निकालपत्र तक्रारदाखलदिनांकः- 25.02.2010 तक्रारनोदणीदिनांकः- 05.03.2010 तक्रारनिकालदिनांकः- 05.07.2010 कालावधी 4 महिने जिल्हाग्राहकतक्रारनिवारणन्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकातबी. पांढरपटटे,B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाताजोशीB.Sc.LL.B. सौ.अनिताओस्तवालM.Sc. ------------------------------------------------------------------------------------------ सुभद्राबाई भ्र.सोपानराव पंडागळे अर्जदार वय 50 वर्षे धंदा घरकाम रा.ज्ञानेश्वरनगर, ( अड सचीन सुतार ) सखला प्लॉट परळी गेट, परभणी. विरुध्द 1 जिवनसेवा इनफोटेक इंडिया प्रा.लिमीटेड गैरअर्जदार मार्फत अथोराइज्ड सिग्नेटरी ( एकतर्फा ) रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, 403, जया इनकेव व्दारकापूरी कॉलनी पुंजागुटटा, हैद्राबाद, हैद्राबाद 500 082 ( आंध्रप्रदेश ) 2 रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीडेट ( अड. गोपाल दोडीया ) मार्फत अथोराइज्ड सिग्नेटरी तिसरा माळा, मालीक मोटारच्या वर ( टाटा मोटार्स ), थर्ड स्ट्रीट हिमायतनगर, हैद्राबाद 500029 ( आंध्रप्रदेश ). -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाताजोशी सदस्या 3) सौ.अनिताओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्रपारितव्दाराश्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष ) वैयक्तिक अपघात विमा पॉलीसीच्या जोखमीप्रमाणे विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली नाही म्हणून प्रस्तूतची तक्रार आहे. अर्जदाराचीथोडक्याततक्रारअशीकी, अर्जदारपरभणीयेथीलरहिवाशी आहे. तिचा मुलगा नागेश सोपानराव पंडागळे याने त्याचे हयातीत गैरअर्जदार क्रमांक 2 कंपनीची वैयक्तीक अपघात विमा पॉलीसी उतरविली होती. तीची मुदत दिनांक 23.01.2009 ते 22.01.2010 पर्यंत होती. सदर पॉलीसीमध्ये वैयक्तिक अपघातामध्ये मृत्यू करीता, कायमचे अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई देण्याची हमी गैरअर्जदाराने घेतली आहे. पॉलीसीवर अर्जदार हीचे नाव नॉमिनी म्हणून आहे. नुकसान भरपाई क्लेम संबंधीची कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे सादर करावीत असे पॉलीसी सर्टीफीकेट मध्ये नमूद केले असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 याना या कामी पार्टी केले आहे. दिनांक 23.04.2009 रोजी पॉलीसी होल्डर नागेश पंडागळे याचा मोटर सायकल क्रमांक एम.एच.22/जे 5284 वरुन जात असताना शिराळा जिंतूर रोडवर रस्त्यात वाहन स्लिप झाल्यामुळे दुपारी 1 चे दरम्यान अपघात होवून जबर जख्मी झाला होता. ग्रामीण हॉस्पिटल जवळा येथे उपचारासाठी त्याला सुरुवातीला अडमिट केले व त्यानंतर सिव्हील हॉस्पिटल परभणी येथे व त्यानंतर तेथूनही पुन्हा सिव्हील हॉस्पिटल, नादेड येथे अडमिट केले तिथे व्यवस्थित उपचार न झाल्याने घाटी हॉस्पिटल , औरंगाबाद येथे नेले परंतू उपचार चालू असताना दुर्दैवाने दिनांक 05.05.2009 रोजी त्याचा मृत्यू झाला. अपघात घटनेची नोंद पोलीसी स्टेशन हटटा यांच्याकडे गु.र.क्रमांक 18/09 प्रमाणे झालेली होती. दिनांक 05.05.2009 रोजी नागेशचे निधन झाल्यानंतर घाटी हॉस्पिटल मध्ये त्याचे शवविच्छेदन केले होते. त्यानंतर अर्जदार हीने गैरअर्जदाराकडून मुलाच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वकिलामार्फत दिनांक 04.01.2010 रोजी पाठवली पैकी गैरअर्जदार क्रमांक 1 यानी अर्जदारांच्या वकिलांना नोटीस उत्तर कुरीअरमार्फत पाठविले. त्यानंतरही अर्जदारास नुकसान भरपाईचा क्लेम मंजूर/नांमजूर केल्या संबधी काही एक कळविले नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी पाठविलेला लखोटा त्यामध्येही खुलासा दिला नव्हता त्यामुळे अर्जदाराने त्याची कायदेशीर दाद मिळण्यासाठी ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन पॉलीसी हमीप्रमाणे गैरअर्जदाराकडून नुकसान भरपाई रुपये 3,00,000/- द.सा.द.शे 18 % व्याजासह मिळावेत याखेरीज इतर खर्च रुपये 6000/-मानसिक त्रासापोटी रुपये 10000/- अर्जाचा खर्च रुपये 5000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. तक्रारअर्जाचेपुष्टयर्थअर्जदारानेआपलेशपथपत्र(नि. 2) वपुराव्यातीलकागदपत्रातनि. 4लगत गैरअर्जदारानी वकिलामार्फत पाठविलेल्या नोटीसच्या पोष्टाच्या पावती, गैरअर्जदार क्रमांक 1 ने पाठवलेला उत्तर लखोटा, हटटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिष्टर क्रमांक 18/9 मधील घटना पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र व पॉलीसी सर्टीफीकेट दाखल केले आहे. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यानी मंचाची नोटीस स्विकारुन देखील नेमलेली तारखेस मंचापुढे हजर झाले नाहीत किंवा आपला लेखी जबाब देण्याची व्यवस्था केली नाही त्यामुळे त्यांचे विरुध्द दिनांक 26.04.2010 रोजी एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अड. दोडीया हजर झाले व त्यानी लेखी म्हणणे सादर करण्यासाठी तीन वेळा मुदत मागितली ती मंजूर केली होती. संधी देवूनही लेखी म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांचे विरुध्द दिनांक 04.06.2010 रोजी ‘’ नो से ‘’ आदेश पारीत करण्यात आला. तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड. सुतार व गैरअर्जदारातर्फे अड दोडीया यानी युक्तिवाद केला. निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्ये. मुद्ये उत्तर 1 गैरअर्जदार क्रमांक 2 ने पॉलीसी होल्डर मयत निलेश पंडागळे अपघाती मृत्यूची डेथ क्लेमची नुकसान भरपाई अर्जदारास देण्याचे बाबतीत सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मुलगा नागेश पिता सोपानराव पंडागळे यानी त्याचे हयातीत गैरअर्जदार क्रमांक 2 या कंपनीची वैयक्तिक अपघात विमा पॉलीसी दिनांक 23.01.2009 रोजी घेतली होती हे शाबीत करण्यासाठी पुराव्यात सदर पॉलीसी सर्टीफीकेटची छायाप्रत नि. 4/7 दाखल केली आहे. तीचे अवलोकन केले असता पॉलीसी सर्टीफीकेट क्रमांक 663 असून पॉलीसीची मुदत 23.01.2009 ते 22.01.2010 या एक वर्षाची दिली असून अपघात नुकसान भरपाई कव्हरेज मध्ये अपघाती मृत्यू किंवा अपघाती कायमचे अपंगत्व संबंधी आहे तसेच नुकसान भरपाई कव्हरेज रुपये 3,00,000/- कंपनीने घेतले असल्याचे दिसते. सदर पॉलीसी वर असेही नमूद केले आहे की, पॉलीसी वैधते काळात विमेदाराचा मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई साठी गैरअर्जदार क्रमांक 1 अथवा गैरअर्जदार 2 यांच्याकडे क्लेम सादर करावा पॉलीसी होल्डर नागेश पंडागळे हा दिनांक 23.04.2009 रोजी मोटार सायकल कमांक एम.एच.22/जे 5284 वरुन त्याचे नातेवाईक राजकुमार बरोबर शिरळा ते जिंतूर रोडवरुन जात असताना दुपारचे 1.00 चे दरम्यान अपघातात जबर जख्मी झाला होता. अपघातानंतर त्याला सरकारी दवाखाना जवळा, त्यानंतर सरकारी दवाखाना परभणी व नांदेड येथे उपचार केला शेवटी घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे अडमिट केले होते परंतू उपचारा दरम्यान त्याचा दिनांक 05.05.2009 रोजी मृत्यू झाला ही वस्तूस्थिती अर्जदाराने पुराव्यात नि. 4 लगत दाखल केलेल्या पोलीस स्टेशन हटटा अपघाती मृत्यू र.क्र.18/09 मध्ये दिलेली एफ.आय.आर (नि. 4/3) घटनास्थळ पंचनामा (नि.4/4) मरणोत्तर पंचनामा (नि.4/5) प्रोव्हीजनल पी.एम.रिपोर्ट कम डेथ सर्टीफीकेट, मेडीकल कॉलेज औरंगाबाद या कागदपत्रातून शाबीत झालेले आहे. पॉलीसीमध्ये अर्जदार ( पॉलीसी होल्डरची आई ) चे नांव नॉमिनी म्हणून नमूद नोंदले असल्यामुळे नुकसान भरपाई रुपये 3,00,000/- मिळण्यासाठी अर्जदार हीने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे वरील कागदपत्रे पाठवली होती परंतू त्यानी क्लेम मंजूर अथवा नामंजूर केल्यासंबंधी काहीही कळविले नाही व गैरअर्जदार क्रमांक 1 यानी नोटीस उत्तर दाखल लखोटा पाठवला होता त्यामध्ये अर्जदाराने दिलेली कागदपत्रे परत पाठवले मात्र गैरअर्जदार क्रमांक 1 यानी कसलाही खुलासा किंवा नोटीस उत्तर दिले नाही असा मंचासमोर अर्जदारातर्फे अड. सुतार यानी निवेदन केले. संबंधीत लखोटा पुराव्यात नि. 4/2 वर दाखल केला आहे तो मंचासमोर उघडून पाहीला असता अड. सचीन सुतार यानी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याना दिनांक 21.12.2009 रोजी कायदेशीर नोटीसीव्दारे नुकसान भरपाईची मागणी केली असल्याचा उल्लेख आहे आणि नोटीस सोबत क्लेम फॉर्म एफ.आय.आर. इनक्वेस्ट पंचनामा, पी.एम.रिपोर्ट व पॉलीसीची कॉपी ही कागदपत्रे पाठवली होती असे दिसते. गैरअर्जदार क्रमांक 1 यानी अर्जदाराना वर नमूद केलेली कागदपत्रे नुकसान भरपाई मंजूर होण्याचे द्रृष्टीकोनातून पाठवली असताना क्लेम मंजूरी बाबत कुठलीही कारवाई न करता किंवा नोटीसला कसलेही उत्तर न देता अर्जदारातर्फे वकिलामार्फत पाठवलेली नोटीस व त्यासंबंधीचे कागदपत्रे जशीच्या तशी का परत पाठवली याचे आश्चर्य वाटते शिवाय त्याचे उत्तरही पाठवलेले नसल्याचे दिसते. गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनी यानी देखील अड. सुतार यानी क्लेम फॉर्म सोबत वर नमूद केलेली कागदपत्रे दिनांक 21.12.2009 रोजी रजि.पो. ने पाठविली होती त्याची पोष्टाची पावती पुराव्यात नि. 4/1 वर दाखल केली आहे. यावरुन गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीस देखील मयत नागेश पंडागळे याच्या अपघाती मृत्यूचा विमा क्लेम व कागदपत्रे मिळालेली होती हे स्पष्ट होते. गैरअर्जदार क्रमांक 2 तर्फे अड. दोडीया यानी या संदर्भात मंचापुढे असे निवेदन केले की, अड सुतार यानी कायदेशीर नोटीस सोबत पाठवलेल्या कागदाच्या कॉपी झेरॉक्स होते. एकही कागद सर्टीफाइड नव्हता त्यामुळे सर्टीफाइड कॉपीज व क्लेम फॉर्म भरुन दिल्यास नुकसान भरपाईचा विचार करण्यात येईल असे मंचापुढे निवेदन केले. अड.सुतार यानी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे क्लेम फॉर्म दिनांक 21.12.2009 रोजी पाठवला. नोटीस सोबत जोडलेली कागदपत्रे सर्टीफाइड नव्हती हा युक्तिवाद मान्य केला आहे त्यामुळे केवळ सर्टीफाइड कॉपीज अभावीच अर्जदाराचा नुकसान भरपाईचा क्लेम गैरअर्जदार क्रमांक 2 यानी प्रलंबित ठेवलेला होता तर क्लेमची कागदपत्रे मिळाल्यानंतर सर्टीफाइड कॉपीज पाठवण्या संबंधी वास्तविक गैरअर्जदार क्रमांक 2 यानी अर्जदारास लगेच कळवण्यास काहीच हरकत नव्हती मात्र तसे कळविले नसल्याने आणि गैरअर्जदार क्रमांक 1 यानी देखील अर्जदाराने पाठवलेला क्लेम व कागदपत्रास कसलेही प्रतिउत्तर न देता परत अर्जदार यांच्याकडे पाठवून गैरअर्जदार 1 व 2 यानी याबाबत निश्चीतपणे सेवा त्रूटी केलेली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार यानी आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत मयत पॉलीसी होल्डर नागेश पंडागळे याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 3,00,000/- ( रुपये तीन लाख फक्त ) मंजूर होण्याचे संदर्भात आवश्यक ती कागदपत्रे व क्लेम अर्जदाराकडून स्विकारुन नुकसान भरपाई द.सा.द.शे 9 % दराने तक्रार दाखल तारखेपासून पूर्ण रक्कम देय होइपर्यंत व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष मा.दोंन सदस्यानी दिलेल्या निकालपत्रातील आदेशाशी मी सहमत नाही म्हणून मी माझे वेगळे निकालपत्र या सोबत देत आहे. सौ. अनिता ओस्तवाल सदस्या मुद्ये उत्तर 1 सदरचा वाद या ग्राहक मंचासमोर चालण्यास पात्र आहे काय ? नाही 2 आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराचा मयत मुलगा नागेश सोपानराव पंडागळे याने त्याच्या हयातीत सदरची पॉलीसी गेरअर्जदार क्रमांक 2 कडून घेतली होती व नुकसान भरपाई क्लेम संबधीची कागदपत्रे गेरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे सादर करावयाची होती. महत्वाची बाब अशी आहे की, दोन्ही गैरअर्जदाराचे मुख्य कार्यालय किंवा शाखा कार्यालय, परभणी येथे नाही. तसेच विमेधारकाचा अपघात ज्या ठिकाणी झाला ते घटनास्थळ सिरळा ते जवळा जाणा-या रोडवर असल्याचे अपघाताची नोंद व घटना स्थळ पंचनामा यात नमूद करण्यात आले आहे व सदरचे घटनास्थळ हे हिंगोली जिल्हयाच्या हद्यीत येते तसेच विमेधारकाचा मृत्यू हा 05.05.2009 रोजी घाटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे झाला. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 11(2) नुसार. 1 तक्रार अर्ज स्थानिक अधिकार क्षेत्रातील संबंधीत जिल्हा मंचाकडे दाखल करता येतील ते असे. A विरुध्द पक्षकारांची संख्या एकापेक्षा जास्त असल्यास सर्व विरुध्द पक्षकार तक्रार अर्ज दाखल करते वेळी प्रत्यक्षात व स्वच्छेने सदर मंचाच्या कार्यक्षेत्रात रहात असतील किंवा धंदा अगर व्यापार करीत असतील किंवा तेथे त्यांचे शाखा कार्यालय असल्यास अथवा उपजिवेकेसाठी कोणताही धंदा अगर व्यवसाय. करीत असतील तर. B जर एका पेक्षा जास्त विरुध्द पक्षकार असतील व तक्रार अर्ज दाखल करतेवेळी त्या भागात कोणीही विरुध्द पक्षकार प्रत्यक्ष व स्वच्छेने त्या कार्यक्षेत्रात रहात असेल किवा उपजिवेकेसाठी कोणताही धंदा अगर व्यवसाय करीत असेल किंवा तेथे त्याचे शाखा कार्यालय असेल तर. परंतू अशा प्रकरणात एकतर जिल्हा मंचाची संमती घ्यावी लागेल किंवा जो विरुध्द पक्षकार त्या जिल्हा मंचाच्या कार्यक्षेत्रात राहात नसेल व उपजिवीकेसाठी धंदा अगर व्यवसाय करीत नसेल किंवा त्याचे शाखा कार्यालय नाही अशा व्यक्तिची संमती असणे आवश्यक आहे. 4 अधिकार क्षेत्रात अंशतः अगर पूर्णतः तक्रार अर्जास कारण घडले असेल तर. वरील विवेचनावरुन मला असे वाटते की, सदरचा वाद या मंचासमोर चालविता येणार नाही. कारण तक्रार दाखल करण्यासाठी कोणतेही कारण या मंचाच्या अधिकारक्षेत्रात घडलेले नाही म्हणून मुद्या क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवून मी खालील प्रमाणे आदेश देत आहे. आ दे श 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज त्यास परत करण्यात यावा. 2 संबंधीताना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सदस्या
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |