- आदेश निशाणी क्र.1 वर -
(मंचाचे निर्णयान्वये, श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 26 मे 2015)
1. सदर तक्रार गैरअर्जदाराने करारानुसार बांधकाम पूर्ण करुन दिले नाही, काम करणे सोडून दिले व अधिकचे रुपये 44,570/- उचल केली ते परत मिळण्याकरीता दाखल केली.
2. सदर तक्रार अर्ज नोंदणी करुन, अर्जदाराचे प्राथमिक सुनावणी करीता ठेवण्यात आले असता, अर्जदाराने प्राथमिक सुनावणीचे वेळी सदर प्रकरण मागे घेण्याचा अर्ज नि.क्र.3 नुसार दाखल केला. सदर अर्जावर प्रकरण मा.अध्यक्षांसमोर ठेवण्यात यावे असे आदेश करण्यात आले. प्रकरण मा.अध्यक्षासमोर दि.25.5.2015 व 26.5.2015 ला ठेवण्यात आले असता, अर्जदार दोन्ही पेशी तारखांवर गैरहजर होते.
3. नि.क्र.3 अर्जानुसार नुसार अर्जदारास प्रकरण मागे घ्यावयाचे असल्याने, सदर प्रकरण निकाली काढणे योग्य होईल, असे आमचे मत आहे. सबब, पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
// नि.क्र.1 वर आदेश //
1. अर्जदाराचे नि.क्र.3 वर दाखल अर्जाचे अनुषंगाने अर्जदारास सदर प्रकरण मागे घेण्यास परवानगी देऊन तक्रार अर्ज खारीज करण्यात येते.
(Complaint disposed by way of withdraw)
2. तक्रारीची मुळ प्रत सोडून उर्वरीत प्रती अर्जदाराला परत देण्यात यावे.
3. अर्जदाराने तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावा.
4. अर्जदारास आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 26/5/2015