ,PRESIDENTHON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh ,MEMBER
PRESENT :

Dated : 30 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच,नांदेड.
प्रकरण क्रमांक :-  2010/220
                          प्रकरण दाखल तारीख - 07/09/2010
                          प्रकरण निकाल तारीख 30/11/2010
 
समक्ष  मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील           - अध्‍यक्ष
      मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर    - सदस्‍या.
   
शंकर नागोराव नागेश्‍वर
वय 55 वर्षे, धंदा व्‍यापार                                   अर्जदार
रा. मगनपुरा, नांदेड,ता.जि. नांदेड
     विरुध्‍द.
1.   कनिष्‍ठ अभिंयता
महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.
विद्यत भवन, युनिट नांदेड.                           गैरअर्जदार
2.   उप कार्यकारी अभिंयता
महाराष्‍ट्र राज्‍य विज वितरण कंपनी लि.
शहरी उपवीभाग क्र.2, नांदेड.
अर्जदारा तर्फे वकील             - अड.ए.व्‍ही.चौधरी
गैरअर्जदारा तर्फे वकील              -  अड.विवेक नांदेडकरृ
                               निकालपञ
             (द्वारा - मा.श्रीमती सुवर्णा देशमुख, सदस्‍या )
             गैरअर्जदार यांनी ञुटीची सेवा दिली म्‍हणून अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे.
              अर्जदाराची तक्रार थोडक्‍यात अशी आहे की, अर्जदार हे गैरअर्जदार यांचे जूने ग्राहक असून ब-याच वर्षापासून नांदेड येथील रहीवासी आहेत. अर्जदार यांनी त्‍यांचे राहत्‍या घरी गैरअर्जदार यांचेकडून कायदेशीररित्‍या दोन विज मिटर घेतलेले आहेत. ज्‍यांचा नंबर 55001105670 व 550011003001 असे आहेत. अर्जदाराने दोन्‍ही मिटरचे चालू बिल भरलेले आहेत. अर्जदाराकडे कोणतीही थकबाकी नाही. अर्जदार हे दोन्‍ही मिटर स्‍वतःच्‍या कूटूंबासाठी वापरत आहेत. गैरअर्जदार यांनी अचानक दि.16.04.2010 रोजी मिटर नंबर 55001105670  हे मिटर अर्जदाराची
कोणतीही संमती न घेता तथा कोणतीही सूचना न देता बिल भरलेले असतानाही काढून नेले. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे अर्ज करुन आपले
 
 
 
मिटर पून्‍हा बसवून देण्‍यावीषयी विनंती केली परंतु आजपर्यत गैरअर्जदार यांनी अर्जदारास मिटर बसवून दिले नाही. म्‍हणून अर्जदारास सदरची तक्रार घेऊन मंचासमोर यावे लागले. अर्जदाराच्‍या मूलाचे लग्‍न झाल्‍यानंतर अर्जदाराच्‍या घराच्‍या वरचे मजल्‍यावर त्‍यांचा मूलगा सूनेसहीत राहत असल्‍यामूळे सदरचे मिटर हे अर्जदाराचा मूलगा वापरत होता. अचानक मिटर काढून नेल्‍यामुळे अर्जदारास आश्‍चर्यासहीत मनस्‍ताप झाला म्‍हणून त्‍यांनी शाखा कार्यालयात जाऊन विचारणा केली की, विज मिटर कशामुळे काढून नेण्‍यात आले तीथे त्‍यांनी कोणतेही समाधानकारक उत्‍तर दिले नाही याउलट उडवाउडवीची उत्‍तरे मिळाली त्‍यामूळे अर्जदाराला मानहानी झाल्‍या सारखे वाटले. त्‍याकारणास्‍तव अर्जदाराने दि.21.6.2010 रोजी माहीतीचे अधिकाराखाली गेरअर्जदार यांचेकडे अर्ज दिला व वसंत नगर भागातील एकाच नांवाचे जास्‍तीचे  कोणते व किती ग्राहकांचे मीटर काढण्‍यात आले या बददलची माहीती तात्‍काळ मागितली पण गैरअर्जदार यांनी त्‍या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही व  कोणतीही माहीती अर्जदार यांना दिली नाही. म्‍हणून अर्जदार यांनी दि.01.07.2010 रोजी गैरअर्जदार यांना एक पञ पाठविले ज्‍यामध्‍ये त्‍यांनी असे लिहीले आहे की, इतर बिल्‍डींग मध्‍ये 4 ते 7 मिटर एकाच ठिकाणी असतानाही त्‍यांचे मिटर न काढता माझेच मिटर काढले ?   या पञाला देखील गेरअर्जदार यांनी कोणतेही उत्‍तर दिले नाही म्‍हणून अर्जदाराने दि.31.07.2010 रोजी पून्‍हा लेखी अर्ज दिला, त्‍यांचेही उत्‍तर मिळाले नाही. दि.02.08.2010 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदारास एक पञ पाठविले ज्‍यामध्‍ये असे लिहीलेले होते की, माहीतीच्‍या अधिकाराखाली पाठविलेल्‍या पञाचे उत्‍तर हे गैरअर्जदाराने दिलेले होते. अर्जदार ते राहत असलेल्‍या भागातील एकाच बिल्‍डींग मधील एकाच नांवाचे मिटर कोणकोणते व्‍यक्‍तीचे काढून नेले या बददल माहीती मागितली होती त्‍यांचे उत्‍तर गैरअर्जदार यांनी असे दिले की, ज्‍यामध्‍ये एकाच नांवाचे जास्‍तीचे असलेले मिटर या विभागाचे कनिष्‍ठ अभिंयता यांनी काढलेले नाही व तसा अहवाल या कार्यालयास प्राप्‍त झालेला नाही. या सर्वर प्रकारामूळे अर्जदारास विनाकारण अंधारात राहावे लागले व समाजात नामूष्‍की झाली म्‍हणून अर्जदाराने मिटर नंबर 55001105670 हे पून्‍हा परत बसवून देण्‍यावीषयी गैरअर्जदारांना आदेशीत करावे अशी मागणी केली आहे, व झालेल्‍या शारीरिक व मानसिक ञासाबददल रु.25,000/- नूकसान भरपाई म्‍हणून दयावेत व दावा खर्चापोटी रु,5,000/- दयावेत अशी विनंती केली आहे. अर्जदाराने अर्जासोबत शपथपञ दाखल केले आहे. तसेच माहीतीचे अधिकाराखाली दिलेला  अर्ज दि.01.07.2010 रोजी,  दि.31.7.2010 रोजीचा दिलेला अर्ज,
 
 
 
