Maharashtra

Nagpur

CC/161/2017

Ku. Reshma Shriram Bhongade (Sau. Reshma Rohan Navkhare), Through POA Shri Prabhakar Narayanrao Navkhare - Complainant(s)

Versus

Joint Director, Tajshree Honda Automobilex Ltd. - Opp.Party(s)

30 Nov 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/161/2017
( Date of Filing : 21 Mar 2017 )
 
1. Ku. Reshma Shriram Bhongade (Sau. Reshma Rohan Navkhare), Through POA Shri Prabhakar Narayanrao Navkhare
R/o. Plot No. 13, Chandrahas Society, Abhijit Nagar, Mangaldeep Nagar No. 2, Manewada-Besa Road, Nagpur 440034
Nagpur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Joint Director, Tajshree Honda Automobilex Ltd.
Deonagar, Khamla Road, Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Joint Director, Honda Motors Cycles and Scooters India Pvt. Ltd.
Commercial Compolex, 11, Sector 49-50, Gulf Course, Extension Road, Gudgaon, Haryana 122018
Gurgaon
Hariyana
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 Adv. Jashree S.Kalbande, Advocate for the Opp. Party 0
Dated : 30 Nov 2021
Final Order / Judgement

 

आदेश

मा.अध्‍यक्ष , श्री. संजय वा. पाटील यांच्‍या आदेशान्‍वये -

  1.      तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्‍या कलम 12 अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष 1 हा विरुध्‍द पक्ष 2 च्‍या निर्मित वाहनाचा वितरक आहे. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 2 ने निर्मित केलेली दुचाकी वाहन होंडा अॅक्‍टीव्‍हा ( पांढरा रंग), इंजिन क्रं. JF50EU3029565, चेसीस नं. ME4JF505CGU029570 हे वाहन विरुध्‍द पक्ष 1 कडून दि.16.05.2016 रोजी  रुपये 58,786/- एवढया किंमतीत खरेदी केले असून त्‍याचा नोंदणी क्रं. MH 49 –AF-1769 असा आहे.
  2.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, सदरचे वाहन खरेदी केल्‍यानंतर 2-3 दिवसातच वाहन चालवितांना तांत्रिक बिघाडामुळे आवाज येत असल्‍याचे आढळले, तसेच ऑईल पडणे, वाहन वळवितांना हॅन्‍डल जॅम होणे इत्‍यादी बिघाडाकरिता तक्रारकर्तीने सदरचे वाहन विरुध्‍द पक्ष 1 च्‍या अधिकृत सर्विस सेंटरवर दुरुस्‍तीकरिता दिले, त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष 1 च्‍या अधिकृत सर्विस सेंटरने वाहनात  दुरुस्‍ती करुन वाहन  तक्रारकर्तीला सोपविले.  त्‍यानंतर पुनश्‍च एक आठवडयानंतर वाहनातील ऑईल सांडणे, हॅन्‍डल जम आणि इंजिन मधून आवाज येत असल्‍याचे पुन्‍हा  जाणविले, त्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 01.06.2016 रोजी सदरचे वादातीत वाहन विरुध्‍द पक्ष 1 च्‍या सर्विस स्‍टेशनला दुरुस्‍तीकरिता सोपविले. त्‍यावेळी सुध्‍दा वि.प. 1 च्‍या सर्विस स्‍टेशनवरुन धातुरमातुर दुरुस्‍तीकरुन वाहन तक्रारकर्तीला सोपविले. तक्रारकर्तीच्‍या वाहनामध्‍ये असलेली तांत्रिक त्रुटी पूर्णपणे दुरुस्‍त न झाल्‍यामुळे तक्रारकर्तीने पुन्‍हा दि. 08.06.2016 रोजी वि.प. 1 च्‍या अधिकृत दुरुस्‍ती केंद्रावर वाहन घेऊन गेली असता  तेथील अधिका-यांनी तक्रारकर्तीचे वाहन ठेवून घेतले व दुस-या दिवशी वाहन घेऊन जाण्‍यास सांगितले. त्‍याप्रमाणे तक्रारकर्ती दि. 09.06.2016 रोजी वि.प. 1 च्‍या अधिकृत दुरुस्‍ती केंद्रावर वाहन घेण्‍यास गेलीअसता वाहन योग्‍य प्रकारे दुरुस्‍त झाल्‍याचे सांगून सोपविले.
  3.      तक्रारकर्तीने पुढे नमूद केले की, तिने सदरचे वादातीत वाहन ताब्‍यात घेतल्‍यानंतर एक आठवडयाच्‍या आंत पुन्‍हा वाहनामध्‍ये तोच तांत्रिक बिघाड आढळून आल्‍यामुळे दि. 15.06.2018 ला परत वाहन वि.प. 1 च्‍या दुरुस्‍ती केंद्रावर घेऊन गेली, त्‍यावेळी वि.प. 1 च्‍या अधिका-याला विनंती करुन सदर वाहनामध्‍ये असलेला तांत्रिक दोष हा वाहन निर्मितीच्‍या वेळेचे असल्‍यामुळे वाहन बदलवून मिळण्‍याची विनंती केली असा वि.प. 1 च्‍या दुरुस्‍ती केंद्रावरील अधिका-यांनी कंपनीचे अधिकारी यांच्‍या सोबत चर्चा करुन निर्णय घेऊन वाहन बदलून देण्‍यात येईल असे सांगितले. तक्रारकर्तीने दि. 09.09.2016, 15.09.2016 , 07.10.2016 ला वाहनातील तांत्रिक दोषाकरिता वि.प. 1 च्‍या अधिकृत सर्विस स्‍टेशनवर वाहन घेऊन गेली व प्रत्‍येक वेळी वाहनातील दोष काढून दिल्‍याचे सांगून वाहन परत केले.  परंतु वाहनातील दोष पूर्णपणे दुरुस्‍त न झाल्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 12.10.2016 ला वि.प. 1 च्‍या दुरुस्‍ती केंद्रावर वाहन घेऊन गेली असता तेथील उपस्थित सर्विस मॅनेजरने वाहनाच्‍या दुरुस्‍तीस नकार देऊन कंपनीचे इंजिनिअर येऊनच वाहनाची तपासणी करतील व वाहनाची दुरुस्‍ती करुन देतील असे सांगितले. त्‍यामुळे तक्रारकर्तीने वि.प. 2 ला पत्र पाठवून त्‍याद्वारे दोषपूर्ण वाहन बदलून त्‍याएवेजी नविन वाहन देण्‍याची विनंती केली. परंतु विरुध्‍द पक्ष 2 ने तक्रारकर्तीच्‍या पत्राची दखल न घेतल्‍यामुळे सदरचे वादातीत दोषपूर्ण वाहन दि. 12.10.2016 पासून वि.प. 1 च्‍या अधिकृत दुरुस्‍ती केंद्रावर पडून  आहे. त्‍यानंतर वि.प. 1 यांनी वाहन घेऊन जाण्‍याबाबत तक्रारकर्तीला फोन करुन कळविले असता तक्रारकर्तीने सदर वाहनाच्‍या दुरुस्‍तीबाबत clarification certificate (स्‍पष्‍टीकरण प्रमाणपत्र)  व (guarantee certificate) हमी प्रमाणपत्र देण्‍याची मागणी केली,  जेणेकरुन सदरचे वाहन यानंतर वांरवांर वि.प. 1 यांच्‍याकडे दुरुस्‍तीकरिता आणण्‍याची गरज राहणार नाही. परंतु वि.प. 1 यांनी दि. 09.01.2017 ला तक्रारकर्तीच्‍या मोबाईल क्रं. 9730041046 वर संपर्क करुन वाहन घेऊन जाण्‍याबाबत सूचित केले व वाहन घेऊन न गेल्‍यास फौजदारी कार्यवाही करुन वाहन पोलिस स्‍टेशनला जमा करण्‍याची धमकी दिली. त्‍यामुळे तक्रारकर्तीने दि. 11.01.2017 रोजी वि.प. 1 विरुध्‍द गैरवर्तणूकीबाबत व धमकीबाबत बजाजनगर पोलिस स्‍टेशन येथे तक्रार नोंदविली. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केल्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार आयोगासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्ष 1 व  2 ने विकलेल्‍या दोषपूर्ण वाहनाच्‍या बदल्‍यात कुठलाही दोष नसलेले नविन वाहन  सर्व सुविधासह त.क.ला देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच  शारीरिक,  मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.  
