(मा.अध्यक्ष, श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र अर्जदार यांच्या करारात नमूद केल्याप्रमाणे रामबाग इमारत क्र.3 चा बांधकाम पुर्णत्वाचा दाखला सामनेवाला यांनी आणून द्यावा व इमारतीसंदर्भात सोसायटी किंवा अपार्टमेंटची स्थापना करुन तसे अंतीम हस्तांतरणाचे दस्त तक्रारदारांचे लाभात लिहून व नोंदवून देण्याविषयी सामनेवाला यांना आदेश व्हावेत. तक्रार कलम 6 मध्ये नमूद त्रुटी व बेकायदेशीर गोष्टी दुरु करुन त्यांची कायदेशीर पुर्तता करुन देण्याविषयी सामनेवाला यांना आदेश व्हावेत. अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून शारिरीक मानसिक त्रासाबाबत नुकसानभरपाई म्हणून रक्कम रु.6,06,248/-, तक्रारीचा खर्च रु.25,000/- व नोटीस खर्च रु.3000/- मिळावेत या मागणीसाठी अर्जदार यांचा अर्ज आहे. सामनेवाला नं.1 ते 3,5 ते 9 यांनी पान क्र.44 लगत एकत्रीत लेखी म्हणणे व सामनेवाला नं.2 यांनी पान क्र.45 लगत प्रतिज्ञापत्र, सामनेवाला नं.5 ते 9 करीता जनरल मुखत्यार श्री.मिलींद जोशी यांनी पान क्र.46 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. सामनेवाला नं.4 हे न्यायमंचाची नोटीस लागून गैरहजर असल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा तक्रार चालविण्याचे आदेश दि.7/9/2011 रोजी करण्यात आले. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेले सर्व कागदपत्रांचा विचार करुन पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत. मुद्देः 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय 2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत आहे काय?- अंशतः आहे. 3) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय?- होय 4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मिळकतीचे खरेदीपत्र होवून मिळणेस पात्र आहेत काय?- होय. 5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. विवेचन या कामी अर्जदार यांनी युक्तीवाद केलेला नाही. सामनेवाला नं.1 ते 3 व 5 ते 9 यांचेतर्फे पान क्र.62 लगत लेखी युक्तीवाद सादर केलेला आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे मध्ये, त्यांनी अर्जदार यांचेबरोबर सदनिकेसंदर्भात करार केलेला आहे ही बाब मान्य केलेली आहे. अर्जदार यांनी पान क्र.7 लगत दि.19/09/1994 रोजीचे करारपत्रांच्या झेरॉक्स प्रती हजर केलेल्या आहेत. ही कागदपत्रे सामनेवाला यांनी स्पष्टपण नाकारलेले नाही. पान क्र.7 चे करारपत्रांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “करारनामे 1994 ते 1996 या कालावधीत झालेले आहे. तक्रार अर्ज 2011 मध्ये दाखल करण्यात आलेला आहे, यामुळे तक्रार मुदतबाहय असून कायद्याला धरुन नाही. 1994 ते 2007 पर्यंत अर्जदार व सामनेवाला यांचेमध्ये कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. सदनिका व दुकानांचा ताबा 1994 ते 1996 या कालावधीतच दिलेला आहे. संस्था नोंदवणेबाबत कधीही अर्जदार यांनी विचारणा केलेली नाही. इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन दिलेले आहे. अर्जदार यांनी कधीही खरेदीपत्राची मागणी सामनेवाला यांचेकडे केलेली नाही. अर्ज रद्द करण्यात यावा.” असे म्हटलेले आहे. या कामी अर्जदार यांनी पान क्र.7 लगत अर्जदार व सामनेवाला यांचेमधील झालेला करार पत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत. अर्जदार यांचे तक्रार अर्जामधील कथन सामनेवाला यांचे लेखी म्हणण्यामधील कथन व पान क्र.7 लगतची करारपत्रे याचा विचार करता, अर्जदार यांना सदनिका व दुकान गाळयांचे कबजे 1994 ते 1996 च्या दरम्यान मिळालेले आहेत. अर्जदार यांची प्रस्तुतचा तक्रार अर्ज या मंचामध्ये दि.02/05/2011 रोजी दाखल केलेला आहे. याचा विचार होता ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 अ नुसार अर्जदार यांचा तक्रार अर्ज मुदतीत दाखल नाही हे स्पष्ट होत आहे परंतु या कामी अर्जदार यांनी पान क्र.26 लगत उशिरा माफीचा अर्ज व पान क्र.33 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. या उशिराचे माफीच्या अर्जामध्ये कलम 2 मध्ये “तक्रारीस घडलेले कारण सतत घडणारे आहे. मे.