(मा. अध्यक्ष, श्री. संजय वा. पाटील यांच्या आदेशान्वये)
निकालपत्र
(पारित दिनांक 14.01.2019)
- तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली असून त्यात नमूद केले की, विरुध्द पक्ष हे बांधकामाचा व्यवसाय करतात. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडून रो-हाऊस क्रं. 270, ओरचिट’ 2 बीएचके, कन्हैया सिटी फेस 2, क्षेत्रफळ 585 चौ.फु. सुपर बिल्डप एरिया 850 चौ.फु. त्याचा खसरा क्रं. 94 प.ह.नं. 46, मौजा वागधरा. तह.हिंगणा, जि. नागपूर एकूण रुपये 11,00,000/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक 20.04.2011 रोजी केला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे वरील नमूद रो-हाऊस करिता रुपये 2,21,000/- चा भरणा केला होता. विरुध्द पक्षाने वरील नमूद कराराप्रमाणे पूर्तता केली नाही व सदरहू जागेवर बांधकाम केले नाही आणि तक्रारकर्ता व इतर ग्राहकांची रक्कम न देण्याचे ठरविल्यामुळे त्याने आपले कार्यालय दूरध्वनी आणि मोबाईल कायमचे बंद करुन टाकले. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाला वकिला मार्फत नोटीस पाठविली तरी ही विरुध्द पक्षाने सदरहू व्यवहार पूर्ण केला नाही. म्हणून सदरची तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे.
2. तक्रारकर्त्याने तक्रारीत अशी मागणी केली आहे की, त्याने विरुध्द पक्षाकडे सदनिका/ रो-हाऊस पोटी भरलेली रक्कम रुपये 2,21,000/- ही रक्कम 20 टक्के व्याजासह परत मिळावी. तसेच तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई म्हणून रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 40,000/- देण्याचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे.
3. विरुध्द पक्ष यांना मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्त होऊन सुध्दा प्रकरणात हजर झाले नाही. म्हणून दिनांक 06.09.2018 रोजी नि.क्रं. 1 वर विरुध्द पक्ष यांच्या विरुध्द प्रकरण एकतर्फी चालविण्याचा आदेश करण्यात आला.
4. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकून मंच खालील निष्कर्षा प्रत आहे.
अ.क्रं. मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारकर्ता विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे काय ? होय
2. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याला त्रुटीपूर्ण सेवा दिली काय? होय
3. काय आदेश ? आदेशाप्रमाणे
निष्कर्ष
5. मुद्दा क्रमांक 1, 2 व 3 बाबत- तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांच्याकडे रो-हाऊस क्रं. 270, ओरचिट’ 2 बीएचके, कन्हैया सिटी फेस 2, क्षेत्रफळ 585 चौ.फु. सुपर बिल्डअप एरिया 850 चौ.फु. त्याचा खसरा क्रं. 94, प.ह.नं. 46, मौजा वागधरा. तह.हिंगणा, जि. नागपूर एकूण रुपये 11,00,000/- मध्ये खरेदी करण्याचा करार दिनांक 20.04.2011 रोजी केला. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे वरील नमूद रो-हाऊस करिता रुपये 2,21,000/- एवढया रक्कमेचा भरणा केला होता, ही बाब तक्रारकर्त्याने नि.क्रं. 2 वर दाखल करारनामाबाबतचे कागदपत्रावरुन सिध्द होते. म्हणून तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे असे सिध्द होते. तसेच विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्या सोबत रो-हाऊस करिता करार केला व त्याकरिता तक्रारकर्त्याकडून रक्कम स्वीकारुन ही सदनिकेचे बांधकाम केले नाही व घेतलेली रक्कम पूर्णपणे परत केली नाही, ही विरुध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटी असल्याचे सिध्द होते.
सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित
अंतिम आदेश
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्याकडून घेतलेली रक्कम रुपये 2,21,000/- आदेश
पारित झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आंत द्यावे.
- विरुध्द पक्षाने सदरहू रक्कमेवर द.सा.द.शे. 16 टक्के दराने व्याज दिनांक
20.04.2011 पासून तर प्रत्यक्ष अदाएगीपर्यंत तक्रारकर्त्याला द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक, मानसिक त्रासाबाबत रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे.
- वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत विरुध्द पक्षाने करावी.
- उभय पक्षांना आदेशाची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
- तक्रारकर्त्याला प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.