जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/31. प्रकरण दाखल तारीख - 30/01/2010 प्रकरण निकाल तारीख – 30/06/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, पाटील - अध्यक्ष मा.श्रीमती सुवर्णा देशमूख, पिंगळीकर - सदस्या. मा.श्री. सतीश सामते, - सदस्य. सौ. शांताबाई भ्र. द्वारकादास शर्मा वय 38 वर्षे, धंदा व्यापार रा. वजिराबाद, नांदेड अर्जदार विरुध्द. 1. कनिष्ठ अभियंता, शहरी विभाग क्र.2, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, महावीर चौक, नांदेड. गैरअर्जदार 2. कार्यकारी अभिंयता, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित, विद्यूत भवन, अण्णाभाऊ साठे चौक, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड.संजयकुमार शर्मा गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे वकील - अड.विवेक नांदेडकर निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, सदस्य ) गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी मर्यादित यांनी रु.8660/- चूकीचे बिल देऊन सेवेत ञूटी केली म्हणून अर्जदाराने आपली तक्रार दाखल केलेली असून त्यात ते म्हणतात त्यांचे वजिराबाद स्थित एक घर ज्यांचा सिटी सर्व्हे नंबर 16033 व मनपा क्र.2-12-116 असा असून 501 चौ. फूटाचे घर असलेल्या जागेस गैरअर्जदार यांनी ग्राहक क्र.55001078991 द्वारे विज पूरवठा केलेला आहे. यात विजेचा वापर अतीशय कमी असून घरात फक्त दोन छोटे लाईट लावलेले असून घरात इतर सोयी सवलती जसे की, पंखे, कूलर, फ्रिज टी.व्ही. उपलब्धच नाहीत. सदर घरातील एका रुमचा उपयोग गायीचा गोठा म्हणून केला जातो. मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये दि.30.11.2008 ते 1.09.2009 या मध्ये 22 ते 31 यूनिट विजेचा वापर झालेला आहे. दि.14.1.2010 रोजी गैरअर्जदार यांनी विज मिटर बदलण्याची मोहीम सूरु केली त्यात अर्जदार यांचेही मिटर बदलण्यात आले. सदरहू मिटर रिप्लेसमेंट रिपोर्ट वर 1964 यूनिटची नोंद केल्या गेलेली आहे. शेवटी नोव्हेंबर 2009 च्या महिन्यात 29 यूनिट चा वापर आहे. असे असताना व तक्रारदारास त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याची संधी न देताना अवास्तव व भरमसाठ रक्कम रु.8660/- चे बिल दिले गेले व न भरल्यास तूमचा विज पूरवठा खंडीत करु असे हा दम दिला. जे नवीन मिटर बसविलेले आहे त्यावर 15 दिवसात फक्त 4 यूनिट विजेचा वापर नोंदविला गेला आहे. यावरुन अर्जदाराचा विज वापर कमी आहे हे लक्षात येते म्हणून अर्जदाराची मागणी आहे की, विज देयक नंबर 13 दि.9.1.2010 रोजीचे यासाठी आकारण्यात आलेले रु.8660/- चे विज देयक दूरुस्त करुन दयावे, मानसिक ञासाबददल रु.5,000/- व दावा खर्च रु.3000/- मिळावेत म्हणून हा अर्ज दाखल केलेला आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले व त्यांनी एकञितरित्या लेखी जवाब दाखल केला आहे.त्यात अर्जदार शांतीबाई शर्मा यांना अंतरिम आदेश मिळाला असून हा त्यांना अधिकारच नाही. विज जोडणी लक्ष्मणबाबा यांचे नांवाने आहे. अर्जदार यांचेकडून सदर मालमत्ता खरेदी करण्यात आली होती. विज जोडणी हा वैयक्तीकरीत्या करण्यात आलेला करार आहे. त्यामळे अर्जदार यांनी विज वितरण कंपनीशी करार केलेला नाही. ञयस्थ व्यक्तीने तक्रार दाखल करणे यांचा त्यांना हक्क नाही. त्यामूळे अर्जदार हे कंपनीचे ग्राहक होत नाहीत. असा आक्षेप घेतलेला आहे. अर्जदार यांना देण्यात आलेले बिल हे विज कायदा 2003 कलम 126 अन्वये देण्यात आलेले आहे. यांचे यानंतर अपील दाखल केलेले नाही. त्यामूळे ते बिल आज अंतीम झालेले आहे. लक्ष्मणबाबा यांचे नांवाने असलेला विजेचा भरणा न चूकता केला हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. अर्जदार हे विजेचा वापर फार कमी प्रमाणात करतात व फक्त दोन टयूब लाईट लावलेले आहेत हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. लक्ष्मणबाबा यांचे इमारतीला भेट दिल्यानंतर गैरअर्जदार यांना असे आढळून आले की, 4 टयूब, बल्ब व 4 पंखे आहेत व एक टी.व्ही. आहे. मंजूर विज पूरवठा 0.5 कि.वॅ. आहे व प्रत्यक्षात विज वापर हा 1.2 कि.वॅट इतका आहे. त्यामूळे अर्जदार हे विजेचा अधिक वापर करतात हे दिसून येते. दि.14.1.2010 रोजी विज मिटर बदलण्याची मोहीम होती व त्याच दिवशी मिटर बदलले हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. काढून नेलेल्या मिटरचे सिल व्यवस्थित होते हे त्यांचे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार यांनी शेवटी रिंडीग 29 यूनिट ही खोटी होंती हे त्यांचे म्हणणे खोटे असून अर्जदार यांचे म्हणणे न ऐकता रु.8660/- ची मागणी केली व फौजदारी तक्रार दाखल करण्याची धमकी दिली किंवा विज पूरवठा खंडीत करु असा दम दिला हे त्यांचे म्हणणे खोटे व चूकीचे आहे. अर्जदाराने दि.14.01.2009 रोजी झालेल्या स्थळ पाहणी शपथपञाची प्रत तिच्यापासून लपवून ठेवलेली दिसते. त्यांची चूक असताना मानसिक ञास दिला ही बाब पण चूकीची आहे. नवीन मिटरवर 15 दिवसांत 4 यूनिटचा वापर झाला त्यामूळे विजेचा वापरच होत नाही हा तर्क असून तो खरा नाही. अर्जदाराचे मिटरचे बॉडी सिल टॅम्पंर होते. मिटर बॉडीस लावलेले लाल प्लॅस्टिकचे सिल देखील हाताळलेले होते. यानुसार विज कायदा 2003 नुसार 12 महिन्याचे कालावधीचे 126 अन्वये रु.8300/- विज बिल झाले ते दिले आहे. यात कोणतीही सेवेची ञूटी केलेली नाही. त्यामूळे अर्जदाराचा तक्रार अर्ज खर्चासह खारीज करावा असे म्हटले आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व पक्षकारांचा युक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय, लाभार्थी ग्राहक 2. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्द करतात काय ? होय. 3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी आपल्या तक्रार अर्जात त्यांचे नांवावर मिटर नाही किंवा ते ग्राहक आहेत असे जरी म्हटले नसले तरी त्यांनी जे कागदपञ दाखल केलेले आहेत त्यात पहिला कागद हा विक्री खत जो की अर्जदार यांचे हक्कात 2002 साली करुन देण्यात आलेले आहे. मिटर हे लक्ष्मणबाबा यांचे नांवाने असून त्यांचा ग्राहक क्र.552010178991 वजिराबाद असा आहे. गैरअर्जदार यांनी म्हटल्याप्रमाणे हे घर त्यांनी लक्ष्मणबाबा यांचेकडून सिटी सर्व्हे नंबर 16033 मनपा नंबर 2-12-116 हे खरेदी केल्या बाबत विक्री खतात स्पष्ट नमूद केलेले आहे. परंतु अर्जदार यांनी चूक अशी केलेली आहे की, आजपर्यत त्यांचे नांवावर गैरअर्जदार यांचेकडून मिटर ट्रान्सफर करुन घेतलेले नाही. यांचा अर्थ ते सर्व हक्काला मूकले असा नाही. यासाठी फार तर त्यांना दंड करणे योग्य होईल. वरील कागदपञाचे आधारे अर्जदार हे विकत घेतलेल्या घराचा विज पूरवठा आजपर्यत उपभोगत आहेत व त्यांनी नियमीतपणे त्यांची बिज बिले भरलेली आहे म्हणून ते लाभार्थी ग्राहक आहेत. म्हणून मूददा क्र.1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात येते. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी जानेवारी 2009 ते नोव्हेंबर 2009 पर्यतची सर्व बिले दाखल केलेली असून ती नियमितपणे भरलेली आहेत व यात विजेचा वापर 4 यूनिट ते 30 यूनिट पर्यत दिसून येतो. यानंतर गैरअर्जदार यांनी दि.14.01.2010 रोजीला अर्जदार यांचे ग्राहक क्र.550010178991 या ग्राहक क्रमांकाचे मिटर बदलले आहे त्यांचे मिटर रिप्लेसमेंट रिपोर्ट या प्रकरणात दाखल करण्यात आलेले असून जून्या मिटरची अंतिम रिंगी 2964 अशी होती. गैरअर्जदार यांनी आपले म्हणण्यात असा आक्षेप घेतला आहे की, विज कायदा 2003 कलम 127 नुसार विजेचा अनाधिकृत वापर या बददल त्यांना असेंसमेट बिल देण्यात आलेले आहे व कलम 126 प्रमाणे 12 महिन्याचे रु.8300/- बिल दिलेले आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, मंजूर भार 0.5 किलो वॅट असताना प्रत्यक्ष विज वापर हा 1.2 किलो वॅट एवढा होता. मिटर रिप्लेसमेंट रिपोर्ट पाहिला असता अर्जदार यांनी घेतलेला आक्षेप हा खोटा ठरतो. यात सिल कंडीशन ओके म्हटले आहे. ओके जर नसेल तर एसडीओ ची स्वतंञ ऑर्डर दाखल करावयास पाहिजे होती. ती गैरअर्जदाराने दाखल केलेली नाही. बॉडी सिल चे नंबर लिहीलेले नाही यावर सिल टॅम्पर्ड असा कूठेही उल्लेख नाही. कनिष्ठ अभिंयता यांनी हे मिटर बददलले दिसते, कोणत्याही भरारी पथकाने ते मिटर बदलले नाही. सर्वात मूख्य गोष्ट अशी दिसून येते की, रिप्लेसमेंट रिपोर्टवर कनिष्ठ अभिंयता यांची सहीच नाही. त्यामूळे गैरअर्जदार जे दावा करतात याप्रमाणे कलम 126 प्रमाणे विजेचे बिल देण्यासाठी कनिष्ठ अभिंयता यांचे शपथपञ ज्यात त्यांनी मिटरचे तपासणी केली, मिटर बदलले, आधीचे मिटरचे सिल कंडीशन काय होते व त्यात त्यांनी कशा प्रकारे कॅलक्यूलेट केले, मिटरचा पंचनामा, असेंसमेंट दाखल करणे आवश्यक होते. केवळ आपले लेखी म्हणणे यांचा उल्लेख करुन त्यांची जबाबदारी टळणार नाही. त्यामूळे आम्ही गैरअर्जदार यांचे सर्व आक्षेप खारीज करतो व नोव्हेंबर 2009 पर्यत गैरअर्जदार यांना बिल दिलेले आहेत व नंतर एकदम डिसेंबर या एकाच महिन्यामध्ये रु.8300/- चे जे बिल दिलेले आहे ते अतीशय अयोग्य व चूकीचे आहे असे ठरवितो. गैरअर्जदाराने मंजूर भारत 0.5 किलो वॅट दिला होता, तर अर्जदार हा 1.2 किलो वॅट वापरत होता. अर्जदाराचे घरात चार बल्ब, चार टयूब व एक टी.व्ही व एक फ्रिज होते या बददल दोन साक्षीदारास समोर ठेऊन केलेला पंचनामा देखील दाखल केलेला नाही. त्यामूळे पूरावा कागदपञा अभावी गैरअर्जदार यांनी रु.8300/- चे कलम 135 नुसार दिलेले बिल देउन सेवेत ञूटी केली व सेवेत अनूचीत प्रकार ही केला हे सिध्द केलेले आहे. अर्जदाराने 2002 मध्ये हे घर खरेदी केले व आजपर्यत त्यांनी विक्री खताचे आधारे त्यांचे नांवाने मिटर ट्रान्सफर करुन घेण्यासाठी अर्ज दिला नाही म्हणजे अर्जदारांनी त्यांची स्वतःची जबाबदारी पूर्ण केलेली नाही. या बददल ते दंडास पाञ आहेत. या बददल त्यांना रु.1000/- दंड करण्यात येतो. जो की त्यांनी गैरअर्जदार यांचेकडे भरावा. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी एकञितरित्या मिटर नंबर 55001078991 यासाठी जानेवारी 2010 मध्ये जे रु.8300/- व त्यावर आकारलेले व्याज लावलेले विज बिल या आदेशान्वये रदद करीत आहोत, अर्जदाराने नियमीत असलेले बिल गैरअर्जदार यांचे कार्यालयात भरावे. 3. मानसिक ञासाबददल रु.3,000/- व दावा खर्चाबददल रु.2000/- मंजूर करण्यात येतात. 4. अर्जदार यांनी मिटर त्यांचे नांवावर ट्रान्सफर न करुन घेतल्याबददल त्यांना केलेला रु.1000/- दंड गैरअर्जदार यांचे कार्यालयात भरावा. 5. निकालाच्या प्रति पक्षकारांना देण्यात याव्या. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुवर्णा देशमूख श्री. सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जयंत पारवेकर लघूलेखक. |