Maharashtra

Dhule

CC/12/59

sanjay gulabrwo suryavnshi dhule - Complainant(s)

Versus

Jitendra Auto word nashik Mahindra Navistra Autoomotiv Limited 10 mile opp amde Hill Mumbai agra ro - Opp.Party(s)

I G Patil

22 Apr 2014

ORDER

DISTRICT CONSUMER FORUM DHULE
 
Complaint Case No. CC/12/59
 
1. sanjay gulabrwo suryavnshi dhule
R/o Plot no 201Jaihind Colony Deopur dhule
dhule
maharstrha
...........Complainant(s)
Versus
1. Jitendra Auto word nashik Mahindra Navistra Autoomotiv Limited 10 mile opp amde Hill Mumbai agra road nashik
10 mile opp Amde Mumbai Agra Road a/p jaukeTal dindori Dist nashik
dhule
maharstrha
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MRS. V.V. Dani PRESIDENT
 HON'ABLE MR. S.S. Joshi MEMBER
 
PRESENT:
 Hatekar/Rankawat, Advocate for the Opp. Party 0
ORDER

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.


 

 


 

                                  ग्राहक तक्रार क्रमांक  –   ५९/२०१२


 

                                  तक्रार दाखल दिनांक – २७/०३/२०१२


 

                                 तक्रार निकाली दिनांक – २२/०४/२०१४


 

   श्री संजय गुलाबराव सुर्यवंशी     


 

    वय - ४९, धंदा - व्‍यवसाय,


 

    रा.ह.मु.२०१, जयहिंद कॉलनी


 

   देवपूर धुळे ता.जि.धुळे                           ..…........ तक्रारदार


 

 


 

    


 

      विरुध्‍द


 

 


 

 


 

१)     जितेंद्र अॅटो वर्ल्‍ड


 

Mahindra Navistar Automotive limited


 

10th mile, opp Ambe Hill मुंबई आग्रा रोड


 

A/p Jaulke Tal. Dindori Dist Nashik


 

नाशिक ४२२२०७.


 

२)     मॅनेजर सो.


 

Mahindra Navistar Automotive limited


 

Limited 3rd floor, Mahindra Towers,


 

Worli, Mumbai 400 018.


 

३)     Jitendra Auto World


 

Dudhar Complex,


 

Opp. 06 Deesan Oil, Awdhan MIDC,


 

Mumbai – Agra Highway, Dhule.           ............. सामनेवाले


 

 


 

 


 

 


 

 


 

    


 

न्‍यायासन  


 

 (मा.अध्‍यक्षा – सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

 (मा.सदस्‍य – श्री.एस.एस.जोशी)


 

 


 

उपस्थिती


 

(तक्रारदारा तर्फे – अॅड.श्री.ए.आय. पाटील)


 

(सामनेवाला नं.१ व ३ तर्फे – अॅड.श्री.एस.एन. रांकावत)


 

(सामनेवाला नं.२ तर्फे – अॅड.श्री.ए.एम. हाथेकर)


 

 


 

निकालपत्र


 


 (द्वाराः मा.सदस्‍य – श्री. एस.एस. जोशी)


 

 


 

१.   सामनेवाले नं.१ यांच्‍याकडून घेतलेले सामनेवाले नं.२ कंपनीचे डंपर सदोष आहे. त्‍याचा पत्रा वाकला असून रंगही उडाला आहे. हे डंपर सामनेवाले नं.१ व २ यांनी बदलून द्यावे या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार दाखल केली आहे.


 

 


 

२.   तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, त्‍यांनी दि.१५/१०/२०११ रोजी सामनेवाले नं.१ यांच्‍याकडून सामनेवाले नं.२ यांनी उत्‍पादीत केलेले डंपर रूपये २४,०९,२००/- एवढया रकमेला खरेदी केले.त्‍याचा क्रमांक एम.एच.१८/ए.ए.१६६० असा आहे. या डंपरच्‍या ट्रॉलीचा पत्रा हलका, निकृष्‍ट, कमजोर आणि कमी गेजचा आहे. त्‍यामुळे डंपरचे चॅनलही वाकलेले आहेत. डंपरचा रंग उडालेला आहे. याबाबत सामनेवाले नं.१ व २ यांच्‍याकडे तक्रारी केल्‍या. त्‍यांना सविस्‍तर कळविण्‍यात आले. डंपरची छायाचित्रेही पाठविण्‍यात आली. मात्र सामनेवाले नं.१ व २ यांनी सदोष डंपर बदलून दिला नाही, असे तक्रारदार यांनी तक्रारीत नमूद केले आहे. सदोष डंपर बदलून द्यावा आणि आत्‍तापर्यंत झालेल्‍या व्‍यवसायाच्‍या नुकसानीपोटी रूपये ११,००,०००/- भरपाई द्यावी, ही रक्‍कम मिळेपर्यंत १८ टक्‍के व्‍याज द्यावे, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रूपये २५,०००/- मिळावेत, तक्रारीचा खर्च रूपये १०,०००/- द्यावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली आहे.


 

 


 

३. तक्रारदार यांनी आपल्‍या तक्रारीच्‍या पुष्‍ट्यर्थ वाहनाचे आर.सी.बुक, वाहनाचा परवाना, वाहनाचा कर भरल्‍याची पावती,  योग्‍यता प्रमाणपत्र, वाहनाचे पैसे भरल्‍याची पावती, विमा पॉलीसी, दि. ऑटोमोटिव्‍ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाने दिलेले प्रमाणपत्र आदी कागदपत्रांच्‍या छायांकीत प्रती दाखल केल्‍या आहेत.


 

  


 

४.   तक्रारदार यांच्‍या तक्रारीबाबत सामनेवाला नं.१,२ व ३ यांनी खुलासा दाखल केला आहे. सामनेवाले नं.१ व ३ यांनी आपल्‍या संयुक्‍त खुलाशात म्‍हटले आहे की, तक्रारदार यांची तक्रार खोटी आहे. तक्रारदार यांना विकलेल्‍या डंपरमध्‍ये कोणताही उत्‍पादन दोष नव्‍हता. सामनेवाले यांनी तक्रारदार यांना वेळोवेळी चांगली सेवा दिली आहे. सामनेवाले नं.२ उत्‍पादीत करीत असलेल्‍या डंपरच्‍या ट्रॉलीसाठी ऑटोमोटिव्‍ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्‍थेने प्रमाणपत्रानुसार ठरवून दिलेल्‍या गेजचाच पत्रा वापरण्‍यात येतो. त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या वाहनासाठी कमी गेजचा पत्रा वापरण्‍यात आला हे म्‍हणणे संयुक्तिक नाही. तक्रारदार यांनी निष्‍काळजीपणे डंपरमध्‍ये अतिरिक्‍त भार भरल्‍याने डंपरचे चॅनेल खराब झोले आहेत. जादा भार भरल्‍यामुळे झालेली खराबी तांत्रिक बिघाडात मोडत नाही. सामनेवाले नं.१ व ३ यांनी वाहनाच्‍या विक्रीनंतरची सेवा देखील पुरविली आहे. आजही वाहन अर्जदाराच्‍या ताब्‍यात आहे. त्‍यांनी विनाकारण खोटा, लबाडीचा वाद निर्माण केला आहे. त्‍यामुळे तक्रार रदद करून अर्जदाराकडून रूपये २,००,०००/- भरपाई मिळावी अशी विनंती सामनेवाले नं.१ व ३ यांनी केली आहे.


 

 


 

५.   सामनेवाले नं.२ यांनी आपल्‍या खुलाशात म्‍हटले आहे की, कंपनीने तक्रारदारास कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. कंपनी ए.आर.ए.आय. या संस्‍थेने ठरवून दिलेल्‍या मानकानुसारच योग्‍य गेजच्‍या पत्र्याचा वापर करते. त्‍याशिवाय उत्‍पादन कंपनीला पुर्तता प्रमाणपत्र (कम्‍प्‍लायन्‍स सर्टीफिकेट) मिळत नाही. वाहन उत्‍पादन करणा-या कोणत्‍याही कंपनीला वाहनाच्‍या रंगाबददल खात्री (गॅरंटी) देता येत नाही. कारण रंगाचा टिकावूपणा हा इतर अनेक बाहय गोष्‍टींवर अवलंबून असतो. त्‍यात वाहनाचा उपयोग कशा प्रकारे केला जातो, वाहन वापरात नसतांना ते कशा रितीने व कोठे उभे करून ठेवले जाते यावरही ते अवलंबून असते. वाहनाचा चॅनेल वाकलेला आहे, या तक्रारदाराच्‍या म्‍हणण्‍यात काही तथ्‍य नाही. ग्राहकाने नवीन वाहन घेतल्‍यानंतर सुरूवातीच्‍या काळात ठराविक कालावधीनंतर विनामुल्‍य सर्व्‍हीसिंगची व्‍यवस्‍था सामनेवाला कंपनीने केलेली होती. त्‍यावेळी तक्रारदार यांनी वरील प्रकारची तक्रार निदर्शनास आणली नाही. वाहनाच्‍या क्षमतेपेक्षा जास्‍त उपयोग केल्‍यास तो वॉरंटीला पात्र ठरत नाहीत.  तक्रारदाराच्‍या वाहनाचा क्षमतेपेक्षा जास्‍तीचा उपयोग सुरू आहे. त्‍यामुळे सदरची तक्रार खर्चासह रदद करावी अशी विनंती सामनेवाला नं.२ यांनी केली आहे.


 

 


 

६.   सामनेवाले नं.१ व ३ यांनी आपल्‍या खुलाशाच्‍या पुष्‍ट्यर्थ तक्रारदारास दिलेले कोटेशन, वाहनाचे डिलेव्‍हरी चलन, तक्रारदाराकडून मिळालेल्‍या रकमांच्‍या पावत्‍या, वाहनाचे बिल, ए.आर.ए.आय. चे प्रमाणपत्र, आर.टी.ओ. चे योग्‍यता प्रमाणपत्र, माल वाहतुकीचा परवाना, जॉब कार्ड, पी.डब्‍लू.ओ.आर. ची प्रत, तक्रारदाराने पाठविलेली नोटीस, त्‍याला सामनेवालेंनी दिलेले उत्‍तर आदी कागदपत्रांच्‍या प्रती दाखल केल्‍या आहेत.


 

 


 

७    तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांनी दाखल केलेला खुलासा, उभय पक्षांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता आणि सामनेवाले वकिलांचा युक्तिवाद ऐकल्‍यावर आमच्‍यासमोर पुढील मुददे उपस्थित होतात. त्‍यांची उत्‍तरेही आम्‍ही सकारण देत आहोत. 


 

 


 

           मुददे                                    निष्‍कर्ष


 

अ.  तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत का ?         होय


 

ब.     सामनेवाले यांनी सदोष वाहन दिले हे तक्रारदार


 

 यांनी सिध्‍द केले आहे का ?                                  नाही


 

क. आदेश काय ?                             अंतिम आदेशाप्रमाणे   


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

विवेचन


 

८.   मुद्दा -  तक्रारदार यांनी सामनेवाले नं.१ यांच्‍याकडून डंपर हे वाहन खरेदी केले आहे. हे वाहन सामनेवाला नं.२ यांनी उत्‍पादीत केले आहे. ही बाब सामनेवाला नं.१ व २ यांना मान्‍य आहे. वाहन खरेदीच्‍या पावत्‍या सामनेवाला नं.१ यांनी दाखल केल्‍या आहेत. यावरून तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. त्‍यामुळे मुददा चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत.



 

९. मुद्दा - सामनेवाले यांनी सेवेत त्रुटी केली असे तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे. डंपरच्‍या ट्रॉलीचा रंग बाहेरून निघत आहे. त्‍याचा पत्रा निकृष्‍ट असल्‍याने चॅनेल वाकला आहे. याबाबत दि.२४/१०/२०११ रोजी सामनेवाले नं.१ व २ यांच्‍या प्रतिनिधींना अडचणीबददल सांगितले होते. त्‍यांनी डंपरची छायाचित्रेही काढली होती. दि.३१/१०/२०११ रोजी सामनेवाला नं.१ यांच्‍या ई-मेलवर छायाचित्रे पाठविली होती. सामनेवाला नं.१ व २ यांच्‍या प्रतिनिधींनी दि.०४/११/२०११ रोजी तसेच दि.१०/११/२०११ रोजी डंपरची पाहणी केली होती. त्‍यानंतरही सामनेवाले यांनी सदोष डंपर बदलून दिले नाही व सदोष सेवा दिली असे तक्रारदार यांचे म्‍हणणे आहे. सामनेवाला नं.१ व २ यांनी आपल्‍या खुलाशात म्‍हटले आहे की, तक्रारदार यांना विकलेल्‍या डंपरमध्‍ये कोणताही दोष नव्‍हता. ए.आर.ए.आय ने ठरवून दिलेल्‍या मानकानुसारच, डंपरसाठी पत्रा वापरण्‍यात येतो. त्‍याशिवाय ए.आर.ए.आय चे प्रमाणपत्र मिळत नाही. तक्रारदार यांना दि.०६/१०/२०११ रोजी वाहनाचा ताबा दिला त्‍यावेळी उत्‍तम स्थितीत त्‍यांनी वाहन ताब्‍यात घेतले. डिलेव्‍हरी चलनवर तक्रारदार यांची स्‍वाक्षरी आहे, असे सामनेवाले यांनी म्‍हटले आहे. त्‍यांनी डिलेव्‍हरी चलनची प्रत दाखल केली आहे. सामनेवाले यांनी डंपरच्‍या वॉरंटीबाबतच्‍या माहिती पत्रकाची प्रतही दाखल केली आहे. त्‍यात म्‍हटले आहे की,


 

 


 

 Warranty does not cover for tipper body paint or any dent due to normal usage or abuse. No warranty applies for base plate or side steel structure of tipper body in case of any damage due to loading pattern or any accident due to usage by the owner of the tipper.


 

 


 

 Warranty does not applicable for any leakage from hydraulic kit like tipping air cylinder or PTO.


 

 


 

   Proprietary equipments, routine maintenance services & consumables & fluid top ups for different aggregates like engine, Transmission, Differential, Steering, Coolant, grease & hydraulic oil etc. are not covered under this warranty.


 

 


 

     सामनेवाले यांनी वाहनाच्‍या योग्‍यतेबाबतचे ए.आर.ए.आय. चे प्रमाणपत्र, आर.टी.ओ.चे. योग्‍यता प्रमाणपत्र दाखल केले आहे. जर वाहनात दोष असता तर ए.आर.ए.आय. आणि आर.टी.ओ. ने योग्‍यता प्रमाणपत्रच दिले नसते असे सामनेवाले यांचे म्‍हणणे आहे. तक्रारदार यांच्‍या वाहनाची पीडीआय सर्व्‍हीस दि.०३/१०/२०११ रोजी करण्‍यात आली. दि.२४/१०/२०११ रोजी दुरूस्‍ती करण्‍यात आली. दि.३१/१२/२०११ रोजी पहिली मोफत सर्व्‍हीसिंग करण्‍यात आली. दि.२९/०२/२०१२ रोजी वॉरंटीतील दुरूस्‍ती करण्‍यात आली. वरील सर्व जॉब कार्ड सामनेवाले यांनी दाखल केले आहेत. त्‍यात वाहनातील दोषाचा उल्‍लेख नाही. तक्रारदार हे डंपरचा क्षमतेपेक्षा जास्‍त वापर करीत आहेत, त्‍यामुळे त्‍यांच्‍या वाहनात दोष निर्माण झाला असावा, त्‍याला सामनेवाले यांना जबाबदार धरता येणार नाही, असा मुददा सामनेवाले यांच्‍या वकिलांनी त्‍यांच्‍या युक्‍तीबाबत उपस्थित केला. सामनेवाले नं.२ यांनी आपल्‍या खुलाशात असे नमूद केले आहे की, तक्रारदार यांच्‍या वाहनाचे निरीक्षण त्‍यांनी इंडिया बुल्‍स या वेबसाईटवर केले होते.त्‍यावेळी वाहनाचा क्षमतेपेक्षा वापर सुरू आहे, हे तक्रारदाराला सांगण्‍यात आले होते.


 

 


 

     वरील मुददा मधील विवेचन पाहता वाहनात कशाप्रकारे दोष निर्माण झाला आणि तो कोणत्‍या कारणामुळे निर्माण झाला, हे तक्रारदार यांना सिध्‍द करता आलेले नाही. उलट तक्रारदार यांना उत्‍तम स्थितीत वाहन ताब्‍यात देण्‍यात आले होते. ए.आर.ए.आय. च्‍या मानकानुसारच वाहनाची निर्मिती करण्‍यात आली आणि त्‍यासाठी योग्‍य दर्जाचा पत्रा वापरण्‍यात आला. तक्रारदार हे वाहनाचा क्षमतेपेक्षा जास्‍त वापर करीत आहेत आणि ती बाब त्‍यांना सांगण्‍यात आली होती, हे सामनेवाले यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याच कारणामुळे मुददा ‘ब’ चे उत्‍तर आम्‍ही नाही असे देत आहोत.


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

१०. मुद्दा – वरील विवेचन आणि सामनेवाले यांनी मंचाच्‍या निदर्शनास आणून दिलेल्‍या बाबींचा विचार करता, तक्रारदार यांनी त्‍यांची तक्रार सिध्‍द केलेली नाही, असे मंचाचे मत बनले आहे. त्‍यामुळे सामनेवालेंविरूध्‍द कोणतेही आदेश करता येणार नाहीत असे मंचाला वाटते. सबब आम्‍ही पुढीलप्रमाणे आदेश करीत आहोत.


 

आ दे श


 

१.     तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्‍यात येत आहे.


 

 


 

२.    खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाहीत.


 

 


 

धुळे.


 

दि.२२/०४/२०१४.


 

             (श्री.एस.एस. जोशी)  (सौ.व्‍ही.व्‍ही. दाणी)


 

                    सदस्‍य           अध्‍यक्षा


 

              जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, धुळे.
 
 
[HON'ABLE MRS. V.V. Dani]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. S.S. Joshi]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.