  4.      विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने आपला लेखी जबाब एकत्रित दाखल केला असून त्‍यात तक्रारकर्तीने वि.प. 2 ने निर्मित केलेले वाहन वि.प. 1 तर्फे खरेदी केल्‍याबाबतचा उभय पक्षात वाद वाद नाही. तक्रारकर्तीने वि.प. 1 च्‍या दुरुस्‍ती केंद्रावर सदरचे वाहन दि. 08.06.2016 ला आणले त्‍यावेळी नि.क्रं. 2 (5) वर दाखल जॉब कार्डनुसार  तक्रारकर्तीच्‍या वाहनात इंजिन मध्‍ये आवाज व हॅन्‍डल मध्‍ये दोष होता व विरुध्‍द पक्ष 1 च्‍या दुरुस्‍ती केंद्रावरुन सदर वाहनातील दोष दूर करुन वाहनातील ऑईल बदलून व हॅन्‍डल मधील दोष दूर करुन वाहन तक्रारकर्तीला हस्‍तांतरित केले. तसेच  दि. 08.06.2016 पर्यंत तक्रारकर्तीचे वाहन 505 कि.मी. चालले होते. दि. 09.09.2016 ला त.क.ने वाहन वि.प. 1 यांच्‍याकडे आणले त्‍यावेळी तक्रारकर्तीचे वाहन हे 3006 कि.मी. चालले होते. तरी सदरच्‍या वाहनातील गाडीतील दोष काढून ऑईल बदलवून गाडी तक्रारकर्तीला सोपविण्‍यात आली. त्‍यानंतर त.क.ने दि. 15.09.2016 ला गाडी वि.प. 1 च्‍या दुरुस्‍ती केंद्रात आणली त्‍यावेळी देखील त.क.चे वाहन हे 3124 कि.मी. चालविण्‍यात आले होते, त्‍यानंतर सुध्‍दा तक्रारकर्तीच्‍या गाडीतील दोष दूर करुन वाहन परत केले. त्‍यानंतर त.क.ने दि. 07.10.2016, 12.10.2016, 15.10.2016 ला वि.प. 1 कडे वाहन दुरुस्‍तीकरिता आणले व प्रत्‍येक वेळेस आवश्‍यक दुरुस्‍ती करुन वाहन त.क.ला हस्‍तांतरित करण्‍यात आले होते.  दि. 16.05.2016 ते 12.10.2016 या कालावधीत त.क.चे वाहन 3950 कि.मी. चालले  जर त.क.च्‍या वाहनात निर्मिती दोष असता तर त.क.चे वाहन 50 कि.मी. ही चालले नसते. कंपनीचे इंजिनिअर कडून वाहनाची तपासणी केली असता वाहना मध्‍ये दोष आढळून आले नाही. त्‍यानंतर दि.18.10.2016 रोजी व दि. 22.11.2016 रोजी स्‍मरणपत्र देऊन तक्रारकर्तीला वाहन घेऊन जाण्‍यास कळविले होते. तक्रारकर्तीने कुठल्‍याही थर्ड पार्टीचे मुलभूत व बदलता न येणारे इंजिनातील बिघाड असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र सादर केले नाही, त्‍यामुळे सदरच्‍या आरोपावर ही तक्रार चालू शकत नाही. त.क.ने clarification certificate (स्‍पष्‍टीकरण प्रमाणपत्र)  व (guarantee certificate) हमी प्रमाणपत्र देण्‍याची मागणी परंतु तसे प्रमाणपत्र देण्‍यासंबंधी कुठलेही नियम नाही, त्‍यामुळे सदरची मागणी ही गैरकायदेशीर असल्‍यामुळे प्रस्‍तुत तक्रार खारीज करण्‍यात यावी अशी विनंती केली आहे.
  5.      उभय पक्षांनी दाखल केलेल्‍या दस्‍तावेजाचे अवलोकन करुन व त्‍यांचा  तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर आयोगाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

            मुद्दे                                                                         उत्‍तर

  1. तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची  ग्राहक आहे काय ?                         होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय आणि  

अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय?                  होय

  1. काय आदेश?                                   अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत –  तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्ष 2 ने निर्मित केलेले होंडा अॅक्‍टीव्‍हा हे दुचाकी वाहन विरुध्‍द पक्ष 1 कडून दि.16.05.2016 रोजी  खरेदी केले होते हे नि.क्रं. 2(4) वरील दस्‍तावेजावरुन दिसून येते व याबाबत उभय पक्षात वाद नाही, यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्ष 1 व 2 ची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  तक्रारकर्तीने वाहनातील इंजिनमधून आवाज येत असल्‍याबाबत, हॅन्‍डल जॅम होत असल्‍याबाबत व ऑईल गळती होत असल्‍याच्‍या कारणावरुन विरुध्‍द पक्ष 1 च्‍या अधिकृत दुरुस्‍ती केंद्रावर वाहन दुरुस्‍तीकरिता घेऊन गेली होती हे  नि.क्रं. 2(5) वर दाखल केलेल्‍या जॉब कार्डवरुन दिसून येते. त्‍यांनतर ही तक्रारकर्तीने सदरच्‍या कारणावरुनच विरुध्‍द पक्ष 1 च्‍या दुरुस्‍ती केंद्रावर सदरचे वाहन हे दि. 08.06.2016, 09.09.2016, 15.09.2016 , 07.10.2016, 12.10.2016, व 15.10.2016 ला वाहन दुरुस्‍तीकरिता दिले होते व प्रत्‍येक वेळी वि.प. 1 ने वाहनातील दोष दूर करुन वाहन तक्रारकर्तीला सुपूर्द केले होते. त.क.ने दि. 16.05.2016 पासून ते 12.10.2016 पर्यंत तिचे वाहन 3,950 कि.मी. चालविले होते. त.क.ने सदरचे वाहन वि.प. 1 कडून विकत घेतल्‍यापासून वाहनात निर्मिती दोष आहे.  परंतु त.क.ने विकत  घेतलेल्‍या वाहनामध्‍ये  निर्मिती दोष असल्‍याबाबतचा पुरावा / तज्ञ अहवाल आयोगा समक्ष दाखल केलेला नाही असा आक्षेप विरुध्‍द पक्षाने घेतलेला आहे. सदरचा आक्षेप हा चुकिचा आहे असे आमचे मत आहे. तक्रारकर्तीने खरेदी केलेले वाहन अगदी सुरुवातीपासूनच ना-दुरुस्‍त असल्‍यामुळे वारंवांर विरुध्‍द पक्ष 1 यांच्‍याकडे दुरुस्‍तीकरिता देण्‍यात आले होते आणि सदरहू दोष हा प्रत्‍येक वेळी थातुरमातुर अथवा तात्‍पुरता दुरुस्‍त करुन तक्रारकर्तीला वाहन देण्‍यात येत होते आणि  सदरहू दुरुस्‍ती दि. 08.06.2016 पासून दि.15.10.2016 पर्यंत वेळोवेळी करुन देण्‍यात आलेली आहे. म्‍हणून तक्रारकर्तीचे वाहन या कालावधीत फक्‍त 3950 कि.मी. चालविण्‍यात आलेले आहे. सबब सदरहू वाहनामध्‍ये दोष नव्‍हता हा विरुध्‍द पक्षाचा आक्षेप चुकिचा असल्‍याचे दिसून येते. जॉब कार्ड वरुन वेळोवेळी करण्‍यात आलेल्‍या दुरुस्‍त्‍या बघितल्‍यातर सदरहू वाहनामध्‍ये निर्मिती दोष असल्‍याचे दिसून येते. याबाबत मा. राष्‍ट्रीय आयोगाने नचिकेत शिरगांवकर विरुध्‍द पंडित अॅटोमोबाईल लि.,  II (2008) CPJ 308 (NC) या प्रकरणात Vehicle was found defective from day one onwards. Vehicle having manufacturing  defects being proved, res ipsa loquitur  was  applicable. अशी महत्‍वाची निरीक्षणे नोंदविलेली आहेत.  दुरुस्‍ती केल्‍यानंतर ही वाहनातील सदरहू दोष हा सतत घडत होता आणि म्‍हणून सदरहू वाहनात निर्मिती दोष असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसून येते. म्‍हणून विरुध्‍द पक्ष 1 व 2 यांनी सदरहू वाहन बदलवून न देता आणि निर्मिती दोष हा कायम स्‍वरुपी दुरुस्‍ती करुन न देऊन सेवेत त्रुटी केलेली आहे आणि अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे असे आमचे मत आहे. सदरहू वाहन हे विरुध्‍द पक्ष 1 कडे दुरुस्‍तीकरिता प्रलंबित आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्तीची  तक्रार अंशतः मंजूर.

 

  1. विरुध्‍द 1 व 2 ने दोषपूर्ण सेवा दिली असल्‍याचे घोषित करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍त रित्‍या तक्रारकर्तीला वादातीत वाहना ऐवजी दुसरी नविन होंडा अॅक्‍टीव्‍हा ( पांढ-या रंगाची) बदलून द्यावी.

 

  • अथवा

विरुध्‍द पक्षाने सदरहू वाहनाची किंमत रक्‍कम रुपये 58,786/- तक्रारकर्तीला परत करावी आणि सदरहू रक्‍कमेवर दि. 12.10.2016 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कमेच्‍या अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याज द्यावे.  

 

  1. विरुध्‍द पक्ष 1 व 2 ने वैयक्तिक अथवा संयुक्‍तरित्‍या तक्रारकर्तीला  झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता रुपये 30,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- द्यावे.

 

  1. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्तीला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.