(द्वारा श्रीमती. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
1. तक्रारदारांनी मे. रॉयल डेव्हलपर्स यांच्या ‘रॉयल कॉम्प्लेक्स’ जूचंद्र नायगाव (पू), ता. वसई, जि. ठाणे या बिल्डींगच्या जाहीराती पोस्टर, होडींग याद्वारे सिडकोमान्य प्रोजेक्ट अशा बाबींकडे आकर्षित होर्उन तक्रारदार यांनी दि. 03/05/2010 रोजी 390 स्के.फु चा फ्लॅट बुक केला (एल/4 विंग फ्लॅट क्र. 001) याप्रमाणे फ्लॅट किंमत रजिस्ट्रेशन फी मुद्रांक शुल्क सोसायटी फी, दोन वर्षाचा टॅक्स वर्षाचा टॅक्स तीन वर्षाचा मेंटेनन्स पाणी फी असे (825000/-) रु. रॉयल डेव्हलपर्स सामनेवाले यांनी घेतले.
2. तक्रारदार यांनी वैयक्तिरित्या श्री. समीर पांचाळ या आर्किटेक्ट यांच्याकडुन सदनिकेची मोजणी केली असता बिल्टअप क्षेत्रफळ यांच्याकडुन सदनिकेची मागणह केली असता बिल्टअप क्षेत्रफळ 280.50 एवढे असल्याचे निष्पन्न झाले. तथापी सामनेवाले यांनी करारामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ 312 चौ.फुट नमुद केले आहे.
3. तक्रारदार यांना सदनिकेचे 32 चौ.फुट बिल्टअप क्षेत्रफळ कमी दिल्याबाबत सामनेवाले यांनी रु. 77,600/- रक्कम द.सा.द.शे 21% व्याजदराने तक्रारदार यांना सदनिका ताब्यात दिल्याच्या तारखेपासून मिळण्यासाठी तसेच मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- तक्रार खर्च रु. 20,000/-, सदनिका करारामध्ये योग्य त्या दुरूसत्या मिळवण्यासाठी प्रस्तुत तक्रार तक्रारदारांनी सामनेवाले यांचे विरुध्द दाखल केले आहे.
4. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसा तक्रारदारांच्या सदनिका क्र. (एल – 4 विंग) चा सदनिका खरेदी करार ता. 25/05/2010 रोजी नोंदणीकृत केला असुन सदनिकेची किंमत रु. 7,56,600/- आहे. तक्रारदारांनी सदनिकेचा ताबा करारातील अटी व शर्तीनुसार ता. 16/06/2010 रोजी घेतला आहे. तक्रारदारांनी प्रत्यक्ष इमारतीच्या कायदेशिर कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सदर सदनिकेचे बुकींग केले व समाधानकारकरित्या सदनिेकेचा ताबा घेतला आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या करारामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ 312 चौ.फुट नमुद केले असुनही प्रत्यक्षात तक्रारदारांची सदनिका 321 चौ. फुट (Built up) एवढया क्षेत्रफळाची आहे. सबब सामनेवाले यांनी तक्रारदार यांना कोणतीही त्रृटीची सेवा दिली नाही.
5) तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले यांची लेखी कैफियत यांचे यांचे मंचाने वाचन केले. तक्रारदारांनी त्यांचे लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली. सबब उपलब्ध कागदपात्रांच्या आधारे मंच खालीलप्रमाणे मुद्दे व निष्कर्ष काढीत आहेः
6. कारण मिमांसा
अ) तक्रारदारांनी सदनिका क्र. 1 बिल्डींग 214 च्या बुकींगची रक्कम रु. 51,000/- चेकद्वारे ता. 03/05/2010 रोजी भरणा करुन सदनिका खरेदी करण्यचे निश्चित केल्याबाबत सामनेवाले यांना दिलेल्या ता. 03/05/2010 रोजीच्या पत्राची प्रत मंचात दाखल आहे. सदर पत्रामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ 390 चौ.फुट व किंमत रक्कम रु. 82,500/- + 2,500/- सोसायटी चार्जेची असल्याचे दिसुन येते.
ब) तक्रारदार यांनी सदनिका क्र. 1 च्या ता. 24/05/2010 रोजीच्या नोंदणीकृत कराराची प्रत मंचात दाखल कली आहे. सदर करारामधील परिच्छेद 13 मध्ये तक्रारदार यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ 312 चौ. फुट (Built up) व सदनिकेची किंमत रु.7,56,600/- असल्याचे नमुद केले आहे. तक्रारदार यांनी ता. 16/16/2010 रोजी सदनिकेचा ताबा घेतला असल्याची बाब उभय पक्षांना मान्य आहे.
क) तक्रारदार यांची सदनिकेचे क्षेत्रफळाची आर्किटेक्ट श्री समीर पांचाळ यांच्याकडुन मोजणी केली आहे. श्री समीर पांचाळ यांनी या संदर्भात सदनिकेचे Area Certificate दिले आहे. सदर प्रमाणपत्राची प्रत मंचात दाखल आहे. प्रमाणपत्रानुसार सदनिका क्र. 1 चे क्षेत्रफळ 22.06 चौ.मी म्हणजेच 280.50 चौ.फुट (Built up) असल्याचे स्पष्ट होते.
ड) श्री. समीर पांचाळ यांनी तक्रारदार यांच्या सदनिका क्र. 1 च्या प्रत्येक खोलीची मोजणी करुन drawing सहीत Area Certificate तयार केले आहे. तसेच तक्रारदार यांनी समीर पांचाळ यांचे शपथपत्र प्रस्तुत प्रकरणात दाखल केले आहे. सामनेवाले यांनी विहीत मुदतीत पुरावा शपथपत्र दाखल न केल्यामुळे त्यांचे विरुध्द विना पुरावा शपथपत्र प्रकरण पुढे चालविण्याबाबतचा आदेश पारित झाला आहे.
इ) सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार तक्रारदार यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ प्रोजक्ट आर्किटेक्ट यांच्या प्रमाणपत्रानुसार 321 चौ.फुट (Built up) आहे म्हणजेच करारामध्ये नमुद केल्याप्रमाणे 312 चौ.फुट पेक्षा जास्त आहे. तथापी सामनेवाले यांनी प्रोजेक्ट आर्किटेक्चर यांचे प्रमाणपत्रांची प्रत मंचात दाखल केली नाही. तसेच तक्रारदार यांना सदनिकेचे क्षेत्रफळ करारनाम्या नुसार 312 चौ.फुट असल्याबाबतचा कोणताही पुरावा मंचासमोर नाही. त्यामुळे सामनेवाले यांचे म्हणणे ग्राह्य धरता येत नाही. तथापी तक्रारदार यांनी आर्किटेक्चर श्री समीर पांचाळ यांच्या Area Certificate अन्वये सदर सदनिकेचे क्षेत्रफळ करारामध्ये नमुद केल्याप्रमाणे 312 चौ.फुट नसुन 280.50 फुट(Built up) असल्याचे पुराव्यानिशी सिध्द केले आहे. सबब तक्रारदार यांचा पुरावा प्रस्तुत प्रकरणात ग्राह्य धरणे उचित आहे असे मंचाचे मत आहे.
ई) तक्रारदार यांना सामनेवाले यांनी सदनिका करारामध्ये सदनिकेचे क्षेत्रफळ 312 चौ.फुट (Built up) नमुद करुन प्रत्यक्षात 280.50 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिका हस्तांतरित करुन त्रृटींची सेवा दिल्याचे स्पष्ट होते. सामनेवाले यांनी तक्रारदार यांच्या कडुन 312 चौ.फुट क्षेत्रफळाकरीता रु. 7,56,600/- एवढी रक्कम घेतली आहे. त्यामुळे 31.5 चौ.फुट (Built up) क्षेत्रफळाची रक्कम रु. 76,234.00- (2423 X 31.5) तक्रार दाखल तारखेपासुन आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 12% व्याजदराने देणे योग्य आहे असे मंचाचे मत आहे.
