Maharashtra

Chandrapur

CC/21/81

Shri.Chandrakant Mahadeorao Gatalewar - Complainant(s)

Versus

Jet Kingdom Chit Pvt. Ltd. Through Manager/Pradhikrut Adhikari Shri.Rajesh Polewar - Opp.Party(s)

M.S.Childule

28 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/81
( Date of Filing : 21 Jun 2021 )
 
1. Shri.Chandrakant Mahadeorao Gatalewar
Qua.no.B-13,D.S.B.,Aria Hospital,Wekoli,Lalpeth,Chandrapur,Tah.Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Jet Kingdom Chit Pvt. Ltd. Through Manager/Pradhikrut Adhikari Shri.Rajesh Polewar
Arvind nagar,Gurudwara road,Adarsh petrol pump samor,Chandrapur,Tah.Dist.Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 28 Feb 2023
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                  (पारीत दिनांक २८/०२/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, कलम ३५ सह ३८ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हे डब्‍ल्‍यु.सी.एल. रय्यतवारी येथे नोकरीवर असून ते सेवानिवृत्‍त आहे. तक्रारकर्त्‍याने दिनांक १५/१०/२०१७ रोजी विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे असलेल्‍या जेट किंगडम चिट फन्‍ड मध्‍ये रक्‍कम रुपये ५,००,०००/- च्‍या रुपयाकरिता दरमहा रुपये १०,०००/- नुसार फंड मध्‍ये रक्‍कम रुपये ३,८७,४६८/- या रकमेचा भरणा भरणा केलेला असून  माहे नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये संपूर्ण चिट्स नुसार रक्‍कम भरलेली चिट्स ही संपलेली असून तक्रारकर्त्‍याने सदरच्‍या चिट्सनुसार कोणतीही रक्‍कम उचल केलेली नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने माहे नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये विरुध्‍द पक्षाकडे रकमेची मागणी केली असता विरुध्‍द पक्ष यांनी सदर रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांच्‍या फंड मध्‍ये दिनांक १५/११/२०१५ रोजी रक्‍कम रुपये १०,०००/- पावती क्रमांक १३८५२ नुसार जमा केलेली आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीच्‍या अभिलेखावर विरुध्‍द पक्ष यांनी दिलेली चिट्स फंडचे पासबुक दाखल केलेले असून तक्रारकर्त्‍याने जमा करीत असलेल्‍या चिट्स फंड मध्‍ये २० सदस्‍य असून सदरची चिट्स फंड हा रक्‍कम रुपये ५,००,०००/- चा होता व त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने माहे नोव्‍हेंबर २०१९ पर्यंत रुपये ३,८७,४६८/- भरणा केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने सदर चिट्स फंडमध्‍ये कोणतीही बोली बोलली नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची संपूर्ण रक्‍कम चिट्स संपेपर्यंत म्‍हणजेच माहे नोंव्‍हेंबर २०१९ पर्यंत फंड नुसार रुपये ५,००,०००/- इतकी झाली. तक्रारकर्त्‍याने सदरची रकमेची मागणी विरुध्‍द पक्ष यांना केल्‍यास विरुध्‍द पक्षयांनी रक्‍कम अडचण असल्‍यामुळे नंतर देण्‍यात येईल असे सांगून नंतर वेळोवेळी मागणी करुनही सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याला दिली नाही. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडे पावती क्रमांक १३८५२ व शेवटची पावती क्रमांक २२५४८ नुसार एकूण ५० पावत्‍यानुसार रकमेचा भरणा केलेला असून सदर पावत्‍या तक्रारीत दाखल केलेल्‍या आहेत. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याची भरलेली चिट्स फंडची रक्‍कम मागणी करुनही न दिल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याप्रती सेवेत न्‍युनता दिली असल्‍यामुळे सदर तक्रार विरुध्‍द पक्ष विरुध्‍द दाखल केली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रारीत विरुध्‍द पक्ष विरुध्‍द अशी मागणी केली आहे की, विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याकडे जमा असलेली रक्‍कम रुपये ५,००,०००/- व्‍याजासह द्यावी तसेच तक्रारकर्ता यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक व आर्थिक ञासापोटी रक्‍कम रुपये १,००,०००/- देण्‍याचा आदेश व्‍हावा तसेच तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- तक्रारकर्त्‍याला देण्‍यात यावे.
  4. आयोगातर्फे विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविण्‍यात आले. नोटीस प्राप्‍त होऊनही विरुध्‍द पक्ष आयोगासमोर उपस्थित न झाल्‍यामुळे विरुध्‍द पक्ष विरुध्‍द तक्रार दिनांक १०/०३/२०२२ रोजी तक्रार एकतर्फा चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  5. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तऐवज तसेच शपथपञ व तोंडी युक्तिवाद वरुन      तक्रारीच्‍या निकालीकामी निष्‍कर्षे आणि कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे.

 

कारणमीमांसा

 

  1. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडे दिनांक १५/११/२०१५ रोजी रक्‍कम रुपये १०,०००/-, पावती क्रमांक १३८५२ नुसार जमा केली असून शेवटची पावती क्रमांक २२५४८ नुसार एकूण ५० पावत्‍यानुसार रकमेचा भरणा विरुध्‍द पक्षाकडे केलेला आहे. विरुध्‍द पक्ष यांनी सदर रक्‍कम तक्रारकर्त्‍याकडून स्‍वीकारलेले आहे, ही बाब तक्रारकर्त्‍याने तक्रारीत दाखल केलेल्‍या निशानी क्रमांक ४ नुसार अ-१ वर दाखल केलेल्‍या पासबुकातील नोंदी व त्‍यावरील स्‍वाक्षरी वरुन स्‍पष्‍ट होत असल्‍यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षांचा ग्राहक आहे. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केलेले कथन व दस्‍तऐवजाचे अवलोकन केले असता तक्रारकर्ता यांनी विरुध्‍द पक्षांकडे दरमहा रुपये १०,०००/- प्रमाणे ५० महिणे रुपये ५,००,०००/- चा भरणा करायचा होता. विरुध्‍द पक्ष यांचा चिट फंड हा ५,००,०००/- चा होता परंतु तक्रारकर्त्‍याने दाखल दस्‍तऐवजानुसार व दाखल पावत्‍यानुसार सन २०१९ पर्यंत रक्‍कम रुपये ३,८७,४६८/- चा भरणा विरुध्‍द पक्षांकडे केला. तक्रारकर्त्‍याने तक्रारी कथन केले आहे की, सदरील चिट्स फंड मध्‍ये त्‍यांनी कोणतीही बोली बोललेली नव्‍हती त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची संपूर्ण रक्‍कम चिट्स संपेपर्यंत म्‍हणजे माहे नोव्‍हेंबर पर्यंत फंडनुसार रुपये ५,००,०००/- इतकी झाली. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे कथन प्रकरणात उपस्थित राहून खोडून काढले नसून त्‍याचे बचावाचे समर्थन करण्‍याकरिता कोणतेही कागदपञ प्रकरणात दाखल केलेले नाही. विरुध्‍द पक्षाविरुध्‍द तक्रार एकतर्फा चालविण्‍याचे आदेश दिनांक १०/०३/२०२२ रोजी करण्‍यात आले. याउलट तक्रारकर्त्‍याने तक्रारीत विरुध्‍द पक्ष यांच्‍याकडे कमी जास्‍त प्रमाणात जमा केलेली रक्‍कम व त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला प्रदान केलेल्‍या पावत्‍या दाखल केलेल्‍या असून अ-१ वर दाखल केलेल्‍या विरुध्‍द पक्ष यांचे चिट फंड मध्‍ये रक्‍कम जमा केल्‍याचे पासबुकवरुन स्‍पष्‍ट होत आहे तसेच सदर पासबुक नुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍दपक्ष यांचेकडे चिट फंड रक्‍कम रुपये ५,००,०००/- करिता दरमहा रुपये १०,०००/- नुसार किंवा कधी कमी जास्‍त प्रमाणात रकमेचा भरणा माहे नोव्‍हेंबर २०१९ पर्यंत रुपये ३,८७,४६८/- चा भरणा केलेला आहे. तक्रारकर्त्‍याने त्‍याची तक्रार सिध्‍द करण्‍याकरिता दस्‍तऐवजासह शपथपञ दाखल करुन त्‍यात नमूद केले आहे की, सदर विरुध्‍द पक्षाच्‍या चिट फंड मधून कोणत्‍याही रकमेची उचल त्‍यांनी केलेली नाही, त्‍यामुळे नोव्‍हेंबर २०१९ मध्‍ये परिपक्‍वता तिथीनंतर तक्रारकर्त्‍याने वारंवार रकमेची मागणी करुनही विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला रक्‍कम परत न करुन तक्रारकर्त्‍याप्रती सेवेत न्‍युनता दर्शविली, हे दस्‍तऐवजावरुन स्‍पष्‍ट होत आहे. त्‍यामुळे तक्रारकर्ता हे विरुध्‍द पक्षाकडून पासबुक मध्‍ये जमा असलेली रक्‍कम व्‍याजासह मिळण्‍यास पाञ असून विरुध्‍द पक्षाकडून झालेल्‍या मानसिक व शारीरिक नुकसान भरपाई तसेच तक्रारीचा खर्च मिळण्‍यास पाञ आहे, असे आयोगाचे मत आहे.  
  2.      वरील विवेंचनावरुन आयोग खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

 

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. ८१/२०२१ अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला तक्रारीत दाखल पासबुकप्रमाणे जमा असलेली रक्‍कम रुपये ३,८८,९९२/- व त्‍यावर आदेश दिनांकपासून ६ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे प्रत्‍यक्ष हातात पडेपर्यंत अदा करावे.
  3. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक वमानसिक ञासापोटी नुकसार भरपाई रक्‍कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- अदा करावे.
  4. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.