Maharashtra

Chandrapur

CC/15/172

Yogana Pitar Shirwarr At Chandrapur - Complainant(s)

Versus

Jham Builders and Developers Pvt Ltd Nagpur - Opp.Party(s)

Adv. Tandan

08 Nov 2017

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL FORUM
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/15/172
 
1. Yogana Pitar Shirwarr At Chandrapur
At Krishan Coloony Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jham Builders and Developers Pvt Ltd Nagpur
Corporet office Kanhya whites 1 Near Swamidham Mandir Besa Nagpur tah Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Hemant Jham
Somalwada Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shri Mukesh Jham
At Somalwada Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Shri Manish Kamble
Rajkala Tokies Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/173
 
1. Shri Sushant Balwant Pujari At Chandrapur
Datala Road Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jham Builders and Developers Pvt Ltd Nagpur
Swamidham Mandir Besa Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Hemant Jham
Nagpur
Nagpur
Maharashtra
3. Shri Mukesh Jham
Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Shri Manish Kamble
Ekori Ward Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
Complaint Case No. CC/15/174
 
1. Shri Prasana Pitar Shirwar
Kshchand Colony Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jham Builders and Developers Pvt Ltd Nagpur
Swamidham Mandir Besa Nagpur
Nagpur
Maharashtra
2. Shri Hemant Jham
Chandrapur
Chandrapur
Maharashtra
3. Shri Mukesh Jham
Somalwada Raod Nagpur
Nagpur
Maharashtra
4. Shri Manish Kamble
Near Rajkala Toikies chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR PRESIDENT
 HON'BLE MRS. MRS.Kirti Gadgil Vaidya MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 08 Nov 2017
Final Order / Judgement

::: नि का   :::

मंचाचे निर्णयान्‍वये,  उमेश वि. जावळीकर मा. अध्‍यक्ष

१.    सामनेवाले यांनी, तक्रारदारांस ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्‍याने प्रस्‍तूत तक्रार दाखल केली आहे. 

२.    सामनेवाले क्र. १ ते ३ विकसीत करीत असलेल्‍या कन्‍हैया सिटी फेस २  मौजा वगधारा तह. हिंगना जि. नागपुर येथिल खसरा क्र. १०८ व १०९ प.ह.क. ४६ या मिळकतीवर उभारण्‍यात येणा-या संकुलातील रो- हाऊस क्र. २४९ जेस्‍मीन एक बेडरुम, हॉल, किचन प्‍लॉट आराजी ६४७.०० सुपरबिल्‍ट अप एरीया   ३९०.०० चौ. फुट मिळकतीची खरेदी किंमत रक्‍कम रु. ६,५१,०००/- निश्‍चीत करुन दिनांक १३.०९.२०१० रोजी धनादेशाव्‍दारे रक्‍कम रु. ११,०००/-, दिनांक २०.०९.२०१० रोजी रक्‍कम रु. ५१,०००/- व दिनांक २१.१०.२०१० रोजी रक्‍कम रु. ६८,०००/- अशी एकुण रक्‍कम रु. १,३०,०००/-  तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ ते ३ यांना अदा केले. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी दिनांक ०२.१२.२०१० रोजी केलेल्‍या करारनाम्‍यातील अटी व शर्तीप्रमाणे २४ ते ३० महिण्‍याच्‍या कालावधीमध्‍ये रो-हाऊसचा ताबा देण्‍याबाबत कबुल केले होते. परंतु सदर बाबीची पुर्तता न झाल्‍याने  तक्रारदार यांनी सामनेवाले क्र. १ ते ४ यांना वकिलामार्फत दिनांक १४.०७.२०१५ रोजी नोटीस पाटवुन रो-हाऊसचा ताबा देण्‍याबाबत विलंब केल्‍याने व्‍यवहाराची रक्‍कम परत करावी अशी मागणी करुन देखील सामनेवाले क्र. १ ते ४ यांनी रक्‍कम परत न दिल्‍याने तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार दाखल आहे.

 

३.    सामनेवाले क्र. १ ते ३ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, हजर न राहिल्‍याने दिनांक १४.०७.२०१६ रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्‍यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.

४.   सामनेवाले क्र. ४ यांना मंचाची नोटीस पाठविली असता, सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारीतील मुद्द्याचे खंडन करुन सामनेवाले क्र. १ ते ३ यांचे कंपनीशी व तक्रारदाराशी कुठलाही संबंध नाही. तसेच तक्रारदाराने सामनवाले क्र. ४ च्‍या माध्‍यमातुन सामनेवाले क्र. १ ते ३ च्‍या वतीने कुठलीही रक्‍कम स्विकारली नसुन सदरहु रक्‍कम तक्रारदारांच्‍या वतीने सामनेवाले क्र. १ ते ३ यांना दिली नाही. त्‍यामुळे सामनेवालेक्र. ४ हे सामनेवाले क्र. १ ते ३ यांचे कंपनीचे प्रतिनीधी होते. हि बाब सिध्‍द झालेली नाही. त्‍यामुळे सामनेवाले क्र. ४ यांचे विरुध्‍द तक्रार अमान्‍य करण्‍यात यावी. अशी विनंती सामनेवाले क्र. ४ यांनी केली आहे.  

६.  तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तिवादाची पुरशिस व सामनेवाले क्र. ४ यांचे लेखी म्‍हणने, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाची पुरशिस यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे कायम करण्‍यात येतात. 

                 मुद्दे                                                       निष्‍कर्ष 

१.   सामनेवाले क्र. १ ते ३ वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे

    यांनी तक्रारदारास प्‍लॅाट विक्री कराराप्रमाणे सेवासुविधा

    पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिद्ध

    करतात काय ?                                          होय    

२.   सामनेवाले क्र. १ ते ३ वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे

    तक्रारदारास नुकसान भरपाई अदा करण्यास पात्र

    आहेत काय ?                                          होय 

३. सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारदारास प्‍लॅाट विक्री

   कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची

   बाब तक्रारदार सिद्ध करतात काय ?                     नाही

४.   आदेश ?                                                              अंशतः मान्‍य

 

                       

कारण मिमांसा

मुद्दा क्र. १ व २ :

५.     सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी दिनांक २७.१०.२०१० रोजी तक्रारदारासोबत केलेल्‍या प्‍लॉट विक्री करारनाम्‍यातील अटी व शर्तीप्रमाणे २४ ते ३० महिण्‍यांच्‍या कालावधीमध्‍ये प्‍लॉट चा वैध ताबा देण्‍याचे कबुल केले होते. परंतु त्‍याप्रमाणे पुर्तता न केल्‍याने तक्रारदाराने दिनांक १४.०७.२०१५ रोजी सामनेवाले क्र. १ ते ४ यांना वकिलामार्फत नोटीस पाठवुन व्‍याजासह रक्‍कम परत मिळण्‍याबाबत  विनंती केली. सबब  सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी तक्रारदारास सेवा सुविधा पुरविण्‍यात कसूर केल्याची बाब सिध्‍द झाल्‍याने व परिणामी तक्रारदारास मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास झाला आहे ही बाब सिध्‍द झाल्‍याने मुद्दा क्रं. १ व २ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्‍यात येते. 

मुद्दा क्र. ३ : 

६.    सामनेवाले क्र. ४ यांनी दिनांक २१.०७.२०१५ रोजी तक्रारदारास सदर नोटीसचे उत्‍तर पाठवुन नोटीस मधिल मुद्द्याचे खंडन केले. सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारदार व सामनेवाले क्र. ३ यांचेमध्‍ये व्‍यवहाराची कोणतेही माहिती सामनेवाले क्र. ४ यांना नसुन सामनेवाले क्र. ४ यांनी कोणत्‍याही कागदपत्रावर स्‍वाक्षरी केलेली नाही. त्‍यामुळे सामनेवाले क्र. ४ यांनी तक्रारदारास कोणतीहीसेवा सुविधा पुरविण्‍यास कसुर केला नाही. सबब सामनेवाले क्र. ४ यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश पारीत करण्‍यात येवु नये अशी विनंती केली आहे. सदर वाद कथनाहुन व कागपत्राचे अवलोकन केले असता सामनेवाले क्र. ४ यांची करारनाम्‍यावर कुठेही स्‍वाक्षरी नसुन तक्रारदारांनी सामनेवाले क्र. १ ते ३ यांना धनादेशाव्‍दारे रक्‍कम अदा केली असल्‍याने सामनेवाले क्र. ४ यांचे विरुध्‍द कोणतेही आदेश पारीत करणे न्‍यायोचीत नाही. असे मंचाचे मत आहे.

 

मुद्दा क्र. ४ : 

७.    मुद्दा क्रं. १ ते ३ वरील विवेचनावरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.

 

 

 

 

आदेश

 

     १.  ग्राहक तक्रार क्र. १७४/२०१५ अंशतः मान्‍य करण्‍यात येते.

         २.  सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे तक्रारदार

        यांना प्‍लॉट खरेदी कराराप्रमाणे , ग्राहक संरक्षण अधिनियम अन्‍वये

        तरतुदीनुसार, सेवासुविधा पुरविण्‍यात कसुर केल्‍याची बाब जाहीर

        करण्यात येते.

     ३. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे तक्रारदार

        यांना प्‍लॉट खरेदी कराराप्रमाणे रक्कम रुपये १,३०,०००/- दिनांक

        ०२.१२.२०१० पासून अदा करेपर्यंत द.सा.द.से. १२% व्याजासह

        तक्रारदार यांना अदा करावी.

     ४. सामनेवाले क्र. १ ते ३ यांनी वैयक्‍तीक व संयुक्‍तीकपणे तक्रारदार

        यांना प्‍लॉट खरेदी कराराप्रमाणे सेवासुविधा पुरविण्‍यात कसूर करुन

        तक्रारदार यांना मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रासापोटी व तक्रार

        खर्चापोटी एकत्रित रक्कम रु. १,००,०००/- या आदेशप्राप्ती

        दिनांकापासून ३० दिवसात तक्रारदार यांना अदा करावे.

      ५.  सामनेवाले क्र. ४ यांचे विरुद्ध कोणतेही आदेश नाहीत. 

            ६.  उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्‍काळ पाठविण्‍यात यावी. 

 

 

 

 श्रीमत श्रीमती.कल्‍पना जांगडे  श्रीमती. किर्ती गाडगीळ   श्री.उमेश वि. जावळीकर        

       (सदस्‍या)          (सदस्‍या)             (अध्‍यक्ष)     

 
 
[HON'BLE MR. UMESH V.JAWALIKAR]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MRS.Kirti Gadgil Vaidya]
MEMBER
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.