मंचाने उशीर माफीचा अर्ज दाखल करणेकामी निर्देश दिल्याने सदरचा उशीर माफीचा अर्ज दाखल केलेला आहे.” असे म्हटलेले आहे. या पान क्र.26 चे उशीरामाफीचे अर्जामध्ये व पान क्र.33 चे प्रतिज्ञापत्रामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यास नक्की किती उशीर झालेला आहे याचा कोणताही उल्लेख तारखेसह व दिवसांसह अर्जदार यांनी केलेला नाही. उलट या पान क्र.26 चे अर्जामधील विनंती कलम 4 अ मध्ये “मे.मंचाचे मताप्रमाणे जो काही उशीर झालेला आहे तो उशीर माफ होवून मिळावा.” असा उल्लेख केलेला आहे. पान क्र.26 चे उशीर माफीचा अर्ज व पान क्र.33 चे प्रतिज्ञापत्रामध्ये अर्जदार यांनी तक्रार अर्ज दाखल करण्यास नक्की किती दिवसांचा उशीर झालेला आहे याचा उल्लेख केलेला नाही. तसेच उशीराची माफी कोणत्या कारणास्तव व्हावी याबाबतही कोणतीही योग्य व संयुक्तीक कारणे दिलेली नाही. याउलट अर्जदार यांना तक्रार अर्ज दाखल करण्यास सततचे कारण घडलेले आहे असेच अर्जदार यांचे मत आहे असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांचा पान क्र.26 चा उशीर माफीचा अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. याबाबत मंचाचे वतीने पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रांचा आधार घेतलेला आहे. 1) 1(2012) सि.पी.जे.राष्ट्रीय आयोग. पान 300. एम.आर.थावरे विरुध्द व्ही.एस. अमीन 2) 2011 एन.सी.जे राष्ट्रीय आयोग. पान 37 न्यु इंडिया इन्शुरन्स कं विरुध्द पी. सी. के. बोर्ड 3) 3(2011) सी.पी.जे.राष्ट्रीय आयोग. पान 115. हुडा विरुध्द इंदु अहुजा 4) मा राज्य आयोग मुंबई यांचे कडील प्रथम अपील क्र.274/2010 निकाल ता.10/6/10 संजय खेमजी वसंत नाशिक विरुध्द नॅशनल इन्शुरन्स कं शाखा नाशिक जरी अर्जदार यांचा उशिरामाफीचा अर्ज नामंजूर केलेला असला व तक्रार अर्ज मुदतीत दाखल नाही असे या मंचाचे मत झालेले असले, तरीसुध्दा तक्रार अर्ज विनंती कलम 14 अ मध्ये “अर्जदार यांनी सामनेवाला यांचेकडून बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळावा, इमारती संदर्भाने सोसायटी किंवा अपार्टमेंटची स्थापना करुन द्यावी व अंतीम हस्तांतरणाचे दस्त अर्जदार यांचे लाभात लिहून द्यावेत.” अशी मागणी अर्जदार यांनी केलेली आहे. वास्तविक बांधकाम पुर्णंत्वाचा दाखला देणे, सोसायटी किंवा अपार्टमेंटची स्थापना करणे व अंतीम खरेदीपत्र नोंदवून देणे या सर्व कायदेशीर जबाबदा-या सामनेवाला यांचेवर आहेत. परंतु सामनेवाला यांनी आज तारखेअखेर अर्जदार यांच्या वरील मागण्या पुर्ण केलेल्या नाहीत. याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. तक्रार अर्ज विनंती कलम 14 अ मधील मागणीचा विचार करता व वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार यांची तक्रार अर्ज विनंती कलम 14 अ मधील मागणी मंजूर करण्यात यावी असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा पान क्र.26 चा उशिरामाफीचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे यामुळे अर्जदार यांचा मुळ तक्रार अर्ज काही अंशी मुदतीत नाही, याचा विचार होता अर्जदार यांचे तक्रार अर्ज विनंती कलम 14 ब, 14 क व 14 ड मधील मागण्या नामंजूर करण्यात याव्यात असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, लेखी युक्तीवाद, मंचाचे वतीने आधार घेतलेली व वर उल्लेख केलेली वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे व वरील सर्व विवेचन याचा विचार होवून पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहेत. आ दे श
1) अर्जदार यांचा पान क्र.26 लगतचा विलंब माफी अर्ज नामंजूर करण्यात येत आहे. 2) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 3) आजपासून 30 दिवसांचे आत सामनेवाला क्र.1 ते 9 यांनी अर्जदार क्र.1 ते 6 यांचे नावे सदनिका व दुकान गाळे यांचेबाबतीत अंतीम खरेदी पत्र नोंदवून द्यावे तसेच इमारतीसंदर्भात सोसायटी किंवा अपार्टमेंटची स्थापना करुन द्यावी व इमारतीचा बांधकाम पुर्णत्वाचा दाखल मिळवून द्यावा. 4) खरेदीपत्राचा संपुर्ण खर्च अर्जदार क्र.1 ते 6 यांनी करणेचा आहे. 5) अर्जदार यांच्या अन्य मागण्या नामंजूर करण्यात येत आहेत. |