जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र. 2009/121 प्रकरण दाखल दिनांक – 18/05/2009. प्रकरण निकाल दिनांक –03/09/2009. समक्ष - मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. रजीया बेगम भ्र. युसुफअली खॉन वय, 55 वर्षे, धंदा घरकाम रा. दरवेश नगर, नांदेड. अर्जदार विरुध्द 1. कनिष्ठ अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, यु.एस.डी.2, शिवाजी नगर, नांदेड. गैरअर्जदार 2. उप कार्यकारी अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, यु.एस.डी.2, विसावा नगर, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड. इरफान अली खॉन गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.विवेक नांदेडकर निकालपत्र (द्वारा,मा.श्री. सतीश सामते, सदस्य) गैरअर्जदार यांनी सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदार यांनी ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी ग्राहक क्र.550010510481 द्वारे विज पूरवठा त्यांचे स्थीत घरात घेतलेला आहे. अर्जदार हे विजेचा वापर काटकसरीने करतात. त्यांना दर महिन्यात जास्तीत जास्त 35 यूनिट ते 55 यूनिट विज वापराचे बिल येते. दि.16.09.2007 रोजी गैरअर्जदार यांनी त्यांचे योजनेप्रमाणे जूने मिटर बदलून नवीन मिटर बसवले. मिटर बदलीच्या अहवालानुसारन हेडसिल चांगल्या स्थितीत होते. दि.3.9.2007 रोजी फॉल्टी म्हणून बिल दिलेले आहे. तसेच दि.26.2.2008 रोजी रु.41,590/- चे बिल देण्यात आले. दि.1.8.2008, दि.30.8.2008, दि.29.9.2008 व दि.27.10.2008 या वेळेस चूकीची बिले दिली होती. परंतु अर्जदाराने तक्रार केल्यानंतर त्यांनी दोषयूक्त बिले दूरुस्त करुन दिले. आता त्यावीषयीची त्यांची तक्रार नाही. गैरअर्जदारांनी सूरक्षा ठेव रक्कमेची मागणी केली व विज देयकासाठी अर्जदाराने जी रक्कम भरली होती ती नंतरच्या 2 ते 3 बिलामध्ये त्यांनी सूरक्षा ठेव रक्कम जमा करुन घेतली. जे की, बेकायदेशीर आहे. दि..3.3.2009 रोजीच्या रु.2640/- च्या बिलातील तक्रारीनंतर रु.280/- भरल्यानंतर पूढच्या महिन्यात बिल दूरुस्त करण्यात येईल असे सांगितले आहे. प्रत्येक वेळी अर्जदार जाऊन तक्रार करुन व बिल दूरुस्त करुन घेऊन बिल भरीत आहेत. अर्जदाराला या प्रकरणात झालेल्या खर्चाबददल रु.7,000/- व नूकसान भरपाई बददल रु.,55,000/- मागितले आहेत. गैरअर्जदार हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराने ज्या तथाकथीत विज देयकासाठी ही तक्रार दाखल केली आहे त्या सर्व देयकाची दूरुस्ती यापूर्वी करुन देण्यात आलेली आहे. अर्जदार हा किती विज वापर करतो व त्यांची विज वापर कमी आहे या बाबत यथायोग्य कागदोपञी पूरावा त्यांनी दाखल केलेला नाही. त्यामूळे ही बाब गैरअर्जदार यांना अमान्य आहे. दि.16.9.2007 रोजी जूने मिटर बदलून नवीन मिटर लावले या बददल वाद नाही परंतु मिटर बदली अहवालामध्ये कंपनी हेउ सिल चांगले होते हे म्हणणे खोटे आहे. विज देयक प्राप्त परिस्थितीनुसार योग्य प्रकारे दिलेले आहे व त्यात वेळोवेळी सूधारणीही केलेली आहे. दि.26.2.2008 रोजीचे रु.41,590/- चे देयक दूरुस्ती करुन देण्यात आलेले आहे. त्यात अर्जदाराचे मिटर बदलल्यावर त्यातून शेवटची रिंडीग त्यात महिन्यात वापरण्यात आलेले 173 यूनिटचे बिल यांची बेरीज करतेवेळेस एकूण यूनिटचे बिल देण्यात आले