उ) तक्रारदार यांना रॉयल कॉम्प्लेक्स को.ऑप. सोसायटी यांनी दिलेल्या मेन्टेनन्स बिलामध्ये तक्रारदार यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ 390 चौ.फुट नमुद केले असुन सदनिकेच्या मेन्टेनन्सची आकारणी खालील प्रमाणे केली आहे.
Annexure R -1
Name – G. Talekar
Flat No. L/4 – G-001
Total Area – 390
Maintenance – Rs. 1.50/ Sq.ft 585 .
Repaire fund – 10 paise /Sq.ft 39 .
Sinking fund – 05 paise/Sq.ft 20 .
Total Maintenance 644 .
Please draw ypur chqeue Name as “ROYAL COMPLEX CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD.,” Till 15th of every month.
21% charges will be applied to total outstanding balance from July 211.
तक्रारदार यांना प्रत्यक्षात 280.55 चौ.फुट क्षेत्रफळाची सदनिका हस्तांतरित होवुनही मेन्टेनन्सची आकारणी मात्र 390 चौ.फुट करीता केली जात आहे. सामनेवाले यांचे मंजुर नकाशा प्रमाणे तक्रारदार यांच्या सदनिकेचे क्षेत्रफळ 390 चौ.मी दर्शविण्यात आले असल्याचे दिसुन येते. सदर इमारतीच्या मंजुर नकाशाची प्रत तक्रारदार यांच्या नोंदणीकृत सदनिका करारासोबत दाखल आहे. यावरुन सामनेवाले यांनी त्यानंतर सदनिकेच्या क्षेत्रफळामध्ये फेरबद्दल (alteration ) केल्याचे स्पष्ट होते. सामनेवाले यांच्या सदरच्या कृतीमुळे निश्चितच तक्रारदार यांना शारिरीक मानसिक व आर्थिक त्रास झाला आहे व सदरची तक्रारही दाखल करावी लागली आहे. सबब सामनेवाले यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु. 50,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 20,000/- देणे न्यायोचित आहे असे मंचाचे मत आहे.
7. सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः
आ दे श
1. तक्रार क्र. 390/2010 अंशतः मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाले 1 ते 3 यांनी नोंदणीकृत सदनिका करारामध्ये नमुद केलेल्या सदनिकेच्या क्षेत्रफळाच्या 31.5 चौ.फुट कमी क्षेत्रफळाची सदनिका तक्रारदार यांना हस्तांतरित करुन त्रृटींची सेवा दिल्याचे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले 1 ते 3 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना 31.5 चौ. फुट सदनिका क्षेत्रफळाची किंमत रु. 76,234/- (अक्षरी रुपये शहात्तर हजार दोनशे चौतीस फक्त) तक्रार दाखल तारखेपासुन म्हणजे ता. 10/06/2011 पासून आदेशाच्या पुर्ततेपर्यंत द.सा.द.शे 12% व्याजदराने ता. 31/05/2017 पर्यंत द्यावी. विहीत मुदतीत सदर रक्कम अदा न केल्यास ता. 01/06/2017 पासून संपुर्ण रक्कम द.सा.द.शे 15% दराने द्यावी.
4. सामनेवाले 1 ते 3 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तरित्या यांना आदेश देण्यात येतो की त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाकरीता नुकसान भरपाई रु. 50,000/- (अक्षरी रुपये पन्नास हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु.20,000/- (अक्षरी रुपये वीस हजार फक्त) दि. 31/05/2017 पर्यंत दयावी. विहीत मुदतीत रकमा अदा न केल्यास दि. 01/06/2017 पासून संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत 9% व्याजदराने दयावी.
5.आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
6.संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.