दि.2.8.2010 रोजी गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या माहीतीच्‍या अर्जावर दिलेले उत्‍तर, दि.4.6.2010 रोजी भरलेले बिल मिटर नंबर 55001105670 चे दि.3.4.2010 रोजीचे विज बिल, दि.9.3.2010, दि.10.02.2010, दि.12.01.2010 रोजीचे बिले भरल्‍याच्‍या पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत. तसेच अर्जदाराकडे असलेले दूसरे मिटर नंबर 550011003001 यांचे दि.17.01.2010 रोजीचे, दि.4.6.2010, दि.09.03.2010, दि.10.02.2010, दि.12.01.2010 रोजीचे बिले भरल्‍याच्‍या पावत्‍या दाखल केलेल्‍या आहेत.
              गैरअर्जदार हजर झाले व त्‍यांनी आपले लेखी म्‍हणणे दाखल केलेले आहे. ज्‍यामध्‍ये त्‍यांनी असे नमूद केले आहे की, गैरअर्जदार यांनी केलेली कारवाई ही विज वितरण कंपनीच्‍या उच्‍च पदस्‍थ अधिका-यांनी धोरणात्‍मक नीर्णयाचा भाग म्‍हणून घेतलेल्‍या नीर्णयाच्‍या अंमलबजावणीस्‍तव करण्‍यात आलेली आहे. विजेचे एकक हे ज्‍या प्रकारे विज वापर केला जातो त्‍यानुसार बदलत असते. विज दर हे वापरलेल्‍या एककाच्‍या प्रमाणात असतात, कमी वापराचे विजेस कमी दर आकारला जातो व जास्‍त वापराचे विजेस जास्‍त दर आकारला जातो.   300 यूनिटपर्यत विजेचे बिल सर्वसाधारण प्रमाणात असते व त्‍या वरच्‍या बिलास जास्‍त रक्‍कम देणे क्रमप्राप्‍त असते. मिटर वीभाजन केल्‍यामुळे विज वापर जास्‍त असला तरी मिटरचे बिल कमी भरण्‍यात येते. त्‍यामूळे गैरअर्जदार यांचा तोटा होतो म्‍हणून कंपनीच्‍या मूख्‍य कार्यालयाने दि.16.6.2010 रोजीला एक व्‍यावसायीक परिपञक्र क्र.110 पाठविले असून त्‍यामध्‍ये विज वापर करणा-या व्‍यक्‍तीनी त्‍यांचे वापराच्‍या एककाची वीभागणी दोन मिटरवर करुन विज वितरण कंपनीचा आर्थीक तोटा होऊ नये म्‍हणून दोन मिटर एकाच व्‍यक्‍तीचे एकाच इमारतीत असल्‍यास त्‍यांना एकञित करुन त्‍यांच जागी एकच मिटर देण्‍याचा धोरणात्‍मक नीर्णय घेतलेला होता व त्‍यांची अंमलबजावणी म्‍हणून अर्जदाराचे एक मिटर रदद करुन एक मिटर ठेवण्‍यात आले त्‍यामूळे या गोष्‍टीस अर्जदाराने आक्षेप घेण्‍याचा अधिकार नाही व अर्जदाराचा अर्ज रदद करण्‍यायोग्‍य आहे. अर्जदाराचे हे म्‍हणणे चूकीचे आहे की, अर्जदाराच्‍या माहीतीच्‍या अधिकाराखाली दिलेल्‍या अर्जाचे उत्‍तर दिले नाही परंतु सदरच्‍या अर्जाचे उत्‍तर गैरअर्जदार यांनी दिलेले आहे. एक मिटर घेऊन गेल्‍यामूळे अर्जदाराचे फारसे नूकसान झाले नाही. वैयक्‍तीक लाभा पेक्षा सार्वजनिक हित महत्‍वाचे असते म्‍हणून अर्जदाराची मागणी ही मान्‍य करण्‍यात येऊ नये व अर्जदाराची तक्रार गैरअर्जदारास रु.10,000/-खर्चासह तक्रार फेटाळण्‍यात यावी असे म्‍हटले आहे. गैरअर्जदार यांनी शपथपञ दाखल केले व व्‍यावसायीक परिपञक दि..16.02.2010 रोजीचे दाखल केले आहे.
 
 
 
              अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेंडर कागदपञानुसार खालील मुददे उपस्थित होतात.
         मूददे                                          उत्‍तर
1.   अर्जदार हे ग्राहक आहेत काय                         होय
2.                 गैरअर्जदार यांनीअर्जदारास ञूटीची सेवा
          दिली आहे काय                                      होय.
2.   काय आदेश                              अंतिम आदेशाप्रमाणे.
                        कारणे
मूददा क्र.1  ः-
              गैरअर्जदार यांनी अर्जदारास दोन मिटर जोडण्‍या दिलेल्‍या आहेत या बददल उभयपक्षात वाद नाही. मिटर नंबर 55001105670 व 550011003001 हे दोन्‍ही मिटर गैरअर्जदार यांनी अर्जदाराच्‍या घरात बसवलेले होते याबददलही वाद नाही. म्‍हणून अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत म्‍हणून मूददा क्र.1 चे उत्‍तर सकारात्‍मक देण्‍यात येते.
मूददा क्र.2 ः-
              वर नमूद केलेले दोन्‍ही मिटर अर्जदाराच्‍या घरात होते अचानक कोणतीही सूचना न देता तथा नोटीस न देता तथा अर्जदाराची संमती न घेता गैरअर्जदार यांनी दि.16.4.2010 रोजी मिटर नंबर 55001105670 हे अचानक काढून घेतले ही घटना गैरअर्जदार यांना मान्‍य आहे. वादातीत मूददा एकच की गैरअर्जदार यांनी अर्जदाराला कोणतीही सूचना न देता हे मिटर काढून नेले. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे कार्यालयात जाऊन स्‍वतः चौकशी केली व तिन वेळेस अर्जही दिले. माहीतीच्‍या अधिकाराखाली अर्ज देऊनही माहीती उपलब्‍ध करुन देण्‍यावीषयी विनंती केंली तरी देखील गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना कोणत्‍याही अर्जाचे उत्‍तर दिले नाही. अर्जदार यांनी दाखल केलेल्‍या बिल भरलेल्‍या पावत्‍या पाहिल्‍या असता हे दिसून येते की, जे मिटर दि.16.4.2010 रोजी काढून नेले त्‍यांचे बिल दि.4.6.2010 रोजी अर्जदाराने भरलेले दिसते, तसेच अर्जदाराने दाखल केलेल्‍या विज बिल भरलेल्‍या पावत्‍या जर पाहिल्‍या असता असे दिसते की, दोन्‍ही मिटरचे प्रत्‍येक महिन्‍याचे बिल अर्जदाराने भरलेले आहे. म्‍हणजेच अर्जदाराकडे कोणतीही थकबाकी शिल्‍लक नाही हे स्‍पष्‍ट होते. माहीतीच्‍या अधिकाराखाली जेव्‍हा अर्जदार एखादी माहीती मागतो ती माहीती देणे हे गेरअर्जदार यांचेवर बंधनकारक होते तरी देखील त्‍याबददल गैरअर्जदार यांनी कोणतीही दखल घेतली नाही याउलट दि.02.08.2010 रोजीला अतीशय मोघम स्‍वरुपाची माहती गैरअर्जदार यांनी अर्जदारास दिली.जे की त्‍यांचेकडून
 