परंतु एप्रिल 2008 मध्ये चूक लक्षात आल्यावर अर्जदाराच्या अर्जाची प्रतिक्षा न करता गैरअर्जदाराने ते बिल दूरुस्त करुन दिले. अर्जदाराने दि.8.5.2008 रोजी रु.330/- भरल्यानंतर आतापर्यत कोणतेही विजेचे बिल भरले नाही. दि.30.8.2008 रोजी रु.3,000/- चे बिल त्यामागे थकबाकी रु.650/- दर्शविण्यात आली होती ती बरोबर आहे. दि.27.10.2008 रोजीच्या बिलात अतिरिक्त सूरक्षा ठेव रु.2150/- चा भरणा केल्याचा वेगळा शेरा मारलेला आहे. दि..3.3.2009 रोजीचे विज देयक रु.2640/- चे देण्यात आले. तक्रारनंतर रु.280/- भरल्याचेनंतर बिल दूरुस्त करुन देऊ असे आश्वासन दिलेले नाही. जी रक्कम अर्जदाराने भरली ती पार्ट रक्कम म्हणून भरली आहे व अर्जदाराच्या विनंतीवरुन पार्ट पेमेंट भरल्याची मूभा त्यांना देण्यात आली. अर्जदाराने त्यांचा विज पूरवठा खंडीत केला असे कूठेही म्हटलेले नाही. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार दि.3.3.2009 रोजी देयक का भरले नाही म्हणून विज पूरवठा खंडीत करण्याची धमकी दिली व बिल भरल्याचे दर्शविल्यानंतर तिकडे लक्ष न देता पोलवर चढून विज पूरवठा खंडीत करण्याऐवजी बाजूच्या घराचा चुकीने विज पूरवठा खंडीत केला हा अर्जदाराचा अपमान आहे हे म्हणणे चूकीचे आहे.दि..3.3.2009 रोजीच्या रु.2760/- च्या देयकात रु.1819/- च्या थकबाकीचा उल्लेख आहे. त्यामूळे शेवटचे बिल कधी भरले होते व हे किती महिन्याचे बिल आहे म्हणजे थकबाकीचा उलगडा होईल. तसेच दि.30.4.2009 रोजीच्या विज देयक रु.2180/- यात रु.240/- व्याज लावलेले आहे व सूरक्षा ठेव रु.2255/- जमा दर्शविण्यात आले आहे. विज नियामक आयोगाप्रमाणे सूरक्षा ठेवीची रक्कम मागण्याचा गैरअर्जदार यांना अधिकार होता व त्यामूळे ती रक्कम घेण्यात आली. त्यामूळे दिलेले बिल हे योग्य आहे. मे,2009 च्या शेवटीस अर्जदाराकडे रु.2452/- ची थकबाकी आहे जी की अर्जदाराने आजही भरली नाही. ज्या व्यक्तीची थकबाकीची रककम जवळपास रु.2500/- आहे त्या व्यक्तीला बिलापोटी रु.55,000/- नूकसान भरपाई व दावा खर्च रु.,7,000/- मागणी करणे हे हास्यास्पद आहे. म्हणून सदर अर्जदाराची तक्रार खोटी असून ती खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व दोघानीही केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र.1 ः- अर्जदार यांनी आपल्या मागणी दाव्यात दि.30.3.2009 रोजी व दि.30.4.2009 रोजीचे देयक रदद करण्या बददल मागणी केली आहे. त्यामूळे त्यांनी त्यांचे तक्रारीत दि..6.4.2007 रोजी पासून दि..3.3.2009 पर्यतचे विज देयके व मागे काय झाले हे बघण्याची गरज नाही. तरी देखील तक्रारदाराच्याच म्हणण्याप्रमाणे दि.26.2.2008 रोजी रु.41,590/- चे बिलाची दूरुस्ती गैरअर्जदाराने करुन दिलेली आहे व त्यांनी त्यांचे लेखी म्हणण्यात चूक झाली व ती लक्षात आल्या बरोबर देयक दूरुस्त करुन दिले व त्या बददल आता तक्रार नाही असे म्हटले आहे. विज मिटर बदलले किंवा जूना मिटरचे सिल चांगले होते व तूटलेले होते या बददलची तक्रार अर्जदाराची नाही. त्यामूळे आता हे मागील तक्रारी व दूरुस्त्याचा परत परत कशासाठी उल्लेख करतात ? अर्जदाराची प्रमूख तक्रार गैरअर्जदार हे सारखे सारखे सूरक्षा ठेव मागत आहेत व एकदा सूरक्षा ठेव भरल्याचे नंतर परत परत येणा-या महिन्यामध्ये त्यांनी सूरक्षा ठेव मागितली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार ते सूरक्षा ठेव भरणार नाही व फक्त विज बिल भरणार आहे व त्यांनी जे विज बिल भरले आहे ते सूरक्षा ठेवीत अडजेस्ट केले अशी त्यांची तक्रार आहे. गैरअर्जदार यांचे म्हणण्याप्रमाणे विज नियामक मंडळाच्या निर्देशाप्रमाणे ते सूरक्षा ठेवीची रक्कम मागतात व ही रक्कम डिपॉझीट म्हणून घेण्यात आलेली आहे तेव्हा ज्या दिवशी अर्जदार विज पूरवठा वापस करतील त्यावेळेस ही डिपॉझीटची रक्कम त्यांना पूर्णत वापस मिळेल. यामूळे त्यांचे कोणतेही नूकसान होणार नाही. सूरक्षा ठेवीची रक्कम मागण्यासाठी गैरअर्जदार यांनी किती सूरक्षा ठेव रक्कमेची मागणी करावयाची आहे यासाठी वेगळी डिमांड नोटीस देणे आवश्यक आहे. असे जरी असले तरी अर्जदाराने आपल्या तक्रारीत गैरअर्जदार हे वेळोवेळी सूरक्षा ठेव मागत होते असे म्हटल्यामूळे त्यांना डिमांड नोटीस दिलेली आहे. असे गृहीत धरण्यास हरकत नाही. अर्जदाराचे म्हणणे त्यांनी रु.2250/- ची सूरक्षा ठेव मागितली होती व अर्जदार हे कमीत कमी रक्कम भरीत गेले त्यामूळे त्यांनी भरलेल्या विज देयकातून सूरक्षा ठेव त्यांना अडजेस्ट करावी लागली. दि.30.3.2009 रोजी मागील रिंडीग 840 व चालू रिंडीग 864 विज वापरलेले यूनिट 24 यूनिट असे एकूण यूनिटचे बिल दिलेले आहे. यात मागील थकबाकीवरील व्याज रु.820/- असे दाखवलेले आहे व एकूण थकबाकी रु.1837/- अशी दर्शवलेली आहे असे एकूण रु.2760/- चे बिज बिल आहे व सूरक्षा ठेव ही रु.1975/- जमा आहे असे म्हटले आहे. मागील पावतीचा दि.8.5.2008 असा आहे. यांचा अर्थ दि.8.5.2008 रोजीच्यानंतर अर्जदाराने कोणतेही बिल भरलेले नाही म्हणजे ते डिफाल्टर आहे. . त्यामूळे दि.30.4.2009 रोजीचे विज देयक पाहिले असता यात मागील रिंडीग 864 व चालू रिडींग 933 एकूण विजेचा वापर 69 यूनिट व 69 यूनिटची बिल रु.240/- चे देण्यात आलेले आहे व मागील थकबाकी रु.1779.35 पैसे असे दाखवलेले आहे. रु.2255/- वजा रु.1975/- तेवढी रक्कमेचे बिल सूरक्षा ठेव रक्कम अडजेस्ट केलेले आहे व ही रक्कम अर्जदारास वापस मिळणारी आहे. अर्जदार यांनी दि.8.5.2008 पासून विज बिल भरले नाही. म्हणून यात थकबाकीची रक्कम जी दर्शवली आहे ती बरोबर आहे. नऊ नऊ महिने म्हणजे एक वर्षापासून विज बिल न भरता विज वापरत आहेत. स्वतः डिफॉल्टर असल्यानंतर परत कंपनीचीच तक्रार करणे हे अर्जदाराकडून अपेक्षीत नाही. जेव्हा तूम्ही विज वापर करतात तेव्हा बिलाची रक्कम भरणे ही तूमची नैतीक जबाबदारी आहे. दि.30.3.2009 रोजी व दि.30.4.2009 या दोन्ही विज देयकात आम्हाला गैरअर्जदार यांची कोणतीही चूक आढळली नाही व विज देयकावरुन असे लक्षात आले की मागील देयकात सूरक्षा ठेवीची रक्कम कमी असल्यामूळै ती पूढील देयकात वाढलेली आहे. म्हणजे अर्जदाराने भरलेली रक्कम ही त्यांचे खात्यात जमा आहे. ती इतरञ कूठेही दाखवलेली नाही. केवळ थकबाकी मूळे विज बिल जास्तीचे वाटत आहे. अर्जदाराच्या मागणीप्रमाणे दोन्ही बिले बरोबर आहेत व अर्जदार हे स्वतः डिफाल्टर आहे. मागचे दिनांकाचे तक्रारीचे अर्ज त्यांनी दाखल केलेले आहे. यावीषयी त्यांची मागणी नाही. त्यामूळे ते बघण्याची आवश्यकता नाही. वरील सर्व बाबीवरुन आम्हास गैरअर्जदाराच्या सेवेत ञूटी दिसत नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारांनी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर लघूलेखक |