सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
वसुली प्रकरण क्र.27/2014
श्री जॉन एडवर्ड लोबो
वय 50 वर्षे, धंदा- बेकार,
राहणार- खासकीलवाडा, सावंतवाडी,
ता.सावंतवाडी,जि. सिंधुदुर्ग ... फिर्यादी/तक्रारदार
विरुध्द
1) जिजस रियल इस्टेट सावंतवाडी तर्फे
प्रोप्रा.श्रीमती लुईजा कार्मा ट्राव्हासो
वय – सज्ञान, धंदा- नोकरी,
2) श्री नॉर्मन मॉर्गन ट्राव्हासो
वय – सज्ञान, धंदा – बिल्डर
अ.क्र.1 व 2 राहणार – मधलावाडा,
पंचक्रोशी हायस्कुलजवळ, घर नंबर 508,
हरमल, गोवा. ... विरुध्द पक्ष/आरोपी
गणपूर्तीः- 1) श्री. कमलाकांत ध.कुबल, प्रभारी अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्य.
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे – कोणी नाही
आदेश नि.42 वर
(दि. 14/10/2015)
द्वारा : मा. श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
1) तक्रारदार यांनी सिंधुदुर्ग मंचात दाखल केलेल्या मुळ तक्रार क्रमांक 32/2012 मधील आदेशाची अंमलबजावणी विरुध्द पक्ष यांनी न केल्यामुळे सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले होते.
2) दरम्यान आरोपी (विरुध्द पक्ष) यांनी मंचाच्या आदेशाप्रमाणे पूर्ण रक्कम तक्रारदार (फिर्यादी) यांना आज दि.14/10/2015 रोजी धनाकर्षाद्वारे दिली असल्यामुळे सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढणेबाबत फिर्यादी यांनी विनंती केलेली आहे.
3) त्यामुळे फिर्यादीच्या नि.42 च्या अर्जास अनुलक्षून हे मंच सदरचे प्रकरण निकाली काढत आहे. सबब आदेश पुढीलप्रमाणेः-
आदेश
1) तक्रारदार/फिर्यादी यांच्या नि.42 वरील अर्जास अनुसरुन सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) विरुध्द पक्ष यांचे बेलबाँड रद्द करण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 14/10/2015
Sd/- Sd/-
(के. डी. कुबल) (व्ही.जे. खान)
प्रभारी अध्यक्ष सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग