(मंचाचे निर्णयान्वये, श्री अनिल एन.कांबळे,अध्यक्ष (प्रभारी))
(पारीत दिनांक : 22 जुन 2010)
1. अर्जदार हीने सदरची तक्रार गैरअर्जदार यांनी पुरवीलेला वीज पुरवठा खंडीत केल्याने नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळण्याकरीता, ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अन्वये दाखल केलेली आहे. अर्जदार हीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात येणेप्रमाणे.
... 2 ... ग्रा.त.क्र.14/2010.
2. अर्जदार ही मौजा सिरोंचा येथील रहीवासी असून, शेतीचे उत्पनावर स्वतःचे कुंटूबाबाचे गुजराण करीत असून, त्या व्यतीरीक्त इतर कोणताही व्यवसाय नाही. अर्जदार हीचे मालकीचे मौजा नारायणपूर, तह. सिरोचा येथे सर्व्हे नं.27/2 आराजी 2.02 हे.आर. भो. वर्ग-2 शेती असून, त्यामध्ये धान पिकाची डबल फसल घेत आहेत. अर्जदार हीने, शेताचे सिंचन व्हावे म्हणून गैरअर्जदार क्र. 3 कडून तीन वर्षापासून विद्युत पुरवठा घेऊन, सबमर्सीबल पंप लावलेला आहे. अर्जदार ही तीन वर्षापासून उच्चप्रतीचे धान सोनम, जयश्रीराम पेरणी करुन उत्पन्न घेतात.
3. अर्जदार हीने, गैरअर्जदार क्र. 1 ते 3 कडून घेतलेल्या विज पुरवठयामुळे सब मर्सीबल पंपामुळे सिंचनाची सोय होत असल्याने, सन 2009-10 या पिक हंगामाचे वेळी जयश्रीराम या जातीच्या धानाची पेरणी केली. गैरअर्जदार यांनी, अर्जदाराचे शेतातील वीज पुरवठा सप्टेंबर महीन्याचे 5 तारखेपासून बंद केला. अर्जदाराचा मुलगा ओकांर याने गैरअर्जदार क्र. 1 ला भेटून दि. 11/9/09 रोजी तक्रार नोंदवीली. गैरअर्जदार यांनी श्री पुलुरी या कर्मचा-यास तक्रारीचे निराकरण करण्यास कळवीले, परंतु, कोणतही दखल घेतली नाही. अर्जदारातर्फे अनेकदा भेटूनही गैरअर्जदार क्र. 1 ने दखल घेतली नाही. अर्जदाराचे शेतातील धान पीक पाण्याअभावी करपून गेले.
4. अर्जदार हीने दि. 24/9/09 रोजी श्री के. एस. आखाडे यांचे मार्फत
गैरअर्जदारास नोटीस पाठवून 1 लाख रुपयाची मागणी केली. गैरअर्जदारास नोटीस प्राप्त होऊन खोटे व बनावटी उत्तर दिले. अर्जदार ही 3 वर्षापासून शेतात प्रती हेक्टरी 30 क्विंटल जयश्रीराम धानाचे उत्पन्न घेत होते. 2 हेक्टर मध्ये 60 क्विंटल धानाचे उत्पन्न होते. मागील वर्षाचा भाव रुपये 1800/- प्रती क्विंटल लक्षात घेता रुपये 1,08,000/- इतके होते. परंतु, गैरअर्जदाराने वीज पुरवठा खंडीत केल्याने 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळण्यास अर्जदार पाञ आहे. नुकसान ही गैरअर्जदाराचे चुकीने व बेपरवाईने झालेली आहे. अर्जदार हीला, गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांचे कडून 1 लाख रुपये नुकसान भरपाई मंजुर करण्याची मागणी केली आहे.
5. अर्जदार हीने, तक्रारी सोबत निशाणी 3 नुसार एकुण 4 दस्ताऐवज दाखल केले आहे, त्यामध्ये 7/12 चा उतारा, कनिष्ठ अभियंत्याना दिलेला अर्ज, गैरअर्जदाराला दिलेल्या नोटीसाची प्रत, पोस्टल पावती इत्यादी दाखल केलेल्या आहेत. तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारांना नोटीस पाठविण्यात आले. गैरअर्जदार हजर होऊन निशाणी 10 नुसार लेखी बयाण दाखल केला.
6. अर्जदार हीचे नांव 7/12 वर जरी असले तरी तीचा कास्तकारी हा व्यवसाय नाही. या व्यवसायावर तिचे व कुटूबांचे गुजराण होते हे सुध्दा खोटे आहे. अर्जदार ही मौजा नारायणपूर, तह. सिरोंचा येथील सर्व्हे नं. 27/2, आराजी 2.02 हे.आर. या शेत जमीनीची मालकीन आहे ही सुध्दा बाब माहिती व पुराव्याअभवी अमान्य केली. शेताचा 7/12 दाखल करुन मालकी हक्क प्रस्तापीत होऊ शकत नाही व
... 3 ... ग्रा.त.क्र.14/2010.
7/12 चा उतारा हा काही मालकी हक्काचा पुरावा होऊ शकत नाही. गैरअर्जदार यांनी, लेखी बयाणात अर्जदाराचा मालकी हक्क नाकबूल केला असून, शेती धान पिकाची आहे हे नाकबूल करुन, डबल पिक घेते व घेत होती हे सुध्दा पुराव्या अभावी नाकबूल केले आहे.
7. गैरअर्जदाराने लेखी बयाणात पुढे असे नमूद केले की, सदर शेतात सिचंनाच्या सोयी करीता वीज कनेक्शन देण्यात आले हे खरे आहे. परंतू, डबल पिकाकरीता पाण्याची मुबलकता होती हे अमान्य करुन, सदर सर्व्हे नंबरमध्ये जी विहीर खोदली आहे ती पूर्णपणे कोरडी होती. सब मर्सीबल पंपामुळे सिचंनाची सोय होत असल्यामुळे सन 2009-10 मध्ये धान पिक हंगामाचे वेळी सदर शेतात जयश्रीराम या जातीचे धान पिकाची पेरणी केली व सप्टेंबर महिन्याचे 5 तारखे पासून गैरअर्जदारानी अर्जदाराचे शेतातील वीज पुरवठा बंद केला, ही बाब खोटी आहे. ज्या ट्रान्सफार्मरवरुन अर्जदाराचे वीज कनेक्शन आहे, त्याच ट्रान्सफार्मरवरुन आजूबाजूचे इतरही कास्तकारांचे शेतातील कृषीपंपाचे कनेक्शन होते, त्यांची त्या काळात वीज कनेक्शन खंडीत असल्याची तोंडी किंवा लेखी तक्रार नव्हती.
8. अर्जदाराने दि. 24/9/09 वकीलामार्फत जो नोटीस दिला त्यातही गैरअर्जदारानी आपला वीज खंडीत केल्याचा उल्लेख नाही, उलट पक्षी त्यात असे नमूद केले आहे की, ‘’माझे पक्षकाराचे शेतातील सबमर्सीबल पंप सुरु होत नाही. त्यामुळे माझे पक्षकाराचे शेतातील धान पिकास सिंचन होऊ शकत नाही.’’ या मजकूरावरुन गैरअर्जदारानी वीज पुरवठा खंडीत केल्याची बाब दिसून येत नाही. कोणीतरी आजूबाजूच्या कास्तकारांनी वाईट हेतूने पंपात बिघाड केल्याचे घटनेला, गैरअर्जदारांना दोषी धरुन नुकसान भरपाई मागणे योग्य नाही.
9. अर्जदाराचे मुलाने जी तक्रार दि. 10/9/09 ला केली त्यात नमूद टिप मधील मजकूरावरुन अर्जदार गावातीलच लोकांवार संशय घेऊन त्याचा हात असल्याचे म्हणत आहे. गैरअर्जदार क्र. 1 यांनी त्वरीत घटना स्थळावार जावून मौका चौकशी केली, आजूबाजूचे लोकांची बयाने घेतली, मौका पंचानामा केला, त्यावर पंचाच्या सह्या घेतल्या. आजूबाजूच्या लोकांनी आपले बयानात, वीज पुरवठा सुरळीत चालू असल्याचे सांगून, पिके हिरवेगार असल्याचे सांगीतले. गैरअर्जदाराचे वरीष्ठ तञज्ञ श्री व्ही.एम.पुल्लोरी यांनी तक्रार मिळताच दि. 10/9/09 ला मोक्यावर जाऊन पाहीले असता, वीज पुरवठा चालू असल्याचे आपले बयाणात म्हटले आहे. पिक हिरवेगार असल्याचे व सबमर्सीबल पंप चालू असल्याचे फोटो घेण्यात आले. सर्व चौकशी अंती अर्जदाराची तक्रार खोटी असल्याचे सिध्द झाले. अर्जदाराने तक्रारीसोबत जाणूनबजून गैरअर्जदाराने पाठविलेल्या नोटीसाची प्रत दाखल केली नाही.
10. गैरअर्जदाराने लेखी बयाणात पुढे असेही म्हटले आहे की, अर्जदाराचा केस खोटी असून, नुकसान भरपाई मागण्याकरीता वीज पुरवठा खंडीत केल्याची बाब सिध्द
... 4 ... ग्रा.त.क्र.14/2010.
होत नसल्याने तक्रारीत तथ्य नाही. असा वाद ग्राहक वाद होऊ शकत नाही. अर्जदाराचा वाद दिवाणी स्वरुपाचा असून साक्ष पुराव्याच्या आधारे सिध्द होणे आवश्यक आहे. समरी पध्दतीने अश्या केस मध्ये गैरअर्जदारांना दोषी धरुन नुकसान भरपाईची मागणी मान्य होत नाही. अर्जदाराची तक्रार ही मंचाचे क्षेञात येत नाही. तक्रार ही सकृत दर्शनी खोटी असल्यामुळे खारीज करण्यात यावी.
11. गैरअर्जदाराने लेखी बयाणासोबत निशाणी 11 नुसार पाच झेराक्स दस्ताऐवज दाखल केले आहे. अर्जदारास संधी देऊनही रिजाईन्डर शपथपञ दाखल केला नाही. गैरअर्जदाराचे वकीलाने निशाणी 14 नुसार लेखी बयाणातील मजकूर शपथपञाचा भाग समजण्यात यावा अशी पुरशीस दाखल केली. गैरअर्जदार यांनी युक्तीवादाचे वेळी निशाणी 16 नुसार 6 मुळ फोटो दाखल केले आहे. अर्जदारास संधी देऊनही तिच्यावतीने कोणीही हजर झाले व युक्तीवाद केला नाही, त्यामुळे निशाणी 1 वर तक्रार गुणदोषावर (Merits) निकाली काढयाकरीता ठेवण्यात यावे, असा ओदश पारीत करण्यात आला.
12. अर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज आणि गैरअर्जदाराने दाखल केलेले दस्ताऐवज आणि गैरअर्जदार यांचे वकीलाने केलेल्या युक्तीवादावरुन खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे : उत्तर
(1) गैरअर्जदाराने विद्युत पुरवठा खंडत करुन सेवा देण्यात : नाही.
ञृटी केली आहे काय ?
(2) अर्जदार पिकाची नुकसान भरपाई रु.1,00,000/- : नाही.
मिळण्यास पाञ आहे काय ?
(3) या तक्रारीचा अंतिम निकाल काय : अंतिम आदेशाप्रमाणे.
मुद्दा क्रमांक 1 व 2 :-
13. अर्जदाराची, मौजा नारायणपूर, तह. सिरोंचा येथे भूमापन क्र. 27/2, आराजी 2.02 हे.आर. शेत जमीन असून त्याबाबत सात-बाराचा उतारा अ-1 वर दाखल केलेला आहे. गैरअर्जदार यांनी अर्जदार हिच्या नावाने सदर शेतात सिचंना करीता वीज पुरवठा केला ही बाब मान्य आहे. अर्जदार हीच्या शेतात सन 2009-10 मध्ये जयश्रीराम धानाचे पिक होते व त्या धानाला गैरअर्जदाराने वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे पाणी पुरवठयाचा तुठवडा होऊन धान करपल्यामुळे, 1 लाख रुपयाची नुकसान भरपाईची गैरअर्जदाराकूडन मागणी केली आहे. परंतु, अर्जदार हीने आम मुखत्यारामार्फत तक्रार दाखल केल्यानंतर सतत गैरहजर राहीली. तसेच, अर्जदारातर्फे वकीलही हजर झाले नाही आणि अर्जदाराने दाखल केलेल्या लेखी बयाणातील कथनावर रिजाईन्डर शपथपञ दाखल
... 5 ... ग्रा.त.क्र.14/2010.
केला नाही. उलट, गैरअर्जदार यांनी आपले लेखी बयाणात अर्जदाराचा वीज पुरवठा खंडीत केला नाही, असे स्पष्टपणे नमूद केले आहे. परंतु, अर्जदार हीने ही बाब रिजाईन्डर शपथपञाव्दारे नाकारलेले नाही. त्यामुळे गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राहय धरण्यास पाञ आहे.
14. अर्जदार हिच्या शेतातील वीज पुरवठा खंडीत केल्याबाबत वेळोवेळी दिलेल्या लेखी तक्रारीचा पुरावा दाखल केला नाही. अर्जदार हीच्या वतीने तिचा मुलगा ओकांर याने दि. 10/9/09 रोजी लेखी तक्रार गैरअर्जदार क्र. 1 यास दिली. त्यात विद्युत पुरवठा सुरु करुन देण्याची मागणी केलेली आहे. सदर अर्जात टिप मध्ये गावातीलच व्यक्तीवर वीज पुरवठा खंडीत करण्यामागे हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. गैरअर्जदार यांनी लेखी बयाणात असा मुद्दा उपस्थित केला की, अर्जदारातर्फे 24/9/09 ला अॅड.के.एस.आखाडे मार्फत पाठविलेल्या नोटीसामध्ये असे नमूद केले आहे की, ‘माझे पक्षाकाराचे शेतातील सबमर्सीबल पंप सुरु होत नाही, त्यामुळे माझे पक्षकाराचे शेतातील धान पिकास सिंचन होऊ शकत नाही.’ यावरुन, सबमर्सीबल पंप बंद होणे, हा वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे बंद झाला असे म्हणता येत नाही. गैरअर्जदार यांनी लेखी बयाणासोबत अर्जदाराच्या आजूबाजूचे कास्तकाराच्या बयानाच्या प्रती, मौका चौकशी पंचनामा दाखल केला. त्यात अर्जदाराकडील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला नव्हता, असे स्पष्टपणे दिसून येते. अर्जदार हीने तिच्या शेताचे बाजूला श्री व्यंकन्ना रामय्या भिमकारी रा. नारायणपूर, श्री कडकरी क्रिस्टय्या नागय्या रा. नारायणपूर, श्री रापेली शंकरबापू रा. नारायणपूर हे बाजूचे कास्तकार नाहीत असे नाकारले नाहीत. दि. 29/9/09 ला स्थळ पंचनामा पंचा समक्ष करण्यात आला, त्यात शेतातील वीज पुरवठा चालू असून धानाचे पिक हिरवेगार असल्याचे नमूद केले आहे, यावरुन अर्जदारास करण्यात आलेला वीज पुरवठा खंडीत करण्यात आला हे दाखल दस्ताऐवजावरुन सिध्द होत नाही. तसेच, वीज पुरवठा खंडीत केल्यामुळे सिंचनाच्या अभवामुळे धानाचे पिक करपून नुकसान झाले, ही बाब सुध्दा अर्जदार सिध्द करु शकली नाही. एकंदरीत दाखल दस्ताऐवजावरुन गैरअर्जदार यांनी सेवा देण्यात ञृटी केली हे सिध्द होत नाही.
15. अर्जदाराने तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्ताऐवजावरुन धान पिकाचे नुकसान झाल्याचा पुरावा दाखल नाही. फक्त तक्रारीत कथन केल्यावरुन नुकसान भरपाई मंजूर करता येत नाही, या आशयाचे वरीष्ठ न्यायालयाचे न्यायनिवाडे आहेत. अर्जदार हीने शेतातील धानाचे नुकसान झाल्याबद्दल आजूबाजूच्या कास्तकाराचे शपथपञ दाखल केले नाही. उलट, अर्जदार हीने तक्रार दाखल केल्यापासून प्रोसीडींग मध्ये सहभाग घेतला नाही. गैरअर्जदार यांनी आपले लेखी बयाणात नमूद केलेले मुद्यावरुन अर्जदार हीच्या शेताचे कोणतेही नुकसान झाले नाही. गैरअर्जदार यांनी याबाबत, निशाणी 16 च्या यादी नुसार 6 फोटोग्राफ दाखल केल्या, त्या पुरावा कायद्याच्या तरतुदीनुसार ठोस पुरावा म्हणून (Conclusive proof) ग्राह्य धरण्यास पाञ नसले तरी
... 6 ... ग्रा.त.क्र.14/2010.
अर्जदार हीने त्याबाबत आपले काहीही कथन केलेले नसल्यामुळे आणि दाखल केलेले फोटो डिजीटल कॅमेराने दि.29/9/09 ला काढलेले असून, त्याच दिवशी गैरअर्जदाराचे अधिका-याने पंचासमक्ष पंचनामा केल्याचे, दस्ताऐवज ब-5 वर दाखल केले असल्यामुळे, गैरअर्जदाराचे म्हणणे ग्राह्य धरण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे, मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर नकारार्थी देण्यात येत आहे.
मुद्दा क्रमांक 3 :-
16. वरील मुद्दा क्रमांक 1 व 2 चे विवेचनावरुन तक्रार नामंजूर करुन, खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदाराची तक्रार खारीज.
(2) उभय पक्षानी आप-आपला खर्च सहन करावा.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 22/06/2010.