जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नांदेड प्रकरण क्र.96/2008. प्रकरण दाखल दिनांक – 07/03/2008. प्रकरण निकाल दिनांक – 05/08/2008. समक्ष - मा.श्री.विजयसिंह नारायसिंह राणे. अध्यक्ष. मा.श्री.सतीश सामते सदस्य. मा.श्रीमती.सुजाता पाटणकर. सदस्या. 1. श्री.पुरभाजी चांदोजी इंगोले, अर्जदार. वय वर्षे 45,धंदा शेती, रा.मालेगांव ता.अर्धापुर जि.नांदेड. 2. श्री.विलास भागीरथजी बाहेती, वय वर्षे 27, धंदा शेती व व्यापार, रा.मालेगांव ता.अर्धापुर जि.नांदेड. 3. श्री.सतीश भागीरथजी बाहेती, वय 32, वर्षे धंदा शेती व व्यापार, रा.मालेगांव ता.अर्धापुर जि.नांदेड. विरुध्द. 1. कनिष्ठ अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, मालेगांव ता.अर्धापुर जि.नांदेड. तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कनिष्ठ अभियंता, अर्धापुर ता.अर्धापुर जि.नांदेड. 2. अधिक्षक अभियंता, गैरअर्जदार. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, अण्णाभाऊ साठे चौक, नांदेड. अर्जदारा तर्फे. - अड.एस.के.दागडीया. गैरअर्जदार क्र.1 ते 2 - अड. व्ही.व्ही.नांदेडकर. निकालपत्र (द्वारा मा.श्रीमती.सुजाता पाटणकर,सदस्या) यातील अर्जदार यांची तक्रार थोडक्यात अशी की, त्यांनी गैरअर्जदार यांचेकडुन ग्राहक क्र.55008000847 याद्वारे विद्युत पुरवठा घेतला. त्यांचे घरामध्ये तीन टयुब,दोन फॅन, एक टी.व्ही. यासाठी विजेचा वापर होतो. सदरील मिटर ऑगष्ट 2006 पासुन बंद असल्याने दि.22/09/2006 रोजी कळवून सदरील मिटर बदलुन देण्याची विनंती केली. अर्जदार याचे घराचे त्यांनी गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना विक्री केले आहे. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचा सदरील घरात एक एच.पी.मोटर एक टयुब आहे. दि.01/01/2008 रोजी अर्जदाराचे जुने मिटर बदलुन त्या ठिकाणी नवीन मिटर बसविले. जुने व नवीन मिटरप्रमाणे अर्जदार यांनी संपुर्ण विद्युत देयके गैरअर्जदाराकडे भरली आहेत व कोणतीही देयके थकबाकी नाही. दि.29/02/2008 रोजी अचानकपणे रु.12,330/- चे देयके दिले व ते ताबडतोब भरण्यासा सांगितले न भरल्यास अर्जदाराचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली. सदरील देयकामध्ये विज चोरी केल्या बाबतचा उल्लेख केला आहे. सदरील मिटरची तपासणी दि.01/01/2008 रोजी केली असे खोटे दर्शविले आहे तसेच कोणताही पंचनामा केला नाही. मिटरची तपासणी गैरअर्जदाराच्या कार्यालयात केली त्याची सुचना अर्जदारांना दिली नाही. विद्युत कायदाचे कलम 126 प्रमाणे कोणतेही असेसमेंटचे बिल दिलेले नाही. सदरील मिटरची तपासणी अर्जदाराच्या माघारी केली आहे. सदरील विद्युत बिल चुकीचे ,खोटे कागदपत्रे तयार करुन सदरील खोटे देयके देऊन सेवेत त्रुटी केली. म्हणुन ही तक्रार दाखल करुन तीद्वारे अशी मागणी केली की, दि.29/02/2008 रोजी दिलेले रु.12,330/- चे देयक रद्य करावे आणि अर्जदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.10,000/- व दावा खर्चापोटी रु.2,000/- गैरअर्जदार यांचेकडुन मिळावेत. यात गैरअर्जदार यांना नोटीस देण्यात आली. त्यांनी हजर होऊन आपला लेखी जबाब दाखल केला. त्यांचे म्हणणे असे की, अर्जदाराची तक्रार कायदेशिर नाही. सदरील प्रकरण विज चोरीचे असल्यामुळे या मंचा समक्ष चालु शकत नाही. अर्जदाराच्या घरी तीन टयुब,दोन फॅक्स व एक टी.व्ही.यासाठी वापर होता हे चुकीचे आहे. अर्जदाराकडे एक एच.पी.ची व एक अर्ध्या एच.पी.ची अशादोन विजेच्या मोटारी आढळल्या आहेत. ऑगष्ट 2006 पासुन त्यांचे मिटर बंद पडले आहे हे म्हणणे चुकीचे आहे. दि.01/01/2008 रोजी गैरअर्जदाराचे भरारी पथकामार्फत पाहणी केल्यानंतर सदरील मिटर बदलण्यात आले त्यापुर्वी मिटर जप्त करण्यात आलेले होते. दि.29/02/2008 रोजी रु.12,330/- बिल देवुन ते भरण्यास सांगितले व न भरल्यास त्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्याची धमकी दिली हे म्हणणे खोटे आहे. दि.01/01/2008 रोजी भरारी पथकाने भेट दिली असता, तेथे 0ण्30 किलोवॅट क्षमतेची विजेची मंजुर केलेली आढळली मिटरचा क्र. 996512 असा होता व मिटरच्या बॉडीला उजवीकडे लावलेले शशिचे सिल टॅम्पर्ड आढळले व मिटर अर्जदाराने बंद पाडलेले होते त्याठिकाणी 1.09 किलो वॅटचा वापर होत होता, मंजुर भरापेक्षा जास्त विजभार वापरला जात होता. सदरील घटनेची घटनास्थळ पंचनामा करण्यात आला. अर्जदाराचे वतीने सतषि बाहेती नांवाची व्यक्ती अहवालावर सही केलेली आहे. अर्जदारास दिलेले विज देयक रु.12,330/- हे कलम 126 विज कायदा 2003 प्रमाणे देण्यात आले आहे आणि अर्जदार यांनी केलेली इतर सर्व विपरी वीधाने त्यांनी नाकबुल केली आणि असा उजर घेतला अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा. अर्जदार यांनी आपल्या तक्रारीसोबत यादीप्रमाणे दस्तऐवज दाखल व शपथपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या जबाबासोबत यादीप्रमाणे दस्तऐवज व शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदारा तर्फे युक्तीवादाच्या वेळेस कोणीही हजर नाही.गैरअर्जदारा तर्फे वकील व्ही.व्ही.नांदेडकर यांनी युक्तीवाद केला. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार क्र. 1 ते 3 गैरअर्जदार यांचे ग्राहक आहे काय? अर्जदार क्र. 1 हे ग्राहक आहेत. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदारांना सेवा देण्यमध्ये कमतरता केली आहे काय? नाही. 3. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्र. 1 – अर्जदार यांनी अर्जासोबत गैरअर्जदारांनी अर्जदारांना दिलेली विज बिले दाखल केलेली आहेत. सदर विज बिलावर अर्जदार क्र. 1 यांचे नांव नमुद असल्याचे दिसुन येत आहे, याचा विचार होता अर्जदार क्र. 1 हे गैरअर्जदार याचे ग्राहक आहेत, असे या मंचाचे मत आहे. मुद्या क्र. 2 – अर्जदार यांनी त्यांच्या अर्जामध्ये त्यांचे मिटर ऑगष्ट 2006 पासुन बंद असल्याचे दि.22/09/2006 रोजी गैरअर्जदार यांना लेखी कळविल्याचे नमुद केलेले आहे. परंतु अर्जदार यांनी दाखल केलेले विज बिले दिलेले आहे, याचा विचार होता अर्जदार यांचे 2006 मध्ये असलेले मिटर गैरअर्जदार यांनी बदलुन दिलेले आहे हे स्पष्ट होते. अर्जदार क. 1 यांनी त्याचे घर मिळकत अर्जदार क्र. 2 व 3 यांना विक्री केलेले आहे असे अर्जामध्ये नमुद केलेले आहे व त्याचे पुष्टयार्थ कोणतेही कागदोपत्री पुरावा या मंचामध्ये हजर केलेले नाही. दि.01/01/2008 रोजी गैरअर्जदार यांचे तक्रार अर्जदाराच्या इमारतीमध्ये भरारी पथकामार्फत तपासणीसाठी कले त्या वेळी त्यांनी गैरअर्जदार यांना सदरचे 0.30 किलो वॅट च्या क्षमतेचे विज मंजुर भारा पेक्षा जास्त म्हणजेच 1.9 किलो वॅट क्षमतेचे विज पुरवठा प्रत्यक्षात खेचला जात असल्याचे दिसून आले. त्याबाबत गैरअर्जदार यांना स्पॉट इन्सपेक्शन रिपोर्ट,जप्ती पंचनामा, ऑफिस नोट, इ. कागदपत्र गैरअर्जदारांनी या मंचामध्ये दाखल केलेले आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेले स्पॉट इन्सपेक्शन रिपोर्टचे अवलोकन केले असता, 1.09 किलो वॅट क्षमतेचा विज पुरवठा प्रत्यक्षात खेचला जात असल्याचे नमुद केले आहे. सदर इन्सपेक्शन रिपोर्टवर अर्जदार क्र.2 यांचे व गैरअर्जदार यांची सही आहे. गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या जप्ती पंचनाम्याचे अवलोकन केले असता, अर्जदार यांचे मिटरचा वापर सतीश बाहेती करीत असल्याचे नमुद आहे. मिटरचे सिल टॅम्पर्ड केल्याचे नुमुद आहे. मिटर तपासणी केली असता, ते बंद असल्याच्य स्थितीत आढळुन आले. मंजुर भार 0.30 किलो वॅट पेक्षा जास्त म्हणजे 1.09 किलो वॅट क्षमतेचा विज पुरवठा खेचला जात असल्याचे आढळुन आल्याची नोंद आहे. तसेचसदर इमारतीमध्ये एक एच.पी. व 0.5 एच.पी. असे दोन मोटर चालु असल्याचे नमुद केलेले आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांनी म्हणणे दाखल केल्यानंतर गैरअर्जदारांच्या म्हणण्यामधील कोणतेही कथने नाकारलेली नाहीत अगर गैरअर्जदारांच्या लेखी म्हणण्यामधील कथनाचे खंडना पुष्टयार्थ त्याचे प्रती उत्तरही या मंचा मध्ये दाखल केलेले नाही. अर्जदार हे युक्तीवादसाठी वेळोवेळी दिलेल्या तारखना गैरहजर राहीलेले आहेत. अर्जदार यांनी या मंचामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याचे निकालापर्यंत त्याचा पाठपुरावा करणे अर्जदार यांचेच काम होते परंतु अर्जदारांनी, गैरअर्जदार यांनी त्यांचे म्हणणे पुष्टयार्थ कागदपत्र दाखल केल्यानंतर अर्जदार प्रत्येक तारखेला गैरहजर राहीलेले आहेत म्हणजेच अर्जदार यांनी या मंचामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याचा कोणताही पाठपुरावा केलेला नाही अगर गैरअर्जदारांनी अर्जदारांना सेवा देणेत कमतरता केली आहे, ही बाब शाबीत करु शकले नाही. या सर्व बाबींचा विचार करता, अर्जदार यांनी विना कारण गैरअर्जदार यांचे विरुध्द या मंचात तक्रार दाखल केली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अर्जदाराकडुन गैरअर्जदार हे कॉम्पेंसेटरी कॉस्ट मिळण्यास पात्र आहेत, असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचे अर्ज, प्रतिज्ञालेख त्यांनी दाखल केलेले कागदपत्र तसेच गैरअर्जदार यांचे लेखी म्हणणे त्यांनी दाखल केलेले दस्तऐवज व त्यांचे वकीलांचा युक्तीवाद याचा विचार होता खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा अर्ज खारीज करण्यात येते. 2. अर्जदार क्र. 1 ते 3 यांनी प्रत्येकी रु.500/- प्रमाणे कॉम्पेंसेटरी कॉस्ट गैरअर्जदार यांना द्यावे. 3. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. (श्री.विजयसिंह नारायणसिंह राणे)(श्रीमती.सुजाता पाटणकर)(श्री.सतीशसामते) अध्यक्ष. सदस्या सदस्य गो.प.निलमवार, लघुलेखक. |