जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/60. प्रकरण दाखल तारीख - 18/03/2009 प्रकरण निकाल तारीख - 27/08/2009 समक्ष – मा. श्री.बी.टी.नरवाडे,पाटील अध्यक्ष. मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या. मा.श्री.सतीश सामते, सदस्य. शंकरराव पि. दिगांबरराव देशमुख वय 48 वर्षे धंदा, शेती, अर्जदार. रा. येवली किनवट ता.हदगांव जि. नांदेड. विरुध्द. 1. कनिष्ठ कार्यकारी अभिंयता महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, शाखा आष्टी युनिट ता. हदगांव जि.नांदेड. गैरअर्जदार 2. वरिष्ठ कार्यकारी अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, शाखा कार्यालय, हदगांव जि. नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. ए.व्ही.चौधरी गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे,पाटील, अध्यक्ष ) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी यांच्या सेवेच्या ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तकार दाखल केली आहे. अर्जदार यांचे नांवे गट नंबर 12 मध्ये येवली ता. हदगांव येथील शेती होती. अर्जदार हे शेतकरी असून त्यांनी आपल्या शेतात सन 2007-08 या सालाकरिता 2 हेक्टर 40 आर मधील 60 आर जमिनीमध्ये ऊस लागवड केली होती. ऊस मोठा होऊन कापणीसाठी आल्यानंतर अचानक अर्जदार यांचे शेतात दि.11.02.2008 रोजी शेतातील विज खांबातील तारांचे एकमेकास घर्षन होऊन थिणग्या पडल्या व या थीणग्या ऊसावर पडल्यामूळे संपूर्ण ऊस जळून खाक झाला. त्यामूळे अर्जदाराचे रु.60,000/- चे व शेतातील 12 पी.यु. सी. पाईप व कडबा अंदाजे 300 पेंडीचे मिळून रु.35,000/- चे नूकसान झाले. या बाबत गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे दि.11.02.2008 रोजी व दि.11.02.2008 रोजी तहसिल कार्यालयास सूचना दिली. तहसिल कार्यालयाने पंचनामा केला. गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे दि.18.02.2008 रोजी सदर घटनेबाबत तक्रार दिली. परंतु यांची तक्रार अर्जदार यांनी पोलिस स्टेशन तामसा येथे दि.20.02.2008 रोजी दिली त्यानुसार त्यांनी एफ.आय.आर. फाडून गून्हा नंबर 04/2008 नोंदविला. दि.21.02.2008 रोजीला पंचनामा केला. अर्जदाराचे झालेले नूकसान रु.95,000/- व्याजासह दयावेत व मानसिक ञासापोटी रु.50,000/- व दावा खर्च म्हणून रु.5,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अर्जदाराचे कोणतेही नूकसान झालेले नसून केवळ रक्कम उकळण्याचे उददेशाने हे प्रकरणत दाखल करण्यात आले आहे. तेव्हा ते खारीज करावे असे म्हटले आहे. अर्जदार यांनी सन 2007-08 करिता त्यांचे शेत गट नंबर 12 मध्ये 70 आर ऊस जमिनीमध्ये लावला होता हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. अर्जदाराने दाखल केलेली 7/12 या उता-याशी विपर्यस्त आहे. दि.11.02.2008 रोजी अथवा कोणतेही दिवशी अर्जदार यांचे विज खांबावरुन तारांचे घर्षने झालेले नाही व ऊसही जळालेला नाही. त्यामूळे अर्जदाराचे शेतातील ऊसाचे व 12 पी.व्ही.सी.पाईप व कडबा 300 पेंडीचे मिळून एकूण रु.95,000/- चे नूकसान झाले हा प्रश्नच येत नाही. गैरअर्जदार यांना या घटनेची सूचना मिळाली नाही किंवा पंचनामा त्यांचे समोर झालेला नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांचे नीष्काळजीपणा दिसून येतो हे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. आगीची घटना दि.11.02.2008 रोजी झालेली असताना त्यांची सूचना पोलिस स्टेशन येथे दि.20.02.2008 रोजी देण्यात आली. अर्जदार स्वतःचे नूकसान झाल्याचे म्हणतात पण ऊस हे पिक असे आहे की ते पूर्णतः जळत नाही. साखर कारखाना जळीत ऊस सूध्दा खरेदी करतात व त्यांचा मोबदला सूध्दा देतात. अर्जदाराची तक्रार खोटी असून मूददामहून दाखल केलेली आहे. सबब खर्चासह खारीज करावी असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात दि.11.02.2008 रोजी आग लागली असे म्हटले आहे व गैरअर्जदार यांना दि.18.02.2008 रोजी कळाले. इतकेच नव्हे तर पोलिस स्टेशन तामसा येथे दि.20.02.2008 रोजी एफ. आय.आर. नोंदविला गेला म्हणजे विलंबाने गून्हा नोंदविण्यात आला. दि.20.02.2008 रोजीचा घटनास्थळ पंचनामा यात अर्जदार यांचे शेतातील गट नंबर 12 मध्ये असलेल्या विज ताराचे एकमेकास घर्षन होऊन थीणगी पडून ऊस जळाल्याची नोंद आहे. सदर शेत हे शंकरराव यांचे असून यामधील 60 आर मधील ऊस जळाला. केवळाबाई यांचे शेतातील 12 पी.व्ही.सी.पाईप व कडबा यांचे अंदाजे रु.3500/- चे नूकसान झालेले आहे. यात कोणत्याही दूशमनीने आग लावलेली नाही. अर्जदाराने आपल्या तक्रार अर्जात फक्त ऊस जळाल्याचा उल्लेख केलेला आहे तसेच शेतातील 12 पी.व्ही.सी. पाईप व कडबा 300 पेंडी असे एकूण रु.35,000/-चे नूकसान झाल्याचे म्हटले आहे. दि.11.02.2008 रोजी तहसिलदार यांचे नांवे सूचना व अर्ज केवळाबाई यांनी सादर केला आहे. दि.16.02.2008 रोजी पंचनामा केला व एफ.आय.आर.मध्ये शेत गट नंबर 12 मध्ये शॉटसर्किटने आग लागली व रु.60,000/- चा ऊस जळाला असे म्हटले आहे. यात पी.व्ही.सी. पाईपचा व कडब्याचा उल्लेख आहे. आग कशामूळे लागली यांचे नेमके कारण शोधण्यासाठी विद्यूत तज्ञाच्या रिपोर्टची मदत झाली असती परंतु या प्रकरणात तसे झाले नाही. शेतक-याने जे फोटो दाखल केलेले आहेत यावरुन ऊस अर्धवट जळाला पूर्ण जळालेला दिसत नाही.एक फोटो हा सर्व फोटो पेक्षा वेगळा आहे तसेच हे फोटो अर्जदार यांचे शेताचेच आहेत याविषयी देखील सबळ असा पूरावा त्यांनी दाखल केलेला नाही. यानंतर अर्जदार यांनी त्यांचे नांवे शेती असल्याबददल जो 7/12 दाखल केलेला आहे. त्यात ऊसाची लागवड ही 40 आर मध्ये केल्याचे दिसते व तक्रारीमध्ये 70 आर जमिनीमध्ये ऊसाची लागवड केल्याचे लिहीलेले आहे. तलाठी यांचे पंचनाम्यात 90 आर ऊस लागवड उल्लेख आहे तसेच सर्व अर्ज केवळाबाई यांचेच आहेत व गैरअर्जदार यांनी यावर आक्षेप घेतलेला आहे. अर्जदाराने त्यांचे शेतात ऊस लावलाच नाही. यावरुन अर्जदाराच्या शेतातील ऊसास आग लागून नूकसान झाले हे सिध्द होत नाही. घटना दि.11.02.2008 रोजी घडल्यानंतर अर्जदार यांनी उशिराने म्हणजे दि.20.02.2008 रोजी पोलिस स्टेशन तामसा येथे तक्रार केली आहे हे सर्व संशयास्पद वाटते. त्यामूळे अर्जदार हे स्वतःची तक्रार योग्य पूराव्यानीशी घेऊन आलेले नाहीत. वरील सर्व बाबीचा विचार करता आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येतो. 2. पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा. 3. पक्षकारांना आदेश कळविण्यात यावा. (श्री.बी.टी.नरवाडे,पाटील) (श्रीमती सुजाता पाटणकर) (श्री.सतीश सामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य जे.यू.पारवेकर, लघूलेखक. |