 
त्‍या पध्‍दतीने अपेक्षीत नव्‍हते. ज्‍या भागाचा उल्‍लेख अर्जदाराने आपल्‍या माहीतीच्‍या अधिकाराखाली अर्जात केलेला आहे त्‍या भागातील कनिष्‍ठ अभिंयता यांनी मिटर काढलेले नाही किंवा मिटर काढल्‍याचा अहवाल या कार्यालयात प्राप्‍त झालेला नाही. अशा आशयाचे उत्‍तर गैरअर्जदार क्र.2 यांनी दिलेले आहे, त्‍या भागातील कनिष्‍ठ अभिंयता यांनी जर मिटर काढले नाही तर हे मिटर काढले कोणी ?  त्‍यांचा अर्जदार यांना मनस्‍ताप झालेला आहे. गैरअर्जदार यांनी दि.16.02.2010 रोजीचे एक व्‍यावसायीक परिपञक सोबत जोडलेले यानुसार एवढे स्‍पष्‍ट होते की, Residential Housing Societies & Commercial Complexes  या संदर्भातच हे परिपञक लागू होते. अर्जदार हे एक घरात राहत होते व त्‍यांचे वरचे मजल्‍यावर त्‍यांचा मूलगा राहत होता. दोघेही जण स्‍वतंञरित्‍या राहत असून दोन्‍ही मिटरचा स्‍वतंञपणे उपभोग घेत होते. गैरअर्जदार आपल्‍या लेखी जवाबात म्‍हणतात असे म्‍हणतात की, मिटर वीभाजनामूळे त्‍यांचा तोटा होतो व कंपनीचा आर्थीक तोटा होऊ नये म्‍हणून दोन मिटर एकाच नांवाचे एकाच जागी देऊ नये. सदरचे दोन्‍ही मिटर हे एकाच नांवाचे जरी असले तरी त्‍यांचा उपभोग घेणारे हे दोन व्‍यक्‍ती होते व सदरील मिटर हे घरात असून ते गैरअर्जदार यांचे परिपञकाच्‍या नियमाप्रमाणे सोसायटीचे नियमा अंतर्गत येत नाही. गैरअर्जदार जसे स्‍वतःचा तोटा होऊ नये म्‍हणून प्रयत्‍नशील आहेत तसेच अर्जदार देखील स्‍लॅब वाढवून त्‍यांचा तोटा होऊ नये या प्रयत्‍नात आहेत. अज्रदाराचे मिटर काढण्‍यापूर्वी गैरअर्जदार यांनी त्‍यांचे व्‍यावसायीक परिपञक हे घरासाठी योग्‍य आहेत काय व ते तसे जर नियमाप्रमाणे असेल तर अशा प्रकारच्‍या सर्व ग्राहकाना परिपञकासहीत नोटीस दिली आहे की किंवा सदरील नियमाची माहीती दिली आहे काय ?  हे तपासणे महत्‍वाचे होते. परिपञकाचे अवलोकन केले असता हे स्‍पष्‍ट दिसते की, सदरील परिपञक हे Residential Housing Society  व Commercial Complex  साठीच आहेत. म्‍हणून अर्जदाराचे त्‍यांच नंबरचे मिटर 55001105670 हे निकालाची प्रत मिळाल्‍यापासून एक आठवडयाचे आंत पूर्ववत अर्जदाराचे घरी नेऊन बसवावे व त्‍यानुसार एमइआरसी च्‍या नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच अर्जदारास झालेल्‍या मानसिक ञासाबददल रु.1,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.1,000/- तसेच अर्जदाराने माहीतीच्‍या अधिकाराखाली केलेल्‍या अर्जाचे योग्‍य उत्‍तर योग्‍य वेळेत न दिल्‍यामुळे गैरअर्जदार यांनी अर्जदारास रु.1000/- मानसिक ञासापोटी निकाल कळाल्‍यापासून एक महिन्‍याचे आंत दयावेत, असे न केल्‍यास रु.3,000/- वर 9 टक्‍के व्‍याजाने रक्‍कम पूर्ण मिळेपर्यत व्‍याज दयावे लागेल, या नीर्णयापर्यत हे मंच आलेले आहे.
 
 
 
                   वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
 
 
                                                    आदेश
     1.                    अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्‍यात येतो.
2.                                         हा निकाल कळाल्‍यापासून एक आठवडयाचे आंत गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मिटर नंबर 55001105670 हे त्‍यांचे घरी बसवून दयावे.
3.                                         गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना मानसिक ञासाबददल रु.1,000/- व दावा खर्च म्‍हणून रु,1,000/- व माहीतीच्‍या अर्जाचे उत्‍तर योग्‍य वेळेत व योग्‍य पध्‍दतीने न दिल्‍याबददल रु.1000/-  एक महिन्‍याचे आंत दयावेत, असे न केल्‍यास संपूर्ण रक्‍कम रु.3,000/-वर 9 टक्‍के व्‍याज पूर्ण रक्‍कम मिळेपर्यत दयावे लागेल.
4.                                         पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
श्री.बी.टी.नरवाडे पाटील                         श्रीमती सुवर्णा देशमूख          
          अध्‍यक्ष                                                  सदस्‍या
 
 
 
 
 
जयंत पारवेकर
लघुलेखक   
 

[HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT