Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक 20/05/2022) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे कलम 35 अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे बचत खाते उघडून रक्कम जमा केली तक्रारकर्त्याने दिनांक 8/12/2015 पासून दि. 09/07/2020 पर्यंत प्रतीमाह रु. 5,000 /- असे एकूण रु. 1,83,000/- जमा केले तक्रारकर्त्याने हि बचत त्याच्या मुलाच्या शिक्षणाकरीताम्हणून वि.प. यांचेकडे जमा केली. वि.प. यांनी तक्रारकर्त्यास जे.के.सी. एच1-2-16 सबस्क्राइबर नं.08 असलेले पासबुक दिले. वि.प.यांचे कर्मचारी याने तक्रारकर्त्याने दिलेल्या रकमा स्विकारून नोंद केली. वि.प.यांचेकडे जमा झालेली रक्कम रु. 1,83,000/-पैकी फक्त रु. 75,000/- तक्रारकर्त्यास दिले व पासबुकनुसार उर्वरित रक्कम रु. 1,08,000/- दिले नाही.तक्रारकर्त्याने उर्वरित रक्कम व्याजासह मिळण्यास वि.प. यांचेकडे वारंवार मागणी केली परंतु वि.प. यांनी कबूल केलेल्या कालावधीत उर्वरित रक्कम दिलेली नाही.वि.प. हे तक्रारकर्त्यास खाते उघडल्यापासून पूर्ण असलेली देय रक्कम व्याजासह देण्यासाठी जबाबदार आहे वि.प.यांनी रक्कम न दिल्याने तक्रारकरत्याने दि. 11/11/2021 रोजी अधिवक्ता यांचे मार्फत नोटीस पाठवून त्यांचेकडे बाकी असलेल्या रक्कमेची मागणी केली परंतु नोटीस प्राप्त होऊनसुध्दा त्यांनी त्याची पुर्तता केली नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास उर्वरित रक्कम न देऊन तक्रारकर्त्याप्रति न्युनतम सेवा दिल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की,तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे दिनांक 8/12/2015 पासून दि. 09/07/2020 पर्यंत प्रतीमाह रु. 5,000 /- असे एकूण रु. 1,83,000/- जमाकेली आहे त्यापैकी उर्वरित रक्कम रु. 1,08,000/- व त्यावर दिनांक 8/12/2015 पासून 18 % व्याजासह तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- आणि तक्रारीचा खर्च रुपये 20,000/- अदा करण्याचे आदेशीत व्हावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन फक्त विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आलली. विरुध्द पक्ष यांना नोटीस प्राप्त होऊनही ते आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही, करिता विरुध्द पक्ष विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक 24/02/2022 रोजी निशानी क्रमांक 1 वर पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, तक्रार दस्तावेज यातील मजकुरालाच शपथपञ समजण्यात यावे अशी पुर्सीस आणि तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष 1. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे होय ग्राहक आहेत कायॽ 2. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याप्रति होय न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ 3. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे मुद्दा क्रमांक 1 बाबतः- - तक्रारकर्त्याने, विरुध्द पक्ष यांचे कडे बचत खाते उघडून रक्कम जमा केली. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांकडे दिनांक 8/12/2015 पासून दि. 09/07/2020 पर्यंत दरमहा चिटच्या रकमेचा कमी जास्त प्रमाणात भरणा केला. विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याकडून रक्कम स्विकारुन पासबुक मध्ये नोंद घेवून स्वाक्षरी केल्याचे निदर्शनास येते. तक्रारकर्त्याने सदर पासबुक प्रकरणात निशानी क्रमांक 4 सोबत दस्त क्रमांक अ-1 वर दाखल केले आहे. यावरुन तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबतः- - तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडे दरमहा 5,000/-,40 महिन्यापर्यंत रकमेचा भरणा करायचा होता तक्रारकर्त्याने जुलै 2020 पर्यंत कमी जास्त प्रमाणात रकमेचा भरणा केलेला आहे आणि त्या रकमेचा विरुध्द पक्षांनी स्विकार करुन तशी नोंद पासबुकमध्ये करुन दिली.तक्रारकर्त्याने दिनांक 08/12/2015 ते दिनांक 09/07/2020 पर्यंत विरुध्द पक्षाकडे एकूण रक्कम रु. 1,54,140/- जमा केल्याचे हे निशानी क्रमांक 4 सह दस्त क्रमांक अ-1 दाखल पासबुक नोंदीवरून स्पष्ट होते. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत कथन केले आहे कि तक्रारकर्त्याने त्यांचेकडे जमा असलेल्या रकमेची मागणी केली असता वि.प. यांनी तक्रारकर्त्यास फक्त रु.75,000/-दिले व उर्वरित रक्कमरु.1,08,000/- दिली नाही.त्यामुळे तक्रारकर्त्याने दिनांक 11/11/2021 रोजी विरुध्द पक्ष यांना अधिवक्ता मार्फत नोटीस पाठविली परंतु नोटीस प्राप्त झाल्यावरही त्यांनी त्याची पुर्तता केली नाही. सदर नोटीस, पोस्टाच्या पावत्या व नोटीस मिळाल्याबाबत पोस्टाचा ट्रक रिपोर्ट अनुक्रमे दस्त क्रमांक अ-2 ते अ-4 वर प्रकरणात दाखल आहे. तक्रारकर्त्याचा आक्षेप विरुध्द पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्या बचावाचे समर्थनार्थ कोणतेही म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही. तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षाकडे चिट फंड मध्ये एकूण रक्कम रु. 1,54,140/-जमा केल्याचे पासबुक वरुन स्पष्ट होते. तक्रारकर्ता यांनी जमा रकमेपैकी रु.75,000/-प्राप्त झाल्याचे त्यांनी मान्य केले आहे. तक्रारकर्ता यांनी वि.प.कडे रक्कम रु. 1,83,000/- जमा केले होते व आता त्यांना उर्वरित रक्कम रु. 1,08,000/-घेणे आहे याबाबत कोणाताही दस्तावेज वा पुरावा दाखल केला नाही.त्यामुळे विरुध्द पक्ष हे तक्रारकर्त्याला उपरोक्त पासबुक मध्ये जमा असलेल्या रक्कमेपैकी रु.75,000/-वजा जाता उर्वरित रक्कम देणे लागतात परंतु मागणीनंतर तसेच परिपक्वता तिथीनंतर तक्रारकर्त्याने वारंवार मागणी करुनही विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्याला रक्कम परत न करुन तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दर्शविली हे दाखल दस्तवेजांवरुन सिध्द होते या निष्कर्षाप्रत आयोग आले आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष यांचेकडून पासबुक मध्ये जमा असलेल्या रक्कमेपैकी रु.75,000/-वजा जाता उर्वरित रक्कम व्याजासह तसेच रक्कम परत न केल्याने झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3बाबतः- - मुद्दा क्रमांक 1 व 2च्या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. 21/242 अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारर्त्याला ग्रुप जे.के.सी.एच-1-2-16, पासबुक मध्ये जमा असलेली रक्कम रु. 1,54,140/-पैकी रु.75,000/-वजा करून उर्वरित रक्कम व त्यावर निकाल दिनांक 20/05/2022 पासून 6 टक्के द.सा.द.शे. व्याज तक्रारकर्त्याचे प्रत्यक्ष रक्कम हातात पडेपर्यंत अदा करावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये 10,000/-व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
(किर्ती वैद्य (गाडगीळ)) (कल्पना जांगडे (कुटे)) (अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष | |