Maharashtra

Kolhapur

CC/13/8

M/s. Dhanlaxmi Medical & General Stores, Jaysingpur Tal.Shirol, Dist.Kolhapur. For Proprietor Mr.Sunil Jakhgonda Patil - Complainant(s)

Versus

Jaysingpur -Udgaon Sahakari Bank Ltd., - Opp.Party(s)

Mr. U.S.Mangave

22 May 2014

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM, KOLHAPUR
Central Administrative Building, Second Floor,
South Side, Kasaba Bawada Road, Kolhapur.
Phone No. (0231) 2651327, Fax No. (0231) 2651327
.
 
Complaint Case No. CC/13/8
 
1. M/s. Dhanlaxmi Medical & General Stores, Jaysingpur Tal.Shirol, Dist.Kolhapur. For Proprietor Mr.Sunil Jakhgonda Patil
A/p. Hupari. Tal.Hatkangale
Kolhapur
...........Complainant(s)
Versus
1. Jaysingpur -Udgaon Sahakari Bank Ltd.,
Jaysingpur, Tal.Shirol,
Kolhapur
2. Jaysingpur-Udgaon Sahakari Bank Ltd., Jaysingpur on behalf of Chairman
Tal.Shirol,
Kolhapur
3. Jaysingpur-Udgaon Sahakari Bank Ltd., Jaysingpur on behalf of Manager
Tal.Shirol
Kolhapur
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'ABLE MR. Sanjay P. Borwal PRESIDENT
 HON'ABLE MR. Dinesh S. Gavali MEMBER
 
For the Complainant:
अॅड. उमेश माणगांवे, अॅड. संतोष तावदारे
 
For the Opp. Party:
अॅड. संदिप घाटगे
 
ORDER

निकालपत्र-(दि.22/05/2014)-व्‍दाराः- मा.श्री.दिनेश एस. गवळी, सदस्‍य  

1.    तक्रारदार यांनी सामनेवाले पतसंस्‍थेत मुदत बंद ठेव अन्‍वये गुंतवलेली रक्‍कम मागणी करुनही परत दिली नाही म्‍हणून त्‍यांनी प्रस्‍तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.

2.    तक्रारदार यांची थोडक्‍यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.1- जयसिंगपूर-उदगांव सह.बँक लि., जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्‍हापूर (यापुढे संक्षिप्‍तेसाठी पतसंस्‍था असे संबोधण्‍यात येईल)या पतसंस्‍थेत मुदत बंद ठेव पावती क्र.014420 अन्‍वये दि.25/10/1999 रोजी रक्‍कम रु.50,000/- इतकी 24 महिन्‍याकरिता द.सा.द.शे.14 % व्‍याजदराने गुंतविले होते. सदर ठेव रक्‍कमेची मुदत दि.25/10/2001 अखेर होती.

3    तक्रारदार यांनी सामनेवाला बॅंकेकडून व्‍यवसायाकरिता कर्ज उचल केले होते. व व्‍यवसायातील मंदीमुळे सदर कर्ज थकीत गेले. त्‍यामुळे सामनेवाला यांनी सहकार न्‍यायालय क्र.2 कोल्‍हापूर येथे तक्रारदारांचे विरुध्‍द हिशोबाचा दावा दाखल केला होता. तक्रारदार यांचे चुलत भाऊ श्री अमोल बापूसो पाटील व त्‍यांचे पत्‍नी यांनी तक्रारदाराचे कर्जाची पूर्णपणे व्‍याजासह परतफेड केली. तसा सामनेवाला बॅंकेने दाखलही दिलेला आहे. त्‍यानंतर तक्रारदार यांनी सामनेवाला बॅंकेकडे असलेल्‍या मुदत बंद ठेव पावतीची रक्‍कम व्‍याजासह मागणी केली असता सामनेवाला यांनी तक्रारदारास उडवाउडवीची उत्‍तरे देऊन सदरची ठेवीची रक्‍कम कर्जास वर्ग केलेचे सांगून ठेव रक्‍कम देणेस नकार दर्शविला. तक्रारदार यांची ठेव रक्‍कम देणेची सामनेवाला यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे. सामनेवाला यांची सदरची कृती ही अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब करणारी आहे.  त्‍यामुळे तक्रारदारास प्रचंड मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे. तक्रारदार यांनी सामनेवाला यांना वकीलामार्फत रजि.ए.डी.ने कायदेशीर नोटीस पाठवून रक्‍कमेची मागणी केली असता चुकीच्‍या मजकूराचे उत्‍तर सामनेवाला यांनी पाठविले आहे.

सबब, सामनेवाले यांचेकडून मुदत बंद ठेव पावतीवरील रक्‍कम रु.50,000/- व त्‍यावर द.सा.द.शे.14% प्रमाणे  होणा-या व्‍याजाची रक्‍कम रु.91,000/- तसेच मानसिक, शारिरीक  व आर्थिक त्रासापोटी रक्‍कम रु.50,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.10,000/- असे एकूण रक्‍कम रु.2,10,000/- सामनेवाला यांचेकडून व्‍याजासह वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.

4.    तक्रारदारांनी त्‍यांचे तक्रारीसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्र यादीमध्‍ये अ.क्र.1 वर मुदत बंद ठेव पावती क्र.014420 ची प्रत, अ.क्र.2वर सामनेवाला बँकेने तक्रारदारास दिलेला दाखला, अ.क्र.3 वर तक्रारदार यांनी सामनेवाला बँकेस वकीलामार्फत पाठविलेली नोटीस,अ.क्र.4वर सामनेवाला यांनी सदर नोटीसला पाठविलेले उत्‍तर,अ.क्र.5वर सामनेवाला बॅंकेच्‍या उत्‍तरी नोटीसला तक्रारदार यांनी पाठविलेले प्रतिउत्‍तर नोटीस इ.कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.04/7/13 रोजी पुराव्‍याचे शपथपत्र दाखल केले आहे.

5    सामनेवाले क्र.1 ते 3 यांचेवर नोटीसची बजावणी झालेवर सदर सामनेवाला यांनी एकत्रित लेखी म्‍हणणे/कैफियत दि.04/04/13 रोजी दाखल केले आहे. सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार परिच्‍छेदनिहाय  नाकारलेली आहे. सामनेवाला त्‍यांचे म्‍हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार यांनी श्री शितल नंदगावकर व श्री भरत अवटी यांना जामीन देऊन रुपये दोन लाख इतकी रक्‍कम दि.23/3/1999 रोजी सिक्‍युरिटी कॅश क्रेडीट कर्जाने उचल केलेली आहे. सदर कर्जाच्‍या वेळेस रु.50,000/- ची मुदतबंद ठेवीने ठेवण्‍याचे अटीवरच सदर कर्जास मंजूरी देणेत आलेली आहे. सदरची ठेव रक्‍कम ही कर्जाच्‍या सुरक्षिततेकरिता ठेवून घेणेत आलेली होती. तसेच मे.सहकार न्‍यायालय क्र.2 कोल्‍हापूर यांचे कोर्टातील दावा क्र.608/2002मध्‍ये तक्रारदार यांनी सदर रक्‍कम परत मिळणेकरिता अर्ज दाखल केला होता. तो अर्ज कोर्टाने नामंजूर केलेला आहे. मे. कोर्टाने संमती दर्शविलेने सदरची मुदत बंद ठेव रक्‍कम सामनेवाला यांनी तक्रारदार यांचे कर्जखाती दि.25/03/11 रोजी वर्ग करुन घेतलेली आहे. तसेच उर्वरित रक्‍कम रु. 3,60,000/- कर्जास जमा करुन एकूण रक्‍कम रु.4,42,176/- चे कर्ज पूर्णफेड करुन घेतलेले आहे. तसेच सामनेवाला यांनी दि.29/04/02 रोजी सहकार कायदा कलम 101 अन्‍वये वसुली दाखला मिळणेकरिता मे.सहाय्यक निबंधक सह.संस्‍था कोल्‍हापूर यांचेकडे लवाद अर्ज क्र.3/02 दाखल केला. त्‍यावर सुनावणी होऊन गुणदोषावर दि.04/04/05 रोजी वसुली दाखला मंजूर करणेत आलेला आहे. त्‍याप्रमाणे तक्रारदाराकडून कर्जाची पूर्णफेड करुन घेतलेली आहे. तसेच तक्रारदार यांनी कर्ज उचल करतेवेळी लिहून दिलेल्‍या कागदपत्रांमध्‍ये लेटर ऑफ लीन अॅन्‍ड सेट ऑफ लिहून दिलेले आहे. त्‍यातील अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारचे संमत्‍तीशिवाय ठेव रक्‍कम कर्ज खाती जमा करुन घेणेचा अधिकार सामनेवाला बँकेस प्राप्‍त झालेला आहे. तसेच सदर ठेव रक्‍कमेबाबत सहकार न्‍यायालय क्र.2,कोल्‍हापूर यांनी पूर्वीच तक्रार दाखल केली होती व त्‍याचा निर्णय देखील झाला असलेने त्‍याच मुद्दयावर पुन्‍हा तक्रार दाखल करणे कायदयाच्‍या विरोधात आहे. त्‍यामुळे एकाच स्‍वरुपाची दाद तक्रारदार यांना दोन्‍ही कोर्टात मागणी करता येणार नाही. सामनेवाला यांना त्रास देण्‍याचे हेतूनेच सदरची तक्रार दाखल करणेत आली असलेने प्रस्‍तुतची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत येऊन तक्रारदाराकडून रक्‍कम रु.25,000/- कॉम्‍पेसेंटरी कॉस्‍ट वसुल होऊन‍ मिळावी अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे.

6.    सामनेवाला यांनी त्‍यांचे म्‍हणणेसोबत दाखल केलेल्‍या कागदपत्र यादीमध्‍ये अ.क्र.1 वर सहाय्यक निबंधक, सहकारी संस्‍था यांनी सामनेवाला बॅंकेस तक्रारदार यांचेविरुध्‍द दिलेला वसुली दाखला, अ.क्र.2 वर तक्रारदार यांनी लिहून दिलेली वचनचिठ्ठी, अ.क्र.3 वर तक्रारदार यांचा कर्ज मागणी अर्ज, अ.क्र.4 वर तक्रारदार यांनी लिहून दिलेला कंटिन्‍युर्इंग गॅरंटी बॉन्‍ड, अ.क्र.5 वर तक्रारदार यांचा जामीनकतबा, अ.क्र.6 वर तक्रारदारांचा कर्जरोखा, अ.क्र.7 वर तक्रारदार यांनी लिहून दिलेले लेटर ऑफ लिन अॅन्‍ड सेट ऑफ, अ.क्र.8 वर तक्रारदार यांचा खातेउतारा इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच दि.30/04/14 रोजी दाखल केलेल्‍या कागदपत्र यादीमध्‍ये अ.क्र.1 वर सामनेवाला बँकेने अधिकारासंबंधी केलेला ठराव कारण लागू पुरता उतारा, अ.क्र.2 वर दावा 608/02 चे कामी दिलेला अर्ज दावा व त्‍यामधील निर्णय यांच्‍या सत्‍यप्रती इत्‍यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.

7.    तक्रारदार यांची तक्रार, दाखल कागदपत्रे व सामनेवाले यांच्या कैफियती/म्‍हणणे, उभय पक्षकारांच्‍या वकीलांचा युक्‍तीवाद याचा विचार होता, तक्रारीच्‍या न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.

अ.क्र.

मुद्दे

    उत्‍तर

1

तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे ग्राहक आहे‍त काय ?

    होय

2

सामनेवाले यांनी तक्रारदार यांना दयावयाच्‍या सेवेत

त्रुटी केली आहे काय ?

    नाही

3

आदेश काय ?

तक्रार नामंजूर

 

                       कारणमिमांसाः-

मुद्दा क्र.1 -  तक्रारदार यांनी मुदत बंद ठेव पावती स्‍वरुपात गुंतविलेल्‍या रक्‍कमेची पावतीची छायांकित प्रती सादर केलेली आहे. सामनेवाले यांनी तक्रारदार यांची मुदत बंद ठेव स्‍वरुपातील रक्‍कम सामनेवाले यांनी नाकारलेल्‍या नाहीत. मुदत बंद ठेव स्‍वरुपात  गुंतविलेल्‍या रक्‍कमेचा विचार होता, तक्रारदार हे सामनेवाले यांचे  ग्राहक आहेत असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे, म्‍हणुन मुद्दा क्र.1 चे उत्‍तर हे मंच होकारार्थी देत आहे.

मुद्दा क्र.2 –प्रस्‍तुत कामी तक्रारदार यांनी सामनेवाला बँकेत दि.25/10/1999 रोजी रक्‍कम रु.50,000/- ठेव स्‍वरुपात ठेवली होती त्‍याची देय मुदत दि.25/10/2001 अशी होती. तिचा पावती क्र.14420 असा आहे. ठेव पावती सामनेवाला यांचेकडे ठेवली याबाबत वाद नाही. तथापि, सदर ठेव पावतीची मुदत संपली असतानादेखील सदर ठेव पावतीची रक्‍कम सामनेवाला यांनी दिली नाही. तसेच तक्रारदारांची कोणतीही संमती न घेता सदरची रक्‍कम कर्जास वर्ग केलेचे सांगून ठेव रक्‍कम देणेस नकार दिला. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराची ठेव ठेवीची रक्‍कम कर्ज खात्‍यास वर्ग करुन तक्रारदारांना दयावयाचे सेवेत त्रुटी केली आहे का? हा वादाचा मुद्दा उपस्थित होतो. सदर मुद्दयाचे अनुषंगाने तक्रारदारांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता अ.क्र.1 कडील मुदत ठेव पावती पाहिली असता सदर ठेव पावतीवर धनलक्ष्‍मी मेडिकल जनरल स्‍टोअर्स जयसिंगपूर असे नमुद असून रक्‍कम रु.50,000/- इतकी आहे. सदर ठेवपावती देय ता.25/10/01 नमूद आहे. स्विकृत दि.6 एप्रिल,2000 अशी नमुद आहे. अ.क्र.2 कडील सामनेवाला बॅंकेने दिलेला दाखला असून सदर दाखल्‍यावर धनलक्ष्‍मी मेडिकल अॅन्‍ड जनरल स्‍टोअर्स असे नमुद असून त्‍यामध्‍ये आपण बँकेकडून दि.04/1/1997 रोजी कर्ज रक्‍कम रु.2,00,000/- इतके घेतले असून आपलेकडून आजरोजी सदर कर्जाची संपूर्ण परतफेड झालेली आहे. अशा मजूकराचा दि.25/3/11 रोजीचा दाखला दिलेला आहे. या दोन्‍ही कागदपत्रावरुन तक्रारदारांनी सामनेवाला बॅंकेकडे मुदतबंद ठेव पावती रक्‍कम रु.50,000/- ठेवली होती हे दिसून येते. तसेच अ.क्र.2 कडील सामनेवाला यांनी दिलेल्‍या दाखल्‍यावरुन तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे कर्ज मागितलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. तथापि, सामनेवाला यांनी दि.02/05/13 रोजी दाखल केलेल्‍या अ.क्र. 1 ते 8 कडील कागदपत्रांचे या मंचाने अवलोकन केले असता अ.क्र.1 कडे दावा क्र.3/02सहाय्यक निबंधक यांनी तक्रारदार यांचेविरुध्‍द दिलेला वसुली दाखला दाखल केलेला असून सदर दाखल्‍यावरुन रक्‍कम रु.2,43,955/- तसेच रक्‍कम रु.1,70,530/- यावर दि.27/04/2002 पासून संपूर्ण रक्‍कम परत मिळेपावेतो.द.सा.द.शे.19 टक्‍के दराने होणारी व्‍याजाची रक्‍कम तक्रारदार यांचेकडून वसुल करावी असा वसुली दाखला आहे. अ.क.2 वर वचनचि‍ठ्ठी अ.क्र.3 वर कर्ज मागणी अर्ज, पाहिला असता सदर अर्जावर धनलक्ष्‍मी जनरल स्‍टोअर्स, श्री सुनिल जरवगोंडा पाटील यांचे नावाचा कर्ज मागणी अर्ज असून अ.क्र.4 वर कंटिन्‍यू गॅरंटी बॉन्‍ड व अ.क्र.5 वर जामीनकतबा अ.क.6 कडे सर्व्‍हे उतारा, इत्‍यादी कागदपत्रे पाहिली असता सदर कागदपत्रावरुन यातील तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडे रक्‍कम रु.2,00,000/-चे कर्ज घेतले होते हे स्‍पष्‍ट होते. तसेच अ.क्र.7 वरील लेटर ऑफ लिन अॅन्‍ड सेट ऑफ चे पत्रामधील कलम 2 पाहिले असता सदर कलमामध्‍ये ‘’ माझ्या/आमच्‍या कुठल्‍याही एकत्रित किंवा संयुक्तिकरित्‍या असलेल्‍या खातेवरील नांवे रक्‍कम वा इतर देणे मग ते खरे अथवा आकस्मित उदभवणारे, प्राथमिक वा अनुषंगिक, एकत्र वा संयुक्तिकरित्‍या असून, वळते करणेस आमची संमती आहे असे नमूद असून सदर पत्रावर तक्रारदारांची सही प्रोप्रायटर म्‍हणून आहे. तसेच बँकेने तक्रारदारांचा खातेउतारा जोडला असून सदरचा खातेउतारा सामनेवाला बँकेने दाखल केला असून सदर खातेउता-यावर सामेनवाला बँकेने 25, मार्च 2011 राजी तक्रारदारांची ठेव पावतीची रक्‍कम त्‍यांचे कर्ज खातेस वर्ग केलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. सदरचे खाते बंद केलेचे दिसून येते.

     तक्रारदारांचे तक्रार अर्जातील नमुद करतात त्‍यापमाणे सामनेवाला बॅंकेने तक्रारदारांची संमती न घेता त्‍यांची ठेव पावतीची रक्‍कम त्‍यांचे कर्ज खातेस वर्ग केली आहे हे तक्रारदारांचे म्‍हणणे सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या अ.क.7 कडील कागदपत्रावरुन पूर्णपणे चुकीचे ठरते. कारण सदर कागदपत्राप्रमाणे तक्रारदारांनी बँकेत त्‍यांचे नांवे असलेल्‍या रक्‍कमा त्‍यांना न कळविता त्‍यांचे कर्जास वळते करण्‍यास संमती आहे असे लेटर ऑफ लीन अॅन्‍ड सेट ऑफ या पत्रान्‍वये सामनेवाला यांना लिहून दिले असून त्‍यावर तक्रारदारांची सही आहे. याचाच अर्थ तक्रारदारांनी त्‍यांचे कर्ज खातेस त्‍यांचे ठेव पावतीची रक्‍कम वर्ग करणेस संमती आहे असा होतो. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्‍या कागदपत्रावरुन तक्रारदारांची ठेव पावतीची रक्‍कम व्‍याजासहीत तक्रारदारांचे कर्ज खातेस जमा केली आहे. त्‍यावरुन तक्रारदारांचे संपूर्ण कर्ज परतफेड केलेचा दाखला दि.25/3/11 रोजी सामनेवाला बँकेने तक्रारदारांना दिला आहे.

     वरील सर्व बाबींचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवालाकडून घेतलेल्‍या कर्जापोटी तक्रारदाराची ठेवीची रक्‍कम तक्रारदाराचे कर्जास वर्ग केलेचे स्‍पष्‍टपणे दिसून येते. सबब तक्रारदारांची संमती न घेता सामनेवाला बॅंकेने ठेव पावतीची रक्‍कम कर्ज खातेस वर्ग केली हे तक्रारदाराचे म्‍हणणे हे मंच मान्‍य करीत नाही. तक्रारदाराचे कर्ज पूर्णफेड झालेचे तक्रारदार हे त्‍यांचे तक्रारअर्जासोबत दाखल केलेल्‍या अ.क.2 वरील कागदपत्रावरुन स्‍पष्‍ट होते. सबब वरील सर्व बाबींचा विचार करता सामनेवाला बँकेने तक्रारदाराचे कर्ज खातेस ठेव पावतीची रक्‍कम वर्ग करुन कोणतीही सेवेत त्रुटी ठेवलेली नाही या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्‍त्‍र हे मंच नकारार्थी देत आहे.

मुद्दा क्र.3 -  सबब, मंच पुढीलप्रमाणे आदेश देत आहे.

 

आदेश

 

  1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्‍यात येत आहे.
  2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
  3. आदेशाच्‍या प्रमाणित प्रतीं उभय पक्षकारांना विनामुल्‍य पाठविण्‍यात याव्‍यात.
 
 
[HON'ABLE MR. Sanjay P. Borwal]
PRESIDENT
 
[HON'ABLE MR. Dinesh S. Gavali]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.