Maharashtra

Kolhapur

CC/09/469

Baburao Bapurao Hendre - Complainant(s)

Versus

Jayjawan Nagari Sah Pat Sanstha - Opp.Party(s)

S.N.Mudagal

06 Nov 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/09/469
1. Baburao Bapurao HendreShahunagar.Kabnur.Ichalkaranji Kolhapur2. Sou.Sunanda Bandu BurandeR/o. as above3. Sou.Rukmini Baburao HendreR/o. as above4. Sou.Mandakini Vijay ChambulkarR/o. as above5. Shri Nagnath Baburao HendreR/o.as above ...........Appellant(s)

Versus.
1. Jayjawan Nagari Sah Pat Sanstha Mukat Sainik Vashat Ichalkaranji Kolhapur2. Shivaji Mahadev KhavareShanti Nagar.Ichalkarnji. Tal - Hatkanangale. Kolhapur3. Bapuso Dhondiba Khamkar Mukat Sanik Vasahat,Ichalkarnji Tal - Hatkanangale. Kolhapur4. Sambhaji Ramrao Khochare.Shanti Nagar.,Ichalkarnji Tal - Hatkanangale. Kolhapur5. Sudam Dadu Kambale.Mukat Sanik Vasahat,Ichalkarnji Tal - Hatkanangale. Kolhapur6. Ramchandra Bandu Lohar.Mukat Sanik Vasahat,Ichalkarnji Tal - Hatkanangale. Kolhapur7. Prakash Lahu Gaikwad Mukat Sanik Vasahat,Ichalkarnji Tal - Hatkanangale. Kolhapur8. Sou.Suvarna Bhauso ChavanMukat Sanik Vasahat,Ichalkarnji Tal - Hatkanangale. Kolhapur9. Balaso Baburao Mane.Awale Galli Ichalkarnji Tal - Hatkanangale. Kolhapur10. Dattatray Krishna More.Krishna Nagar.Shapur Road.Ichalkaranji.Kolhapur11. Rajendra Devappa SalunkheShantinagar.Ichalkaranji.Tal-Hatkanangale.Kolhapur, 12. Vilas Pandurang Kumbhar.Shantinagar.Ichalkaranji.Tal-Hatkanangale.Kolhapur, 13. Sakharam Ramchandra Daware.Shantinagar.Ichalkaranji.Tal-Hatkanangale.Kolhapur, 14. Kamal Rajaram Shendge.Mukat Sainik Vasahat.Ichalkarnji.Tal-Hatkanangale Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :S.N.Mudagal, Advocate for Complainant

Dated : 06 Nov 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.06.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2, 3, 5, 6, 7, 8, 11, 12 व 13 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम
1.
902
8000/-
04.11.2003
05.10.2009
16000/-
2.
554
7000/-
21.11.2002
21.11.2007
14000/-
3.
743
5000/-
30.04.2003
01.07.2008
10000/-
4.
723
15000/-
16.04.2003
17.04.2008
30000/-
5.
721
20000/-
16.04.2003
17.04.2008
40000/-
6.
722
15000/-
16.04.2003
17.04.2008
30000/-
7.
724
5000/-
16.04.2003
17.04.2008
10000/-
8.
अल्‍पबचत ठेव योजना खाते क्र.405
9000/-
--
--
--

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. सदरच्‍या ठेव तक्रारदारांनी त्‍यांच्‍या मुलींच्‍या लग्‍नाकरिता ठेवल्‍या होत्‍या. तक्रारदार क्र.1 हे यंत्रमागावरील कामगार असून त्‍यांना मिळणा-या उत्‍पन्‍नात सर्व कौटुंबिक खर्च भागवावा लागतो.  तक्रारदारांना आर्थिक व पर्यायाने मानसिक त्रास सहन करावा लागत आहे व लागत आहे.  तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.2, 3, 5, 6, 7, 8, 11, 12 व 13यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला संस्‍थेची नोंदणी दि.31.03.2008 रोजी उपनिबंधक, सहकारी संस्‍था, हातकणंगले यांचे आदेशान्‍वये नोंदणी रद्द केलेली आहे.  उपनिबंधक यांनी सदरची संस्‍था अवसायानात काढलेने संपूर्ण व्‍यवहार बंद आहेत. अवसायकास पक्षकार केलेले नाही.  प्रस्‍तुत सामनेवाला हे सामनेवाला संस्‍थेचे कधीही संचालक नव्‍हते. तक्रारदारांना सुनंदा बंडू बराडे, नागनाथ बाबुराव हेंद्रे, रुक्‍मीणी बापूराव हेंद्रे, सौ.मंदाकिनी विजय चंबुळकर यांच्‍यावतीने ठेवी मागण्‍याचा अथवा तक्रार अर्ज दाखल करणेचा कोणताही अधिकार नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. 
 
(6)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 14 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(7)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर अल्‍पबचत ठेव योजना खाते क्र. 405 वर दि.12.07.2007 रोजीअखेर रुपये 9,000/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूद तारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
देय मुदतपूर्ण रक्‍कम
व्‍याजदेय तारीख
1.
902
16000/-
05.10.2009
2.
554
14000/-
21.11.2007
3.
743
10000/-
01.07.2008
4.
723
30000/-
17.04.2008
5.
721
40000/-
17.04.2008
6.
722
30000/-
17.04.2008
7.
724
10000/-
17.04.2008

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.405 वरील रक्‍कम रुपये 9,000/- (रुपये नऊ हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.12.07.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

 


[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER