Maharashtra

Nagpur

CC/229/2019

DEEPAK JUGALKISHOR CHOWDHARY THROUGH ITS POWER OF ATTORNEY HOLDER SHRI KUSHAL DEVIDAS SALODKAR - Complainant(s)

Versus

JET AIRWAYS INDIA LIMITED - Opp.Party(s)

ADV HEMA GOYAL

02 Jul 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/229/2019
( Date of Filing : 09 Apr 2019 )
 
1. DEEPAK JUGALKISHOR CHOWDHARY THROUGH ITS POWER OF ATTORNEY HOLDER SHRI KUSHAL DEVIDAS SALODKAR
PLOT NO 2, SURYANSH, GANDHI NAGAR NEAR LAD COLLEGE SQUAERE, NAGPUR BALAJI NAGAR, MANEWADA ROAD NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
2. RAJSHREE PATHY DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
3. VIKRAM SINGH MEHTA DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
4. ASHOK CHAWLA DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
5. NARESH JAGDUSHRAI GOYAL DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
6. GAURANG ANANDA SHETTY WHOLETIME DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMTIED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
7. ANITA NARESH GOYAL DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
8. AMIT AJAYKRISHNA AGARWAL CFO JET AIRWAYS INIDA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
9. RANJAN MATHAI DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
10. NASIN ZAIDI DIRECTOR JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
11. VINAY DUBE CEO JET AIRWAYS INDIA LIMITED
SIROYA CENTRE, SAHAR AIRPORT ROAD, ANDHERI EAST MUMBAI 400099
MUMBAI
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 02 Jul 2021
Final Order / Judgement

(आदेश पारीत व्‍दारा- श्रीमती चंद्रिका बैस, मा. सदस्‍या)

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 12 अन्वये दाखल केली असुन विस्‍तृत तक्रार खालीलप्रमाणे..
  2. तक्रारकर्ता हा जेट प्रिवीलेज  यांचा प्‍ल्‍ॅाटीनम  मेंबर असून त्‍यांचा मेंबरशिप क्रमांक  101546513  असा आहे.  तसेच तक्रारकत्‍याने श्री कुशल देवीदास सालोडकर यांच्‍या नावाने न्‍यायालय समक्ष प्रकरण चालविण्‍याकरिता आममुखत्‍यारपञ दिलेले आहे. विरुध्‍द पक्षांनी आपल्‍या व्‍यवसायाची प्रसिद्धी करण्‍याकरिता आपल्‍या सदस्‍यांना ऑफर दिली. त्‍यानुसार दिनांक 16/9/2018 रोजी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 यांच्‍या मार्फत चेन्‍नई ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर अशा विमान प्रवासाकरिता आरक्षण केले. त्‍याकरिता त्‍यांचा फ्लाईट क्रमांक 9W-429 असा असून त्‍यांचा ई-टिकीट क्रमांक 5892135258386 असा होता व परतीच्‍या प्रवासाचा म्‍हणजेच मुंबई ते नागपूर या प्रवासाकरिता त्‍यांचा फ्लाईट क्रमांक 9W-2865 असा असून हे विमानाचे आरक्षण 17/09/2018  रोजीचे होते. त्‍याकरिता तक्रारकर्त्‍याने खालिलप्रमाणे तक्‍ता दिलेला आहे.

Date

Dep. Time

From

To

Flight No.

Upsell bidding offer

Amount deducted

17/9/2018

16:50 Hrs

Chennai (MAA)

Mumbai (BOM)

9W429

8500/-

8500/-

17/09/2018

19:35 Hrs

Mumbai

Nagpur(NAG)

9W2865

5000/-

10200/-

 

विरुध्‍द पक्षाने ऑनलाईन आरक्षण करतेवेळी तक्रारकर्त्‍यास दिनांक 17/09/2018  रोजी फ्लाईट क्रमांक 9W-2865 यावर मुंबई ते नागपूर या प्रवासाकरिता 5,000/- ची सुट असल्‍याबाबत कळविले होते. तसेच विमानामध्‍ये इकानॉमी आरक्षनावरुन बिझनेस क्‍लास मध्‍ये बदल करावयाचे असल्‍यास 5,000/- ची सुट देण्‍याचा ऑफर होती. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाकडे रुपये 10,200/- जमा केले. परंतु विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याची ऑफर ची रक्‍कम वजा करण्‍यास विसरले. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने टिकीट प्राप्‍त झाल्‍यानंतर विरुध्‍द पक्षाकडे त्‍यासंबंधी दिनांक 16/09/2018  रोजी ई-मेल करुन टिकीट मध्‍ये सुधारणा करुन रुपये 5,200/- तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात वळते करण्‍यासंबंधी कळविले. तक्रारकर्त्‍याने दिनांक 17/9/2018  रोजी चेन्‍नई विमानतळावर विचारणा केली असता त्‍यांना सदरच्‍या फ्लाईटवर 5,000/- ची सुट असल्‍याचे कळले. त्‍यानंतर दिनांक 19/09/2018 रोजी विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍यास कळविले की, मुंबई ते नागपूर विमान भाडे रुपये 10,200/- असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात 5,200/- रुपये तक्रारकर्त्‍यास परत करण्‍याची आवश्‍यकता नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍यानी विरुध्‍द पक्षाच्‍या विविध पदस्‍थापीत व्‍यक्‍तींसोबत संपर्क केला परंतु त्‍यापैकी कोणीही तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात 5,200/- रुपये वळते केले नाही. ही विरुध्‍द पक्षाची तक्रारकर्त्‍याप्रती सेवेत ञुटी आहे त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने जिल्‍हा ग्राहक आयोग, नागपूर येथे तक्रार दाखल केली.

  1. तक्रारकर्त्‍याचे मागणी प्रमाणे विरुध्‍द पक्षाने सेवेत ञुटी केली असल्‍याचे घोषित करावे तसेच विरुध्‍द पक्षाचे त्‍यादिवशींचे आरक्षणासंबंधीचे सॉफ्टवेअर चेक करावे. चेन्‍नई विमानतळावरील दिनांक 17/09/2018 रोजी चेन्‍नई विमानतळावरील ऑफर चेक करण्‍याकरिता निर्देश द्यावेत. तसेच तक्रारकर्त्‍याचे रुपये 5,200/- परत करावे. तसेच विरुध्‍द पक्षांच्‍या  संचालकांच्‍या अध्‍यक्षाने प्रतिष्‍ठीत तक्रारकर्त्‍याची लिखीतमध्‍ये माफी मागावी. या घटनेमुळे तक्रारकर्त्‍याची प्रतिष्‍ठा धुळीस मिळाली आहे. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍यास शारीरिक, आर्थिक व अब्रु नुकसानीकरिता रुपये 10,00,000/-  व तक्रारीचा खर्च देण्‍यात यावा अशी मागणी तक्रारकर्त्‍याचे  आममुखत्‍यार श्री कुशल देवीदास सालोडकर यांनी केलेली आहे.
  2. विरुध्‍द पक्ष क्रमांक 1 ते 11 हे आयोगाची नोटीस प्राप्‍त होऊनही ते आयोगासमक्ष हजर झाले नाही करिता त्‍यांचे विरुध्‍द दिनांक 2/11/2019  रोजी प्रकरण एकतर्फा  चालविण्‍याचा आदेश पारित करण्‍यात आला.
  3. तक्रारकर्त्‍याने तक्रारीसोबत निशानी क्रमांक 2 वर दाखल दस्‍ताऐवज, लेखी युक्तिवाद व तोंडी युक्तिवाद ऐकल्‍यावर खालिल मुद्दे विचारात घेतले व त्‍यावरील कारणमिमांसा खालिलप्रमाणे नमुद आहे.

        अ.क्र.                  मुद्दे                                                                   निष्‍कर्ष

  1. तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?                                 होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?                        होय
  3. काय आदेश ?                                                                       अंतिम आदेशाप्रमाणे 

कारणमिमांसा

  1. तक्रारकर्त्‍याने दिनांक 15/02/2019  रोजी श्री कुशल देवीदास सालोडकर यांचे नावे नोटराईझ आममुखत्‍यारपञ केले असल्‍याची प्रत अभिलेखावर दाखल केली आहे.  तसेच तक्रारकर्त्‍याने जेट एअरवेज व्‍दारा दिनांक 17/09/2018 रोजी चेन्‍नई ते मुंबई व मुंबई ते नागपूर या  प्रवासाकरिता टिकीटाची प्रत अभिेलेखावर दाखल आहे. तसेच अॅनेक्‍सचर क्रमांक 4 वर तक्रारकर्त्‍याचे मुंबई ते नागपूर जाणा-या विमानाचे भाडे रुपये 5,000/- वरुन 11,200/- इतके असल्‍याचे प्रसिद्धी दिलेली आहे. तसेच अॅनेक्‍सचर क्रमांक 5 वर एम पी एम प्रायव्‍हेट लिमीटेड यांचे पञ अभिलेखावर दाखल आहे त्‍यात नमुद आहे की, तक्रारकर्त्‍याकडून रुपये 5,200/- अतिरीक्‍त घेतलेली आहे. यावरुन असे दिसून येते की, विरुध्‍द पक्षाने त्‍यांचा प्‍लॅटीनम सदस्‍य श्री दिपक चौधरी यांचेकडून सुद्धा रुपये 5,200/- ऑफर दिल्‍यानंतर सुद्धा अतिरीक्‍त वसुल केले. ही विरुध्‍द पक्षाची त्‍यांच्‍या सेवेतील ञुटी आहे. सबब आदेश खालिलप्रमाणे...

अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याचे अतिरीक्‍त रक्‍कम रुपये 5,200/- तक्रारकर्त्‍यास द.सा.द.शे. 16 टक्‍के दराने  व्‍याजासहीत वापस करावे.
  3. विरुध्‍दपक्षाने तक्रारकर्त्‍याला शारीरिक व मानसिक ञासाकरिता रुपये 5,000/- व तक्रारीख खर्च रुपये 5,000/- अदा करावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक   महिन्‍याच्‍या आत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभयपक्षांना आदेशाची प्रत निःशुल्‍क देण्‍यात यावी.
  6. तक्रारकर्ते यांना प्रकरणाची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.