Maharashtra

Kolhapur

CC/10/731

Mahadev Prabhu Kudache - Complainant(s)

Versus

Jaysingpur Udgaon Sahakari Bank Ltd., Jaysingpur - Opp.Party(s)

J.V.Navale

29 Apr 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/731
1. Mahadev Prabhu Kudache Plot No.45, Sangam Society, Near Sahyadri Starch, Behind Biroba Mandir, MIDC Miraj ...........Appellant(s)

Versus.
1. Jaysingpur Udgaon Sahakari Bank Ltd., JaysingpurPradhan Karyalaya, Jaysingpur, Tal.Shirol Dist.Kolhapur2. Mahadev Baburao RajmaneJaysingpur, Gat No.7, Tal.Shirol Kolhapur3. Mahendra Appa BagiDanwad, Tal.ShirolKolhapur4. Annasaheb Revgonda PatilJambhali, Tal.ShirolKolhapur5. Adinath Bala KudacheJaysingpur, Gandhi Chowk, Tal.ShirolKolhapur6. Bhupal Govind KhamkarJaysingpur, Khamkar Mala, Tal.ShirolKolhapur7. Ramesh Vitthal PatilAbdullat, Tal.Shirol, Kolhapur8. Bapuso Narasu ChouguleKurundwad, Patil Galli, Tal.ShirolKolhapur9. Rajesh Baslingappa SanikopJaysingpur, Tal.ShirolKolhapur10. Suresh Bhupal PatilUdgaon, Tal.ShirolKolhapur11. Damodar Shankar SutarHerwad, Tal. ShirolKolhapur12. Shivaji Shankar PolKawalapur,Tal.MirajSangli.13. Babu Shivappa GaurajKanwad, Tal.ShirolKolhapur14. Appaso Ramu NaruteMajarewadi, Tal.ShirolKolhapur15. Sau.Vinaya Ramesh GhorpadeKurundwad, Tal.ShirolKolhapur16. Sau.Mangaladevi Daragu GawadeShirol, Kolhapur17. Dilipkumar Jarappa AraliTejraj Maharaj, Udgaon, Behind Prabhakar Tiles, Tal.ShirolKolhapur18. Jyasingpur Udgaon Sahakari Bank Ltd.,JaysingpurBranch Dattanagar, Sakhar Karkhana Parisar, Tal.ShirolKolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :J.V.Navale, Advocate for Complainant

Dated : 29 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :-(दि.29.04.2011) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 व 18 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           सामनेवाला क्र.1 संस्‍था ही महाराष्‍ट्र सहकार कायद्याखाली नोंद झालेली सहकारी पतसंस्‍था आहे. सामनेवाला क्र.2 ते 16 हे सामनेवाला संस्‍थेचे संचालक आहेत. सामनेवाला क्र.17 हे सामनेवाला क्र.18 शाखेचे शाखाधिकारी आहेत.   सामनेवाला क्र.2 ते 18 हे सामनेवाला संस्‍थेच्‍या दैनंदिन कारभार व व्‍यवहारास जबाबदार आहेत. यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेव क्र. 003611 अन्‍वये रुपये 2,40,000/- ची ठेव दि.01.07.2009 रोजी ठेवली. सदर ठेवीवर रुपये 8.5 टक्‍के व्‍याजदर आहे. सदर ठेवीची मुदत दि.01.08.2010 रोजी संपलेली आहे. सदर ठेवीची मुदत संपलेवर तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे व्‍याजासह ठेव रक्‍कमेची मागणी केली असता सामनेवाला क्र.17 यांनी सदर पावतीवर मुदत सपंले तारखेस गोल करुन दि.31.08.2010 अशी तारीख टाकली व सही केली. तसेच, सदर पेमेंट व्‍याजासह अदा करीत आहे असे लिहून दिले. तथापि, तदनुसार ठेव रक्‍कम दिली नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.22.09.2010 रोजी लेखी अर्जाद्वारे व दि.25.10.2010 रोजीच्‍या वकिलामार्फत नोटीसीद्वारे सदर ठेव रक्‍कमेची मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या लेखी अर्जास खोटे उत्‍तर देवून ठेव ठेवलेलेचे आढळून येत नाही व सामनेवाला क्र.17 यांना एक वर्षापूर्वी काढून टाकले असलेचे व कायदेशीर कारवाई प्रलंबित असलेचे कळविले. अशा परिस्थितीत, तक्रारदारास ठेव रक्‍कम न देता उलट खोटया व लबाडीच्‍या ठेव पावतीच्‍या आधारे रक्‍कम लुबाडणेचा बनाव केला आहे वगैरे खोटे आरोप केले.   सदर उत्‍तरानुसार तक्रारदारांनी त्‍यांचे सेव्‍हींग खातेचे पुस्‍तक सामनेवाला क्र.18 यांचेकडे मागणी केले असता ते मिळत नसलेचे सांगून वेळकाढूपणा करु लागले. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.23.11.2010 रोजी लेखी पत्र दिले असता त्‍यावरही सदरचे जुने पासबुक मिळाले नसलेचे लिहून दिले. 
 
(3)        तक्रारदार त्‍यांच्‍या त‍क्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला हे तक्रारदारांना देणे लागत असलेली ठेवीची रक्‍कम देणेस टाळाटाळ करीत आहेत. सदर ठेवीची रक्‍कम देणेस सामनेवाला क्र. 2 ते 17 हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार आहेत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावती, सामनेवाला क्र.17 ने लिहून दिले पत्र, तक्रारदारांनी सामनेवाला क्र.17 कडे दिलेला रक्‍कम मागणी अर्ज,  वकिलामार्फत पाठविलेली नोटीस, संचालक यादी व सामनेवाला क्र.18 यांना जुने पासबुक मागणीबाबतचा अर्ज इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला 1 व 18 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केलेली ठेव सामनेवाला यांचेकडे ठेवलेबाबत चलनाची नोंद नाही व संगणकावरही नोंद नाही. सामनेवाला यांच्‍या शाखा दत्‍तनगर, शिरोळ या शाखेत दिलीप पराप्‍पा आरळी हे शाखाधिकारी म्‍हणून काम करीत होते, त्‍यांना त्‍यांच्‍या एकूण वर्तवणुकीवरुन व काही रक्‍कमेच्‍या अपहारावरुन दि.02.02.2010 रोजी बँकेतून बडतर्फ केले आहे. तक्रारदारांना सदर बाबीची माहिती असल्‍याने तक्रारदारांनी त्‍यांची ठेव पावतीची मुदत संपलेवर सामनेवाला बँकेकडे न येता सामनेवाला क्र.17 च्‍या घरी जावून तथाकथित ठेव पावती दाखविली व सामनेवाला यांनी तक्रारदाराला फसविण्‍याच्‍या हेतूने पावतीची डयु डेट 01.08.2010 ला गोल कंस करुन त्‍याठिकाणी स्‍वहस्‍ते 31.08.2010 अशी एक महिन्‍याची मुदत वाढवून सही केली. तसेच, सदर पावतीवर कॅशिअर/अधिकारी म्‍हणून सामनेवाला क्र.17 यांनीच बनावट सही केली आहे. कारण ठेव ठेवली त्‍यादिवशी दि.01.07.2009 रोजी कॅशिअर म्‍हणून बँकेच्‍या सदर शाखेत सौ.सुजाता अरुण पाटील या काम पहात होत्‍या. त्‍यावर त्‍यांची सही नाही. त्‍यामुळे सदरच्‍या ठेव पावतीची रक्‍कम कॅशिअरकेडे दिलेली नव्‍हती. यावरुन तक्रारदार व सामनेवाला क्र.17 यांचा संगनमताने बँकेस फसविण्‍याचा हेतू आहे किंवा सामनेवाला क्र.17 यांनी तक्रादारांकडून ठेव रक्‍कम स्विकारुन ती बँकेत न भरता स्‍वत:कडे ठेवली आहे.  तसेच, सामनेवाला क्र.17 यांचेविरुध्‍द फौजदारी कारवाई सुरु आहे. त्‍यामुळे तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत येवून सामनेवाला यांना रुपये 25,000/- कॉम्‍पेनसेटरी कॉस्‍ट देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.    
 
(6)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत मागणी केलेली ठेव पावती क्र.003611 ची रक्‍कम सामनेवाला बँकेकडे जमा नाही. तसेच, सदरची पावतीची रक्‍कम सामनेवाला क्र.17 यांनी स्‍वत:कडे ठेवून तक्रारदारांना पावती परस्‍पर दिलेचे किंवा तक्रारदार व सामनेवाला क्र.17 यांनी संगनमताने सदरची पावती करुन बँकेस फसवित असलेचे कथन केले आहे. त्‍यामुळे सदर ठेव पावतीची रक्‍कम देय नसलेचे प्रतिपादन सामनेवाला बँकेने केले आहे. सामनेवाला बँकेने त्‍यांच्‍या सदर म्‍हणण्‍यातील कथनांच्‍या पुष्‍टयर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा जसे की, सदर पावतीवरील कॅशिअरची सही सौ.सुजाता अरुण पाटील यांनी नसलेबाबत त्‍यांचे शपथपत्र, सामनेवाला क्र.17 यांचेविरुध्‍द फौजदारी कारवाई प्रलंबित असलेबाबतचे कागदपत्रे, तक्रारीतील ठेव ठेवले तारखेस सामनेवाला बँकेच्‍या दत्‍तनगर, शिरोळ शाखेत झालेल्‍या ठेवींबाबतचे सर्व व्‍यवहारांचा तपशील इत्‍यादी कागदपत्रे या मंचासमोर हजर करणेस सामनेवाला बँकेस काही अडचण नव्‍हती. तथापि, सामनेवाला बँकेने तसे केलेले नाही. त्‍यामुळे तक्रारदारांकडे असणारी ठेव पावती क्र.003611 ही सामनेवाला बँकेने तक्रारदारास दिलेली नाही ही बाब सामनेवाला बँक सिध्‍द करु शकलेले नाहीत.  तसेच, सामनेवाला बँकेने दाखल केलेले म्‍हणणेदेखील शपथेवर नाही. त्‍यामुळे सामनेवाला बॅंकेने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात केलेली कथने ग्राहय धरता येणार नाहीत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.     
 
(7)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये मुदतबंद ठेव ठेवली आहे व त्‍याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला यांनी सदर रक्‍कम देणेची कायद्याने कोणतीही जबाबदारी त्‍यांचेवर येत नसल्‍याचे प्रतिपादन केले आहे. परंतु, वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे मुदतबंद ठेव रक्‍कम ठेवली आहे व दि.22.09.2010 रोजीच्‍या अर्जान्‍वये व दि.25.10.2010 नोंद पोच डाकेने मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 17 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे असा युक्तिवाद तक्रारदारांच्‍या वकिलांनी केलेला आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ते 17 यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांच्‍या वकिलांनी केलेला युक्तिवाद फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(8)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेली ठेव पावती क्र.003611 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावती ही मुदत बंद ठेवींची आहे व  तिची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांची मुदत ठेव रक्‍कम पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.      उपरोक्‍त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मुदत बंद ठेव पावती क्र.003611 वरील रक्‍कम रुपये 2,40,000/- (रुपये दोन लाख चाळीस हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर ठेव पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(3)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT